जिन्नस घरात असले तर झटपट होणारे लाडू आहेत.बिघडण्याची रिस्क तर अजिबात नाही. आज जास्त प्रमाणात केले आहेत्.ते प्रमाण दिले आहे.प्रमाण कमी घेतले तर वेळ कमी लागेल.इथे मिश्रण थंड होण्याचाही वेळ मोजला आहे.एका वाटी खोबरा बूरा घेवुन केले तर १५ मिनिटात लाडू तयार होतात.
लागणारे जिन्नसः-
६वाट्या खोबरा बूरा.किंवा डेसिकेटेड कोकोनट.
४ वाट्या एव्हरीडे मिल्क पावडर.
१ १/२ वाटी पिठी साखर.
२ वाट्या हापुस आंब्याचा रस.
मिक्सर मधुन आमरस फिरवुन घ्यावा.त्यातील गुठळ्या मोडल्या पाहिजेत.
एका मोठ्या मावे.च्या बाऊल मध्ये खोबरा बूरा+मिल्क पावडर+पिठीसाखर हाताने मिक्स करुन घ्या.आता त्यात आमरस थोडा-थोडा टाकत मिश्रण छान कालवुन घ्या.सगळे मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
आता मावे.मधे हाय-पॉवर वर २-२-२ मिनिटे असे ३ वेळा ठेवले.प्रत्येक वेळी मिश्रण चमच्याने छान ढवळुन घेतले.मिश्रणाचे लहान गोल गोळी वळुन पाहिली तर ती थोडी बसत होती , मिश्रण थोडेसे ओलसर वाटले म्हणुन शेवटी अजुन एकदा २ मिनिटे ठेवले.आता बाऊल मावे च्या बाहेर काढुन ठेवला.
मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर तिळाच्या लाडूच्या आकारचे लाडू वळायला सुरवात केली.एका ताटात लाडू वळुन ठेवले.
पुर्ण गार झाल्यावर आस्वाद घेण्यासाठी एका बाऊल मधे भरुन ठेवले.
२] वरील मोजमापाप्रमाणे आपल्याला पाहिजे असेल तितक्या प्रमाणात डेसिकेटेड खोबरे,मिल्कपावडर्,पिठीसाखर व अगदी थोडेसे दुध किंवा साय घेतली तरी चालेल.[मिश्रण ओलसर होईल इतकेच]हे सगळे एकत्र करुन मावेत शिजवुन घ्या.या मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात कोको पावडर मिसळुन ३० सेकंद मावेत ठेवा.मिश्रण थंड झाले कि अगदी लहान मुदाळ्यात किंवा वाटीत दोन्ही मिश्रण अर्धे -अर्धे भरुन त्याच्या वड्या करा.
कोको पावडर मिश्रणाला चॉकलेटी रंग येईल इतकीच घालावी.जास्त घातल्यास कोको चा कडु पणा जाणवेल.त्यासाठी टी स्पून वापरावा व तयार मिश्रणाची चव पहावी.
चॉकोलेट चवीच्या वड्या चवीला खूप छान लागतात..
१] आंब्याचा नैसर्गिक रंग आणि स्वाद आहे.कोणतेही एसेन्स व तूप अजिबात वापरले नाही.
२]हापुस ऐवजी इतर कोणताही आंबा वापरता येतो.
३]केशरी रंगाचा रस असला तर तयार लाडू ला तळलेल्या गुलाबजाम सारखा सुरेख रंग येतो.
४]आमरसाच्या गोडीवर पिठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करता येते.
५]पिठीसाखर घालताना एव्हरीडे मिल्क पावडर गोड आहे हे लक्षात असु द्यावे.
त्यामुळे सगळे मिश्रण कालवुन चव पहावी.
६]आंब्याप्रमाणे काप्या फणस,अननस.स्ट्राबेरी चा पल्प,ड्रिंकींग-चॉकोलेट घालुन हे लाडू करता येतील.
७]लाडू च्या आत गुलकंद्,काजु-बदाम तुकडा,चॉकोलेट मिश्रण थोडेसे वेगळे शिजवुन त्याची लहान गोळी आत भरुन दोन रंगातले लाडू करता येतील.
८]कोणतेही फळ न घालता फक्त खोबरा बूरा,व मिल्क पावडर,पिठी साखर व हे मिश्रण भिजेल इतपत दुध घालुन तर मावामिश्रीचे अप्रतिम सुंदर पांढरे लाडू तयार होतात.त्यामुळे ऐन वेळी प्रसंग उत्तम साजरा करता येतो.
९] चुकुन कधी मिश्रण सैल रहिले तर-- तर लाडू वळुन एका लहान प्लेट मधे खोबरा बूरा घेवुन त्यात घोळवावे.
खोबरा - बुरा म्हण्जे
खोबरा - बुरा म्हण्जे डेसिकनेटेड कोकोनट का ?????
फोटो पाहुन तोंपासु
वा, सुंदर रंग आलाय. चवीला पण
वा, सुंदर रंग आलाय. चवीला पण छानच असतील !
अनुसुया -होय.खोबरा बूरा
अनुसुया -होय.खोबरा बूरा म्हणजे डेसिकेटेड कोकोनट.
व्वॉव! काय दिसतायत लाडु! एकदम
व्वॉव! काय दिसतायत लाडु! एकदम तोंपासु!
दिनेशदा,नैसर्गिक रंग आहे आणि
दिनेशदा,नैसर्गिक रंग आहे आणि खरंच अप्रतिम चव आहे!!
सुंदर.... आजच करणार!!!!
सुंदर.... आजच करणार!!!! सगळ्या गोष्टी आहेत घरी. आणि मावे मधल्या सगळ्या रेसीपी मला आवडतात कारण त्या चुकत नाहीत. मला ते गॅस वर पाक करणे वगैरे जमत नाही. हे बरे.
मस्त सोप्पी रेसेपी.....ठांकु.....
तोपासु
तोपासु
खुप च छान .. रन्ग अगदी खुलुन
खुप च छान .. रन्ग अगदी खुलुन आलाय...
मावे नसेल तर काय करावे?
वॉव्व! खास दिसत आहेत. टिपाही
वॉव्व! खास दिसत आहेत.
टिपाही आवडल्या.
मस्त दिसताहेत लाडू
मस्त दिसताहेत लाडू
डेसिकेटेड कोकोनट आणि
डेसिकेटेड कोकोनट आणि कन्डेन्स्ड मिल्क वापरून मी खोबर्याचे लाडू करते. त्यात आमरस घालून करून बघेन आता.
दीपाली, मावे नसेल तर
दीपाली, मावे नसेल तर नॉन्-स्टिक पॅन मधे गॅस वर आळवुन करता येईल्.जर पॅन नसेल तर खाली तवा आणि त्यावर कढई[म्हणजे मिश्रण करपणार नाही.]ठेवुन सतत मिश्रण ढवळावे.
सहिच... करुन बघतेच.
सहिच...
करुन बघतेच.
वा.. फारच सुरेख,..... आमच्या
वा.. फारच सुरेख,.....
आमच्या सारख्या ब्याचलरांना सुद्धा सहज जमेल
सुलेखा खुप छान रेसिपी सध्या
सुलेखा खुप छान रेसिपी सध्या आयते आंबे आहेतच..
पण वेलची पावडर, काजु घातले तर अजुन छान चव येईल ना?
मी हे असच मिल्क पावडर ऐवजी खवा घालुन नारळाच्या वड्या बनवते त्याही छान चवीच्या होतात.
सुलेखा, पुस्तक कधी येणार तुझं
सुलेखा, पुस्तक कधी येणार तुझं रेसिपीजचं?
'रुचिरा' नंतरचं हीट पुस्तक सुलेखाचं 'सुरुची' 
अतिसुंदर
अतिसुंदर
लाडू अगदी सह्ही झालेत. चव पण
लाडू अगदी सह्ही झालेत. चव पण अप्रतिमच असणार. इतक्या मस्त रेसिपी बद्दल धन्यवाद.
मस्त!
मस्त!
खुपच छान दिसतायत लाडू..!!
खुपच छान दिसतायत लाडू..!! करुन बघेन
डेसीकेटेड कोकोनटऐवजी भाजलेला
डेसीकेटेड कोकोनटऐवजी भाजलेला रवा वापरला तर.. ?
सारीका ,ती चव येणार
सारीका ,ती चव येणार नाही.आंब्याचा शीरा सदृश चव येईल.
सह्हीच! काय सुंदर केशरी रंग
सह्हीच!

काय सुंदर केशरी रंग आलाय.... इथे आंब्याचा सिझन नाही अत्ता पण पल्प वापरून करुन बघेन. किंवा चॉकलेट
काय सुंदर दिसताहेत लाडु.
काय सुंदर दिसताहेत लाडु. मस्तच.
मस्त, सुबक दिसतायत लाडू.
मस्त, सुबक दिसतायत लाडू.
काय सुरेख दिसतायत
काय सुरेख दिसतायत लाडू.
सुलेखा, तुमच्या रेसीपीज मस्त असतात.
तोंपासु!!! रंग अप्रतिम आला
तोंपासु!!!
रंग अप्रतिम आला आहे. एक लाडु पटकन तोंडात घालावा असं वाटतय, इति मिश्टर!
माझ्याकडे आंबा पल्प आहे त्याचे करुन बघते!
काय रंग आलाय अफलातुन... मस्त
काय रंग आलाय अफलातुन... मस्त आहे रेसिपी..
सुलेखा: __/\__ अजून एक किलर
सुलेखा:
__/\__
अजून एक किलर रेसिपी!!!
भारी.... शमिकाला दाखवले आहे.
भारी....
शमिकाला दाखवले आहे. उद्या करणार आणि मस्तपैकी हाणणार...
Pages