सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दी खुप दिवसांपासुन हवी होती अशी शुअर शॉट रेसिपी. मी बीना ब्रेडचे केले होते २ वेळेस. पण सगळे अंदाजेच. बरे जमले होते. पण तरी पाहुणे येणार असतील तर खात्रीने चाम्गले होइल याची गॅरंटी नव्हतीच.

आजच करण्यात येइल Happy

मस्त. खरंच सोप्पी आणि सुटसुटित वाटतेय रेसेपी. आज्-उद्या मध्ये करुन बघणार.

मस्तच. मी हे पुडिंग कॅरॅमलशिवाय केलं आहे. पण कॅरॅमलची मजाच वेगळी. तुम्ही केलेलं कॅरॅमल आणि ते बदामाचे काप परफेक्ट दिसतायंत अगदी Happy

वॉव! बदामाचे काप की मोगर्‍याच्या कळ्या?

परवाच टीव्हीवर दाखवलं होतं. सध्या अश्याच रेसिपीज दाखवताहेत........नाताळ निमित्त!

मस्त फोटो!!

साखर कॅरमलाइज्ड करताना त्यात थोडं पाणी घालावं लागतं का? की तशीच गॅसच्या आचेवर साखर वितळू द्यायची?

मी ह्यात वॅनिला इसेन्स घालते.म्हणजे अंड्याचा जराही वास येत नाही.वर्षू नील बदामाचे काप खासच.

साखर कॅरमलाइज्ड करताना त्यात थोडं पाणी घालावं लागतं का? की तशीच गॅसच्या आचेवर साखर वितळू द्यायची?>> माझ्या माहिती प्रमाणे पाणी नाहित घालत

मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल >>> Lol कित्ती प्रांजळ आहेस गं वर्षू Lol आता तुमा जमलं म्हणजे मला जमणारंच Happy सही रेसिपी आहे! घरात अंडं तेवढं नाही, नाहीतर लग्गेच केलं असतं... या सोप्या आणि भारी रेसिपीबद्दल धन्स वर्षू Happy

मंजूडी.. पाणी अजिबात घालायचं नाहीये.. Happy
दिनेश दा.. अंड नको.. तर मग दोन स्लाईसेस घ्याव्या लागतील ,म्हंजे पुडिंग नीट सेट व्ह्यायला मदत होईल..

मस्त रेसिपी आहे. सध्याचे घरातले गोड पदार्थ संपले की करून पाहिन.

एक कळलं नाही.
कुकर मधे ठेवून वाफवता येईलश्या जाड बुडाच्या भांड्यात पाऊण कप साखर ,मंद आचेवर वितळत ठेवा>>>>> म्हणजे नुसतं खाली पाणी घालून भांडं ठेवून कुकर ओपनच ठेवायचा ना?

अंजली.. ज्या भांड्यात पुडिंग करायचे आहे त्याच भांड्यात कोरडी साखर घेऊन वितळवायची आहे. कारण कॅरेमल थंड होऊन कडक झालं कि त्यावरच दूध,अंड,साखर,ब्रेड चं एकजीव मिश्रण ओतायचंय. मग
कुकर मधे पाणी घालून ,त्यात स्टँड ठेव. त्यावर हे मिश्रण असलेलं भांड ठेव. झाकण ठेवू नकोस भांड्यावर आणी कुकर ला झाकण लाव पण वर शिट्टी ठेवू नकोस. आपण इडल्या जश्या वाफवतो त्याच पद्धतीने पुडिंग वाफव..
होप क्लिअर????
नाहीतर परत सांगीन

मग २,३ उंच वाट्या किंवा स्टील चं बाऊल उपडं करून त्यावर भांड ठेवून ट्राय कर..
जस्ट लक्ष ठेव कि कुकरमधलं पाणी पुडिंग मधे शिरणार नाही..
हॅपी कुकिंग अंजली Happy

वर्षू, हे पुडिंग मी कॉलेजात असताना खूपदा केले आहे व बर्‍याचजणांना खिलवले आहे. आता अंडे खात नाही, म्हणून बरीच वर्षे ही रेसिपी मनात धूळ खात पडली होती! Proud थँक्स या रेसिपीची आठवण करून दिल्याबद्दल! फोटो टेम्प्टिंग आहेत. आता हे पुडिंग जादाचे ब्रेड स्लाईस घालून करून बघेन.
व्हॅनिला इसेन्स / वेलदोडा पूड यांचा स्वाद मस्त लागतो या पुडिंगला.

(रच्याकने : मी बर्‍याचदा कॅरेमल करताना साखर जरा जास्तच जळवली आहे, आईचे किचन धूरमय केले आहे, पातेल्यातून ज्वाळा काढल्या आहेत... नंतर ते पातेले घासूनही काळेकुट्ट राहिले म्हणून आईची बोलणीही खाल्ली आहेत कॅरेमल पुडिंगसोबत!! :हाहा:)

आई गं अरुंधती Proud ...
बिच्चारं कॅरेमल.. आणी बिच्चारं पातेलं .. Lol
मला पुडिंग्समधे व्हॅनिला इसेन्स / वेलदोडा पूड आवडत नाही म्हणून नाही जात त्यांच्या वाटं ला Wink
हां ब्रेड स्लाईसेस दोन घालून बघ...

जवळपास असंच,( फक्त कॅरॅमल शिवाय) पुडींग मी ओव्हन मध्ये करते. तेव्हा हे पण कूकर ऐवजी ओव्हन मध्ये होऊ शकेल ना ?

वर्षु गं, माझा हात वर. एक क्वेच्चन! ती साखर कॅरमलाइझ करताना, साखर घातलेलं भांडं डायरेक्ट फ्लेमवर ठेवलं तर नाही चालणार? कुकरमधल्या पाण्यावर अजुन एक भांडं त्यात साखर आणि तीही गोल्डन होइपर्यंत ठेवायची, म्हणजे फार वेळ लागेल त्यापेक्षा डायरेक्ट फ्लेमवर ते भांडं ठेवलं तर?

मनिमाऊ
आधी कॅरामल करण्यासाठी भांड गॅसवर मंद आचेवरच ठेवायला सांगितलय की. जळू नये म्हणून सतत ढवळायची साखर.
सगळ मिश्रण तयार झाले की मगच ते कुकरमध्ये ठेवायला सांगितालय. फक्त भांड कुकरमध्ये बसेल असे हवय.
वर्षू मस्त आहे. ही कृती बरीचशी स्पॅनिश फ्लॅनच्या कृतीशी मिळतीजुळती आहे.

Pages