.
काही दिवसांपूर्वी तिन मायबोलीकर गप्पा मारत होते.
'पूर्वी कसली मजा यायची माबोवर.'
'का रे? मजा तर आताही येते.'
'तस नाही रे. काही वर्षांपूर्वी माबोला सुगीचे दिवस होते. बरेचजण उच्च लिहायचे.
कविता, गझल, लेख... मेजवानी असायची नुसती. ती गंमत हल्ली नाही येत. डोळ्यांना, कानांनाही सवय होते उत्तम वाचायची, उत्तम ऐकायची. एकदा का ती सवय झाली की मन फक्त तोच दर्जा स्विकारतं.'
'हे मात्र खरं. हल्ली वैभव जोशी तर काहीच लिहित नाही.'
'हो रे.. तिच तर खंत आहे. कुठे गेले हे लोक?'
'वैभव हल्ली बराच बिझी असतो त्यामुळे वेळ मिळत नाही त्याला तेवढा.'
'अरे मग आम्हाला त्याच्या कविता वाचायला कशा मिळणार?'
'हं.. ए आपण असं केलं तर? आपण वैभवचा कविता, गझलचा कर्यक्रम अॅरेंज केला तर?'
'मस्त आयडीया'
हा एकच विचार मनांत आला आणि पुढलं सगळं मनासारखं घडत गेलं.
हे तिन मायबोलीकर म्हणजे आनंदमैत्री (आनंद चव्हाण), कौतुक शिरोडकर, किरू (किरण सामंत).
सुरूवातीला छोटं स्वरूप डोळ्यासमोर असलेला हा कार्यक्रम आता भव्य होऊन कागदावर उतरलाय.
आनंदाची गोष्ट म्हणजे यातून एका संस्थेची निर्मिती झाली. सृजन थिएटर्स, मुंबई.
तेंव्हा आता सृजन थिएटर्स, मुंबई, २० ऑगस्ट २०११ रोजी आपला आवडता मायबोलीकर वैभव जोशी याच्या गीतांची आणि गझलांची एक अनोखी मैफील घेऊन येत आहे.
कार्यक्रमांत सहभाग असणार आहे यांचा..१) वैशाली सामंत
२) राहूल देशपांडे
३) अमृता नातु
४) रघुनंदन पणशीकर
५) मधुरा दातार
६) दत्तप्रसाद रानडे
७) जयदीप बागवाडकर
८) जान्हवी प्रभू - अरोरा
आणि गझल, कविता सादर करतील...
सौमित्र आणि स्वतः वैभव जोशी..
सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांच असेल.
एवढा भव्य कार्यक्रम करायचा म्हणजे खर्चही तितकाच भव्य असणार. या खर्चाचा भार पेललाय आपलेच एक मायबोलीकर श्री. राम चिंचलीकर यांच्या एलिगंट केअरटेकर या कंपनीने.
त्याशिवाय आपल्या बर्याच मायबोलीकर मित्रांची मेहनत आहेच. ते सगळं कार्यक्रमानंतरच्या वृत्तांतात येईलच.
हा मायबोलीकरांनी मायबोलीकरांकरता योजलेला मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे. त्याचा आपण नक्की लाभ घ्यावा ही विनंती.
कार्यक्रम २० ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदीर, पुणे इथे होईल.
मायबोलीकरांकरता तिकीटविक्री १३ ऑगस्ट रोजीच चालू होईल आणि १५ ऑगस्ट पासून टिळक स्मारक मंदीर येथे तिकीटविक्री सर्वांकरता खुली होईल.
तिकीट मिळण्याचे स्थळ -
विवेक देसाई
१६ - अभिकल्प अपार्टमेंट,
अलकापूरी हाऊसिंग सोसायटी,
न्यु फ्रेंड्स सोसायटी समोर, वनाझ शेजारी,
पौड रोड, कोथरूड,
पुणे - ४११०३८
संपर्क - ९८५०५१३९१५
तिकीटं मिळण्याची वेळ -
शनिवार - सकाळी ९:३० ते दुपारी १२:००
संध्याकाळी ६:३० ते रात्री ९:००
रविवार - सकाळी ९:३० ते रात्री ९:००
अधिक माहितीसाठी संपर्क -
परेश लिमये - ९८९०४३०१२३ (पुणे)
किरू - ९८२०८१०६०६ (मुंबई)
आनंदमैत्री - ९७६९४५४४२९ (मुंबई)
* (काही तांत्रिक अडचणींमूळे तिकीट विक्री १३ तारखेला सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी)
कर्यक्रमासंदर्भात शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. त्याची ही काही क्षणचित्रे.
पण प्रेक्षक फक्त मायबोलीकर
पण प्रेक्षक फक्त मायबोलीकर नसणार ना?
उलट मायबोलीबाहेरचाही उदंड प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाला मिळावा अशीच शुभेच्छा मी देईन.
हे खुसपट म्हणून लिहिलेलं नाही, असं लिहून नकळत तुम्ही कार्यक्रमाचा स्कोप मर्यादित करत आहात असं वाटलं म्हणून लिहिलं. असो.
कार्यक्रमास शुभेच्छा.
कार्यक्रमास शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
मनःपूर्वक अभिनंदन आणि
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती, शुभेच्छांबद्दल
स्वाती,
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
>>>>>>कार्यक्रम सर्वांसाठी खुला असतांना अशी जाहिरात दिशाभूल करणारी वाटते.
तुझा असा समज होणं सहाजिक आहे.
'हा मायबोलीकरांनी मायबोलीकरांकरता योजलेला मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे' असं म्हटलय त्याचं कारण म्हणजे एकतर आयोजक, प्रायोजक आणि उत्सवमूर्ती म्हणजे स्वतः वैभव हे रामने म्हटल्याप्रमाणे मायबोलीकर आहेत. सुरुवातीला जेव्हा कार्यक्रमाचा विचार झाला तेंव्हा मायबोलीकरताच करायचा असा विचार होता. (एक छोटी मैफील). हळूहळू वर दिल्याप्रमाणे कार्यक्रमाचं स्वरूप वाढत गेलं इतकच. म्हणूनच आपण ११ ते १४ हे तिकीटविक्रीचे दिवस मायबोलीकरांकरता ठेवले आहेत. याचा अर्थ या दिवसांत बाहेरील लोकांना तिकीटं मिळणार नाहीत असं नाही पण खास त्यांच्याकरता तिकीट विक्री खुली नसणार.
त्या अर्थाने हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे.. आपणच योजलेला.. आपल्याकरता.
तुझ्या म्हणण्याप्रमाणे मायबोलीबाहेरचाही उदंड प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाला मिळावा असाच प्रयत्न आमचाही आहेच..
पुन्हा एकदा शुभेच्छांबद्दल धन्यवाद. :).
शुभेच्छा!
शुभेच्छा!
किरू , भरता बहेरच्य
किरू , भरता बहेरच्य लोकांसाठी हा कार्यक्रम तुम्हि ऑनलाईन प्रसारीत का करत नाही? गुगल+ चे हहँगाऊट हे उत्तम व फुकट साधन अशा कर्यक्रमासाठी सहज वापरता येईल!
भारता बहेरच्या लोकांसाठी हा
भारता बहेरच्या लोकांसाठी हा कार्यक्रम तुम्हि ऑनलाईन प्रसारीत का करत नाही? >>> उत्तम सूचना.
नुकतीच आमच्या शाळेची बॅच-रियुनियन पार्टी झाली. तेव्हा असा प्रयोग केला गेला होता. गूगल+ वापरलं होतं किंवा नाही ते माहिती नाही. पण टेक-सॅव्ही मंडळींनी काहीतरी खटपट नक्की केली होती आणि मर्यादित काळासाठी ती यशस्वी झाली होती.
किरू, मला तिकिट कसं घेता येईल
किरू, मला तिकिट कसं घेता येईल तुमच्याकडून ? फोन करू ? की टिस्मला जाऊ ?
मनापासुन शुभेच्छा!!!
मनापासुन शुभेच्छा!!!
धन्यवाद किरू
धन्यवाद किरू
संपूर्ण कार्यक्रम नका हो
संपूर्ण कार्यक्रम नका हो ब्रॉडकास्ट करू (फुकट). आम्ही तिकिटं काढून जाणार आहोत कार्यक्रमाला

पण युट्यूबवर नंतर काही स्निपेट्स टाकता येतील.
काही तांत्रिक अडचणींमूळे
काही तांत्रिक अडचणींमूळे तिकीट विक्री १३ तारखेला सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी,
अरे वाह!!! शुभेच्छा आहेतच
अरे वाह!!! शुभेच्छा आहेतच त्याच्बरोबर मायबोलीकराच्या या उत्साहाचे आणि कल्पकतेचे कौतुक वाटतय. मायबोलीकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो असे काही दिसले की.
हा कार्यक्रम खूप खूप खूप यशस्वी होवो हीच प्रार्थना.
पौर्णिमा गूगल+ फुकट आहे
पौर्णिमा

गूगल+ फुकट आहे म्हणलो कर्यक्रम फुकटात प्रसारीत करा असे अजिबात नाही. को. शोभतेस हो अगदि
मुंबई मुंबई आणि मुंबईत
मुंबई मुंबई आणि मुंबईत कार्यक्रम झालाच पाहीजे..................................

वैभव सर...... आम्ही आतुरतेने वाट पाहतोय तुमची ... लवकरात लवकर हा योग ये॑वो !!!
मायबोलिकरांच्या प्रतिसादाला
मायबोलिकरांच्या प्रतिसादाला सुरुवात...
पहिल्या तासाभरात ७५ तिकीटांची विक्री...
फक्त शुभेच्छां ऐवजी, कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थीत राहून संयोजकांचा उत्साह वाढवा, ही नम्र विनंती!!!... :स्मित:...
कानातून वाफा.... (जळल्याच्या)
कानातून वाफा.... (जळल्याच्या) येणारी हताश बाहुली!
वैभवची मैफिल... सुर्रेख जमूदे. कुणीतरी झक्कास आंखोदेखा हाल लिहा, रे (गं).
वैभवा, खूप खूप मनापासून शुभेच्छा. देखणा होऊदे कार्यक्रम.
इतक्या लवकर भारतातून परत
इतक्या लवकर भारतातून परत आल्याबद्दल हळहऴ वाटतेय
आपल्या कार्यक्रमाला मात्र आभाळभर शुभेच्छा
कार्यक्रमासाठी शुभेच्छा! ललि
कार्यक्रमासाठी शुभेच्छा!
ललि +१
अरे वा! कार्यक्रमाला खूप
अरे वा!
कार्यक्रमाला खूप शुभेच्छा.
कार्यक्रमाला हजर नाही रहाता
कार्यक्रमाला हजर नाही रहाता येतय याचं मनापासून वाईट वाटतय.
शुभेच्छा!! मुंबईतल्या कार्यक्रमाची वाट बघते.
सगळ्या सहभागी मंडळींना परत
सगळ्या सहभागी मंडळींना परत एकदा खूप खूप शुभेच्छा.
माबो करांचा मोठा ग्रुप असला
माबो करांचा मोठा ग्रुप असला सोबत तर मजा येईल.
खूप सुरेख झाला कार्यक्रम.
खूप सुरेख झाला कार्यक्रम.
फारच मस्त झाला कार्यक्रम,
फारच मस्त झाला कार्यक्रम, कालचा ! कार्यक्रम आयोजित करणार्या अन त्यात सहभागी असलेल्या सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन !
खुप दिवसांनी असा जेन्युईन, नवा, फ्रेश कार्यक्रम अन तो ही कवितांना महत्व देणारा... वा क्या बात है |
धन्यवाद; वैभव जोशी, राम चिंचलीकर, आनंद चव्हाण, कौतुक शिरोडकर, किरण सामंत आणि सर्वांना मनापासून धन्यवाद
खुपच सुंदर झाला कार्यक्रम.
खुपच सुंदर झाला कार्यक्रम. वैभवचे शब्द म्हणजे अक्षरशः जादू, मदिरा. सगळे श्रोते तृप्त झाले. प्रत्येक शब्दागणिक उचंबळून व्वा, व्वा निघत होते. संपूर्ण कार्यक्रमात गायक, गायिका, संगीतकार न दिसता फक्त वैभव दिसत होता, वैभब ऐकू येत होता आणि वैभव भरून राहत होता.
'ऋतू येत होते, ऋतू जात होते'... 'पुन्हा घेतली मी भरारी वगैरे'... 'रेड सिग्नल'... 'असा भेटला पाऊस'... 'सूर जाहला ईश्वर'... किती किती घ्यावे आणि किती साठवावे अशी परिस्थिती झाली होती सगळ्यांची.
आणि वैभवने 'मायबोली.कॉम' मुळेच आज मी 'वैभव जोशी' झालो अशा अर्थाने व्यक्त केलेले मायबोलीचे ऋण म्हणजे वैभव महान प्रतिभावंत तर आहेच पण माणूस म्हणूनही किती मोठा आहे हे जगाला कळले.
असा हा वैभवामृताचा घनु मुक्त मुक्त बरसला...आणि आम्ही सगळे शब्दांच्या समाधीत 'वैभव' ही एकच जाणीव कायम ठेवून चिंब चिंब भिजलो. राम चिंचलीकर, आनंद चव्हाण, कौतुक शिरोडकर, किरण सामंत यांचे आभार कसे मानावे?
अजूनही जीव टिळक स्मारक मंदिरात '५ ते ८' या स्तब्ध झालेल्या 'वैभवकाळात" घोटाळतो आहे!
उमेश कोठीकर + १ फार छान झाला
उमेश कोठीकर + १
फार छान झाला कार्यक्रम
<<'ऋतू येत होते, ऋतू जात होते'... 'पुन्हा घेतली मी भरारी वगैरे'... 'रेड सिग्नल'... 'असा भेटला पाऊस'... 'सूर जाहला ईश्वर'... किती किती घ्यावे आणि किती साठवावे अशी परिस्थिती झाली होती सगळ्यांची.>>
हेच सगळं लिहणार होतो
बेष्ट!!!
खूप छान झाला कार्यक्रम
खूप छान झाला कार्यक्रम
वैभवजी, तुमच्या आवाजात स्टेज
वैभवजी, तुमच्या आवाजात स्टेज च्या मागील रूम मध्ये बसून ऐकलेली " गझल " अजून कानात आहे...तुम्ही ग्रेट आहात..!!
Pages