नेमके कसे ?

१) मुलीन्नी वागावे ते नेमके कसे?
मनमोकळेपणाने समाजात वावरले तर म्हणतात.....
पोरीला घरबन्धन्च नाही.
२)शान्त धिरगम्भीरपणे वावरले तर म्हण्तात.....
सन्कटान्ना तोन्ड देण्याची हिम्मतच नाही.
३)मित्रमन्ड्ळी जास्त असतील तर म्हणतात......
हि मुलगी टवाळखोरच असेल.
४)मित्रमन्ड्ळी कमी असतील तर म्हणतात......
मुलगी एकलकोन्डी असेल.
५)लवकर लग्न केले तर म्हणतात......
एखादे लफडे लपवायचे असेल.
६) शिक्षण कमी घेतले तर म्हणतात.......
अक्क्ल कमी असेल, नाहीतर मागासलेल्या विचारान्ची असेल.
७) खूप शिकलेली असेल तर म्हणतात.......
काय कामाची डोक्यावर नाचेल.
आता तुम्हीच सान्गा, या दुतोन्ड्या जगात कसे वागावे, वागावे ते नेमके कसे?


मस्तच! म्हणूनच तर म्हणतात ना...ऐकावे जनाचे करावे मनाचे!!



खुप छान,
अग मनाला येईल तस पण आपणाला साजेस वागाव, आपण कसे आहोत हे आपणाला माहितिये मग जगाला स्पश्टिकरन देन्यचि गरज काय?
आणि आपल्या लोन्काचा विश्वास आहे तर प्रश्नच नाहि.



ही कथा आहे?? का???



हो ही सर्व मुलीन्चीच कथा आहे.



अहो हे मुलांच्या बाबत पण असेच आहे....

जरा मोकळेपणा दाखवला की म्हणता आगाउ आहे...
जरा कमी बोलल की म्हणता शिष्ठ आहे...
जरा बरे कपडे घातले की म्हणता नटवा कुठला...
गबाळ राहिल के म्हणता मॅनर्सच नाहीत...
खुप मैत्रिणी असल्या की म्हणता चालू आहे...
एकच असली तर म्हणता की बरी गटवलीय....
आणि एकपण नसली तर म्हणता की धम्मकच नाहिये....
लवकर लग्न केल तर म्हणता उतावळा नवरा आणि..
लवकर नाही केल तर म्हणता जमतच नसेल कुठं...
आई-आई, केल की म्हणता ममाज बॉय आहे....
आणि नाही केल तर म्हणता घरच्यांशी एटॅचमेंटच नाहिये...

असो.... ही लिस्ट अशी पुढे बरीच वाढवता येइल....

पण हे सगळ "कथा" मध्ये नकोय.... आपण "रडकथा" नावाचा वेगळा विभाग उघडुया का?



shravani, swaroop दोघांचेही approches एकदम पटले.
पण
"हमे हिला सके ये जमाने मे दम नही
जमाना हमसे है, जमाने से हम नही"
असं म्हणून रहायच. निवांत!!!!!!!!!!



श्रवणी ही कथा (किन्वा जो काही साहित्यप्रकार असेल तो. पण कविता म्हणण्यापेक्षा कथा बरे) मला मेलमधे वाचल्यासारखं वाटतंय. तुझे नाव नव्हते त्यावर.



खरच स्वरूप आणि श्रवणी दोघांचे मुद्दे आवडलेत. कुठलाही साहित्यप्रकार असेना मनाला भावलं ते महत्त्वाचं.