Submitted by संयोजक on 1 September, 2011 - 13:46
एकदंत, वक्रतुंड रूप गोड गोजिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || धृ ||
ताल देतसे समीर, रुणझुणती घाग-या
चंचल चपला उतरे पावलांत नाच-या
सोनसाखळ्या चरणी, त्यांत जडविले हिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || १ ||
मनमोहक हावभाव, मूक तरी बोलके
माय - तात गौरी-शिव पाहतात कौतुके
गिरकी घेता गणेश, सकल विश्वही फिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || २ ||
सूर्य-चंद्र, गगन-धरा, गिरि-सागर दंगले
तीन लोक नृत्याच्या मोहिनीत रंगले
दिन-रजनी विसरुनिया काळ नर्तनी विरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || ३ ||
कवयित्री: क्रांति साडेकर
संगीत : प्रमोद देव
गायन : श्री केदार पावनगडकर
हार्मोनिअम : श्री केदार पावनगडकर
तबलासाथ : श्री सुहास कबरे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
वा केदारसेठ वा...! काय सुरेख
वा केदारसेठ वा...! काय सुरेख गाता राव तुम्ही.
-दिलीप बिरुटे
वाह वाह !! अप्रतिम संगीत आणि
वाह वाह !!
अप्रतिम संगीत आणि रचना.... खूप आवडले
सर्वांचे आभार !!
खूपच सुंदर काव्य, सुश्राव्य
खूपच सुंदर काव्य, सुश्राव्य गायन, अप्रतिम संगीत आणि ठेका!
व्वा..............मस्तच
व्वा..............मस्तच !!

क्रांति.........काय सही शब्द आहेत गं.....!! "गणराज रंगी नाचतो" सारखं हे सुद्धा लोकप्रिय होणार
अतिशय सुरेल आवाज !!!
देवकाका........ चाल आवडेश
छान.. शब्द, सूर, लय मस्त
छान.. शब्द, सूर, लय मस्त जुळलय..
(फक्त ध्वनिमुद्रणात खरखर येतीये त्यामूळे थोडे कानाला खटकते आहे. असो.)
अ प्र ती म खूपच आवडलं
अ प्र ती म
खूपच आवडलं
अत्यंत सुंदर झालेय गीत. माय
अत्यंत सुंदर झालेय गीत.
माय - तात गौरी-शिव पाहतात कौतुके
गिरकी घेता गणेश, सकल विश्वही फिरे
सूर्य-चंद्र, गगन-धरा, गिरि-सागर दंगले
गीतकाव्याच्या दृष्टीने फ़ार उच्च कोटीच्या ओळी आहेत या.
खूप आवडले. धन्यवाद.
खूप आवडले. धन्यवाद.
सुंदर !
सुंदर !
क्रांति, गाण्याचे शब्द अतिशय
क्रांति, गाण्याचे शब्द अतिशय आवडले.
प्रमोदकाका, चालही सुंदर आणि केदार ह्यांचं गायनही आवडलं. मनःपूर्वक धन्यवाद
खूप आवडलं! प्रमोद काका चाल
खूप आवडलं!
प्रमोद काका चाल खूप सुरेख झालीये.
सुंदर ! अतिसुंदर !!
सुंदर ! अतिसुंदर !!
झक्कास !
झक्कास !
वा मस्त आहे गीत, गायन संगीत
वा मस्त आहे गीत, गायन संगीत ठेका सगळंच.. सुश्राव्य
ऑस्सम. अतिशय सुंदर. धन्यवाद
ऑस्सम. अतिशय सुंदर.
धन्यवाद केदार, क्रांति, देवकाका.
अप्रतिम. मस्तच .
अप्रतिम. मस्तच .
सही ! काय सुरेख आहे सगळेच...
सही ! काय सुरेख आहे सगळेच... शब्द, चाल, गायन, साथ... वा वा !
क्रांति साडेकर, प्रमोद देव, केदार पावनगडकर, सुहास कबरे सर्वांना धन्यवाद !
समस्त प्रतिसादकांचे मनःपूर्वक
समस्त प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!
मागणी करताच अल्पावधीत इतकी सुंदर काव्यरचना करून दिल्याबद्दल क्रांतीचे खूप कौतुक वाटते.
हे गाणे आपल्या सुरेल आवाजात गाऊन दिल्याबद्दल केदारजी आणि उत्तम तबलासाथ केल्याबद्दल कबरेसाहेबांचेही मनःपूर्वक आभार!
मायबोलीने संधी दिल्यामुळेच इतक्या सुंदर गीताचा जन्म होऊ शकला आणि म्हणूनच मी मायबोली प्रशासनाचाही मनःपूर्वक आभारी आहे.
अफाट! सही झाले आहे हे गाणे.
अफाट! सही झाले आहे हे गाणे. क्रांती, केदार व प्रमोदकाका खरचं धन्यवाद. पण ध्वनीमुद्रन अजून चांगले करून घ्या. हे गाणे गाजेल ह्यात अजिबात शंका नाही.