"मुन्नार "

Submitted by Yo.Rocks on 22 February, 2012 - 15:16

केरळमधील मुन्नार सर्वांना माहित असेलच.. त्यात चंदन (मार्को पोलो) ने अतुलनिय भारत मालिकेत दर्शन घडवले होतेच.. नुकतीच तिथे 'शॉर्ट एन्ड स्विट' स्टाईलमध्ये मुन्नार नि अ‍ॅल्लेपीचे बॅकवॉटर इथे भेट देउन आलो.. बघण्यासारखे खूप काही.. पण जंगलातील वळणावळणाच्या रस्त्यांतून जाताना, दोन्ही बाजूला चहाचे मळे बघताना, दुरुन डोकावणार्‍या डोंगररांगा बघतानाच मन प्रफुल्लित होउन जाते... इथे शक्यतो निवांत वेळ काढून यावे जे मला तरी काही जमले नाही.. इथलेच काढलेले काही प्रचि..

प्रचि १: इथे अनेक धबधबे पण फेब्रुवारीचा महिना.. तेव्हा दिसतील की नाही साशंक होतो.. कोचीनहून मुन्नारला जाताना पहिला लागलेला 'Cheeyappara' (ह्यांचे उच्चार करायच्या भानगडीत पडणार नाही) नावाचा धबधबा एकदम सुका होता.. अगदी तेथील पाण्याखाली दडलेल्या सातच्या सात नैसर्गिक दगडी पायर्‍या दिसत होत्या.. ! पण नशिबाने ह्याच्या पुढे अगदी जवळच एक 'Valara' नावाचा वॉटरफॉल नजरेस पडला.. त्यातच समाधान

मुन्नार येण्याअगोदर पल्लीवासाल नावाचे गाव लागते.. नि हरित रंगाच्या डोंगररांगाचे दर्शन सुरु होते.. आम्ही सायंकाळी चारच्या आसपास पोहोचत होतो.. पण आकाशातील उपस्थित काळे ढग, पसरलेले धुके यामुळे सहा वाजून गेले की काय असे भासत होते.. काहि अवधीतच चहाचे मळे दिसू लागतात..

प्रचि २:

पुढे आम्ही वाटेत लागलेल्या 'Punarjani Traditional Village' ला मार्शल आर्टच्या शोजची तिकीटे बुक केली..
इथे कथ्थकली (वेळ सायंकाळी ५ वा. - दर प्रत्येकी रु. २००/-) आणि पारंपारिक मार्शल आर्टस (वेळ सायंकाळी ६ वा. - दर प्रत्येकी रु. २००/-)असे दोन शो आहेत..

तुम्हाला दोन्ही पहायचे नसेल वा वेळ नसेल पण फोटो दोन्हीकडचे घ्यायचे असतील सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास तिथे हजर रहायचे.. अर्थात तिकीट मार्शल आर्टची घ्यावी लागेल.. असे केल्यास कथ्थकलीचा शो संपत आलेला असतो.. नि तो संपला की त्या कलाकारांबरोबरदेखील फोटो काढायला मिळतात.. हे संपले की बाजूलाच मार्शल आर्टस सुरु होते.. पण कथ्थकलीमधील कलाकारांचा मेकअप बघायचे असेल तर मग सरळ सायंकाळी ४ ला कथ्थकलीच्या शो चे तिकीट काढून हजर रहायचे.. मला हेच पहायचे होते पण वेळ चुकली..

अधिक माहितीसाठी त्यांचे हे संकेतस्थळ जरुर पहावे..
http://www.punarjanimunnar.org/

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७: जल्ला आपल्याला पण भयानक पोझ सहज देता येते काय.. .. Proud

(अर्थात वरील फोटो सौ. रॉक्स यांनी काढला आहे.. त्यामुळे अजून भयानक भाव दर्शवणे जमले नाही Wink

Kalarippayattu (जल्ला अचूक उच्चार समजलाच नाही) ट्रॅडिशनल मार्शल आर्टस सुरु.. या खेळाचे वैशिष्ट्य सांगायचे तर त्यांचे सादरिकरण आवडले.. गोल लाल मातीची रिंग.. नि तिन्ही बाजूंनी प्रेक्षकांसाठी छोटे स्टेडियम.. नि मार्शल आर्टसला पुरक असे वाजत असलेले पार्श्वसंगीत. या गोष्टींमुळे अधिक मजा घेता आली.. खरे तर त्यांचे खेळ बघून मला आपले 'मराठी पाउल पडते पुढे' आठवले.. असो, इथे फोटोग्राफीचे कसब लागते हे खरे.. नि साहाजिकच अ‍ॅक्शन कॅच करताना माझ्या डिजीकॅमच्या मर्यादा (वा कॅमेरा हाताळण्याच्या मर्यादा) उघडया पडत होत्या.. पण आजुबाजूच्या काही लोकांच्या डिजीकॅमचे फोटो बघून मात्र थोडे हायसे वाटत होते.. आपले तरी बरे असे वाटत होते.. लेन्सवाल्यांकडे मात्र ढुंकून पण पाहिले नाही.. Proud Lol

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२

प्रचि १३:

प्रचि १४:

खेळ संपला की इथे पण प्रेक्षकांना वस्तू(तलवार, ढाल, भाला इत्यादी) हाताळण्यास, फोटो काढण्यास मुभा देतात.. त्या कलाकारांच्या उडया बघून मलाही तलवार नि ढाल घेउन उडी मारायचा मूड आला पण थोडे वळले तरी ह्याला त्याला धक्का लागेल अशी फोटो काढून घेण्यासाठी गर्दी झाली.. Sad मग काय शिस्तीत उभे राहून फोटो काढून घ्यावा लागला.. Sad

मुन्नारमध्ये फिरताना चहाचे मळे दिसतात खूप.. नि चंदनने म्हटल्याप्रमाणे खरेच इथे त्यांनी डोंगरावरचा कुठलाही कोपरा सोडला नाहीये चहाच्या शेतीसाठी..

प्रचि १५:

प्रचि १६:

प्रचि १७:

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

प्रचि २१:

प्रचि २२:

डोळे झाले का हिरवे ?? Happy इथे चहाचे म्युझियम व कारखाना आहे जिथे चहा कसा बनवला जातो याची माहिती दिली जाते.. इथे तुम्हाला कंटाळा जरी आला तरी इकडे मिळणारी चहा हमखास प्यावी.. बस्स.. अशी चहा पुन्हा कुठे भेटणार नाही सो दोन- तीन कप आरामात पोटात Happy

आमचा मुक्काम मुन्नारमध्ये 'सिल्वर टिप्स' या हॉटेलमध्ये होता.. उल्लेख करावासा वाटतो कारण हॉटेल एकदम मस्त आहे.. वैशिष्ट्य म्हणाल तर त्यांनी बॉलिवूड, टॉलीवूड व हॉलिवूड या तिन थीम वापरून हॉटेल एकदम बघेबल केलेय.. प्रवेशद्वारातच एक मोठा प्रोजेक्टर मांडलाय.. नि हॉटेलमध्ये संपूर्ण आवारात चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचे फोटो आढळतात.. प्रत्येक रुमसाठी एक गाजलेला चित्रपट निवडला आहे.. सो चित्रपट शौकींनाना हे वेगळेपण निश्चीतच आवडेल.. हॉटेल जितके पॉश तितके जेवणपण.. तेव्हा यापेक्षा मुन्नार टाउनमध्ये 'महावीर' हॉटेल गाठावे.. सर्व प्रकारच्या थाळी मिळतात.. नि चवीलाही उत्तम..

प्रचि २३: सिल्वर टिप्स हॉटेलमध्ये प्रवेश करताच..

प्रचि २४:

प्रचि २५:

प्रचि २६: मनमोहक सजावट Happy

क्रमश :
आगामी : माटटूपेट्टी डॅम परिसर

गुलमोहर: 

सही! सुंदर फोटो आहेत. तिथले अर्ध्याहून जास्त चहाचे मळे जयललिथाबाईंचे असल्याची (बिनकामाची) माहिती मिळाली होती. रात्री या मळ्यांत सगळीकडे असंख्य काजवे लुकलुकतात. त्याचा फोटो आहे का?

मस्त फोटो! Happy
प्रचि ६ खास!
कलरीपय्याटू मार्शल आर्ट्सची जननी. कुंगफूच्याही आधीची, शरीर-मनाचे अधिक सखोल तत्त्वज्ञान लाभलेली आणि अधिक जीवघेणी (हे ब्रूस लीनेही मान्य केले होते)! त्यातील काही प्रकार आता (प्रात्यक्षिकासाठी सुद्धा) अधिकृतरीत्या बंद केले आहेत.

सह्हिचे सफर रे. Happy
प्रचि ६, २५, २६ विशेष आवडले.

जल्ला आपल्याला पण भयानक पोझ सहज देता येते काय.. ..
Kalarippayattu (जल्ला अचूक उच्चार समजलाच नाही)
त्या कलाकारांच्या उडया बघून मलाही तलवार नि ढाल घेउन उडी मारायचा मूड आला>>>>>>>:फिदी: अगदी यो स्टाईल वर्णन Happy

अजून भयानक भाव दर्शवणे जमले नाही>>> Rofl
आधीच शरणागती. Happy
उडया बघून मलाही तलवार नि ढाल घेउन उडी मारायचा मूड आला>> उडीबाबा Proud

सुन्दर आहे ही जागा. फेब्रुवारीमध्ये सुद्धा इतकी हिरवाइ. Happy
फोटो सुन्दर आहेत.
त्या लढाइचे फोटो भरपुर उजेडात काढले तरच नीट येतील कमी प्रकाश असल्याने
जास्त शटर स्पीड लाव्ता येणार नाही. त्यामूळे जे आलेत ते उत्तमच आहेत रे भावा. Happy

केवळ अप्रतिम फोटो -
रच्याकने तो प्र चि १५ मधला बंगला मी ऑलरेडी बुक केलाय हां - ४-५ वर्षात जाईनच रहायला..... Wink

जल्ला मधूचंद्राला गेल्यावर पण माबोवर टाकायच्या प्रचिंची तयारी डोस्क्यातून गेली नाही तुझ्या? धन्य आहेस तू
>>>> कविन + १

बाकी फोटु मात्र एकदम खास Happy

सुंदर!

अजून भयानक भाव दर्शवणे जमले नाही>>> आधीच शरणागती >>> Lol
अर्थात वरील फोटो सौ. रॉक्स यांनी काढला आहे.. >> बर आहे तुला हेल्पिंग हँड भेटला आता तु उड्या मारायला मोकळा Wink

सर्वच प्रचि भारी आहेत Happy ३,१५,१६,१७ खास..........

Pages