अशीही नागपंचमी ! (आमच्या वार्ताहराकडुन)

*******काल्पनिक*******आज नागपंचमी, आज पुन्हा आमचा वार्ताहर आपल्या कामावर निघाला. जीव मुठीत धरुन अर्थात. मागच्या अनुभवाने आम्ही शहाणे झालो असल्याने या वेळी त्याच्याकडे टेपरेकॉर्डर द्यायला विसरलो नव्हतो. त्याच्या टेपेतुन ( टेपमधुन या अर्थी ) मिळालेले संवाद.

* सासु सुनेचा रंगात आलेला संवाद !
"अगो सुनबाई, आज नागोबाची पुजा करुन त्याला दुध आणि लाह्या द्यायच्या असतात, आजकालच्या तुम्हा मुलींना मुळीच सणासुदीच महत्व नाही हो! "
" आहो सासुबाई, पुजा करायची असते हे मला आत्ता सांगताय? बाकी दुध आणि कॉर्नफ़्लेक्स खाउन गेला हो नागोबा तुमचा"
" काय म्हणतेस? तु सकाळी सकाळी नागोबाला दुध लाह्या दिल्यास म्हणतेस? मग देवघरात नागोबा दिसत नाही तो?"
" अस काय करताय आई, आता इतक्या उशिरा दिसणार का तो? केव्हाच गेला"
" बोलतेस काय सुनबाई? तु काय खर्‍या नागोबाला ओवाळलेस की काय? " सासुबाईंचा घाबरल्यासारखा आवाज.
" नाहीतर काय? आता खरोखरचाच आहे ना तो "
" अगो बाई, खरं की काय सुनबाई?"
" आहो यात खोटं काय असणार आई?"
या नंतर असे कळले की कॉलनीतल्या सगळ्या बायका या घरात सुनबाईची ओटी भरण्यासाठी गर्दी करत होत्या. नाहीतरी आजकाल पपयातुन निघालेल्या, बटाट्यातुन निघालेल्या, नारळातुन निघालेल्या गणपतीच्या मुर्तीच्या पुजेसाठी सुध्दा अशीच गर्दी लोटत असते. त्यात फ़ळात असलेला दोष आरामात झाकल्या जात असतो. या ओटी भरणे या प्रकारामध्ये टी शर्ट या प्रकाराला पदर नसल्याने बळेच साडी नेसायला लागलेल्या सुनबाई वैतागलेली दिसत होती.
या सगळ्या प्रकारानंतर चकीत झालेल्या आमच्या वार्ताहराने त्या घरात ठाण मांडले आणि शेवटी उजेडात आले थक्क करणारे सत्य. जेंव्हा त्या घरातल्या सुनेचा पती आणि सासुचा मुलगा ऑफ़ीसातुन घरी आला. तेंव्हा रेकॉर्ड झालेले हे संवाद.

" आलास का बाळा? नशीबवान हो तु, तुला अशी देवीसारखी बायको मिळाली या आजच्या काळात"
" काय केले तुझ्या या सुनेने आज?"
" अरे, आज हीने खर्‍या नागोबाची पुजा करुन त्याला दुध आणि लाह्या दिल्या" नेहमी प्रमाणे 'पुजा केल्याची' भर पडली होतीच.
" काय म्हणतेस आई?"
" काय डार्लींग आज कशी काय इतकी भावीक झालीस? एरव्ही देवळात हीलस्टेशनला गेल्यासारखी जातेस" हे वाक्य अर्थात कुणाला उद्देशुन म्हंटल्या गेले असेल ते तुम्ही ओळखले असेलच.
" अरे मी काय केलेय? आईच मी काहीतरी चमत्कार केल्यासारखे वागतायत आज"
"असे नक्की काय केलेस तु?"
" अरे आईंनी विचारले की नागोबाला दुध आणि लाह्या दे म्हणुन, आता तु जातानाच दुध कॉर्नफ़्लेक्सचा ब्रेकफ़ास्ट करुन गेलास असे सांगीतले तर त्यांनी काहीतरी भलताच समज करुन घेतलाय"
"सुनबाई, तोंड आवर जरा नवर्‍याला त्याच्या तोंडावर साप म्हणतेस? काय ह्या आजकालच्या मुली आमच्या वेळी नव्हतं बाई असलं काही" इथुन पुढचे पाल्हाळ टेपवरुन पुसुन टाकण्यात आले आहे.
" अय्या! तुम्ही स्नेक नागोबा बद्दल म्हणत होता का? मी समजले तुम्ही तुमच्या मुलाला नागेशला आज लाडाने नागोबा म्हणताय."
पुढे टेपवर ठप्प ठप्प असे तीन आवाज रेकॉर्ड झाले आहेत ते बहुधा कपाळावर हात मारल्याचे असावेत.

आमचा वार्ताहर दिवसभर एकाच घरात गुंतुन पडल्याने आणखी माहीती मिळवु शकला नाही तरी कृपया वाचकांनी आपापल्या परीने ह्यात भर घालावी ही विनंती. स्मित


सही रे. मस्त आहे .......... स्मित

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा
उलगडला धारांतून अवचित हिरवा मोरपिसारा



हाहा



हा हा मस्तच स्मित
नागोबा स्मित



हा हा हा.. छोटे पण छान. स्मित शेवटच्या २ ओळी तर मस्त. ते नागेश आणि ३ ठप्प. तूच भर घाल की अजून.



सही आहे.... अजुन कुठल्या घरात गेला नाही का तुमचा वार्ताहर???



अस बोलतात का..? आता बघ... नाग तुला पंच करेल .. मग म्हणत बसशील नाग पंच मी.. नागपंचमी... स्मित

वार्ताहर पुढे घरात नाही बिळात गेला आहे... बाहेर आल्यावर सविस्त व्रुत हाती येईल..

चाफ्या.. चालु दे तुमच्या वार्ताहराचे सिजन आला आहे... गटरीला बद्दल काही खबर नाही ती? कशी असणार म्हणा .. तुमचा पडला असेल गटारी करत... पालिका कर्मचार्‍यांना फोन करुन कळव...झाकण उघडा म्हणाव वार्ताहर अडकला आहे... स्मित



चाफ्फ्या, मस्तच रे!



अरे वा,
माझे आन आईचे सकळि हेच बोलने झाले,
वार्ताहर चाप्टर आहे हो, मीच हे बोलले काल सकाली फरक एवडाच माझ्या सासुबाईना नाहि आईला म्हणाले माझ्या नागोबा समोर, नागोबा हसत ओफिसला गेला.

आवड्ला माझाच विचार वार्ताहर कडुन,



चाफ्या, धम्माल्....मजा आली...



आ रा! रा!! कुठं ठिवावं ह्या चाफ्याला !!!!!
गोदेय



फ्लॉवर पॉट मध्ये स्मित



अरे बसणार नाहि तो फ्लॉवर पॉट मध्ये त्याला
फ्लोवर ट्ब्(घमेल्यात) टाक.



हाहा



मस्त रे.. स्मित



हाहा मस्तच!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
The only thing bad about Holiday is it is followed by a Non Holiday..
स्मित



हाहा जबरदस्त..