जगभरात विखुरलेल्या अनेक मायबोलीकरांच्या सहभागाने ’मायबोली शीर्षकगीत’ संगीतबद्ध करणं हा उपक्रम
म्हणजे एक फार मोठं आव्हान. पण आपले ज्येष्ठ मायबोलीकर श्री. योगेश जोशी यांनी (योग) घेतलेली अपार मेहनत, त्यांना गायक मायबोलीकरांनी तितक्याच तळमळीने दिलेलं सहकार्य, आणि मायबोलीच्या संस्थापकांनी यात जातीने लक्ष घालून संबंधितांशी संपर्क साधून दिलेला सल्ला, सूचना, मार्गदर्शन तसंच ऍडमिन, व्यवस्थापन समिती आणि या विषयातील तज्ञ मायबोलीकर यांचा सक्रीय सहभाग या सार्यामुळे हे काम सुकर झालं आणि अतीशय योजनाबद्ध रीतीने पार पडलं.
योगेश जोशी(योग) :
सिनिअर माबोकर म्हणून कुठेही आढ्यतेचा लवलेश नाही. संगीत क्षेत्रातलं आणि तत्संबंधी तंत्रज्ञानातलं उत्तम ज्ञान आणि अनुभव असूनही बढाया मारण्याची वृत्ती नाही. अगदी down to earth माणूस. गायक माबोकरांच्या चुका/त्रुटी स्पष्टपणे पण मार्दवपूर्ण शब्दात सांगण्याची, समजवण्याची धाटणी. प्रत्येकाकडून जास्तीत जास्त चांगलं करवून घेण्याचं कसब. वेळ आणि वेग यांचं संतुलन राखत अतिशय शांत चित्ताने, हसतमुख राहून स्वत:च्या घरातलं कार्य असल्यासारखा हा माणूस झटला. “योग यांना बघून तर झपाटलेपण काय असतं याची प्रचिती आली” असं अनिताताईंनी म्हटलंय ते तंतोतंत खरं आहे.
स्वत: झटून, सर्वांचं सहकार्य मिळवून हे सर्व घडवून आणलं याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. अशा टीम-लीडरबरोबर काम करणं हा खूप आनंददायक अनुभव असतो. हा आनंद सर्व संबंधित माबोकारांनी अनुभवला असेलच.
माबोकर गायक, गायिका :
यांचं योगदान तर खूपच महत्वाचं. दिलेल्या सूचनांनुसार त्यांनी गीताची नियमित तालीम केल्यामुळे प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी त्यामानाने कमी रिटेक्स घ्यावे लागले. काही प्रसंगी गीतातील काही विशिष्ट जागा घेताना जरी ३-३/४-४ रिटेक्स झाले तरी सांगितलेले बदल अंमलात आणून, न कंटाळता सर्वांनी योगेशना संपूर्ण सहकार्य दिलं. खरं तर यातल्या प्रत्येक गायकाला ही गोष्ट माहित आहे की, जरी संपूर्ण गीत त्याच्या / तिच्याकडून गाउन घेतलेलं असलं तरी प्रत्येकाने गायलेल्या एखाद-दुसर्या निवडक ओळीचा अंतर्भाव गीतात केला जाणार आहे. “एकाच काय, अर्ध्या ओळीचा अंतर्भाव जरी झाला/न झाला तरी आपण सर्व मिळून काहीतरी चांगलं घडवतोय, हेच मोठं समाधान आहे” अशा स्वरूपाचे उद्गार त्यांच्याकडून ऐकल्यावर मन भरून आलं, फार पूर्वी ऐकलेल्या एका गीताच्या ओळी आठवल्या -----
"असू आम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदिर उभविणे हेच आमुचे शील"
एक सुंदर कलाकृती निर्माण करायची हे सर्वांचं ध्येय. ध्येय ही एक प्रकारची नशा (अर्थातच उदात्त अर्थाने) असते. आणि ध्येयपथावर स्वत:ला झोकून देऊन निरंतर मार्गक्रमण करणं हीदेखील तितकीच नशा, ’मधुशाला’ मधे हरिवंशरायजी बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे :
“मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला”
गेले काही महिने सगळेच या उदात्त नशेने, ध्येयाने झपाटलेले होते.
पण या सगळ्यात माझा प्रत्यक्ष सहभाग अगदीच नगण्य. कारण ना मी गाऊ शकत, ना गीताबरोबर प्रकाशित होणार्या व्हिज्युअल इफेक्ट्स बाबत स्वत: काही ठोस करू शकत. त्यामुळे moral support इतकीच काय ती माझी मदत.
असो .....
कला, तंत्रज्ञान आणि मायबोलीकरांनी ’आपल्या मायबोलीचा उपक्रम’ यशस्वी करण्यासाठी आत्मीयतेने घेतलेली मेहनत; अशा त्रिवेणी संगमातून एक सृजनसोहळा सांघिकरीत्या घडतोय, शीर्षक गीतातल्या या ओळी :
मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते विश्वात 'मायबोली'
प्रत्यक्ष साकार होताना दिसतायत आणि मीही या सृजनसोहळ्यातला एक छोटासा अंश आहे हे माझं परमभाग्य.
.... उल्हास भिडे
मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:
झलक मधील गाय़कः
१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)
मगापासून पुन्हा पुन्हा ऐकतोय
मगापासून पुन्हा पुन्हा ऐकतोय पण समाधान होत नाहीये. !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऐकतो आहे. सुंदर !
ऐकतो आहे.
सुंदर !
अहा....... मजा आ गया
अहा....... मजा आ गया यार.........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही
सही
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव! श्रवणीय!
वॉव! श्रवणीय!
झलकच ईतकी छान तर गाणं नक्कीच
झलकच ईतकी छान तर गाणं नक्कीच अप्रतीम असणार. सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन !!
अ प्र ति म.
अ प्र ति म.
झकास...... मायबोलीssss
झकास......
मायबोलीssss मायबोलीssssssssssssss
सुरेख! मोबाईलवर
सुरेख!
मोबाईलवर ऐकल्या-बघितल्यामुळे समाधान होत नाहीये. लवकरच पूर्ण गाणं ऐकायला मिळेल.
सर्वच संबंधितांचे मनापासून अभिनंदन!!
वा! छान बनवलंय
वा! छान बनवलंय ध्वनीचित्रमुद्रण! पडद्यामागच्या समस्त कलाकारांचे अभिनंदन!
श्या! हे फारच जबरी आहे
श्या! हे फारच जबरी आहे राव....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आनंदाश्रू ओघळलेच दोन
मस्त... मस्त...मस्त ...
मिटवून अंतराला, जोडून
मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते विश्वात 'मायबोली'
>>> सुंदर
रार , अ प्र ति म व्हिजुअल
रार , अ प्र ति म व्हिजुअल केलयंस!! ये$$स. यु हॅव डन इट. तुला मदत केली त्यांचे पण आभार.
भुंग्या , आवाज छान लागलाय ! मायबोलीवरच्या प्रेमामुळे!!:स्मित:
योग , कृतकृत्य वाटतंय ना?
आता सगळ्यांचे सुरेल आवाज ऐकण्याची घाई झालीय. येऊ दे लवकर संपूर्ण गीत!!
मस्त!!
मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह! पहिला म्युझिकपीस ऐकूनच
वाह! पहिला म्युझिकपीस ऐकूनच इतका आनंद झालाय ना!
अ प्र ति म ... यापुढे शब्दच नाहीत. गणेशोत्सवातून हे इतकं सुंदर गाणं निर्माण झालं याचा मनापासून आनंद वाटतोय. मायबोलीच्या शीर्षकगीताची कल्पना सर्वांत प्रथम लाजोने मांडली होती. त्यामुळे लाजोचे, उल्हासकाकांचे, योगेश जोशी यांचे आणि सर्व गायक गायिका, वादक या सगळ्यांचे आभार, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! चाल अतिशय सुरेल बांधलीये. धन्यवाद योग.
आणि ते अप्रतिम अॅनिमेशन कोणी केलय? त्यांचेही आभार. अतिशय चपखल अॅनिमेशन.
पूर्ण गाणं कधी ऐकवताय?
far mast vatla aikun!!!
far mast vatla aikun!!!
अप्रतीम, सुंदर
अप्रतीम, सुंदर ..................
झक्कास...! अतिशय सुंदर!
झक्कास...! अतिशय सुंदर!
सुंदर! नितांतसुंदर!! शब्द,
सुंदर! नितांतसुंदर!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शब्द, लय, ताल.. सारेच किती सही. ते अॅनिमेशनही जबरदस्त आहे. उल्हास भिडे, योग आणि सार्या गायकांचे मनापासून अभिनंदन करते.
आता पुन्हा पुन्हा ऐकेन.
झकास!!! मस्त.
झकास!!! मस्त.
अशक्य सुंदर!! खूप भारावून
अशक्य सुंदर!! खूप भारावून जायला होतय गीत ऐकून. संबंधितांचे अभिनंदन आणि आभार.
khoopach
khoopach chhannnnnnnnnnnnnnnnnnnnnn
उल्हास भिडे, योग आणि सार्या गायकांचे मनापासून अभिनंदन.
मायबोलीsssssssssssssssssssssssss मायबोलीssssssssssssss
क्लास.. क्लास...!!! फारच
क्लास.. क्लास...!!!
फारच सुंदर... अप्रतिम!!! शब्दच नाहीत येवढ सुंदर झालय गीत..!!!
मायबोलीने गाठलेला अजुन एक टप्पा...!!!
मला ऑफिसातून दिसत नाहिये
मला ऑफिसातून दिसत नाहिये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वा मस्त!
वा मस्त!
सिंपली सुपर्ब !!! अमेझिंग
सिंपली सुपर्ब !!! अमेझिंग
.
?
पूर्ण शीर्षकगीत कधी येतंय
खुप छान
खुप छान
अप्रतिम!!!!! किती गोड वाटतंय
अप्रतिम!!!!! किती गोड वाटतंय ऐकायला. मन प्रसन्न झालं एकदम.
ह्या गीताच्या निर्मितीत सर्व पातळ्यांवर मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार.
सरस्वतीमध्येच 'मायबोली'
सरस्वतीमध्येच 'मायबोली' अक्षरे गुंफण्याचा कल्पनेला सलाम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाण्याचा तरंगाचा इफेक्टही जबरदस्त आहे.
Pages