फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न
आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू
फोटोशोप उघडा
file --- open --- तुम्हाला हवी असलेली image
हा फोटो मी घेतलाय
आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा
आता एकावर एक असे २ layer बनतील
आता त्याच window मध्ये सर्वात शेवटी जो भाग गोल वर्तुळाने highlight केलाय , त्या बटनावर क्लिक करून " black न white " option सिलेक्ट करा '
आता आपली कार अशी blackn white दिसेल
त्यानंतर डाव्या बाजूला तो टूल बॉक्स आहे त्यातला खोडरबर (इरसेर) सिलेक्ट करा
आता काम सोप्पय ... जेवढा भाग आपल्याला रंगीत हवाय तेवढ्या भागावर तो इरसेर फिरवा , म्हणजे कृष्णधवल भाग निघून जाईल
हे final output
आहे कि नाही एकदम सोप्प
असो भेटूच पुढील भागात काहीतरी नवीन घेऊन
वा छान. मला शिकायचय
वा छान. मला शिकायचय हे.
(हजारो ख्वाइशे... )
आमच्या अज्ञानाचा एक एक लेयर
आमच्या अज्ञानाचा एक एक लेयर असाच इरेझ करा ! खूप आवडेल शिकायला. धन्यवाद.
अरे वा! मस्त. एकेक फीचरची
अरे वा! मस्त. एकेक फीचरची माहिती करुन दिली तर मस्त लेखमालिका होईल.
हे मस्तच आहे. कधी पासुन
हे मस्तच आहे. कधी पासुन शिकवणी चालू करताय
छान! मलाही हे कस करतात ते
छान! मलाही हे कस करतात ते माहीत नव्हत.:स्मित:
धन्यवाद.
अगदी शैलजा, मी ही तेच लिहिणार
अगदी शैलजा, मी ही तेच लिहिणार होते. बेसिक पासून शिकवायला सुरु करा.
बेसिक पासून शिकवायला सुरु
बेसिक पासून शिकवायला सुरु करा. > +१. मलाही अगदी शिकायचय कधीचं.
मलाही शिकायचय
मलाही शिकायचय
धन्यवाद! मलाही पाहिजे ही
धन्यवाद!
मलाही पाहिजे ही शिकवणी!
व्वा प्रसन्न. अभिनंदन. खुप
व्वा प्रसन्न.
अभिनंदन.
खुप चांगला उपक्रम.
फोशॉ च्या अशा नविन नविन ट्रिक्स शिकायला नक्किच आवडेल.
पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.
खुप खुप धन्यवाद मला कधी
खुप खुप धन्यवाद

मला कधी पासुन हे शिकायच होत, ईनफॅक्ट मी थोडी सुरवात ही केली होती पण आता इतक आठवत नाही.
पण तुम्ही लेखन मालिका केलीत तर वाचायला आणि शिकायला खुप आवडेल.
धन्यवाद! मलाही केंव्हापासुन
धन्यवाद! मलाही केंव्हापासुन शिकायच होतं पण वेळच मिळत नव्हता

तुमच्या क्लासमध्ये माझं पण नाव घ्या. अगदी बेसिकपासुन सुरु कराल का प्लीज ? म्हणजे माझ्या सारख्यांना बर पडेल
बेसिक पासून शिकवायला हरकत
बेसिक पासून शिकवायला हरकत नाही...
पण ते समोरासमोर बसून जास्त पटकन समजत..
इथे मी tutorials आणि ट्रिक्स देऊ शकेन.. म्हणजे ज्यांना अगदी थोड बेसिक जरी येत असेल तरी ते पटापट पिक अप करू शकतील
अरे वा मस्त. अजुन असेच पुढचे
अरे वा मस्त. अजुन असेच पुढचे ज्ञान देत रहा.
मलाही शिकायचयं. बेसिक पासून
मलाही शिकायचयं.
बेसिक पासून शिकवायला सुरु करा. > +१.
आवडेश बेसिकपासून शिकायला
आवडेश
बेसिकपासून शिकायला आवडेल.
बेसिकपासून शिकायला
बेसिकपासून शिकायला आवडेल.<<<<<< + १
मस्त तुम्ही tutorials आणि
मस्त तुम्ही tutorials आणि ट्रिक्स देत रहा. फार छान उपक्रम आहे.
हा प्रयत्न छान आहे. ज्यांना
हा प्रयत्न छान आहे.
ज्यांना Photoshop trick लौकर शिकायच्या असतील त्याच्या साठी
Photoshop CS5: Top 100 Simplified Tips and Tricks
हे पुस्तक छान आहे. CS४, CS३ सुद्धा उपलब्ध आहेत.
धन्यवाद प्रसन्न आमच्या
धन्यवाद प्रसन्न
आमच्या अज्ञानाचा एक एक लेयर असाच इरेझ करा ! खूप आवडेल शिकायला.>>>>+१
कधीचं शिकायचं होतं
कधीचं शिकायचं होतं हे..............पाहू काही डोक्यात शिरतंय का! गुरुजी ...पुढचा धडा कधी?
मस्त आणि उपयुक्त माबोच्या
मस्त आणि उपयुक्त
माबोच्या खंद्या फोटोग्राफर्सनी वाखाणून झालेच आहे. 
शैलजाने म्हटल्याप्रमाणे सगळ्या फिचर्सची एक मालिका केलीस तर खूप उपयोग होइल.
तुम्ही सांगितलंत त्याप्रमाणे
तुम्ही सांगितलंत त्याप्रमाणे करून बघायचा प्रयत्न केला काल पण गाडी त्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट करण्याच्या ऑप्शनलाच अडकली, कारण माझ्याकडे ब्लॅक अॅन्ड व्हाईट ऑप्शन दिसलाच नाही.
मी फोटॉशॉपचं सीएस २ वापरतेय. समजा त्यात असं करता येत नसेल तर दुसरा काय पर्याय?
मला इमेज दिसत नाहित, पण
मला इमेज दिसत नाहित, पण माहिती छान आहे
लक्षात ठेवतोय.
माझ्याकडे एक अष्टलक्ष्मीचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट स्केच आहे डाऊनलोड केलेले. मला ते लाल रन्गात बनवुन हवे आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या एमएस एडिटर वा पेन्ट ब्रश मधे मी रन्ग बदलवु शकत नाहीये, तर यास काय उपाय?
>>>>>तुम्ही सांगितलंत
>>>>>तुम्ही सांगितलंत त्याप्रमाणे करून बघायचा प्रयत्न केला काल पण गाडी त्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट करण्याच्या ऑप्शनलाच अडकली, कारण माझ्याकडे ब्लॅक अॅन्ड व्हाईट ऑप्शन दिसलाच नाही.
cs २ मध्ये सदर option दिसायलाच हवा
मी आत्ताच बघितले
ओके
तुम्हाला कुठले options दिसत आहेत.. ते जरा प्रिंट स्क्रीन करून डकवा इथे
>>>गुरुजी ...पुढचा धडा
>>>गुरुजी ...पुढचा धडा कधी?
लवकरच.. इथे अजूनही कलाकार लोक्स आहेत.. त्यांनी मदत केली तर काम अजून सोप्प होईल
अवल???
मला ब्लॅक अॅन्ड व्हाईट सोडून
मला ब्लॅक अॅन्ड व्हाईट सोडून बाकीचे ऑप्शन्स दिसतायत
झब्बू. पण हा किडा फोटोशॉपमधला
झब्बू. पण हा किडा फोटोशॉपमधला नाही. पिकासामधला आहे!
छान मार्गदर्शन धन्यवाद !
छान मार्गदर्शन धन्यवाद !
गुरुजी मी हा प्रयत्न पेंटात केलाय आपल्या प्रो. नं हे लेयर प्रकरण भारीये
बाप्पा जालावरुन सआभार
प्रसन्न, भन्नाट आयडिया आहे
प्रसन्न, भन्नाट आयडिया आहे ही. रोज असे किडे करायला शिकवणार का तु?
आता ते फोटोशॉप सॉफ्टवेअर कुठुन डाउनलोड करु ते पण सांग.
Pages