साहित्य: अळूची मध्यम आकाराची ७/८ पाने
दीड वाटी आंबट ताक
एक वाटी गोड दही
एक मोठा चमचा दाण्याचे कूट
दोन हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी तूप हिंग व जिरे
मीठ, व कोथींबीर
अळूची देठे कापून सोलून बारीक चिरा.
अळूच्या पानाचे तळहाताएवढे तुकडे करा.
पानाची सुरनळी करा. जस कागदाची करतो त्याप्रमाणे.
या सुरनळीला गाठ मारा. या झाल्या गाठी.
तूप हिंग जिरे याची फोडणी करून, त्यात हिरव्या मिरच्या व देठी व गाठी परतून मग त्यावर आंबट ताक ओता.
थोडे मीठ घालून या गाठी नीट शिजवायच्या. ताक जवळजवळ आटून जाइल.
मग गॅसवरून खाली उतरवून थोडे थंड झाल्यावर त्यात दही, थोडी साखर्(चवीला), दाण्याचे कूट, कोथींबीर घालून
एकत्र करून सर्व्ह करा.
पाने छोटी तळहाताएवढी असतील तर तुकडे करावे लागणार नाहीत.
मोठी पाने असल्यास तळहाताएवढे तुकडे करायचे.
पाने जून असतील तर वळताना व गाठ मारताना फाटतात.
पाने थोडी कोवळी असावीत्.ताक आंबट नसेल तर थोडी चिंच टाकावी.
अरे वा.
अरे वा. मस्त वाटतेय देठी गाठी! अळूची पानं मिळवायला हवीत.
हा वेगळाच
हा वेगळाच आहे अळूचा प्रकार. देठांच्या शीरा निघतील त्यानेच गाठी मारायच्या ना ?
ऋषींच्या
ऋषींच्या भाजीत घालतात ना अश्या देठी/गाठी करून?
नुसत्या नव्हत्या खाल्ल्या. आता करून बघेन.
सिंडरेला न
सिंडरेला
_
नाही नाही, पानाची वळकटी करायची अन त्याचीच गाठ घालायची . वड्यांचं अळू असेल तर जमत नाहीत. फिकट हिरव्या रंगाची , भाजीच्या अळूची कोवळी पानं हवीत. ( तसली पानं विकण्यावर या देशात बंदी असावी बहुतेक, जशी चुका, चाकवत, चवळी ( पाला ) या भाज्यांवर आहे
अच्छा. इथे
अच्छा. इथे जी colocasia ची रोपे मिळतात त्यात खाण्याच्या अळूचा प्रकार असतो का ?
एशियन
एशियन दुकानात अळूचे गड्डे मिळतात, ते लावायचे असे मैत्रिणीने सांगितले. तिने लावले होते उन्हाळ्यात, तिला विचारेन.
अश्या अजून द्या.
रेसिपी छान आहे.
आजचा 'बी'
आजचा 'बी' खिताब कोणाला बरे द्यावा ?
शोभेचे अळू वेगळे - ते कोलोकेशिया नावाने मिळतात. कधी कधी हत्तीचे कान या नावाने पण मिळतात.
खायच्या अळूची पानं पटेल बंधू अन त्यांच्या व्यवसाय बंधूंकडे मिळतात. ती नेहेमी वड्या करण्याकरता चांगली अशी मिळतात. आमच्या पार्ल्यात भाजीच्या अळूची पानं वेगळी मिळायची अन वड्याच्या अळवाची वेगळी.
इथे निरस्तपादपे देशे या न्यायाने वडीच्या पानांचं फदफदे करतात लोक. पण त्या पानांच्या गाठी जमत नाहीत. अनेकदा प्रयत्न करून अनुभवांती आलेले शहाणपण...
आजचा 'बी'
आजचा 'बी' खिताब कोणाला बरे द्यावा ? >>> भाजीची पानं इथे कुठे मिळणार म्हणुन म्हंटले त्या कोलोकेशिया प्रकारात एखादा खाण्याचा प्रकार असतो का चौकशी करावी
तशी आमच्या श्रीरामपूरात पण वड्यांची आणि भाजीची पाने वेगवेगळी मिळतात हो 
इथे फ्रोझन वड्यांचे फदफदे करतात असे पण ऐकीवात आहे
गाठी
गाठी नाहीत, पण वड्यांच्या अळूंची भाजी करता येते पानं आधी नुसती थोड्या तेलावर परतून घेतली तर. (मी केलेली नाही, पण ऐकलंय.)
वेगळाच
वेगळाच प्रकार दिसतोय. शोन्य्य, इथल्या इंडियन स्टोअरची अळूची पानं चालतील का ग? तुला माहितेय असं दिसतंय.
माझी आजी
माझी आजी अशीच भाजी करायची.. गाठी कशा मारायची ते कोणालाच माहीत नव्हते. पण त्या पुरचूंडीसारख्या दिसायच्या. गाठीच्या आधी पाने चुलीवर २-३ सेकंद नरम करुन घ्यायची बहुतेक. ती भाजी तिच्या एकाही सुनेने शिकुन घेतली नाही म्हणुन मी अजुनही खुप हळहळते.
ह्या कृतीबद्दल धन्यवाद. ह्या पद्धतीने करुन पाहिन.
एक
एक शंका..
फोडणीत ताक घातले तर फुटत नाही का? की ताकाला थोडं बेसन लावून घालायचं?
कोंकणी मधे
कोंकणी मधे यालाच गंटी बुत्ती म्हणतात. खाली मी एक लिंक देतो आहे. त्यावर गेलात की सचित्र ही कृती तुम्हाला दिसेल. मी आणि माझी एक कोकंणी मैत्रीण आम्ही दोघांमिळून ही भाजी केली होती. पण का कुणास ठावूक माझी जिभ नंतर दिवसभर चरचर चरचर करत होती. बहुतेक नीट वाफवली गेली नसावी. विदर्भात अळूला चमकुरा म्हणतात.
बर खाली लिंक पहायला इसरू नका.
http://dalitoy.blogspot.com/2007/09/tere-panna-ganti-butti-colocasia-lea...
शोनू, माझ्या नावाचा किताब दिलास पण त्यामागचे उद्दीष्ट निदान मला तरी कळू दे
हा प्रकार
हा प्रकार छान लागतो. मी या गाठींच्या आत, भिजवलेली चण्याची डाळ, खोबरे वगैरे घालतो.
बी, अळू हे
बी, अळू हे ९०% वेळा खाजरं असतं. त्यात काहीतरी आंबट पदार्थ घालून त्याची खाज नष्ट करतात. त्यामुळे अळूच्या कुठल्याही कृतीत काहीतरी आंबट पदार्थ असतोच असतो जसं की चिंच, आमसूल, आंबट दही वगैरे..
मंजे,
मंजे, अळूवडीत आंबट काय असतं? नसतं ना..
बी, आम्ही
बी,
आम्ही अळूवडीत चिंच्-गूळ घालतो.... तांदूळाच्या पीठाच्या करायच्या असतील तर आंबट ढाण ताक घालतो.
फोडणीत ताक
फोडणीत ताक फुटते. पण सगळ ताक आटवून टाकायचे. मग या गाठींना ताकाचे बारीक बारीक गोळे चिकटलेले दिसतात. अगदी बारीक. ते छान लागत. हा पदार्थ उपासाला करत असल्याने पीठ नाही लावत. शिवाय उपासाला हिंग ही नाही घालत.
फक्त जिरे. अळूच्या कुठल्याही पदार्थात चिंच आमसुल, ताक वगैरे घातले नाही तर अळू खाजते. व हे आंबट पदार्थ आपल्या नेहमीच्या अंदाजापेक्षा ज्यास्तच घालायचे.
अळूचे जे कंद मिळतात, याला अरवी किंवा अळकुड्या म्हणतात. याही कुकर मधे भरपूर चिंच व मीठ घालून शिजवून व बटाट्याप्रमाणे सोलून खायला अत्यंत चवदार लागतात. जराशा बुळबुळीत लागतात. पण फार चवदार.
मस्त भाजी!!
मस्त भाजी!! कध्धी नव्हती ऐकली. नेमके इथल्या दुकानात आळु मिळत नाही. मिळाला की नक्की करून बघेन.
आळकुड्यांची एक भाजी बंगलोरला स्वयंपाक करणार्या बाईंकडून शिकले. आळकुड्या कुकरमधे शिजवून सोलून घ्यायच्या. ताटलीत हळद तिखट, मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला, दाण्याचा कूट एकत्र कालवून एकेक आळकुडी ह्या मिश्रणत घोळून शॅलो फ्राय करायची. (कॅलरी कॉन्शस न होता खायची.)
..............
दादल्याच्या खर्चाच्या, लाल काळ्या मिर्च्यांचा, वर्हाडी हा ठेचा बाई मी कुटला, जाऊ नगा आज माझ्या वाटला!!!!
बी, चमकुरा
बी, चमकुरा नाही रे ते. चामकुरा बरं का.
ही टीपीकल
ही टीपीकल कोकणी भाजी आहे. अगदी ऋषीची भाजी म्हणून गोवा-रत्नागीरीला फेमस. भाजीचाच अळू छान लागतो. वडीचा अळूची पाने चालु शकतात पण काहीतरी वेगळी चव लागते(मी दोन्ही खावून पाहीलेत.) खरे तर उपासाला नारळाच्या दूधात करतात ही भाजी. ताक काही काही जण टाकतात. नारळाच्या दूधात करून पहा. नारळचे दूध, एखादे कोकम्,एखादी हिरवी मिरची नी जिरे नी मस्तच लागते.
ते चुलीत थोडीसी पान गरम करून मग पटकन गाठ बसते. खोबरे नी बेसन वगैरे optional आहे जर ती उपासाला नसेल तर. पण मस्त प्रकार आहे.
बरीच वर्षे झाली खावून.
चायनीज मार्केटात अळूची भाजीची पाने मिळतात्.(इथे तरी) आता NJ चे माहीत नाही. वडीचा अळू ज्यास्त खजरा असतो. तसे दोन्ही अळूच खजरे म्हणून चिंचेच्या पाण्यात भिजवावी ती पाने नी मग गाठी माराव्या चुलीत किंचीत शेकून. नाहीतर सरळ तव्यावर शेकून गाठ मारावी.
छान
छान
मस्त वाटतीय रेसीपी, गाठी
मस्त वाटतीय रेसीपी, गाठी कश्या करायच्या मला कळल्या नाहीत.
कोणी फोटो टाकेल का?
https://youtu.be/JVmUkhQMw5Y
https://youtu.be/JVmUkhQMw5Y
दहा वर्शांनी धागा वर आला.
दहा वर्शांनी धागा वर आला. मस्त वाटतेय भाजी.