आमंत्रण लेखन स्पर्धा (नियम) : "आवताण... लै वरताण" : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 08:51

avataan.jpg

****************************************************************************

काय आवडलं आमंत्रण? आपल्याला अनेक प्रकारची लिखित आमंत्रणं येत असतात. लग्न, मुंज, बारसं, वाढदिवस, सत्कारसमारंभ, पुस्तक प्रकाशन, कवी-संमेलन .... अशी कितीतरी! कधी कधी मुख्य समारंभाआधीच या निमंत्रण पत्रिका आपली अत्यंत करमणूक करतात - कारण आपलं 'आवताण' अधिकाधिक 'वरताण' करण्यापायी लोक काहीही लिहितात.

हे झालं केवळ त्यातल्या लिखाणाचं. कधी कधी तर भलत्याच ठिकाणी भलतेच शब्द वापरल्याने, शुद्धलेखन न तपासल्याने अक्षम्य चुका होतात. कधी त्यात अचाट फोटो असतात तर कधी वर्णनात्मक अवर्णनीय काव्य असते. एक ना दोन ... हजार तर्‍हा!

तुम्ही बघितली आहे अशी एखादी निमंत्रणपत्रिका? नसेल तरीही हरकत नाही. कागद-पेन उचला आणि एखादी मस्त विनोदी निमंत्रणपत्रिका लिहून काढा आणि सगळ्यांना ते आमंत्रण पाठवा. समारंभ कोणताही निवडायची मुभा आहे. पाठवताय ना? सगळे तुमच्या 'आवताणाची' आतुरतेने वाट बघतायत.......

****************************************************************************

नियम :
१. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
२. प्रत्येक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवू शकतो.
३. प्रत्येक प्रवेशिकेसाठी कमाल शब्दमर्यादा ४०० शब्द.
४. पत्रिकेत फोटो, चित्र, नक्षी इत्यादी टाकून आकर्षक करू शकता.
५. स्पर्धेचा अंतिम निकाल मतदान पद्धतीने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

प्रवेशिका कशा पाठवाल?

प्रवेशिका पाठवण्याची पद्धत सोपी करण्याच्या उद्देशाने, प्रवेशिका पाठवण्याबद्दलचे नियम बदलण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत (१ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०११) स्विकारण्यात येतील. प्रवेशिका पाठण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य-नोंदणीकरता १ सप्टेंबरला खुला करण्यात येईल.

१. 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०११' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सभासद झाला आहात.

२. याच गृपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०११ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शिर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
आमंत्रण लेखनस्पर्धा - "आवताण ... लै वरताण" - स्वतःचा मायबोली आयडी

४. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्युमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

५. शब्दखुणा या बॉक्समध्ये "आमंत्रण लेखन स्पर्धा, आवताण ... लै वरताण, मायबोली गणेशोत्सव २०११" हे शब्द लिहा.

६. मजकूरात आपली प्रवेशिका लिहावी / कॉपी-पेस्ट करावी.

७. मजकूरात प्रचि टाकायचे असल्यास मजकूराच्या बॉक्सखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नविन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी upload हा ऑप्शन निवडा. मग 'browse' हा पर्याय क्लिक करून तुमच्या कॉप्युटरवरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की कालच्या करड्या बॉक्स मध्ये तसा मेसेज दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी 'Send to textarea' हा ऑप्शन वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रचि टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.

८. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.

१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा ऑप्शन वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही तुमच्या निरनिराळ्या कार्यक्रमांच्या आमंत्रणाची आतुरतेनं वाट पहात आहोत. पाठवताय ना आम्हाला आमंत्रण?