१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.
२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.
३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.
४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते
महत्वाची सुचना : हा फोटो पाहुन कोणी जळू नये आणि जळल्यास मी जबाबदार नाही.
सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते.
सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे.
सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.
तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.
आई.. ग... जेवतानच असे फोटो...
आई.. ग... जेवतानच असे फोटो...
मस्तच... फोटो आणि त्यातील तुकडी आहाहा
जागु, मस्तप्रेमिं ऐवजी
जागु, मस्तप्रेमिं ऐवजी मत्स्यप्रेमी असा बदल अपेक्षीत..
सुरमई आँखियोंमे नन्हा मुन्ना
सुरमई आँखियोंमे नन्हा मुन्ना सपना दे जा रे !
सुरमई शाम इस तरह आये, साँस लेते है जिस तरह साये !
(No subject)
जुई रंगत येईल आता
जुई रंगत येईल आता जेवणात.
सारीका मॅडम (शाळेतल्या शुद्धलेखन तपासणार्या ह्या अर्थाने :स्मित:) लिखाणात दुरुस्ती केली आहे.
महेश अजुन कोळी गाणी पण आहेत ना.
निकिता
जागु, मी असे वांग्याचे काप
जागु, मी असे वांग्याचे काप करुन खाणार आहे..
तो पा सु,,{एवढे कि विचारु
तो पा सु,,{एवढे कि विचारु नये}
मसाला म्हंणजे नेमके काय काय?
सारीका मग अश्विनी, दिनेशदा,
सारीका
मग अश्विनी, दिनेशदा, दक्षीणा ह्यांना पण पाठव.
मलाही सुरमई अखियोमे गाणेच
मलाही सुरमई अखियोमे गाणेच आठवले. दिवाळी आली की बाजारात सुरमईचा पाऊस पडायला लागतो.
आज दोन घास जास्त जातील जागु कृपेने.
मी एकदा चुकून कुपा आणलेला सुरमई सारखा दिसतो म्हणजे तसाच लागत असणार असे समजुन. भयाण लागतो
अगं मी दोनदा येऊन गेले इथे.
अगं मी दोनदा येऊन गेले इथे. आणि सुरमईच्या आकाराचे डोळे कसे दिसत असतील हाच विचार करत बसले
जागु तोंपासु मी सुरमई चे एक
जागु तोंपासु

मी सुरमई चे एक दोन तुकडे टेस्ट केले आहेत.
दक्षे मला प्रचंड धक्का बसला
दक्षे मला प्रचंड धक्का बसला तुझ वाक्य वाचुन. अग मग आख्खी तुकडीपण खाउन बघ.
अश्विनी
साधना खुप जण फसतात.
मस्त वा वा दक्षे मग आम्हाला
मस्त

वा वा दक्षे मग आम्हाला पण खाउ घाल की
दक्षे... दोन तुकडे?? मग बाकी
दक्षे... दोन तुकडे?? मग बाकी राहिलं काय?

माझा आवडता मासा. मोठी सुरमय, (आम्ही त्याला ईस्वण म्हणतो) रवा लावुन तळायची... यम्मी!
जागु मस्तच ग तोंपासु
जागु मस्तच ग तोंपासु
लाळच लाळ चोहिकडे.....
लाळच लाळ चोहिकडे.....
मसाला
मसाला .................???????????????
प्रिती थोड्याच वेळात तुला
प्रिती थोड्याच वेळात तुला लिंक देते.
फोटो छानच आहेत.
फोटो छानच आहेत.
धन्यवाद दिनेशदा. प्रिती ही
धन्यवाद दिनेशदा.
प्रिती ही मसाल्याची लिंक :
http://www.maayboli.com/node/25739
(No subject)
वर्षा केली आता बरोबर. धन्स ग.
वर्षा केली आता बरोबर. धन्स ग.
आईशप्पथ!!!!!!!!!!!! तोंपासू..
आईशप्पथ!!!!!!!!!!!!
तोंपासू........... माझा सर्वात आवडता मासा...........
अश्वीनी +१
अश्वीनी +१
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म धन्
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
धन्स
मला वाटले मसाल्यात कांदा लसुन खोबरे पण आहे
छान आहे
सुरमई मस्तच एक्दम
धन्स जागु
सकाळी सकाळी अत्याचार ! जबरी
सकाळी सकाळी अत्याचार !
जबरी आहे फोटो..
जीवघेणा फोटो!
जीवघेणा फोटो!
जागू, मस्त रेसिपी आणि
जागू, मस्त रेसिपी आणि लिहिल्येसही छान.
कोणीतरी माहितगारांनी या माशांच्या मराठी आणि इंग्रजी नावांचा तक्ता करा प्लीज. इथे ओरिएन्टल मार्केट्समधे काही प्रकार मिळतात, पण माझ्यासारख्या नवमांसाहारींना ओळखता येत नाहीत.
स्वाती,
स्वाती, http://cool007moss.blogspot.com/2008/02/fish-names-english-marathi-hindi...
या लिस्टचा प्रिंट घेऊनच मी मार्केटला जाते.
धन्यवाद, स्वाती२. ही आणखी एक
धन्यवाद, स्वाती२.
ही आणखी एक यादी प्रॅडीने दिली.
Pages