मानवनिर्मीत आश्चर्य- पनामा कालवा

Submitted by वर्षू. on 5 April, 2012 - 05:36

लहानपणी प्रायमरी च्या भूगोलाच्या पुस्तकात भेटलेला पनामा कालवा,पुढे कधी
आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
पण साधारण वीसेक वर्षापूर्वी आमच्या ऑफिसची एक शाखा जेंव्हा आम्ही मध्य
अमेरिकेच्या दक्षिणेकडचा शेवटला देश्,'पनामा' या चिमुकल्या देशात उघडली
,तेंव्हापासून पनामा ची वरचेवर गाठ पडू लागली. सुरुवातीला वर्षातून २,४
वार्‍या घडत. आता लेकच तिच्या परिवारासकट तिकडे सेटल झाल्यामुळे दरवर्षी
एक तरी ट्रिप होतेच.
दरवेळी पनामा कालव्याला भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही. कितीदा पाहिले तरी
 त्याबद्दल वाटणारे कौतुहल ओसरत नाही.

या कालव्याच्या कल्पनेचा जन्म पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकं इस्थुमस ऑफ
पनामा मधे दाखल झाले,तेंव्हा झाला. इस्थुमस ऑफ पनामा ला अटलांटिक आणी
पॅसिफिक या दोन्ही महासागरांचे सर्वात अरूंद भाग आहेत ही गोष्ट
पहिल्यांदा लक्षात आली ती एका  स्पॅनिश ,भटक्या  खलाशी ,'बलबोआ' ला.
या पॉईंट वर कालवा खोदला तर अटलांटिक हून पॅसिफिक ला जायला  ८००० नॉटिकल
मैल इतकं अंतर कमी  होईल आणी त्यामुळे इंधनाची ही बचत होईल,याशिवाय उत्तर
अमेरिकेला जाताना ,जहाजांना दक्षिण अमेरिकेच्या सदर्न टोकाच्या केप हॉर्न
ला पूर्ण वळसा घालून जावे लागत असे. या भागात समुद्री चाच्यांचा सुळसुळाट
होता, कालव्यामुळे हा प्रश्न ही कायमचा सुटणार होता.

कालव्याचे महत्व जाणून ,त्या दिशेने तो बनवण्याचे प्रयत्न स्पॅनिश
,ब्रिटिश  आणी शेवटी १८८० मधे फ्रेंचांनी सुरु केले. पण या भागात घनदाट
रेन फॉरेस्ट्स होते. त्यांच्यामुळे किडे,डास इ. भरपूर मात्रेत असल्याने
विभिन्न रोग पसरत .मजूर पटापट रोगाला बळी पडत. शेवटी  मजूर, पैसा या
सगळ्यांची कमतरता पडू लागली आणी कालव्याचे काम पुन्हा बंद पडले.
१९०३ मधे ,अमेरिके च्या मदतीने पनामा ,कोलंबिया पासून वेगळा झाला आणी एक
स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. मग अमेरिकेने कालव्याचे काम आपल्या
हाती घेतले आणी १५ ऑगस्ट,१९१४ रोजी  हा कालवा दळणवळणासाठी खुला झाला.
अश्याप्रकारे या कालव्याच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप यायला ४०० वर्षांचा
दीर्घ काळ लागला.

अटलांटिक आणी पॅसिफिक महासागरांना जोडणारा, ८० किलोमीटर लान्बीचा  हा
कालवा बनवण्याकरता, पनामा सिटीतून पनामाच्या एका डिस्ट्रिक्ट कोलोन कडे
वाहणार्‍या 'छाग्रेस' नदी वर दोन जागी बांध घालून दोन मोठाले तलाव
निर्माण करण्यात आले. छाग्रेस नदी समुद्रपातळीपासून अडीचशे फूट उंचावर
आहे.ही जगातील एकमेव नदी आहे जी अटलांटिक आणी पॅसिफिक या दोन्ही
मसागरांमधे विलीन होते. त्यांवर तीन लॉक्स चे पॅरलल सेट्स बांधण्यात आले,
मीराफ्लोरेस्,पेड्रो मिगल आणी गातून.
यापैकी मीराफ्लोरेस लॉक्स, पनामा सिटीपासून वीस मिनिटाच्या ड्राईव वर
आहे . तिथे अटलांटिक सागर आहे तर गातून लॉक्स च्या पलीकडे पॅसेफिक सागर
आहे. पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे.
या लॉक्स मधे तलावाचे पाणी ग्रॅव्हिटी चे तत्व वापरून भरले जाते.
प्रत्येक लॉक मधे १०१,००० मीटर क्यूब पाणी भरले जाते."या लॉक्स मुळे या कालव्या मधे जहाज समुद्रपातळीपासून वर उचलले जाते आणी अट्लांटिक कडून
गातून लॉक्समधे आल्यावर हळू हळू पाण्याची पातळी कमी करत करत पुढे गातून लेकमधुन प्रवास करुन पेड्रो-मिगेल लॉकमधुन मीराफ्लोरेस लेक मध्ये जाते व मीराफ्लोरेस लॉक्समधून दुसर्‍या बाजूला अटलांटिक महासागरात अलगद पणे प्रवेश करते. याचप्रमाणे याच्या ऊलट अटलांटिक कॅनल मधे प्रवेश करणारे जहाज मीराफ्लोरेस लॉक्स, मीराफ्लोरेस लेक, पेड्रो-मिगेल लॉक्स, गातून लेक, गातून लॉक्स असा प्रवास करत करत गातून लॉक्समधे पोचले कि दारं उघडून त्या बाजूने पॅसेफिक प्रवेश करते."

हा कालवा संपूर्ण  पार करण्यासाठी जहाजा च्या आकारमानाप्रमाणे ८ ते १०
तासांचा वेळ लागतो.
वर्षाकाठी १४,००० +  शिप्स या कालव्यातून जातात.
हा कालवा पास करण्याकरता ,एका जहाजाला सरासरी २८०००० अमेरिकन डॉलर फी द्यावी लागते.
आत्तापर्यन्तची सर्वात जास्त फी  ' कोरल प्रिंसेस' नावाच्या क्रूज शिप ने
भरलेली आहे. २००२ मधे या क्रूजशिप ने ३८०,५०० अमेरिकन डॉलर ची  घसघशीत फी
दिली होती तर १९२८ मधे रिचर्ड हेलिबर्टन या अमेरिकन स्विमर कडून   कॅनाल
पोहून जाण्याकरता केवळ ३६ सेंट्स ची फी आकारलेली होती.
पुढच्या वर्षी या कालव्याला शंभर वर्षं पूर्ण होतील.
मनुष्याची काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती(ingenuity ) ,धैर्य ,साहस
या गुणांची ग्वाही , हा कालवा दिवसरात्र देत असतो.
(आत्ताचे लॉक्स ११० फूट रुंदीचे आणी १०५० फूट लांबीचे आहेत त्यामुळे आजची नवीन शिप्स त्यातून पास होऊ शकत नाहीत..
पण आता नवीन कॅनाल चे बांधकाम सुरु झालंय ऑलरेडी. नवीन लॉक्स ५५ मीटर रूंद आणी ४२७ मीटर लांबीचे असणारेत.. ऑलमोस्ट चार फुटबॉल मैदानांच्या आकाराचे.)
स्पेशल नोट- दिशांच्या बाबतीत झालेली चूक 'अतुलनीय' यांच्या मोलाच्या मदतीमुळे सुधारता आलीये.
अतुलनीय- चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

पनामा सिटी- प्रदूषण रहित हवा आणी निरभ्र आकाश इथे बाराही महिने अनुभवायला मिळतं

मीराफ्लोरेस लॉक्स - इथे जाऊन कॅनाल ची पूर्ण प्रोसेस नीट पाहता येत नाही कारण आसपासच्या देशातून आलेल्या टूरिस्ट्स एकच झुंबड उडालेली असते.

पनामा सिटीपासून दोन तासाच्या अंतरावर कोलोन फ्री झोन मधे असलेल्या आमच्या ऑफिस ला जायचा रस्ता.. हाच रस्ता पुढे कोलोन मधे असलेल्या गातून लॉक्स कडे जातो.रस्त्याच्या दुतर्फा असलेलं हे घनदाट रेन फॉरेस्ट ,गातून पर्यन्त साथ देतंं

गातून लॉक्स- इथे ७ डॉलर चं प्रवेश तिकिट घेऊन ,वर गॅलरीत जाऊन निवांतपणे कॅनाल चं पूर्ण फंक्शन पाहायला मिळतं.

गॅलरीतून समोर जवळच दिसणारी गातून लॉक्स ची कंट्रोल रूम

अटलांटिक कडून येणारे जहाज ,गातून लॉक्स मधे प्रवेश करण्याची वाट पाहात थांबलेलं होतं

लॉक्स मधे पाणी भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. एकेका लॉक मधे प्रत्येकी १०१,००० मीटर क्यूब पाणी भरण्यास केवळ आठ मिनिटांचा अवधी लागतो.

या लॉक्स मधे प्रवेश करण्यापूर्वी जहाजा चा ताबा ,लॉक्स अथॉरिटीकडे देण्यात येतो. मग लॉक्स चे कर्मचारी , कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या रुळांवरून तीन तीन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स द्वारे जहाजाला कालव्यात ओढून आणतात.

पहिल्या लॉक मधे जहाजाने प्रवेश केल्यावर लॉक ची दोन्ही अजस्त्र दारे बंद होतात.. मग दुसर्‍या लॉक मधे पाणी भरलं कि दार उघडून जहाज दुसर्‍या लॉक मधे प्रवेश करतं.तोपर्यन्त तिसर्‍या लॉक मधे पाणी भरण्याची प्रोसेस चालू होते

जहाज,तिसर्‍या आणी शेवटच्या लॉक मधे प्रवेश करताना

आता ते इतक्या जवळून जात असतं कि गॅलरीतून हात बाहेर काढून त्याला स्पर्श करायचा मोह आवरत नाही.. Wink पण तितकंस जवळही नसतं

पाहतापाहता पलीकडे दिसणार्‍या पॅसेफिक मधे अलगद प्रवेश करून गेलं ही आपल्या पुढच्या वाटचाली करता...

यावेळी जेंव्हा कॅनाल ला भेट दिली तेंव्हा पॅसिफिक कडून अटलांटिक कडे जाणारं आणी अटलांटिक कडून पॅसेफिक कडे जाणारं दोन्ही एकदमच दिसली.. त्यामुळे अजूनच आनंद झाला..

गुलमोहर: 

.

अप्रतिम फोटो..लाईकले..
मेक्यनिकल इंजीनिअरिन्ग ची अशक्य प्राय किमया..
वा मस्त

मस्तच. निव्वळ वाचून हे सगळे समजले नसते. फोटोंमूळेच समजते.
(आधी मला समुद्र सलग असताना त्यांच्या पातळीत फरक असूच कसा शकतो, असा प्रश्न पडायचा.) कधीतरी संधी मिळाली तर बघायचे आहे नक्की.
अशी कल्पना करणे आणि ती प्रत्यक्षात आणणे, हे खरोखर अदभूत आहे.

खूप उत्सुकता होती या कालव्याबद्दल. ही संपूर्ण प्रोसेस ती किती छान समजावून सांगितलीस..
आणि प्रचिशिवाय तर काहीच लक्षात नसतं आलं. खूप मेहनतीने घेतलीत प्रचि ( इतरांना काढू देतात का?)

थँक्स या माहीतीबद्दल वर्षुतै Happy

दिनेश दा.. नेक्स्ट टैम हमारे साथ ही चलो.. Happy
युरीजी... कोणालाही प्रवेश आहे..आणी वाट्टेल तितके फोटो काढ.. मीच जवळ जवळ ४०० काढले,त्यातले इकडे कितीकिती टाकू म्हणत जरूरीपुरतेच टाकले..
मीराफ्लोरेस मधे इतकी गर्दी असते टूरिस्ट्स ची कि धड उभं ही राहायला मिळत नाही..या उलट गातून साईड ला कुणीच नसतं अगदी तुरळक,दोन चार लोकं येतात.. आणी त्या पॉइंट वरून अगदी जवळून पाहता येतं...

धन्स अम्मि,चिमण,माधव,म्हमईकर,योरॉक्स..
हो ना... कितीदाही पाहिलं तरी नेहमी पहिल्यांदा जितकी वाटली होती तितक्याच उत्सुकतेने परत परत पाहाविशी वाटणारी ही किमया आहे..

अत्यंत अप्रतिम लेख, माहिती व चित्रे

सुंदर प्रकाशचित्रे

सर्व लॉक्सची दार एकानंतर एक अशी का उघडली जातात?

कारण तिन्ही लॉक्स मधे असलेल्या पाण्याची पातळी एकसारख्या उंचीची नाहीयेत..
जहाज,समुद्रसपाटी वरून हळू हळू उचलले जाते किंवा खाली आणले जाते...
एकदम तिन्ही दारं उघडल्यास ते बुडून जाईल..

लॉरा डेक्कर या अवघ्या १६ वर्षाच्या तरुणीने नुकताच छोट्या बोटीवरून एकटीने जग प्रवास केला. त्याची माहिती इथे पहा -- http://www.lauradekker.nl/English/Home.html

त्यामधे शेवटी एक व्हिडिओंचा दुवा आहे, त्यातला एक पनामा कालव्यातून जातानाचा आहे.

खुपच छान माहिती आणि प्रचि.

खुप खुप धन्यवाद इतकी छान ओळख करुन दिल्या बद्दल Happy

वा मस्त माहिती...

या लॉक्सचा साधारण साईझ काय आहे (विशेषतः रुंदी) ? कितीही अजस्त्र जहाज यातून जाऊ शकते का ?

वर्षू, आमंत्रण लक्षात ठेवलय बरं का.
सुऎझ वरती तशी लॉक्स नाहीत हे गुगल अर्थ वर पण दिसतंय.
या अवाढव्य यंत्रणेपुढे अत्यंत चिमुकली वाटेल, पण अशीच यंत्रणा
लव्ह ग्रोव उदंचन केंद्र या ठिकाणी आहे. आता हे धेडगुजरी नावाचं ठिकाण
कुठे आहे, असे विचारालच.
तर ते आहे, मुंबईला. वरळी नाक्यावरुन पूनम चेंबरकडे जाताना, तूम्ही
एक नाला ओलांडता. तिथे डाव्या हाताला हि यंत्रणा दिसेल. हा नाला
मुंबईतील सांडपाणी समुद्रात वाहून नेतो. पण भरती आल्यावर समुद्राचे
पाणी नाल्यात घुसू नये म्हणून ही यंत्रणा आहे, अर्थातच खुप जूनी आहे.

शशांक .. ही माहिती द्यायची राहिलीच... वरती एडिट करून टाकते..
आत्ताचे लॉक्स ११० फूट रुंदीचे आणी १०५० फूट लांबीचे आहेत त्यामुळे आजची नवीन शिप्स त्यातून पास होऊ शकत नाहीत..
पण आता नवीन कॅनाल चे बांधकाम सुरु झालंय ऑलरेडी. नवीन लॉक्स ५५ मीटर रूंद आणी ४२७ मीटर लांबीचे असणारेत.. ऑलमोस्ट चार फुटबॉल मैदानांच्या आकाराचे.

अफाट, अफलातुन इंजिनियरींग!! Happy लहानपणी भुगोलात पनामा कालव्याबद्दल फक्त वाचलेलं होतं!
हे असं काही अजस्र वै. असेल अशी कल्पनाही केली नव्हती.

<<पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे.
या लॉक्स मधे तलावाचे पाणी ग्रॅव्हिटी चे तत्व वापरून भरले जाते.<<<
म्हणजे हे एवढं फक्त २० से.मी. पाण्याची लेव्हल मेन्टेन्ड करण्यासाठी होतं??? Uhoh

वर्षु, अतिशय उपयुक्त माहिती अगदी परिणाम कारक समजावलीस. प्रचिमुळे अगदी डोळ्यासमोर चित्र उभेकरता आले अगदी! Happy

लव्ह ग्रोव उदंचन केंद्र... इतक्या वर्षात दिसलं नाही ते.. Uhoh
पुढच्या वेळी लक्ष ठेवीन...
आर्या.. :)..नाहीतर अ‍ॅक्सीडेंट्स होतील ना...

Pages