दोन दिवसांपुर्वी माझी गाडी servicing ला दिली. आम्हाला जी गाडी तात्पुरती वापारायला मिळाली, ती चालु करताना जरा माझी फजितीच झाली. ही अगदी २००८ ची गाडी आहे. बहुतेक controls जरा वेगळेच आहेत. सकाळी उशीर झालेला. इशानची मागे बसुन भुणभुण. त्यात ती गाडी पुढे जाउ लागली. मला पटकन काय करावे सुचेना. मी वैतागुन नवर्याला फोन केला. तर तो म्हणतो कसा- काय एखाद्या आडाणी बाई सारखं करतेस. त्यावरुन हे सुचलं.
****************************************
परवाच्याला बगा आमच्या गाडीचं काय डागडुजीचं काम निगालं. आमचं ह्ये म्हटलं त्या कुनकडच्या ठेसनात येतो टाकुन गाडी. म्या म्हटलं यावा. ते ठेसनावालं लई बेस. त्येंनी बदली गाडी दिली ना. आता पयली गाडी इकली. तवा बदली गाडी लागती आमाला. त्याचं असं झालं, यक वरसामागं (असं मागं नगा बगु...मागं म्हणजे मागल्या वरसात) बारक्या झालत्या. आता येवड्या तेवड्या जीवाला दुसर्याच्या दारात सोडुन कामाला जायाचं मला काई बरं वाटना. म्हुन मी बशीले घरीच. आमचं ह्ये म्हटलं, माह्यीवाली काडुन टाकु. म्या म्हटलं टाका. तसंबी त्ये दोन शिटाचं गाडी, त्ये काय खेळगाडी म्हणं (खेळगाडी म्हण्जे खेळाची नव्हं..तशी मोप हायेत बारक्याकडं....ह्ये लई लांब लांब रेशीमधं लागतं म्हणं असलं गाडी). आता तीन जणाला कशी काय पुर्नार ? लई जीव खाली वर झाला बगा. लई चालिवलं त्ये गाडी. असा बुंग बुंग करत चालयचं का काई इचारु नगा. दिली आपल्या वळखितच येक जणाला. त्येची गाठभेट झाली का त्ये दोन शिटाचं गाडी भी भेटतं. आन माझ्याकडं बघुन खुदु खुदु हसतया बगा. आन मी बी त्याच्याकडं बघुन दात काढतिया. लई माया हाये माझी त्येच्यावर.
.
कायच्या बाय बोलत बसु नगा व्हं. म्या सांगत व्हते ना त्ये बदली गाडी दिलं. आमचं ह्ये म्हटलं तुला समदी शेट करुन देतो. म्या म्हटलं द्यावा. त्ये काय शेटिंग करुन गेलं हापिसात. मग म्या बारक्याचं कालवण, कोरड्यास बांधुन बिंधुन त्याला बखोटीला मारलं अन निघाले आन बगते तर काय.....काय गाडी ह्ये का काय ह्ये....लई भारी भो.....नवं कोरं बेमर दाराफुडं उभी ना.
.
म्या बारक्याला घाई घाई त्येच्या कुर्चीत टाकलं नी गाडी चालव्या बसले. आन घोळ ध्यानात आला. रोजच्ची चावी न ह्यीची चावी येकदम येगळी ना.....आत्ता काय करावं......तरि पन धिर धरुन तिथल्ल्याच येका भोस्कात घुसवली....घर्रर्र आवाज झाला नी गाडी इश्टार्ट्.....म्या काय खुळी वाटले कि काय....झाली ना चालु.....मंग येकदम झोकामंदी आरशे लावले....मागचे फुडचे समदे लावले...आन मागं जायाचा ग्यार टाकला....आता गाडी मागं घ्यावासाठी आक्शिटलेवर पाय दिला आन पुना घोटाळा....गाडी फुडं जाया लागली ना.....आत्ता काय करावं.....गाडी बगली वाट्टं....न्हाई म्हणाया ह्ये असं लई बगलेली धेंडं बघितल्याती मी....माह्यावालं काम त्ये कांपुटटर मधीच तर हाये.....मंग म्या म्हटंल जवा गाडी मागं जाया पायजे तवा त्ये फुडं जाताया तर मंग्... हितं बगा डोस्कं लागतया....तर मंग जवा ती फुडं जाया पायजे तवा नक्की मागं जाणार....म्हुन मी त्ये फुडं जायाचा ग्यार टाकला...तर्री गाडी फुडंच ना...आत्ता काय करावा....येकदम माज्या डोस्क्यामधी प्रकाश पडला....कुणीतरी खुळा आणुन लावला त्ये शिश्टम लिवाया नी ह्ये घोटाळा झाला....त्येनं नक्कि फुड जायाचं लाइनी आन मागं जायाचं लाइनी येकच लिवलं...म्हुन गाडी बी असं खुळ्यागत कराया लागली. आता काय करावं तरी काय मानसानं ?
.
आमच्या ह्येना फुन लावला. पहिल्या रिंगात उचलला ना. नायतर आमचं ह्ये लई बिजी. त्येच हापिस लई मोटं बघा. कुनच्या तरी कार्डाच्या सुश मधी ह्ये काम करत्याती. अख्खा दिस ह्ये मीटिंग न त्ये मीटिंग. सारी गडी माणसं मिळुनशानी नुस्त्या मीटिंगा करत्यात आन मग काम कधी करत्यात कुणास ठावं. आन आमचं ह्ये, मीटिंगात नाय गावलं तर त्येच्या सायबांसोबत गावत्याती. आन मग त्येच्याम्होरं माज्याशी विंग्रजीत काय बोलत्यात, मला ते हानी काय म्हणत्यात. एव्ह्ढं हुश्शार आमचं ह्ये पण आसं खुळ्यागत हुन जातं बगा हापिसात गेल्यावर. न्हायी मी काय म्हटलं...आपलं रानी म्हटलं तर येक वेळ खपुन घीन पण त्ये हानी म्हन्जे कसं अंगाला मुंगळं चिगटल्यागत वाट्टं बगा.
.
त्यो सायब बी येक पंटरच हाये. आठेक दिसा मागं त्यो आन मंडली जेवाया आल्ती. म्या झ्याक कालवण आन मिरचीचा ठेसा केल्ता. शान्यासुर्त्या मानासावानी खाल्ला-पिल्ला, लई वेला कवतीक केलं. आन जायच्या वग्ताला म्हनतुया, "हाग". आत्ता बया...न्हायी कालवण वाईच तिखाट झाल्तं पन म्हनुनशान बायामानसा देखत ह्ये असा बोल्णं...काय म्हनावं बाई सायबाला. म्या मुंडी खाली घालुन त्येला परसाकडची खोली दावली तर आमचं ह्ये समद्या देखत व्हस्सकनी वरडलं. वरडलं तर वरडलं आन पुना त्येच्या गल्यात पल्डं. माह्या तर बाई राडाया यायला लागलं. मंग त्येचं मंडली माह्या गल्यात पल्डं. बायामानसाची दुक्क बायमानसालाच ठाव.
.
अन त्येच्या घरी गेल्तो तवा तर लयी वंगाळ झालं बगा. तुमास्नी म्हनुन सांगते, उगा कुटं बोलु नगा. म्या अन आमचं ह्ये गेल्तो सायबाच्या घरी काय पारटी हुती म्हनं. ह्ये एव्ह्ढी मानसं आल्ती अन समद्याला कितीक येळ निस्तं चनं फुटानं दिलं. कवातरी दुपारच्या येळेला सायबानं चुल लावली. म्या म्हटलं आत्ता बया आता काय बाप्या भाकरी थापणार की काय. पन त्येनं निस्तं बल्गर म्हुन पाव वडा दिलं समद्यास्नी. अन मला इचारतुया, "तिरुपती, कसं काय बरं हाय ना ?" अस्सा राग आल्ता. माज्या बानं येवडं झ्याक नाव ठिवलया माजं, तरुप्ती अन ह्ये मला म्हनतया तिरुपती. बालाजी कुनकडचं !!! अन निगायच्या येळेला पुना मगच्या येळेसारखं ना.."हाग". म्या म्हटलं कारं बाबा हाय की येव्हडं वावर तुज्याच मालकीचं...जा की मग कुटं जायाचं ते...पन न्हायी बायामानसासमोर ह्ये असं वंगाळ बोलायची लयी खोड. अन आमचं ह्ये बी लगी त्येच्या गल्यात पल्डं. आवो त्येला परसाकडं जायचं अन तुमी कुटं त्येच्या गल्यात पल्डतया. आन म्या ह्ये समदं इचार करत्ये तवर्...बया बया कसं सांगु तुमाला...लयी लयी वंगाळ्....त्ये सायब माज्या गल्यात पल्डं ना...समद्या देकत्...आमचं ह्ये, त्येचं मंडली, समदी हापिसातली मानसं बगत्यात ना....आता त्येचं लगीन झालेलं, माझं लगीन झालेलं अन तरी मनसानं असं वागावं का...ह्ये असलं पापी मानसापायी जगबुडी यायची र्हायील का तुमी सांगा ?
.
कायच्या बाय बोलत बसु नगा व्हं. म्या सांगत व्हते ना ह्येना फुन लावलं. लावल्या लावल्या उचललं आन "काय ग" म्हणालं. काय डोस्क ठीकाणावर होतं वाट्ट. अवं हसता काय फिदी फिदी. मला त्येच म्हणायचं व्ह्तं, आमचं ह्ये डेस्काच्या ठीकाणावर व्हतं. त्येंना ह्यो घोटाळा सम्जुन सांगितला. तवा त्येनी समदी शिश्टम आगदी झकाsssस एकचप्लेन केली. म्हटलं न्हायी आमचं ह्ये लई हुश्शार.
.
तर आता आसं बगा आदी बरेक लावायचा...साधा सुधा न्हायी चांगला कचाक्कनी लावयाचा...मंग चावी त्या भोस्कात पुशायची.....आवो पुशाची म्हन्जी फरशी पुसल्यावानी नव्हं....आत्ता काय करावं बया....त्ये चावी आन त्ये गाडी लई चकापक हायती, त्येला पुशायची जरुर न्हायी... हितं पुशायची म्हन्जी घुसवायची....मंग्....अम्म्म्म्....विसरले की बया...हा....तर चावी पुशायची आन मंग मोट्टं ढवळं बटान पुशायचं....तेव्हढं झालं की जिकडं जायच तिकल्ला ग्यार टाकायचा.....हाय काय आन नाय काय.....आन मंग फुडं काय इचारताय्....निस्तं बुंग बुंग बुंSSSSSSग !!!!
.
मंडळी, पइलाच परयत्न हाये. काय चुकी झाली तर मापी द्यावा !!!!
लई झ्याक हाय बगा. हसुन हसुन पार वाट लागलीया.
आम्ची पयल्यांदा बसली ना.. ड्रायवींग ला हो.. म्या म्हटल गियर टाक. तर म्हणते कुटं टाकु.. अगं हलीव हलीव.. तवा कुट डोसक्यात परकाश पडला. अजुन पातुर ती बायनरी मदेच सगळ करते बगा गाडी मधी.
आता वायपर.. पाऊस कसा हाय ते बगुनश्यान.. जरा हळु जरा फाश्ट करायचा.. पण कसल काय. एकतर बंद नायतर फुल स्पीड मंदी..
एकदम डोस्क्यात जाते बगा.. हिच्या शेजारी बसल की.. आता त्यो खड्डा.. दाखवतो बर का.. पण गाडी नेम धरुन बरोबर खड्यात.. कीती टायर बदलणार हो.. लेफ्ट म्हटल की राईट आनी राईट म्हटल की लेफ्ट.. नेमीचच. मंग म्या ओरडतो अदर लेफ्ट अदर लेफ्ट.. आता काय काय सांगु.. जाऊद्या झाल.. आपलच ओठ..
- अनिलभाई
आवं शिंडरेला तायी.. लय झ्याक लिवलय बगा तुमी... एकदम बेश..
त्ये आडानी बयेचं बोलनं अगदी फक्कड की हो..
==================
सुसाट वारा वीज कडकडे
अनिलभाई , त्या लेफ्ट राईटची ट्रिक नाही का माहीत तुम्हाला?
उजवीकडे वळायचं असेल तेंव्हा खिडकीच्या काचेवर टक टक करायची 'तो बजने वाला लेफ्ट टर्न'. डावी कडे वळायचं तेंव्हा ड्रायव्हरच्या उजव्या डोळ्याखाली हात जोरात हलवावा. 'हा न बजने वाला लेफ्ट टर्न.'
अर्थात भारतात नाही तर राणीच्या देशात गेलं की सगळंच मुसळ केरात!
माझ्या लोनरची पण अशीच कहाणी झाली होती. डिलर कडुन घेताना त्यांच्या माणूस गाडी चालू करुन, दार उघडून उभा होता. ऑफिस मधे आल्यावर पार्क केली तर चावी काही निघेना ! शेवटी डिलरकडे फोन करून विचारावं लागलं
सिंड्रेला झक्कास!
आवं बाई अश्या ग्वाष्टी हाफीसात वाच्याचा म्हंजी...शेजारचं लोकं हिचारतात की आवं बाई काय झालं इतकं हासायासनी

आपलं रानी म्हटलं तर येक वेळ खपुन घीन पण त्ये हानी म्हन्जे कसं अंगाला मुंगळं चिगटल्यागत वाट्टं बगा.>>सहीच
आन जायच्या वग्ताला म्हनतुया, "हाग">>
खुपच छान लिहीले आहे...
काय झ्याक लिवतायसा वं शिंड्रेलाबाय तुमी!! हासून हासून खुळ्यागत झालं न्हवं का मला अगदी!! याकदम झ्याकवानी हाय बगा!!
***
माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि
मस्तंच .. पन् काय वं शिंडीरेलाताई, ह्यो बेमर म्हंजी त्ये हिकडं 'बीमर' म्हंतात त्येच का वो?
.............................................................
A successful marriage requires falling in love many times, always with the same person.
मंग त्येचं मंडली माह्या गल्यात पल्डं. बायामानसाची दुक्क बायमानसालाच ठाव.

>>>> हा पॉश होता
झ्याक लिवलंय शिन्ड्रेलाताई..
------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
मायंद्याळ हासलो बगा........ हापिसात समदी इचारायला लागलि, काय झालं म्हणुन ? आता काय डोंबल सांगणार त्यास्नी? पण लई ब्येस व्हतं बगा.....
च्यायला शिंडरेला काहुन नाव तुमचं , चांग्ल सखूबाय किवा ईमल आसाया पाहिजे हुतं
लई फर्मास लिव्हित्या तुमी, माज्याच हापिसात हासायची चोरी ! प्वाट दुकलं ना ?
गोदेय
सिंड्रेला
शिंद्रेला बाय ! लई भारी बगा !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
शिंद्रेला बाय ! लय भारी बगा
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
समद्यास लई लई धन्यवाद !!! तुमा समद्यास आवल्डं ह्येतच समदं मिळालं बगा:)

.
घरच्या भानगडी गावभर करतीया' म्हून वराडले >>>> न्हायी...त्ये काई सुदीक म्हनायचं न्हायी...(साबुं माफ करा) त्येच्या बाची बी टाप न्हाय काई म्हनायची
.
पन् काय वं शिंडीरेलाताई, ह्यो बेमर म्हंजी त्ये हिकडं 'बीमर' म्हंतात त्येच का वो >>> आक्शी बरुबर वळखलं तुमी ताई. धा पयकी धा
सही लिहिलयं...
सिंडरेला, मस्तच!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
घरवाल्याला बिचार्याला मर्हाटी ल्हिता वाचता येत न्हाई म्हून असं काईच्याकाई लिहितात होय ? पन झ्याक हाये. अजून येउ द्या ....
लई झ्याक!
समद्यास्नी पुना पुना ठांकु !!!!

.
घरवाल्याला बिचार्याला मर्हाटी ल्हिता वाचता येत न्हाई म्हून >>> त्येंचा सारा जल्मं हिथच गेला...त्येस्नी समदं समजतं बगा...तुमी काय लिवलं त्ये बी समजलं
.
वो हवाईबाई निस्तं दात नगा दावु...तुम्चं त्ये कुजबुज बी येउ द्या की...आमस्नी बी जरा दात कहाडु द्या की...
आत्ता! अवं शिंडीरेलाताई, त्या हवाईबाई कुठं दात दावतायत?
.
त्यांचं खायाचं आनि दाखुवायचं कसलं बी दात दिसत न्हाई बगा .. कुनालाच ..
आईशप्पथ, अगदी म्हणजे अगदी फर्मास, सिंडरेला. भाषेचा तोल मस्तच संभाळलाय.
ह्ये तुमचं लिकान म्हंजे आक्शी गुळधाव सोनं बगा, शिंडरेलाबायी!
हापिसात बसून वाचन्याचा गाडावपना क्येला... त्याला तुमी तरी काय करनार, म्हना.
सिंड्रेला, हसुन हसुन मेले ग बाई. खुप हसले
)
.
-प्रिन्सेस...
>>>आपलं रानी म्हटलं तर येक वेळ खपुन घीन पण त्ये हानी म्हन्जे कसं अंगाला मुंगळं चिगटल्यागत वाट्टं बगा.
सिंड्रेला
आगदी फर्मास जमलय बगा.
सिंड्रेला, संपूच नये असे वाटले. खूप छान. अजून लिहा ना!
च्यामारी कोठून श्यानी हापीसामंदी वाचाचा येड्चाप पना केला
समदी मंडली खुळ समजाया लगली की हो मले
कसलं बी दात दिसत न्हाई बगा >>> खरं की.. बोळकं जनु...काशानं वो समदे दात पल्डे ?
मी काही लेखिका नाही. १-२ वेळा असेच काही बाही लिहिले. सर्वांना आवडले हेच खुप झाले 
.
ह्ये तुमचं लिकान म्हंजे आक्शी गुळधाव सोनं बगा, शिंडरेलाबायी >>> तुमी असं म्हटलं म्हन्जी लई बेस झालं बगा
.
खूप छान. अजून लिहा ना! >>>> झाली की गाडी इश्टार्ट्...आता अजुन काय लिहु
मावशी
सिंड्रेला..... एक नंबर!
ह. ह. पु. वा. : हहगलो:
विषेश आवडलेले:
कायच्या बाय बोलत बसु नगा व्हं. : हाहा:
कुणीतरी खुळा आणुन लावला त्ये शिश्टम लिवाया नी ह्ये घोटाळा झाला....त्येनं नक्कि फुड जायाचं लाइनी आन मागं जायाचं लाइनी येकच लिवलं : हाहा:
बायामानसाची दुक्क बायमानसालाच ठाव. : हाहा:
त्ये चावी आन त्ये गाडी लई चकापक हायती, त्येला पुशायची जरुर न्हायी : हाहा:
जबरदस्त!
लयी झॅक लिवल बगा तुमी
ह.ह.पु.वा. झ्याक लिवलयं शिंडर्येलाबाय...
पुन्हा एकदा धन्यवाद
विनोदी विभागात काही टाकायचं म्हणजे भीतीच वाटत होती. कुणालाच हसु नाही आले तर ? पण हे तुम्हाला सगळ्यांना आवडलं आणि हसुही आलं बघुन छान वाटते आहे 
~सिंड्रेला
मावळतीला सुर्य सुद्धा रंग बदलतो..आपण तर माणसं !!!!
अग लई झ्याक लिवलयस कि ग मैतरणी
"मंग म्या म्हटंल जवा गाडी मागं जाया पायजे तवा त्ये फुडं जाताया तर मंग्... हितं बगा डोस्कं लागतया....तर मंग जवा ती फुडं जाया पायजे तवा नक्की मागं जाणार..."
हे जबर आहे..
खूप आवडलं. ह. ह. पु. वा
आपलं रानी म्हटलं तर येक वेळ खपुन घीन पण त्ये हानी म्हन्जे कसं अंगाला मुंगळं चिगटल्यागत वाट्टं बगा >>
.
एकदम जबर्या ...... लिहीत रहा
.
अखेर आज मुहुर्त मिळाला वाचायला
जबरदस्त !! धमाल आली वाचताना ...

लईsssss झ्याक !!!
लईsssss झ्याक !!!
आता त्येचं लगीन झालेलं, माझं लगीन झालेलं अन तरी मनसानं असं वागावं का...ह्ये असलं पापी मानसापायी जगबुडी यायची र्हायील का तुमी सांगा ?
>>>>>>>>>>
मस्त!!!!
--------------
नंदिनी
--------------
धन्यवाद

.
अखेर आज मुहुर्त मिळाला वाचायला >>> खड्डे बुजले वाट्टं
ह. ह. पु. वा.
च्यामारी कोठून श्यानी हापीसामंदी वाचाचा येड्चाप पना केला
मस्त लिहीलय, आवडलं
मस्त मजा आली.
खूप दिवसां पासून अस्सं वरिजन्ल वाचायची ईच्छा होती... धमाल!
हापिसात वाचू नये अशी धमकी द्यायला हवी होती...
अरे.. हे मी पाहीलच नव्हत! सिंड्रेला...मस्तच लिहीले आहेस की...
धन्यवाद सर्वांना
prajyot_Deep, farend, prajakta, Indradhanushya, तुमचे प्रतिसाद मी आजच बघितले.