कोकण दर्शन (भाग - २)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 November, 2011 - 13:40

कोकण दर्शन (भाग १) http://www.maayboli.com/node/30691

२१) वेळणेश्वरला आम्हाला अगदीच संध्याकाळ झाली म्हणून आम्ही तिथल्याच समुद्रकिनार्‍या जवळ असणार्‍या एम.टी.डी.सी. च्या रुम्स मध्ये राहीलो. तिथे रात्री अगदी शांत, थंड आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ह्या वातावरणात आम्ही गप्पा मारत बसलो. ही सकाळ

२२)

२३)मला सगळ्यात जास्त आवडलेला हा नजारा.

२४) तिथे हे पक्षी भरपूर होते पण पोझ देत नव्हते.

२५) पारव्याने मात्र व्यवस्थित भाव न खाता फोटो काढून दिला.

२६) कण्हेरीची फुले

२७) तिथुन निघून आम्ही प्रथम हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो.

२८) हेदवीच्या गणपतीच्या आजूबाजूचा हिरवागार परीसर.

२९)

३०) ही फुले कोकणात सगळीकडेच पहायला मिळाली.

३१) तिथून आम्ही मालवणच्या दिशेने निघालो त्या वाटेतील दृश्ये.

३२)

३३) मालवणात जाता जाता अचानक भराडी देवीच्या दर्शनाला जायचे ठरले. आणि इतके सुंदर मनमुराद दर्शन झाले की आम्हाला खुप प्रसन्न वाटून दिवसभराचा थकवा क्षणात दूर झाला. तिथे स्ट्रीक्टली देवीचा फोटो काढणे मनाई आहे.

३४) त्या रात्री तारकर्लीला राहून आम्ही सकाळी समुद्र सफर करण्यास सज्ज झालो.

३५) तारकर्लीच्या किनार्‍यावर लागलेल्या बोटी ह्या समुद्र सफर घडवून आणणार्‍या फायबरच्या बोटी आहेत. आम्ही लाकडाची बोट घेतली होती.

३६) ही आम्ही बुक केलेली लाकडी बोट. बिचारे ते बोटवाले खुप कष्ट करून बोट आत नेतात आणि बाहेर आणतात.

३७)

३८) तिथले सगळेच समुद्रकिनारे स्वच्छ आणि अप्रतिम. तारकर्लीच्या समुद्र किनार्‍यावे हे शंख शिंपले आलेले. त्यातील पाण्यातले बरेचशे शंख जिवंतही होते.

३९) सुंदर दिसत आहेत ना.

४०) वेगवेगळे प्रकार

४१) अफाट समुद्र आम्ही बोट मध्ये बसुन न्याहाळत होतो.

४२) सकाळच्या उन्हात किनारा चमकत होता.

४३)

४४)

४५) हा बहुतेक वेंगुर्ल्याचा किनारा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सगळे फोटो मस्त आलेत.
किती वर्षांनी कण्हेरीची फुले पाहिली.
३१ क्रमांकाचा फोटो पाहून असं वाटलं की आता सुंदर दिसणार्‍या जागेवर काही वर्षांनी इमारतींची दाटी झालेली दिसेल काय?

वा! सुंदर आहेत प्रची. सहलही छानच झालेली दिसतेय!

शंख शिंपली दिसली की सामान्यतः खेकडे आणि समुद्रफेसही दिसतो. इथे मात्र ते दिसत नाही आहेत.

मस्त.
मालवणला असताना समुद्रावर जाउन भरपुरसारे शंख शिंपले गोळा करायचो. अगदी पिशव्या पिशव्या भरुन. त्याचे खेळ करायचो मग. स्टार फिश पण यायचेत.
माझ्या शाळेत एक टिचर होते त्यांना मोठ्ठा खेकडा सापडलेला. त्याच शेल एवढ मोठ होत की त्यांनी त्यात घड्याळ बनवलेल.

दीपा, गंधर्व, नैना, नरेंद्र, जिप्सी, विकास, शशांक, एक पाकळी, दक्षिणा धन्यवाद.

रिमा माझ्या मुलीनेही गोळा केले ते शंख आणि घरी आणलेत. स्टरफिशही दिसला आम्हाला.

मालवण, माझे गाव.. पण मी तारकर्लीला अजूनही गेलो नाही कधी. इथल्या फोटोतूनच बघितली.

वॉव्...एकदम भारी!
आणि इतके रंगी बिरंगी शंख शिंपले... मी सुद्धा भरभरुन वेचले असते. Happy
एवढी सागरी संपदा असेल तर मी ठाण मांडुनच बसेन त्या किनार्‍यावर.

अप्रतिम !!
[ तारकर्ली- देवबाग या माझ्या घरच्या खेळपट्टीवर प्रत्यक्ष जागूजीनी बॅटींग केली याचा मला खास आनंद !]

मस्तच Happy

भाऊ तुम्ही तारकरलीचे का ?

प्रज्ञा अजुन एक किंवा दोन भाग होतील.

शांकली, रोहीत धन्यवाद.

<< भाऊ तुम्ही तारकरलीचे का ? >> तारकर्लीच्या जवळच आमची छोटी नारळांची बाग आहे [ आतां 'होती', म्हणूंया]; खाडीच्या बाजूला समोरच्या कांठावर आमचं वडिलोपार्जित घर आहे . त्यामुळे,
तिथून तारकर्ली-देवबागला जा-ये करायला आमची एक होडी पण होती. तो सारा परिसर आम्हां भावंडांच्या भावविश्वाचा केंद्रबिंदूच आहे ! म्हणूनच वरची पोस्ट विशेष भावली .

भाऊ खरच सुंदर आहे तो परीसर.

इनमिनतिन धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल.

धनश्री, शोभा धन्यवाद.

जागु, सगळेच फोटो खुप भारी आलेत.

ते शंख शिंपले पण अतिशय छान .. खरचं पटकन उचलावेसे वाटत आहेत.:)