http://www.maayboli.com/node/30435
http://www.maayboli.com/node/30957
http://www.maayboli.com/node/31336
दिनांक, २५.१०.११, उठल्या, उठल्या, कॅमेरा हातात घेऊन बाहेर डोकावले. आणि सुर्यदेवाच्या स्वागतासाठी काढलेली नक्षी बघून मंत्रमुग्धच झाले.
१.
२.सुर्यदेवालाही मग नक्षी बघण्याची घाई झाली.
३.हे हेलिकॉप्टर खूप खालून फेर्या मारत होत.
४.नेहमी प्रमाणे नाश्ता-चहा उरकून, चक्रधरांची वाट पहात उन्हात उभे होतो. तर हे साहेब आमच्याही आधी येथे हजर होते.
६.चला! चक्रधर आले, आणि मार्गक्रमण सुरु झाले. आमच्या बरोबर ह्या ही फ़िरायला निघाल्या होत्या.
७.एक शाळेची बस आमच्या समोरच थांबली. त्यात एकही विद्यार्थी चढला नाही. बस सुरू झाली आणि मग बसवर चढण्याची ही घाई.
९.
एवढा घाटाचा व अरूंद रस्ता असताना ह्या कसरतींची काही गरज आहे का? त्यांच्याकडे पहाता, हे नेहमीचच आहे हे जाणवत होत. त्या गाडीच्या मागूनच आमची गाडी चालली होती. त्या मुलांकडे पाहून, आम्हालाच भिती वाटत होती. का करतात असा वेडेपणा ही मुलं?
१०.आकाश भरून येत होतं. आजही पाऊस पडून, बर्फ़वृष्टी होणार होती.
इथे अजून रहायची इच्छा अनावर झाली होती. पण आमच्याजवळ वेळच नव्हता.
आज आम्ही एक संग्रहालय बघणार होतो. ते आहे निकोलस रोयरीच यांच. जाता जाता काढलेले, तिथेल्या १२.बागेतील हे काही फोटो.
१७.ही पहा छोटी-छोटी घरे. पण ही अशी कशासाठी बांधली होती, ते मात्र विचारायच राहिल.
२३.हा आहे त्यावेळचा एक रुपया.
२३.हा आहे तेव्हाचा टाईप रायटर.
२४.हा रोयरिच कुटूंबाचा ’टी सेट’
२५. १९६७-६८ साली इंदिरा गांधी, यांनी इथे भेट देऊन, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
२६. हे २५.०५.५९, ला लिहिलेले एक पत्र.
२७. ही त्यावेळची तिजोरी.
२८. हेच ते संग्रहालय.
हे संपूर्ण लाकडाचे बांधलेले आहे. हे खूपच जुने आहे. येथे एक पाटी लिहिलेली आहे. "एका वेळी ४-५ पेक्षा जास्त माणसानी, वरच्या मजल्यावर जाऊ नये." जास्त वजन, ते लाकडाचे जूनं बांधकाम, आता पेलू शकणार नाही हेच कारण आहे.
खिडक्यांच्या बंद काचेमधून आपल्याला सर्व वस्तू पहायला मिळतात. आत अंथरलेले
गालिचे, झुंबरं, हंड्या, आत लावलेले पडदे, सोफ़ा, खुर्च्या, विविध फोटो, हे सर्व बघताना "बघता, किती बघशील दो नयनाने"(आर्या नव्हे :फिदी:) अशी आमची अवस्था झाली होती. आणि त्यावेळच्या त्यांच्या श्रीमंतीची कल्पनाही आली.
फ़ोटो काढायला बंदी आहे. तरी पण एक फोटो काढलाच.
२९. विणलेला सुंदर रुमाल, त्यावर बसून ५.३४ वेळ दाखवणारे सुरेख घड्याळ, उदबत्ती लावण्याचे, नक्षीदार घर.
३०. ही आहे त्यांची गाडी.
नंतर आम्ही बागेत एक फ़ेर फ़टका मारला. आणि आवडतं काम हाती घेतल.
३१. माझं सर्वात लाडकं फुल.
"रंग रंगुल्या, सान-सानुल्या, गवत फुला रे गवत फुला,
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा" ह्या ओळी आठवल्या.
३२. ही आणखी काही फुले.
आणखी काही अंतर चालून गेल्यावर, व बरयाच पायरया चढून गेल्यावर, अजून एक संग्रहालय होतं. आजूबाजूचे उंचच उंच वृक्ष पाहून ’आकुमी’च्या मुलीने "हे ‘देवधराचे’ वृक्ष ना काका?" अशी पृछा केली. आणि एकच हशा पिकला. अशा बरयाच गंमती-जमती करत आम्ही ह्या पायरया चढलो.
३७.
इथे तलवारी, ढाली, बाण, पिस्तूल, काडतूसे, खंजीर, बिचवा, सत्तूर, शिरस्राण, अशा लढाईच्या सहित्याचे विविध प्रकार पहायला मिळाले. येथे फ़ोटो काढायला बंदी होती.
परत येताना काढलेले हे काही फ़ोटो.
३८.
४०. हे घराचे वेगळेच छप्पर पहा.
४१. सुंदर कोरीवकाम केलेल्या ह्या शिळा.
४२. हे सरस्वतीची सुंदर प्रतिकृती इस.सन, २७०५ मध्ये मिस्त्रि, श्री. लोनम वर्मा यांनी तयार केली.
४४.ह्या वेली किती भक्कम आहेत पहा.
एका झाडावर अतिक्रमण करून त्या खूप वर गेल्यात, वेळेअभावी फ़ोटो काढला नाही. (’निग’, क्षमस्व.)
४५. हे झाड हिरव्या आणि पिवळ्या पानांमुळे खूप छान दिसत होत.
४६. हे ओळखा पाहू काय आहे ते?
४७. हे शिंगवाल फळ आहे. आणि हे खातात सुद्धा. चवीला चांगल आहे. साधारण सफ़रचंदासारख आहे. एक फळ २० रू. मिळाल.
४८.हे एक गुलाबाच फुल. (खरं नाव वेगळ आहे. :डोमा:) ओळखलं का हे फुल कशाच आहे?
५०.
५१.ही फुलं रंगवली तर अशी दिसतील.
५२.
इथून आम्ही अशा ठिकाणी गेलो, जिथे, रोपवे, पॆराशूट, वगैर होतं. आणि भरपूर थंडी होती.
श्री.आकुमी, आणि त्यांच्या मुलीने पॆराशूट मध्ये बसून उड्डान केले. मी फ़ोटो काढण्याचा प्रयत्न केला. (निष्फळ)
५४.
५५.
५६.हे कसले झाड आहे? (दिनेशदा, जागू, जिप्सी, साधना.............)
५७.
५८.हा मस्त नजारा.
‘विर’ च्या ठरलेल्या हॉटेलमध्ये जेवण करून, घरी फोनाफोनी करून, फोटोग्राफी केली.
६०.
आणि हॉटेलवर परतलो. हॉटेलवर येऊन, आवरून खरेदीला बाहेर पडलो. थंडी तर सपाटून होती. आणि मनासारखी खरेदी पण होत नव्हती. शेवटी एक हॉटेल बघून आत घुसलो, तर तो ’बार’ आहे असं वाटल. आणि त्याच पावली परत आलो. नंतर पुरूष वर्गाने जाऊन शहानिशा केली आणि ते हॉटेल आहे, आणि बार शेजारी आहे हा शोध लागला. त्वरीत आत गेलो. पटकन चहाची ऒर्डर दिली. चहा येईपर्यंत, लहान मुलांच बागडणं पाहिल. खूप वेळाने चहा आला. मग मात्र पटापट, चहाचे घोट घेतले. गरम गरम चहा पोटात गेल्यावर खूपच छान वाटलं. आम्ही काही मेंबर बाहेर आलो. आणि फोटो काढलेच.
६२.
चहाच बिल देऊन आलेल्यांच्या चेहरयाकडे बघून, काहीतरी वेगळ वाटल. चौकशी केल्यावर कळल, आमच्या पोटात गेलेला एक चहाचा कप, फ़क्त २५/- रुपयांना होता.
असो. परत एकदा स्वेटर्स, शाली, असं पाहून झालं. (खरेदीसाठी. :फिदी:) आणि मग मात्र परतीचा मार्ग पकडला. कुडकुडतच हॉटेलवर पोहोचलो. थोड्या गप्पागोष्टी करून, गरम गरम अन्न, आणि गरम गरम पाणी पोटात ढकलून, निद्रा देवीला शरण गेलो.
प्रज्ञा, धन्यवाद!
प्रज्ञा, धन्यवाद!
छानच प्र.चि. आहेत!!
छानच प्र.चि. आहेत!!
वा...
वा...
छान!!
छान!!
छान.. फोटो कुणाचाय?? देविका
छान.. फोटो कुणाचाय?? देविका रानी?? शोभना समर्थ???
वा छान सफर झालेली दिसते
वा छान सफर झालेली दिसते बाइसाहेबांची. ते झाड नाही ग ओळखता येत मला. झाड आहे की वेल आहे ? इंग्लिश पाल्याची वेल साधारण अशीच असते पण पाने खुप पातळ असतात.
फोटो देविका रानींचा आहे.
फोटो देविका रानींचा आहे. त्यांनी निकोलस रॉयरिच च्या मुलाशी म्हणजे स्वेतोस्लाव्ह रॉयरिच शी दुसरे लग्न केले होते.
बाकी ते फुल पाइन चे आहे ना? ते असे सुकलेले असते. त्याला फुल म्हणावे की फळ ? अशी सुकलेली फुले आज काल रंगवुन शोभेच्या गुच्छात वापरायची पध्धत आहे. मी ह्यांचा एक फ्लॉवर पॉट केला होता. मला ही फुले/फळे एका प्रदर्शनात मिळाली होती.
सोनाली, वैबु, जिप्सी, वर्षू,
सोनाली, वैबु, जिप्सी, वर्षू, जागू, मो.मी. धन्यवाद.

फोटो देविका रानींचा आहे.>>>>>>>..बरोब्बर! आणि ते फुल देवदार वृक्षाच आहे.
मस्तं आहेत फोटोज.... ते ६१
मस्तं आहेत फोटोज....
ते ६१ मधलं फुल केवढं मोठ्ठं आहे... सह्ही
वा मस्त फोटो व सफर पण
वा मस्त फोटो व सफर पण
पद्मजा, मोनालिप धन्यवाद.
पद्मजा, मोनालिप धन्यवाद.

पद्मजा, आता सुरू कर तुझी चित्रकला, यातील विषय घेऊन.
शोभा फोटो सुरेखच! माझं मन तर
शोभा फोटो सुरेखच! माझं मन तर १९ वर्षापुर्वीच्या काळात विहरू लागलं
रच्याकने तू मला धन्यवाद का म्हणालीस ते कळलं नाही.
ते हेलिकॉप्टर बहुदा तुम्हालाच पाहायला ईतक्या खालून फे-या मारत असेल.
शोभा फोटो सुरेखच! माझं मन तर
शोभा फोटो सुरेखच! माझं मन तर १९ वर्षापुर्वीच्या काळात विहरू लागलं फिदीफिदी>>>>>>>>>>>पुन्हा जा ना.
हा.का.ना.का. 


रच्याकने तू मला धन्यवाद का म्हणालीस ते कळलं नाही.>>>>>>>>>वेड घेऊन पेडगावला जाऊ नको.
ते हेलिकॉप्टर बहुदा तुम्हालाच पाहायला ईतक्या खालून फे-या मारत असेल.>>>>>>अग हो. पण हे मी स्वत:च कस सांगणार ना?
मस्तच
मस्तच
शोभा, काल दिसले नव्हते फोटो,
शोभा, काल दिसले नव्हते फोटो, म्हणून प्रतिसाद द्यायचा राहिला. छान आहेत फोटो.
मला अजून, दिल्लीच्या उत्तरेला जायची संधी मिळालेली नाही ! असे फोटो बघितले कि, आत्ताच जावेसे वाटते.
मज्जाय ब्वा
मज्जाय ब्वा
दिनेशदा, धन्यवाद. मला अजून,
दिनेशदा, धन्यवाद.

मला अजून, दिल्लीच्या उत्तरेला जायची संधी मिळालेली नाही ! असे फोटो बघितले कि, आत्ताच जावेसे वाटते.>>>>>>>>>>>>दिनेशदा, मग वाट कसली बघताय? निघा ना.
म्ह.कर, धन्यवाद! खूप दिवसानी इथे दर्शन.
म्ह.कर, धन्यवाद! खूप दिवसानी
म्ह.कर, धन्यवाद! खूप दिवसानी इथे दर्शन. <<<< हो, म्हटलं इकडे फार उकडत आहे, फिरुन येऊया मनाली ला
हो, म्हटलं इकडे फार उकडत आहे,
हो, म्हटलं इकडे फार उकडत आहे, फिरुन येऊया मनाली ला>>>>>>>>>>>>>>>म्हणून तर फ़ोटो काही दिवस (महिने :डोमा:) इथे डकवले नव्हते.
खासच !
खासच !
मला दरवर्षी हिमशिखरे साद देत
मला दरवर्षी हिमशिखरे साद देत असतात. सलग चार वर्ष झाली मी दर उन्हळ्यात हिमालयात जातेय. फोटो अप्रतिम! रोयरिच आर्ट गॅलरी अप्रतिम आहे. नग्गर पाहिलंस की नाही. खूप सुंदर आहे.
मुकू, मंजूताई धन्यवाद! नग्गर
मुकू, मंजूताई धन्यवाद!
नग्गर पाहिलंस की नाही. खूप सुंदर आह . >>>>>>>>.नाही. वेळे अभावी बरचं पहायच राहिलं.
वा सुरेख मनाली दर्शन , मस्त
वा सुरेख मनाली दर्शन , मस्त प्रचि मजा आली
ही पहा छोटी-छोटी घरे. पण ही अशी कशासाठी बांधली होती, >>>> शोभा ही कदाचीत मधमाशांची घरटी असावीत.
शोभा ही कदाचीत मधमाशांची घरटी
शोभा ही कदाचीत मधमाशांची घरटी असावीत.>>>>>>>>>>मुद्दाम मानवाने बांधलेली का?