सदस्य प्रवेश |
भो चे घा, टॉ ची को आणि आ चो घो!एकदम घाईघाईतच ट्रिप ठरवली. सध्या आई, मावशी आल्यात माझ्याकडे. भारतातून बराच खाऊ आणलाय, शिवाय असं तसंही करून घेतलय. सताठ दिवस बाहेर म्हणजे तयारीही बरीच आणि जोरदार. माझ्या नेहमीच्या सवयीने एक यादी बनवली, ’न्यायच्या समस्त वस्तू’. पथ्य-बित्याचं निमित्तं आणि खाण्याची हौस त्यामुळे स्वयंपाक शक्यतो घरीच करण्याचा बेत होता. आई, मावशी, मावसोबा...सगळ्यांचीच वयं झालीत. त्यामुळे सामान भरताना वातावरण जरा टेन्स. चार दिवस सगळी मोठी माणसं नाहीशी होऊन, अख्खं घर आपल्याला एकट्याला मिळणार म्हणून जरा अती उत्साहात मुलगा आपल्यामते सुचना देऊन आणि सामान भरायला लागून ’मदत’ करतोय. ’ह्याला मदतीला घे आणि हा सगळा पसारा आवर. आपण एकच नेतोय, गाडी ... ट्रक नाही. आम्ही पटकन बाजारात जाऊन येतो....’, मी आधी रडकुंडीला आणि मग चिडून हातघाईवर येण्याआधीच हे पुढे म्हणाले, ’का मी हे भरू आणि तुम्ही तिघी जाताय?... बाहेर?’. ह्यांनी एकदाच आवरलेल्या स्वयंपाकघरात, माझ्या माहेरून आलेली सांडशी मी अजून शोधतेय. सांडशी वापरायच्या प्रत्येक वेळी तिच्या आठवणीने आता माझे डोळे भरत नसले तरी ह्यांचे कान उतू जातील इतपत तरी मी बोलते. ह्या दोघी दोन पायांवर (प्रत्येकी एक), तय्यार व्हायच्या आधी मीच पांढरा झेंडा हलवला आणि विजयी मुद्रेने ते दोघेही बाहेर पडले. ज्याला ’घे मदतीला’ म्हणून दिला होता, तो मावशीचं बीपीचं मशीन आणि उघडं आमटीचं पातेलं एस्कीत ठेवत होता, मगाशी. मग मी आधी त्या उपद्रवी मदतनिसाला पकडला आणि ब्रेकफास्ट बारच्या स्टूलावर त्याची प्रतिष्ठापना केली. ’कळतला नाय तर काय? मराठी वाचुक येता त्याका!’, मावशी-आई मालवणीत बोलतात बरेचदा घरात. ती यादी बघून तो म्हणाला, ’थांब! मी, आधी टॉयलेटला जाऊन येतो, मग पाणी पितो, मग काहीतरी खायला घेऊन इथे बसतो.’ त्यानंतर सुरू झालं ’माझं’ एकेक मराठी अक्षर लावत, त्याचं यादी-वाचन, आई आणि मावशीची त्यावर मालवणीत चर्चा, त्यातून माझ्या अक्षराला नावं ठेवणं, आणि लिस्टमध्ये अधिक वस्तूंची भर करीत त्याचं एकेक अक्षर लावीत लिहिणं. लेक: कॉफी लेक: ’चहा पावडर’ लेक: साखर. आई, साखर अजून कशात घालणार? मावशी: गो, आमचा इक्वल घेतलं मा? लेकानं एकेक अक्षर लावीत ’इक्वल’ मराठीत लिहिलं. त्याचं इतकं लावून लावून चाललं होतं की आम्हीच उतावीळ होऊन ’ता’ वरून ताकभात ओळखत होतो. त्यानं ’मी’ म्हटलं की मावशी ’मीठ’ उचलत होती आणि त्याने ’गू’ म्हटलं की आई ’गूळ’. ह्यात पदार्थांची जातीने विचारपूस, मधे मधे माझ्या अक्षराला नाव ठेवणं चालूच होतं. आई-मावशी न गाळलेल्या जागा भरत होत्या. लेक: सबूदाण्याच्या पाप्या... नाय थांब. सबूदाण्याच्या पाड्या... पापड्या. आई, हे कसं लागतं? आई: काय गो अजून साबूदाण्याच्या पापड्या खाल्ल्यान नाय ह्याणा? शिरा पडो. आमच्या घराक व्हावान जातत पापड्यो आणि लेकराक अजून चव नाय? काय नव्हेच ते. ह्या पद्धतीने आपण आठ दिवस फक्तं सामन भरू. मीच शेवटी म्हटलं त्याला की प्रत्येक शब्दाचा पहिलं अक्षर वाच, आम्हाला कळतय. म्हणजे ’पुरण पोळ्या’ असं अख्खं न वाचता ’पू च्या पो’ असं. मग सुरू झाला जो ओळखा पाहूचा गोंधळ..... लेक: सा च्या पा. लेक: फो च सा आणि कंसात हिंजीहमो. लेक: फो चं ते लेक: खो लेक: ऊ शी र आता त्याला जरा वेळ मिळायला लागला आजूबाजूला बघायला. त्यामुळे आम्हाला काही मिळत नसल्यास शोधूनही देत होता. एव्हाना आम्हाला प्रत्येक गोष्टीचं हसूही येत होतं. लेक: पू च्या पो लेक: पो चं पी... नाही नाही थांब खोडलय ते. आईने कपाळावर हात मारला. लेक: भो चे घा वैतागवाडी कधीच विसरून आता खेळ खंडोबा झाला होता... हसून हसून मुरकुंडी वळून झाली होती. त्या पसार्यातच आम्ही पसरलो. तितक्यात दार वाजलं आणि लेकानं विचारलं कोण? आई आणि मावशी दोघी एकाच वेळी म्हणाल्या, ’तुझ्या आ चो घो’! |
|
खुपच छान दाद , नेहमीप्रमाणेच मस्त
****************************
:फिदीफिदी:

-प्रिन्सेस...
खिखिखिखिखि
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
ल झ्या!!
हसून हसून पुरेवाट झाली. शेवटी पसारा कधी आवरला?
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
खुप मस्त दाद.
खु ह हो...... छा झा
ल भा दा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
दाद,
मालवणी तशीच मजेशीर वाटते, अन त्यात हा घो.. खुप हसलो वाचुन
फा छा लि आ
-- चि
मस्त.
आजची सकाळ एकदम मस्त झाली. 
पण माझा एक बुद्दुपणा. मला ते टॉ च्या को कळलं नाही.
टॉमॅटो ची कोशिंबीर
ए, मग ते टॉ ची को. आणि आम्ही टोमॅटो म्हणतो ना.

मला आधी हेच वाटले होते. पण टॉ आणि च्या ने घोळ केला.
फि फि ह
आठवून आठवून दिवसभर हसतेय........
ह ह पु वा
गणपती बाप्पा मोरया !!
स च्या प्र मस्तच आहेत
धन्यवाद
’उ शी र भा ठे’ जबरी....
दाद मस्तच गं !!
दाद तू आणि तुझो झिल जबरदस्त !!
दाद, सोबत वाचली आणि आता हे.. सगळे लेखनप्रकार लिलया पेलवतेस बघ अगदी..
खूप आवडलं.. ह ह पु वा..
दा, खरच ह ह पु वा!
दाद! सर्व प्रकारचं लिखाण तू अगदी लिलया हाताळतेसच, पण विनोदी लेखनात तू विशेष खुलतेस!

-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
मस्त! पण एवढे सगळे अर्धे घर घेवून कुठे होती ही ट्रीप? उ. वि. ले. प्र. रा. मा. न.
म लि ब का? ह ह पु वा...
खूपच छान !
सगळंच कसं इतकं सुंदर लिहीता तुम्ही?
फूल गेन्दवा ची आठवण आली
दाद, मस्तच.. मालवणी वाचायला फारच मजा आली.
धम्माल गं दाद... आता ट्रीपचा वृतांत पण लिही. तोही असाच ह. ह. पु. वा. करणारा असणार...
आवाडला मा तुमका? बराsssss वाटला, जिवाक.
हा सगळा कल्पनाविलास आहे. मध्ये एक दिवस लेकाला विचारलं 'पू ची पो' देऊ का डब्यात? तो माझ्यासारखाच 'माकडू' आहे. त्यामुळे सरळ चेहरा ठेऊन, 'नको. फो चा भा दे' म्हणाला. आई-मावशी 'आ' करून बघत होत्या... त्यांना हसू आवरेना. त्यावरून सुचलेलं हे सगळं.
मालवणीच्या अस्सल सोलांचा रंग यायला हवा तसा आलेला नाही. त्यामुळे मी ही जरा जपूनच वापरलीये.
ह ह ग लो. मा आ ला वा दा त ति प ह ह पु वा.
फु गें सा एं के. भो भा. भो म आ. आ आ चा घो त भा..!!!!!
साजिरा, माझी विकेट घेतलीत..... तो अभिप्राय पूर्णं शब्दात लिहा, प्लीज..... मला काय काय वेगवेगळे शब्दं लागतायत....
धम्माल लिवलंय. मालवणी वाचून जाम मज्जा आली. लेक अगदी तोडीस तोड दिसतोय.
पण वाचल्यावर कळलं.
तुला गम्मत सांगू? मी नाव वाचून शॉर्टफॉर्म्स ओळखले. कारण आम्ही खरंच पदार्थांना घरात असे शॉर्टफॉर्म्स वापरतो. फक्त भो च्या घा आणि टॉ च्या को चे आ च्या घो शी काय साम्य(मेन्सा पझलसारखं ) ते कळेना.
नेहमीप्रमाणेच अप्रतीम,

)
मुख्य म्हणजे मी पहील्यांदाच तुमची कथा स्त्रि च्या भुमिकेतुन लिहीलेली वाचतोय ( व्याकरणात लिहीले असते तर एक विनोदाचा विषय झाला असता
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
ह ह ग लो. मा आ ला वा दा त ति प ह ह पु वा.
फु गें सा एं के. भो भा. भो म आ. आ आ चा घो त भा..!!!!!
दाद माफ करा..
--
हसून हसून गडाबडा लोळलो. माझ्या आईला वाचून दाखविली तर तिची पण हसून हसून पुरेवाट.
'फुल गेंदवा' सारखेच एंजॉय केले. भोत भारी. भोत म्हणजे भोतच आवड्या. आणि 'आ चा घो' तर भारीच भारी..!!!
दाद,जबरी..
तुसी कमाल हो 
अशक्य आहे!!!

--------------
नंदिनी
--------------
अ प्र ति म!!!
ह. ह. पु. वा.
आता अस्सल मालवणीतलो एकादो लिखाण होऊन जाव देत (भ. गा. अ.)... लय दिसात मालवणेतला काय फक्कड वाचूक गावला नाय..
भ. गा. अ. - भरपूर गाळिये असलेलो
वा दाद...खुपच मजा आली वाचुन...मी बर्याचदा असे शब्द वापरते...म्हणजे फो चा भा...पु ची पो वगैरे, त्यामुळे जास्त मजा आली...तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
हे माहीत नव्हतं मला. ही दाद वेगळी.
कमाल केलीत. आम्ही ऑफीसात वाचतो हे तुम्ही विसरु नका. नोकरी जाईल अशाने एक दिवस. असो.
भन्नाट !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ऑफीस च्या आ चा घो !!
पुढचं कधी लिहीतेयस? ...
घो घो....
बाप्पा, किती हसवले तुमी... सगळ्यांना मोदक.