सध्याचा जमाना आहे डाएटचा! तर या डाएट फॅड ला आमचाही हातभार म्हणून आम्ही तुम्हाला हस्तकलेच्या माध्यमातून न-पदार्थ करायला उद्युक्त करत आहोत. म्हणजे काय की वस्तु/पदार्थ पाहून तोंडाला पाणी तर सुटलं पाहिजे पण शेवटी पोटात जाईल... फक्त तोंडाला सुटलेलं पाणी. बाकी काहीही नाही.
काही अंदाज? जौदे! आता वाचाच आणि कराच!!
खाद्यपदार्थ सदृश वस्तु, खाण्यास अयोग्य अशा जिन्नसांपासून बनवायची.
नियम व अटी -
१. खाण्यालायक कुठलाही जिन्नस वापरण्यास सक्त मनाई.
२. अंतिम वस्तु सर्वमान्य अशा कुठल्याही खाद्यपदार्थासारखी दिसली पाहिजे.
३. अंतिम वस्तुचा फोटो आवश्यक आहे.
४. वापरलेल्या वस्तूंची यादी व थोड्क्यात कृती लिहीणे आवश्यक आहे. कृती च्या पायर्यांचे (स्टेप बाय स्टेप) फोटो देता आल्यास उत्तम पण अनिवार्य नाहीत.
५. एका सभासदामागे एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
६. मायबोली सभासदत्व अनिवार्य.
७. या स्पर्धेत सर्व मायबोलीकर आणि त्यांच्या १२ वर्षांवरील मुलांना सहभागी होता येईल. मुले पालकांच्या सभासदत्वाने (आयडी) येऊ शकतात. मात्र कुठल्या सभासदत्वाचा मुलगा/मुलगी हे सांगणे आवश्यक आहे.
प्रवेशिका कशा पाठवाल?
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृप सदस्यत्व घ्या. हा गृप सदस्य नोंदणीकरता १९ सप्टेंबरला खुला करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
२. याच गृपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०१२ गृप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
तों.पा.सू. - पदार्थाचे नाव - स्वतःचा मायबोली आयडी
४. विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची मधून (ड्रॉपडाऊन मेन्यु) 'मायबोली, उपक्रम' हा पर्याय निवडा.
५. शब्दखुणा या चौकटीमध्ये तों.पा.सु., मायबोली गणेशोत्सव २०१२ हे शब्द (मध्ये स्वल्पविराम देउन) लिहा.
६. मजकूरात आपली प्रवेशिका लिहावी/कॉपी-पेस्ट करावी.
७. मजकूरात प्रकाशचित्र टाकायचे असल्यास मजकूराच्या चौकटीखालील 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
९. Save ची कळ दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, तेवढी कळ काढा आता तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
प्रवेशिका दि. १९ सप्टेंबर २०१२, गणेश चतुर्थीपासून, (भारतीय प्रमाणवेळेनुसार), स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख, अनंत चतुर्दशी, दि. २९ सप्टें२०१२, (अमेरिकेच्या पश्चिम किनार्याच्या प्रमाणवेळेनुसार) ही आहे.
या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येइल.
अरे!! भारी स्पर्धा!!
अरे!!
भारी स्पर्धा!!
लय भारी.. दुनियाभर
लय भारी.. दुनियाभर खाद्यपदार्थांपासून डेकोरेशन करायच्या स्पर्धा असतात. इथे बाकीच्या वस्तूंचे खाद्यपदार्थ बनवायचे..
आयडिया आवडली!
आयडिया आवडली!
कल्पक आहे स्पर्धा हा वरचा
कल्पक आहे स्पर्धा
हा वरचा फोटो एकदम मस्त!
सही आयडीया!! फोटो एकदम
सही आयडीया!! फोटो एकदम तोंपासु
एकदम इनोवेटिव !!
एकदम इनोवेटिव !!
फोटोतला हात मामीचा आहे का?
फोटोतला हात मामीचा आहे का?
ही पण स्पर्धा भारी !
ही पण स्पर्धा भारी !
भारी आहे स्पर्धा!
भारी आहे स्पर्धा!
ओ सो इनोवेटिव !!! 'डाएट फॅड
ओ सो इनोवेटिव !!!
'डाएट फॅड ला आमचाही हातभार''
मस्तच एकदम!
मस्तच एकदम!
लय भारी!!! मस्त आयडिया
लय भारी!!!
मस्त आयडिया
मंजे, तू माझ्या हातामागे हात
मंजे, तू माझ्या हातामागे हात धुऊन का लागलियेस?
एकदम अभिनव कल्पना...भाग
एकदम अभिनव कल्पना...भाग घ्यायला मिळेल की नाही त्याची शंका आहे
सही स्पर्धा आहे..
सही स्पर्धा आहे..
मामी, यात विदेशी शक्तींचा हात
मामी, यात विदेशी शक्तींचा हात दिसतो आहे
ही पण स्पर्धा खूप आवडली.
ही पण स्पर्धा खूप आवडली. कल्पक!!
@युगंधर शक्यता नाकारता येत
@युगंधर
शक्यता नाकारता येत नाही
कल्पक स्पर्धा . फोटोतला हात
कल्पक स्पर्धा .
फोटोतला हात मामीचा आहे का? >>> मंजुडी, मला तो हह चा हात वाटतो .
मला लाजो चा वाटतोय. स्पर्धा
मला लाजो चा वाटतोय.

स्पर्धा मस्त आहेत सगळ्या. मला विशेष आवड नाही पण पहायला मजा येइल.
एकदम भारी आहे कल्पना. खूप
एकदम भारी आहे कल्पना. खूप आवडली.
मस्त स्पर्धा आहे. आमच्याकडून
मस्त स्पर्धा आहे. आमच्याकडून प्रवेशिका येण्याची दाट शक्यता आहे
आयडिया मस्तच आहे.... काय बरे
आयडिया मस्तच आहे.... काय बरे करावे असा विचार करणारी बाहुली
अरे लय भारी ! एकदम कल्पक.
अरे लय भारी ! एकदम कल्पक.
वा! वा!!! एकदम मस्तच......खूप
वा! वा!!! एकदम मस्तच......खूप आवडली कल्पना.
मस्त स्पर्धा!!! एकदम वेगळी
मस्त स्पर्धा!!! एकदम वेगळी ..
प्रवेशिका पहायला उत्सुक आहोत..
आमच्याकडून प्रवेशिका येण्याची दाट शक्यता आहे >> अरे वा सायो गुड लक
मंडळी, गणेशोत्सव आठ दिवसांवर
मंडळी,
गणेशोत्सव आठ दिवसांवर आलाय. तों.पा.सू. पदार्थासाठीच्या लागणार्या जिन्नसांची जमवाजमव सुरू केलीत ना?
मस्त मस्त !
मस्त मस्त !
अत्यंत कल्पक स्पर्धा.
अत्यंत कल्पक स्पर्धा. प्रवेशिका पहायला मजा येईल
अरे वा, .पण १२ वर्षांचा खालिल
अरे वा, .पण १२ वर्षांचा खालिल मुलांना नाही का भाग घेता येणार?
Pages