परवा एक वेगळेच फळ पाहायला मिळाले. तळहाताच्या ओंजळीत मावेल इतके!
मध्यातून हळूच उकलले अन
आणि पूर्ण उघडले
नाही मी नाही अॅरेंज केली द्राक्ष यात निसर्गाची जादू पहा, फळाच्या टरफलाला ही काळी छोटी फळं लगडलीत.
ही सगळी छोटी फळं काढली तेव्हा हे टरफलही कित्ती सुंदर दिसले
त्यातले काळे छोटे फळ सोलले. वरचे हे लाल अवरण, त्याच्या आत काळे पांतळ साल, त्या आत पांढरे नाजूक साल, आतले काळे टणक अवरण, त्या आतले स्किन कलरचे पांतळ साल काढले अन, त्यातून निघाला हा मोती !
अन हा संपूर्ण सोललेला मोती !
माझी मैत्रीण कम मावशी जुनागडला गेल्या होत्या. तिथे त्यांना हे फळ दिसले. वेगळे म्हणून त्यांनी लगेच चौकशी केली. तेव्हा त्या फळवाल्याने हे पिस्त्याचे फळ आहे असे सांगितले. त्यांनी लगेच डझनभर खरेदी केली. आल्यावर आम्हा सगळ्यांना दाखवली. मी नेटवर सर्च केलं पण मला काही या फळाची माहिती सापडली नाही. पिस्त्याचे फळ नेटवरती खुपच वेगळे आढळले. कोणी माहिती द्याल का हे कसले फळ आहे ? चव मात्र अगदी पिस्त्यासारखीच आहे. अगदी थोडा फरक वाटतोय. पिस्ता अन काजू यांच्या मधली काहीशी. जागू, दिनेशदा आणि माहितगार प्लिज मदत करा ना .
(No subject)
कसलं भारी...
कसलं भारी...
अवल, खरंच नवलच आहे!
अवल, खरंच नवलच आहे!
अगं हा जंगली बदाम आहे बहुधा,
अगं हा जंगली बदाम आहे बहुधा, स्टर्क्युलिया फिटिडा. पिस्ता नाही.
आरती, किती छान, निसर्गाचे असे
आरती, किती छान,
निसर्गाचे असे कितीतरी अविष्कार आपल्याला माहितीही नसतात, पण हे पाहून फार मस्त वाट्लं
ती आतल्या फळांची अरेंजमेंट किती शिस्तबद्ध आहे.
वाह...
सॉलिड...... वेगळंच दिसतय!!!!
सॉलिड...... वेगळंच दिसतय!!!! अजब फळ....
(No subject)
शांकली बरोब्बर. हे बघा.
शांकली बरोब्बर. हे बघा. http://en.wikipedia.org/wiki/File:Sterculia_foetida_(Wild_Almond)_fruits_W_IMG_8878.jpg
http://commons.wikimedia.org/
http://commons.wikimedia.org/wiki/Category:Sterculia_foetida
अवल, खरच छान फळ आहे.
अवल, खरच छान फळ आहे.
वॉव्..अमेझिंग फळ!!!
वॉव्..अमेझिंग फळ!!!
जंगली बदाम >> तरीच! मला इतके
जंगली बदाम >>
धन्यवाद अवल, शांकली, केपी.
तरीच! मला इतके दिवस वाटायचे की बदामाचे चिन्ह आणि खायचे बदाम किंवा झाडाला लागलेले बदाम यांचा काही संबंध असेल का? आज ती शंका फिटली. चौथ्या फोटोमधे आतली फळे वगळली तर बाहेरचा संपूर्ण आकार बदामासारखा दिसतो आहे आणि रंगही अगदी लाल! बदाम म्हणजे हृदय वगैरे ठीके पण मग या चिन्हाला मराठीत 'बदाम' हेच नाव का? एक कोडे सुटले.
Thanks Shankali & Kandapohe
Thanks Shankali & Kandapohe
AshuD agadi khar g
AshuD
agadi khar g
आशुडे तुझी सगळी पोस्ट लाईक.
आशुडे तुझी सगळी पोस्ट लाईक.
अगं हा जंगली बदाम आहे
अगं हा जंगली बदाम आहे बहुधा>>>>>हो जंगली बदामच आहे.
हेय मस्तच आहे हे...
हेय मस्तच आहे हे...
आरती, मस्त दिसतायत ते फोटो.
आरती, मस्त दिसतायत ते फोटो. निसर्गाची किमया अद्भूतच.
जंगली बदामच, पण फिटीडा
जंगली बदामच, पण फिटीडा वर्गातला म्हणजे अगदी घाणेरडा वास येणारा फुलोरा.
हा फुलोरा असतो देखणा मात्र.
पिस्त्याचे फळ वेगळे असते. आपण जो सालासकट पिस्ता बघतो त्यावर किरमिजी रंगाचे आवरण असते. ते अगदी पातळ असते आणि त्याला तशी चवही नसते. (मी इराणमधले ओले पिस्ते खाल्ले आहेत.)
हो आमच्या घराजवळ आहे हे झाड.
हो आमच्या घराजवळ आहे हे झाड. त्याच्या सुकलेल्या फांद्या उमललेल्या कवचासकट खाली पडतात त्या गोळा करून ठेवल्या आहेत. रंगवून डेकोरेशनला चांगल्या दिसतील.
कोकणात आणि गोव्यात ह्याला
कोकणात आणि गोव्यात ह्याला "हीर्यचे" झाड असे म्हणतात. फोफळि सारखीच दिसायला पण त्याचापेक्षा उंच आणि रुंद असे हे झाड असते.
मस्तच दिस्तंयं!
मस्तच दिस्तंयं!
हे बहुधा "गोलदारू" या
हे बहुधा "गोलदारू" या नावाच्या. झाडाचे फळ असावे.
हिरव्याकंच डेरेदार दोन ते चार मजली झाडाला अशा फळांचे घोस लागतात. सुरूवातीला ही फळे हिरवी असतात. पिकत जातील तसतशी लाल आकर्षक रंगाची आणि रूपाची होतात.
मस्त
मस्त
फळविक्रेता विकत होता म्हणजे
फळविक्रेता विकत होता म्हणजे हे फळ खातात का? की इतर काही उपयोग आहेत याचे?
आशू, खरंच की ग.
पहिल्यांदाच बघितले हे फळ.
पहिल्यांदाच बघितले हे फळ.
मस्त. पहिल्यांदाच कळले ह्या
मस्त. पहिल्यांदाच कळले ह्या फळाबद्दल. धन्यवाद अवल
आशूडी + १
उघडल्यावर मस्तच दिसतेय फळ..
उघडल्यावर मस्तच दिसतेय फळ..
वेगळेच फळ! धन्यवाद अवल,
वेगळेच फळ! धन्यवाद अवल, शांकली,केपी.
अवलतै हा दागिनाच आहे. या
अवलतै
हा दागिनाच आहे. या मोत्यांची माळ करायची. ती ठेवायसाठी डबी ऑलरेडी आहेच. कुठल्याही समारंभात मिरवण्यासाठी एकदम मस्त
Pages