सध्या उन्हाळा -ऑक्टोबर हीट-आहे.या दिवसात कधी कधी डेअरीतून आणलेले दूध तापायला ठेवले कि ते नासते किंवा पूर्ण चोथा-पाणी झालेले दिसत नाही पण नासल्यागत दिसते.. जर या दूधाची चव कडू नसेल तर अशा दूधाचे आपण पनीर करतो ते भाजीत वापरतो किंवा पनीर भुरजी,स्टफ पनीर पराठा ,कटलेट मध्ये वापरतो ..या पनीर मधे साखर घालुन गॅसवर आळवुन त्याचा गोड कलाकंद करतो..या अशा दूधापासुन जाळीदार आणि खूपच चवदार घावनं करता येतील .त्यासाठी लागणारं साहित्यः---
असे नासलेले दूध,
तांदळाचे पिठ,
१ किंवा २ चमचे बारीक रवा ,[एकुण साहित्याप्रमाणे]
जिरे.
हिरवी मिरची बारीक चिरलेली,
किसलेले आले,
बारीक चिरलेला कांदा,
चवीप्रमाणे मीठ,
कोथिंबीर बारीक चिरलेली,
तेल पाव वाटी.
नॉन स्टिक तवा /वॉक असेल तर पहिल्या घावनापुरते एक टी-स्पुन तेल तव्याला लावुन घ्यावे.त्यानंतर पुन्हा तेल वापरावे लागत नाही.
जितकी घावनं करायची असतील त्या अंदाजाने नासलेले दूध घेवुन मिक्सरमधे फिरवुन एकजीव करुन घ्यावे.
त्यात तांदूळपिठी व रवा घालुन मिश्रण कालवुन घ्या.
१० मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवावे.
आता त्यात हि .मिरची,आले, कांदा ,कोथिंबीर व चवीपुरते मिठ घालुन मिश्र पुन्हा एकदा कालवुन घ्यावे.घावन /धिरडी घालण्यासाठी लागते तसे पिठ असावे..
नॉन स्टिक पॅन तापवुन त्यावत १ टी स्पून तेल घालुन त्यावर मिश्रण घालावे.वर झा़कण ठेवावे.शिजले कि झाकण काढुन घावन उलटवुन त्याची दुसरी बाजु ,तव्यावर पुन्हा तेल न टाकता भाजुन घ्यावी.
अशा पद्धतीने सर्व घावनं करुन घ्यावी.
टोमॅटो-सॉस व कोथिंबीर-खोबरे-हिरवी मिरची-आले घालुन केलेल्या चटणीबरोबर खावी.
गोड घावनं करताना मिक्सरमधुन एकजीव केलेल्या दूधात तांदुळ पिठ,रवा,ओले खोबरे,चवीपुरते गूळ/पिठी साखर आणि कणभर मिठ घालुन करावी.
छान कल्पना.
छान कल्पना.
ए़क दिवस आधि मिळाली
ए़क दिवस आधि मिळाली असति तर्.... त्या दिवशी दूध नासलेले... असो.. (FRY PAN . "मस्त आहे)
घावन ं मस्त दिस त आहे .. माझी आवडती डीश चहा आणि घावन ...........
सुलेखा, अप्रतिम मस्तच जाळिदार
सुलेखा, अप्रतिम मस्तच जाळिदार झालियेत घावनं
मला प्रचंड आवडतात आनि कायम
मला प्रचंड आवडतात आनि कायम फसतात...नाही जमत

ह्या पदधतीने करुन पाहेन
गुपचुप मीठ टाकु का दुधात ...आजीची नजर चुकवुन
वा फारच सुरेख दिसतायत घावन!
वा फारच सुरेख दिसतायत घावन! आत्ताच तोंपासु.!
मस्त रेसीपी. पण हल्ली दुधच
मस्त रेसीपी. पण हल्ली दुधच नासत नाही
व्वा..मस्त दिसतायत!
व्वा..मस्त दिसतायत!
हा प्रकार माहित नव्हता. नक्की
हा प्रकार माहित नव्हता. नक्की करून बघेन! बहुतकरून गोडाची करेन
सुलेखा, मस्त!! यासाठी अगदी
सुलेखा, मस्त!!
यासाठी अगदी चोथापाणी झालेले चालणार नाही ना?
आता पुढच्यावेळी कधी दुधातून 'ढॉम्!' आवाज येईल तेव्हा खबरदारीचे उपाय योजण्यात वेळ घालवण्यापेक्षा ही घावनं करावीत हे उत्तम
दुधातून 'ढॉम्!' आवाज >>
दुधातून 'ढॉम्!' आवाज >>
पर्फेक्ट! दूध हा आवाज करून उडी मारतं. तेव्हा आपला घावनाचा बेट तडीस जाणार ही खूणगाठ बांधावी! 
ढॉम आवाजाबद्दल अगदी अगदी. मला
ढॉम आवाजाबद्दल अगदी अगदी.

मला तर असं झालं की एखादा पेशंट अचानक गास्प करू लागल्यासारखं दु:ख होतं.
उद्या रवा घालून घावणे करण्यात येतील.
धन्यवाद सुलेखा.
त्या वोकची कंपनी कुठलीय?
मंजुडी-----चोथापाणी झाल्यावर
मंजुडी-----चोथापाणी झाल्यावर ही चालेल.फक्त दूधाला कडवट चव नको .
श्रुष्टी १४,-----खरंच फ्राय पॅन /वॉक मस्त मोठेठे आहे.त्यामुळे पेपर दोसा/दोसा ही मोठ्ठा करता येतो..त्याला तेल ही अगदी नांवापुरते लागते.जड आहे त्यामुळे छान भाजता येते.
अनुसुया,---असं मुद्दाम दूध नासवायची गरज नाही.तू दूधात पिठ भिजव ना..तीच चव येईल.
मंजुडी-पौर्णिमा-----"ढॉम!" आवाज ...अगदी बरोब्बर.
मुक्तेश्वर,----कधीतरी अशी वेळ येतेच..नाहीतर घावनाचे पिठ दूधात भिजवायचे ..
सह्ही! एकदम यम्मी दिसतायत
सह्ही! एकदम यम्मी दिसतायत घावन!
इथे दूध उकळत नाही त्यामुळे नासण्याचा प्रश्न येत नाही, दूध घालुन करुन बघेन )
सुलेखा, फ्राय पॅनचे डिटेल्स
सुलेखा, फ्राय पॅनचे डिटेल्स सांगणे प्लीजच.

बाकी, घावन म्हणजे जीव आणि प्राणसुद्धा. मस्त दिसतंय.
धारा. उसगावातलं IKEA 365
धारा. उसगावातलं IKEA 365 ..Diameter --Inner base 10 inches ,Outer surface 13 inches या मापाचे असुन त्याला एका बाजुला दमदार अर्धगोल कडी तर दुसरीकडे लांब दांडा आहे..चायनीज पदार्थ करण्यासाठी ही उपयोगी आहे.
धन्यवाद
धन्यवाद
पनीर आणि दुध एकत्र करून पण
पनीर आणि दुध एकत्र करून पण करता येईल ना हे घावन?
मंजूडी आणि पौर्णिमा.. मस्त
मंजूडी आणि पौर्णिमा.. मस्त पोस्ट
मंजू
मंजू
सुलेखा, नासलेले दुध वापरायची
सुलेखा, नासलेले दुध वापरायची आइडीया मस्त....ह्या घावनांमधे खवलेला नारळ व किसलेले आले घातल्यावर अजून छान चव येते.....
मस्त! एकदम फ्लफी दिसतायत
मस्त! एकदम फ्लफी दिसतायत घावन.

वाडेश्वर मध्ये सेट डोसा मिळतो, तो कसा बनवतात माहिती आहे का? तो पण असाच फ्लफी दिसतो.
दीपाक ७३, दूध व पनीर
दीपाक ७३, दूध व पनीर मिक्सरमधे फिरवुन घातले तर अगदी तशीच चव येईल.
सुमेधाव्ही, खवलेला नारळ व आले घातले तर निश्चितच छान वेगळी चव येईल.मी गोड घावनात नारळ घालते.
दक्षिणा, मंजुडी व पौर्णिमे ने अगदी योग्य शब्द वापरला आहे..किती छान आकलन झाले.
सुलेखातै, फोटू न रेस्पी मस्त!
सेट डोसा - बेकिंग सोडा नाही
सेट डोसा - बेकिंग सोडा नाही घातला तरी चालतो
http://www.tarladalal.com/Set-Dosa-4987r
सुंदर दिसताहेत पण लाजोला +१
सुंदर दिसताहेत पण लाजोला +१
फक्त दूध वापरले तर ती चव
फक्त दूध वापरले तर ती चव येणार नाही.त्यासाठी दूधात थोडे पनीर घालावे लागेल..
सुलेखा काल मी नुसत्या ताज्या
सुलेखा काल मी नुसत्या ताज्या दुधाची केली होती..मस्त झाली होती चवीला.अर्थात मला मुळ चव माहीती नाही.पण घरी आवडली सगळ्यांना...धन्यवाद
मंजुडीच्या स्पर्धेतल्या
मंजुडीच्या स्पर्धेतल्या पाकृ.वरुन इथे उडी मारुन आले.
मस्त आहे कृती.
वर फेमस झालेला 'ढॉम्!' आवाज आमच्याकडे कधी ऐकु येत नाही त्यामुळे पनीर अधिक दूध असेच वापरणार.
काल सकाळी ढाँ आवाज ऐकला आणि
काल सकाळी ढाँ आवाज ऐकला आणि बस्स.... सुमेधा तुमचीच आठवण आली. त्वरीत पाकॄ कृतीत आणली. फक्त चवीपुरते मीठ घातले होते. खुप छान झाले. धन्स.
मागच्या वीकांताला दूध
मागच्या वीकांताला दूध नासल्याने ही पाककृती करून बघितली. जमली.
मायबोलीमुळे आयत्या वेळी उद्भवणार्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत.
Pages