Submitted by दक्षिणा on 28 August, 2008 - 02:42
पावसाळा संपला, ऑक्टोबर आला पण ऑक्टोबर हिट अजून सुरू झाली नव्हती,
२ तारखेला अनायसे सुट्टी आली म्हणून सिंहगडावर जाऊ असं ठरलं. निघताना
पावसाचा मागमूसही नव्हता... पोचलो तेव्हा वातावरण असं होतं.....

क्षणात कुठूनसा एक मोठ्ठाच्या मोठ्ठा ढग वेगाने आमच्याकडे सरकताना दिसला...
मग चित्रं थोडं बदललं आणि वातावरण किंचित अंधूक झालं....

जसा जसा ढग जवळ यायला लागला तसा तसा हवेतला गारवा वाढला, ढग जेव्हा
अगदी जवळ आला तेव्हा, आमचे कपडे आपोआप् भिजायला लागले, आणि
मुसळधार पाऊस सुरू झाला... अंधार आणि वारा प्रचंड होता, एक क्षण वाटलं आता आपण उडून जातोय की काय?....

मोजून २ ते ३ मिनिटं पाऊस पडला, ज्या वेगाने ढग आले त्याच वेगाने भिजवून परत ही गेले. वातावरण स्वच्छं झालं, मावळतीचा सुर्य पुन्हा दिसायला लागला...

गुलमोहर:
शेअर करा
मस्तच!
मस्तच!
ग्रेट.
ग्रेट. निसर्गाच्या लहरी छानच टिपल्यात कॅमेर्यात.
व्वा, छानच!
व्वा, छानच!
मला अस उन्चावर ढगात अडकल्यावर वीजान्ची जाम भिती वाटते!

...;
आपला, लिम्बुटिम्बु
एकदम छान
एकदम छान दक्षिणा..
आणि टिपण ही छन टाकलय्स.
सही !! *** Skating
सही !!
***
Skating away on the thin ice of the new day...
वा
वा दक्षिणा
छान टिपलेस निसर्गाचे निरनिराळे रूप .
२-३ मिनिटात आम्ही पण सिंहगडाचा फेरफटका मारुन आलो
क्या बात
क्या बात है! कवितेचे चार चरण असावेत तसे वाटले हे चार फोटो.
परागकण
दक्षिणा,
दक्षिणा, मस्त टिपलेत क्षण!!
*******************
फांदीफांदीवर उमटती
आर्त धुक्याची धुळाक्षरे
करी साजरे रंग सोहळे
झाड वयात आलेले...
सुंदर!
सुंदर!
खूप आवडले
खूप आवडले फोटो!! अप्रतिम आलेत.. ढग, वेगवेगळे रंग.. सुंदरच!
खूपच सुरेख
खूपच सुरेख आहेत फोटो...
वा! मस्त.
वा! मस्त. फोटोही छान आहेत.
सर्वांच्य
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद!
फोटो इथे टाकताना धास्तीच वाटत होती. कारण हे साध्या फोटो सारखे फोटो, मुद्दाम फोटोग्राफी करायची म्हणून केली नाही. टाकायला ही बराच उशिर केला.. (ऑलमोस्ट २ वर्षं :)) पण आता हुरूप आलाय.
मस्तच
मस्तच फोटो. हे सगळे इतक्या छोट्या कालावधीत घडले !!!
वा.. छान
वा.. छान फोटो आहेत..
एक एक करून डेस्कटॉपवर चिकटवायला पाहिजे.. 
दक्षिणा,
दक्षिणा, हे सगळे फोटो तू दोन दोन वाक्यांच्या कड्या लावून मस्त गुंफलेयस. खरंच, खूप छान फोटो.
दिनेश, हा
दिनेश, हा प्रश्न आहे की उद्गार?

ऍना... ठेंकू...
मस्त आहेत
मस्त आहेत फोटो आणि त्याचबरोबरच्या तुझ्या टिप्पणी .......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
सुरेख फोटो
सुरेख फोटो आहेत दक्षिणा.
वा! काय
वा! काय सुंदर फोटो आहेत. कुंपणाचा उपयोग लीडिंग लाईन म्हणुन आणखिच मजा आणतो.
पण एक भाबडा प्रश्न! पावसात कॅमेरयाचे काय झालं?
अगं अगदि
अगं अगदि हेच अनुभवल आंम्ही गडावर. आमच्याबरोबर आलेला एक मुलगा तर पक्ष्यासारखे दोन्ही हात घेवुन विहरत होता त्या वार्याबरोबर.. मस्त मस्त वातावरण!!
वा... मस्त
वा... मस्त वेगवेगळ्या वातावरणाचे फोटो...
हा प्रकार ट्रेक करताना बर्याच वेळा अनुभवला. पावसाबरोबर आणि मग येणार्या सुंदर उन्हाबरोबर आपल मन देखील धुतल्यासारखं वाटत.
खुपच छान!!
खुपच छान!!
फोटो तर
फोटो तर छान आहेतच, पण ज्या उत्साहाने ते टिपले आहेत तो उत्साह जास्त तारीफ़-ए-क़ाबिल आहे! फंडू!!!
क्क्क्लास..
क्क्क्लास... मस्त गं... एकदम पुण्यात गडावर गेलं मन... थँक्स
सुंदर!
सुंदर! मस्त टिपलाय लहरी निसर्ग! ('उडून जाऊ की काय' असं वाटत असताना देखिल कॅमेरा सरसावून आधी फोटो!!!!
)
शेवटचे दोन
शेवटचे दोन फोटो एकदम परस्पर विरोधी आहेत आणि तू म्हणतेस की लगेच पाऊन पडून परत मावळतीचा सुर्य दिसायल लागला. किती क्षणात वातावरण बदलले म्हणजे!
दक्स.... बाप
दक्स....
बाप आहेस अगदी फोटोग्राफीत..मस्त फोटो आहेत.
पण खरं सांगु, सिंहगड म्हणलं की तिथली भजी आणि मटक्यातलं घट्ट दहीच आधी आठवतं, आणि देवटाकीचं थंडगार, गोड पाणी.
बाकी सगळं नंतर..........!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
ये हुई ना
ये हुई ना बात.. मस्तच
अतिशय
अतिशय सुंदर!
वातावरण, फोटो आणि वर्णनसुद्धा.
Pages