पाण्याने वेढलेले इटलीतले 'वेनिस' शहर हे सर्वांना माहित असेलच.. मीसुद्धा ह्या शहराचे चकचकीत फोटो पाहिले होते.. जसे हे शहर प्रसिद्ध तशीच ख्याती आपल्या केरळमधील बॅकवॉटर्सची ! केरळमधील "अॅलेप्पी'' (Alappuzha) नावाचे शहर तर 'Venice of East' म्हणून ओळखले जाते.. (भारतातील इतर Venice Of the East म्हणून गणली जाणारी शहरे म्हणजे उदयपूर आणि श्रीनगर) अॅलेप्पी हे सुद्धा अरेबियन समुद्र व अनेक नद्यांचे जाळे यांना जोडलेले असे हे शहर.. युरोपचे नाही तर नाही पण भारतातील 'वेनिस' ला भेट द्यायला मिळतेय यातच समाधान.. इथल्या पाण्यावर मुक्तपणे विहार करणार्या हाउसबोट हे सुद्धा इकडचे एक वैशिष्ट्य.. नि त्यामुळेच जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध !
आम्ही मुन्नारहून थेट अॅलेप्पीला जाणार होतो.. साहाजिकच अॅलेप्पी येइपर्यंत चांगलेच उकडायला झाले होते.. मुन्नारचे वातावरण थंड तर इकडे एकदम गरम ! आम्हाला पोचायला थोडा उशीरच झाला.. नि दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही हाउसबोट गाठली... नि एक आगळावेगळा अनुभव देणारा प्रवास सुरु झाला.. आमचा रात्रीचा मुक्कामदेखील ह्याच तरंगत्या घरात होता..
प्रचि १: आमची हाउसबोट आधीपासूनच वाट बघत होती..
प्रचि २:
प्रचि ३:
सुरवातीला बाजूने जाताना दिसणारी हाउसबोट सही वाटते.. पण लगेच दुसरी बोट नजरेस पडते नि आधीच्या बोटीकडे दुर्लक्ष होते.. सही रे सही ! आमचे असेच चालू होते.. शिवाय काठावर दिसणार्या नयनरम्य दृश्यांकडेदेखिल दुर्लक्ष करुन चालणार नव्हते...
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
सुरवातीला जलाशय हा एखाद्या अरुंद रस्त्याप्रमाणे भासतो.. नि ह्या पाणीमय रस्त्याच्या दुतर्फा बघाल तर नारळाची झाडे, दुकाने, झाडांमध्ये लपलेली छोटी छोटी टुमदार घरे, शाळा, देउळ, चर्च इत्यादी.. !
इकडच्या घरांचे आंगण म्हणजे हा जलाशयच.. जसे घराच्या बाहेर वाहने असतात तसे इथे लहान बोट पार्क केलेल्या दिसतात.. नि घराच्या मागे डोकावायला गेलो तर कोकणची आठवण करुन देणारी हिरवीगार शेती दिसून येते....
प्रचि ७
हे सगळे बघून मला साहाजिकच एक प्रश्न पडला.. पावसात इथे काय परिस्थिती असेल.. इथल्या स्थानिक लोकांचे स्थलांतर केले जाते असे आमच्या बोटीतल्या लुंगीवाल्याने सांगितले..
आमचे दुपारचे जेवण बाकी होते त्यामुळे प्रवास सुरु झाल्यानंतर २०-२५ मिनीटांनी आमची बोट एका बाजूला लावली.. त्यावेळेत नारियल पाण्याची, जेवणात माशे (अर्थातच महाग) हवे असल्यास सोय करुन घेता येते..
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १० : इथल्याच पाण्यातील मासा
इथल्या स्थानिक लोकांचे दैंनदिन जीवन पाहण्यासारखे... इथे वल्हवणारे लहान-मोठे सगळेच असतात...
प्रचि ११ : नातू आणि आजी ??
प्रचि १२ : बाजूने जाणारी आयती हाउसबोट मिळाली तेव्हा आता क्षणभर विश्रांती...
प्रचि १३: शाळा सुटली... पळण्याचा प्रश्णच नाही..
(इथे म्हणे मुलांना आठवड्यातून फक्त दोन का तीन दिवसच गणवेश असतो )
प्रचि १४: हे तर खूप बोलके
प्रचि १५: आमच्या कोकणात नारळाच्या झाडांच्या झावळ्या वगैरे डोईवर घेउन आणतात.. इथे काही वेगळेच..
- - - - - -
आतापर्यंत सभोवतालचे पाण्यावरचे जनजीवन दाखवणारी बोट काही अवधीतच बॅकवॉटरची व्याप्ती किती आहे हे दाखवायला लागते.. अगदी दूरवर पाणीच आणि पाणी.. तिथेच मग अधुनमधून उडणार्या काळ्या-पांढर्या पक्ष्यांचा थवा.. एका बाजूस दिसणार्या काठावर आपली उंची दाखवणारी माडाची झाडे... उष्ण हवामान त्यात मळकट वातावरण त्यामुळे लांबलांबचा पल्ला अस्पष्टच दिसत होता... आजुबाजूने जाणार्या हाउसबोटस 'मीच खरी सुंदर' म्हणत जात होत्या... ह्यांचे तर मग काही ठिकाणी ट्रॅफीकसुद्धा होते..
प्रचि १६:
प्रचि १७:
प्रचि १८:
प्रचि १९:
प्रचि २०:
प्रचि २१:
प्रचि २२:
प्रचि २३:
प्रचि २४:
प्रचि २५: छोटी-मोठी
सुर्य पश्चिमेकडे झुकायला लागला नि बोटीचे असे रंग दिसू लागले..
प्रचि २६:
प्रचि २७:
प्रचि २८:
रात्रीच्या नौका विहारास मज्जाव आहे.. त्यामुळे संध्याकाळची वेळ झाली नि आमची हाउसबोट जवळच्या कुठल्यातरी किनार्यापाशी जाउ लागली...
प्रचि २९: हाउसबोट गावाकडे येताच...
दुसर्या दिवशी पहाटेच बोट सुरु होण्यापुर्वी प्रभातफेरी मारुन आलो तेव्हा दिसलेला सुर्योद्य..
प्रचि ३०:
तर अजुनही निद्रावस्थेत असणार्या हाउसबोट..
प्रचि ३१:
प्रचि ३२: 'मासे घ्या मासे' म्हणत फिरणार्या अशा छोट्या गोलाकार होडया मस्तच.. ह्यांचा धंदा हाउसबोटवाल्यांच्या मासे-खरेदीवरच चालतो..
(हे दांपत्य चक्क मराठी होते !)
सकाळी साडेसात-आठच्या सुमारास पुन्हा बोटीचा प्रवास सुरु झाला.. जिकडून आदल्यादिवशी निघालो होतो तिकडेच जाणार होतो.. पण वेगळ्या वाटेने.. या वाटेत प्रभातफेरीसाठी बाहेर पडलेले काही आजोबालोक्स दिसले.. इथूनच मग आम्ही तासभरात किनारा गाठला तो एक आगळावेगळा अनुभव गाठीशी घेउनच..
प्रचि ३३:
प्रचि ३४:
प्रचि ३५:
प्रचि ३६:
टिप : १)कपल्स, फॅमिली, मित्रमंडळी यांसाठी विविध प्रकारच्या बोट पहायला मिळतात.. फिरंगीलोक तर एकदम रॉयल बोटीतून फिरत असतात.. हे सगळे खाजगी मालकीच्या बोटीतून फिरताना.. पण अगदीच कोणी एकटा दुकटा जाणार असेल, २-३ तासांसाठी (पुरेसे आहे !) अनुभव घ्यायचा असेल व प्रायवसी नको असल्यास त्यांनी 'स्वस्तात मस्त ' अशा सरकारी बोटींची चौकशी करावी.. त्यांची फेरीसुद्धा ह्या खाजगी बोटींच्या फेरींसारखीच असते.. फरक एकच सरकारी बोट थांबत थांबत प्रवाश्यांची गर्दी जमवत जाते.. !! ही माहिती मला नंतर कळली.. तरीसुद्धा हाउसबोटचा अनुभव हा खिसा खाली करणारा असला तरी जास्त आनंद देउन जातो... पण मुक्कामाची बोट ठरवण्यापेक्षा दोन तीन तासांच्या प्रवासासाठी बोट ठरवली तर उत्तम..
२) इथे कुठलीही हाउसबोट असूदे पण संध्याकाळी सहा साडेसहा नंतर पाण्यात विहार करण्यास मज्जाव आहे.. रात्रीचा वेळ हा मच्छिमार करणार्यांसाठी दिला जातो.. त्यामुळे दिवसभरात मुक्तपणे फिरणार्या ह्या सगळ्या नौका आपआपला किनारा शोधून ठाण मांडतात.. किनार्याजवळच्या परिसरात शेती घरे असतील तर ठिक नाहीतर संध्याकाळी साडेसहा ते जेवणापर्यंतचा वेळ काढणे खूप कंटाळवाणे.. शिवाय परिसरात डास भरपूर असले तर रात्रीचा मुक्काम नक्कीच त्रासदायक ठरतो.. खोलीत कोंडून घ्यायचे तर इकडचे बोटीतले एसी रात्री ९ नंतरच चालू करतात जे सकाळी ६ वाजता आपसूकच बंद होतात.. बाहेर फिरायचे तर अपरिचित ठिकाणी रात्रीच्या वेळी फिरणे तसे धोक्याचेच.. या सर्व गोष्टींमुळे रात्रीचा मुक्काम करावा की नाही यावर नक्कीच विचार करावा असे सुचवेन.. अर्थात मित्रमंडळी वा मोठी कौटुंबिक सहल वगैरे असेल तर मात्र मुक्काम करण्यास मजा येईल.
३) हाउसबोट पार्क केल्यानंतर तिथून छोट्या होडींद्वारे कालव्यांमधून फिरायचे असेल तर तोही अनुभव घेता येतो..
४) सुप्रसिद्ध 'स्नेकबोट' कुठे दिसते का बघा.. मला दिसली नाही..
४) हाउसबोटवरच्या कर्मचार्यांशी (कॅप्टन आणि कूक - दोघे लुंगीवाले) संवाद साधताना खूप धमाल उडते.. संभाषण साधता येइल का हे टेंशन घेण्यापेक्षा त्यातून उडणार्या गोंधळाची मजा घ्या.. तरीबरे थोडे थोडे इंग्लिश हिंदी बोलणारा आता पाचात एक सापडतोच.. आमच्या बोटीवरचा लुंगीवाला कॅप्टन तर फाडफाड व हॉरिबल असे इंग्लिश बोलण्याच्या नादात तामिळ पण बोलुन जात होता.. नि लुंगीवाल्या कूकपुढे बोलायची सोय नव्हती.. अगदी हातवारे करुन सांगत लागावे होते.. जल्ला एकदा तर मी वैतागून च्या आxxशीचो घो पण म्हटले...:D नि त्या कॅप्टनला हिंदी येते का विचारले तर म्हणतो कसा " Only Two Things.. ' मेरा भारत महान है' & 'हम किसीसे कम नही!'"
५) येथील पाण्यात पाणवनस्पती बरीच फोफावलेली दिसून येते.. खासकरुन काठावर.. बोटीतून जाताना या पाणवनस्पती बाजूस सरताना जरुर बघा.. कारण मला बर्यापैंकी मोठा पाणसाप दिसला होता...
- - -- -
भाग १ : मुन्नार
http://www.maayboli.com/node/32878
भाग २:माटटूपेट्टी डॅम व इको पॉईंट
http://www.maayboli.com/node/33116
भाग ३: रंगीबेरंगी (हॉर्टीक्लचर गार्डन)
http://www.maayboli.com/node/33233
समाप्त
छान. सुंदर
छान. सुंदर
सुंदर फोटोज् व
सुंदर फोटोज् व माहिती...
जुन्या आठवणी ताज्या केल्यास मित्रा...
मस्त माहिती आणि फोटो मेरा
मस्त माहिती आणि फोटो
मेरा भारत महान!!!!
सही फोटोज !
सही फोटोज !
मस्त प्रचि आणि माहिती!!!
मस्त प्रचि आणि माहिती!!!
मला प्रश्ण पडलाय? पाण्याची
मला प्रश्ण पडलाय? पाण्याची स्वच्छता कशी ठेवतात? लोकं हॉउसबोटीत रहातात ना?
मच्छरांचा त्रास नाही होत का पाण्याजवळ रहाणार्यांना?
छान माहिती रे! फोटो पण मस्त!
छान माहिती रे! फोटो पण मस्त!
मस्त फोटो!!!! आम्ही राहिलोय
मस्त फोटो!!!!
आम्ही राहिलोय हाऊसबोटीत.. खुप वेगळाच अनुभव
तुम्ही कुमारकोम ला गेलात की नाही? अफलातुन जागा आहे... तिथल्या कॉटेजेस, आयुर्वेदिक ट्रीट्मेंट्स, जेवण अप्रतिम!!! तिथलं एकंदर वातावरणच अप्रतिम!!
मुन्नारला आम्ही ट
छान फ़ोटो. पण बोट बाहेरुनच
छान फ़ोटो. पण बोट बाहेरुनच दाखवलीस, आतून नाही.
मस्त फोटो... टिपा पण मस्तच
मस्त फोटो...
टिपा पण मस्तच
वा! योगेश उत्तम फोटो
वा! योगेश उत्तम फोटो आहेत.
बोटींचे प्रकार तरी किती नेटकेपणे टिपलेले आहेत. दाद द्यावीच लागेल.
अलेप्पीला काय पाहावे, कसे पाहावे ह्याचा जणू वस्तुपाठच!
आवडला.
खासच रे लवकरच प्लान करायला
खासच रे

लवकरच प्लान करायला पाहिजे केरळचा.
फोटोज एकदम मस्त आहेत पण मला
फोटोज एकदम मस्त आहेत


पण मला २-३ तासातच बोर झालेल कारण तिथे मला कुणी दंगा करु देत नव्हत
ना गाणी ना काही
माझा मित्र गिटार वाजवत होता ती पण बंद करायला लावली त्यांनी
अस वाटत होत कुणाच्या तरी अंतयात्रेला चाललोय
का काय माहित मला केरळ अजिबात नाही आवडलं

वॉव सुंदर .. केरळ मधे हाऊस
वॉव सुंदर ..
केरळ मधे हाऊस बोट्स्..अमेझिंग!!!
जिप्स्या लौकरच प्लान करणारेस्??काय?काय??
सही रे. प्रचि ३२ सर्वात भारी
सही रे. प्रचि ३२ सर्वात भारी वाटले.
वाह!!! सुन्दर आहेत फोटो.
वाह!!! सुन्दर आहेत फोटो.
प्रचि १२ बघुन लहानपणी पाहिलेले सायकलस्वार आठवले. एखादा ट्रॅक्टर वैगेरे पकडुन असेच जायचे.
हौस बोट प्रकरण एकदा तरी
हौस बोट प्रकरण एकदा तरी अनुभवायचयं... निसर्ग आणि प्रचि फार फार सुंदर आहेत.
लवकरच प्लान करायला पाहिजे केरळचा. >>> माझा हुकलाय.
(भारतातील इतर Venice Of the East म्हणून गणली जाणारी शहरे म्हणजे उदयपूर आणि श्रीनगर) >>> उदयपूरला Lake City म्हणून ओळखले जाते. तिथे एकही नदी नाही.
वा मस्त सफर घडली.
वा मस्त सफर घडली.
सुंदरच.. प्रचि १२ बघुन
सुंदरच..
प्रचि १२ बघुन लहानपणी पाहिलेले सायकलस्वार आठवले. एखादा ट्रॅक्टर वैगेरे पकडुन असेच जायचे.>> अगदी अगदी
मस्त.. मुक्कामाची बोट
मस्त..:)

मुक्कामाची बोट ठरवण्यापेक्षा दोन तीन तासांच्या प्रवासासाठी बोट ठरवली तर उत्तम.. >> अनुमोदन
सुरुवातीला मोठ्या जलाशयातुन सुरु झालेला प्रवास नंतर गावातील छोट्या कालव्यांतुन सुरु होतो तेव्हा कंटाळा येतो.. बरेचदा पाणवनस्पती बोटिच्या पंख्यात आडकतात. अनेक ठिकाणि नाले पार करण्यासाठी छोटे पुल बांधलेले असतात. तिथे येवुन बोटवाला हॉर्न देतो मग जवळचा एखादा तो पुल open करतो आणि आपला पुढिल प्रवास सुरु होतो.. मातृसत्ताक पद्धतीमुळे बरेचदा पुल open / close करण्याचे काम बायकाच करताना दिसतात..
हल्ली गोवा, कारवार व कोकणात देखिल हाऊसबोट सुरु झाल्या आहे. ही माझ्या गावची बोट..:)
धन्यवाद लाजो.. आमच्या
धन्यवाद

लाजो.. आमच्या विशलिस्टवर जे कधीच पाहिले नाही ते चहाचे मळे व हाउसबोट बघायचे होते.. म्हणून टाळले.. पण कुमारकोलम अफलातून आहे हे मात्र खरे.. तिकडचे फोटो बघितलेच की मन चाळवते.. बघू आता
दिनेशदा.. आतून बोट काही विशेष नाही.. घरासारखेच सगळे..
मित्र गिटार वाजवत होता ती पण बंद करायला लावली त्यांनी>> आश्चर्यम ! जिथे टेलिव्हिजन, ऑडीयो सिस्टीम ठेवतात तिकडे गिटार वाजवायला बंदी म्हणजे नक्कीच चुकीची बोट बुक केली असाल.. कारण आमच्या बोटीच्या आजुबाजूने जाणार्या काही बोटीत मोठमोठ्या ग्रुपची धमालमस्ती सुरु होती..
सतीशजी.. मस्त फोटो..
मस्त आठवणी जाग्या झाल्या
मस्त
आठवणी जाग्या झाल्या
जल्ला एकदा तर मी वैतागून च्या
जल्ला एकदा तर मी वैतागून च्या आxxशीचो घो पण म्हटले...

प्रचि आणि माहीती दोन्ही मस्तच
प्रचि २४. हे हॉटेल आहे का ?
मस्त फोटो आणि माहिती.
मस्त फोटो आणि माहिती. सूर्यास्ताचा फोटो सही आलाय.
सुंदर!
सुंदर!
मस्त फोटो आणी माहिती. सुंदर
मस्त फोटो आणी माहिती. सुंदर सफर घडविली मित्रा.
यो मस्त फोटो! हिरवळ
यो मस्त फोटो! हिरवळ अफलातून.
मी पुर्वी श्रीनगरला (२००६ मधे ) गेले होते त्यावेळी दाललेकमधे हाऊसबोटीवर राहिले होते. पण तिथे बोट एकाच ठिकाणी स्थिर असते, व 'शिकार्यातून' सगळीकडे फिरवतात.
लवकरच केरळ पाहायचे आहे.
प्रचि मस्तच... पाहून परत केरळ
प्रचि मस्तच...
पाहून परत केरळ आठवल...पण मुन्नारची सर आलप्पीला नाही...
विशेषतः मासे नाही आवडले...पाणीही बरेच अस्वच्छ....काश्मिरच्या हाऊसबोटींशी तुलना करता भ्रमनिरासच झाला... नि संध्याकाळी डास बोटीच्या बाहेर पडू देइनात...
आपल्या स्कूलबस ऐवजी बोट नि बसस्टॉप ऐवजी असणारे बोटीचे थांबे कुतुहल वाढवून गेले...
आणि हो ही बोट मी ड्राईव्ह केली...जवळ जवळ अर्धा तास......!
निसर्गाच्या लयलूटीला सलाम!
सलाम केरळ!
धन्यवाद!
-सुप्रिया.
सुप्रिया.. अनुमोदन
सुप्रिया.. अनुमोदन
आश्चर्यम ! जिथे टेलिव्हिजन,
आश्चर्यम ! जिथे टेलिव्हिजन, ऑडीयो सिस्टीम ठेवतात तिकडे गिटार वाजवायला बंदी म्हणजे नक्कीच चुकीची बोट बुक केली असाल.. कारण आमच्या बोटीच्या आजुबाजूने जाणार्या काही बोटीत मोठमोठ्या ग्रुपची धमालमस्ती सुरु होती..
>>>>>
आणि माझी रहाती बोट नव्हती काय्...म्हणुन असेल कदाचित. गिटार वाजवायला बंदी नव्हती बाकिच्या बोटमेट्सनी बंद करायला लावली 
असेल...:( मला पण असच वाटतय कारण एकतर आमच्या बोटीमध्ये सगळे केरळीच होते
Pages