कालही रात्री मी दचकुन जागा झालो, गेल्या आठवड्याभरातला हा तिसरा अनुभव. स्वतःच असं निष्प्राण पडलेलं शरीर पहाताना कुणाची झोप उडणार नाही?
काहीही कारण नसताना मला ही असली भयसुचक स्वप्न पडायला लागली. तीही अचानकच. आता रात्रभर झोप येणार नाही हे मला पुर्वानुभवावरुन माहीत झालेलंच होतं. म्हणुन म्हंटलं चला जे काही घडतय, जाणवतय ते शब्दात उतरवण्याचा प्रयत्न करावा.
मी तसा काही मोठा माणुस नव्हे की ज्याची झोप उडाल्याने कुणाचे काही नुकसान होईल मी सोडून अर्थात. मी आपला एक लहानशी नोकरी करुन गृह प्रपंच चालवणारा एक क्षुद्र जीव. सहज म्हणुन काही बाही लिहायला सुरुवात केली आणि नशीबाने बर्यापैकी वाचक मिळाले आणि मी पुढे लिहीत राहीलो. जसं मन सांगेल तसं . जसं वाचकांना भावेल तसं. दिवसभराच्या कंटाळवाण्या कामातुन वेळ काढत लिहीत राहीलो. वाचकांच्या कौतुकानी कधी भारावलो नाही की कधी स्वतःला फ़ार मोठा लेखक वगैरे समजलो नाही. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर माझी कहाणी ही इतकीच.
असेच सगळे सुरळीत चालु असताना मला ते स्वप्न पडलं,
मी नेहमी प्रमाणेच काहीतरी काम करत माझ्या पी.सी. समोर बसलो होतो आणि एकाच वेळी मी हे सारे तिर्हाइत पणे पहातही होतो.मला अचानक झालेली जाणिव म्हणजे माझ्या शरीरातली शक्ती अचानक कमी होत चालली आहे. मी आटोकाट प्रयत्न करत होतो माझी शक्ती काढून घेणार्या त्या अनामिक शक्तीशी लढण्याचा पण क्षणोक्षणी माझी होणारी हार मला जाणवत होती. माझ्या स्वप्नातल्या निष्फ़ळ प्रयत्नांनी कदाचीत मुर्त स्वरुप घेतले असावे मला जाग आली. अंगावर आलेला घाम हा एकमेव दृष्य पुरावा राहीला होता माझ्या संघर्षाचा. त्या रात्री पुन्हा झोप आली नाही.
मधे दोन-तीन दिवस गेले असतील कदाचीत आणि मला पुन्हा एकदा स्वप्न पडले.
एखादे पॉझ केलेले चलतचित्र कसे एक बटन दाबताच पुन्हा चालु व्हावे त्याप्रमाणे मागे जिथे संपले होते तिथुन पुन्हा पुढे चालु झाले.
मी त्या अनामिक शक्तीशी अजुनही लढा देतच होतो पण तो विफ़ल जात होता. मघापासुन की बोर्ड वर वेगाने चाललेले माझे हात आता थांबल्यात जमा होते. नजर एकटक समोरच्या स्क्रीन कडे लागलेली होती. या सगळ्यात विशेष म्हणजे या सर्व घटनेचा साक्षीदारही मीच होतो. एकाच वेळी समोरच्या पी.सी.वर बसलेला मी माझ्या डोळ्यांना दिसत होतो आणि शरीरातुन जिवनशक्ती कमी होत असल्याची होणारी जाणिवही मीच अनुभवत होतो. निश्चल नजरेने स्क्रीन कडे पहाणार्या माझ्या कडे पाहून मला मनाच्या आतुन जाणवत राहीले की या सगळ्याचे उत्तर मला त्या स्क्रिनवर मिळणार आहे नक्की. मी जिव तोडून त्या स्क्रिन कडे जाण्याचा प्रयत्न केला पण ज्या कुठल्या शक्तीने माझी जिवनशक्ती खेचुन घेण्याचा प्रयास चालवला होता तिनेच मला एका जागी खीळवले होते. कोणतेतरी अदृष्य पाश टाकले होते ज्यातुन मी सुटू शकत नव्हतो. ते पाश झुगारुन देण्याचा मी जिवानिशी प्रयत्न केला आणि कदाचीत त्यामुळेच मला जाग आली असावी.
मागच्या वेळी प्रमाणेच ही सुध्दा रात्र झोपेविनाच गेली.
पुन्हा मधे गेलेले दोन तीन दिवस मी कामाच्या गडबडीत ते स्वप्न विसरुन गेलो. त्या रात्री पुन्हा माझे अर्धवट राहीलेले लिखाण पुर्ण करत उशीरापर्यंत बसलो. आणि पुन्हा एकदा त्या स्वप्नाला सामोरे जायची वेळ आली.
या वेळी माझी जिवनशक्ती जवळपास संपुष्टात आली होती आणि मी एखाद्या पुतळ्याप्रमाणे समोर पहात राहीलो होतो. समोरची माझी प्रतीकृती ( की मीच तो ?) डोळ्यांच्या पापण्याही न फ़डकवता समोरच्या स्क्रिन कडे पहात होतो. 'त्या स्क्रिन मधे काहीतरी आहे जे या सार्यास कारणिभुत आहे' ही जाणिव आता आणखी तिव्र व्हायला लागली होती. कदाचीत या तिव्रतेमुळेच असेल पण माझ्या भोवतालचे त्या अनामिक शक्तीचे पाश सैल पडले आणि मी मीच पहात असलेल्या स्क्रिन कडे जवळुन पाहू शकलो. कुतुहल आणि कदाचीत सुटकेचा एखादा मार्ग सापडेल म्हणुन. समोरचा स्क्रिन ही माझी स्वप्नातल्या आयुष्याची शेवटची जाणिव होती. माझी नजर स्क्रिनवर पडताच पी.सी. समोरचा मी वेड्या वाकड्या अवस्थेत जमिनीवर कोसळलो. कदाचीत माझ्यातला जिवनशक्तीचा शेवटचा थेंबही संपला असेल. समोर पडलेल्या माझ्यातले प्राण उडून गेले आहेत हे मला नक्की कळले होते. कदाचीत ते माझेच प्रतीरुप असल्याने असेल. मी धडपडुन जागा झालो. जागा होण्यापुर्वी मला पी.सी च्या स्क्रीन वर पाहीलेले सुस्पष्ट आठवत होते ती माझीच एक अर्धवट लिहीलेली कथा होती.
पुन्हा एकदा कालचीही रात्र झोपेवीना गेली पण काल मात्र मी या स्वप्नाचा अर्थ लावत बसलो होतो. माझ्या परीने मी फ़क्त इतकाच अर्थ लावू शकलो :
कोणीही लेखक असो त्याला लहान किंवा मोठा करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगुन असणारी एकच शक्ती असते. प्रत्येक लेखकाचा प्राण त्याची जिवनशक्ती असते ती म्हणजे त्याचे वाचक, जर हेच वाचक त्याच्या कडे पाठ फ़िरवुन चालू लागले तर? तर तो लेखक लेखक राहील का ? आणि जर हीच जर त्याची जिवनशक्ती त्याला सोडून जाणार असेल तर तो लेखक म्हणुन त्याचा अंत असेल नाही का ? माझ्या स्वप्नातुन काही असेच तर प्रतीत होत नसेल ना ?
अश्या अनेक प्रश्नांच्या गुंतावळ्यातुन उत्तरे शोधता शोधता मी एका मुळ प्रश्नापर्यंत पोहोचलो. की हे सगळे एका लेखकाच्या बद्दल घडू शकेल पण मी तर स्वतःला कधी एखादा लेखक मानलाच नव्हता कमितकमी मला तरी असे वाटत होतेच. मग मला हे स्वप्न पडण्याचे प्रयोजन ? की मी माझ्याही नकळत स्वतःला एखादा लेखक मानायला लागलो होतो ?
या सारख्या प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ प्रत्यक्षात येउ नये म्हणुन मी आता माझे लिखाण थांबवायला हवे असा एकच मार्ग मला दिसतोय आणि मी तो अंगीकारणार आहे. त्यामुळे हे कदाचीत माझे शेवटचे लिखाण असेल.
I rhink it will be pause!
I rhink it will be pause!
दीपक
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
चाफ्या जर
चाफ्या
आणि स्वगत असेल तर खूप वाईट 
......

जर ही कथा असेल तर जबराट
थांबू नकोस मित्रा. वाटल्यास थोडी विश्रांती घे, ताजातवाना हो
.... आणि मग अजून येऊ द्यात
---हे कदाचीत
---हे कदाचीत माझे शेवटचे लिखाण असेल.---
चाफ्फुल्या बाळा, वर्गात कधीकधी कविता नीट म्हणता आली नाही आणि बाईंनी बाकावर उभं केलं तर आपण कविता म्हणायचं सोडलं का ? नाही ना ! परत नीट पाठांतर करून म्हणतंच राहिलो ना? मी विद्यार्थीच नाहिये, मला स्मरणशक्तीच नाहिये असे नाही ना म्हणून चालत ?
तेव्हा असलं भोकाड पसरायचं नाही. कोणी चिडवलं तर ते positively घ्यायचे. थोडी विश्रांती घे, एकिकडे स्वतःला enrich कर आणि ताज्या दमाने मायबोलिकरांसाठी सुंदर लिखाणाची भेट घेऊन परत ये. पाहिजे तर स्वतःचे लिखाण उर्फाला वाचायला लाव व तिचे मत आजमाव, स्वतःही त्याकडे त्रयस्थपणे पाहून घे.
एवढे lecture दिले म्हणून रागावू नकोस.
तुझी अश्विनी ताई
अरे
अरे बाळांनो, ही कथा आहे. आणि ती चाफ्फ्याचीच आहे हे तुम्ही गृहीत का धरून चाललाय???
.
चाफ्फा, छान लिहिलं आहेस.
---आणि ती
---आणि ती चाफ्फ्याचीच आहे हे तुम्ही गृहीत का धरून चाललाय?-----
अगं नुकतेच दोन वेळा त्याला "लिखाण थांबव" असे सल्ले मिळालेले तुझ्या वाचनात नाही का आले? मला वाटलं त्यामुळे त्याने हिरमुसले होऊन लिहिले आहे.
ज्यावेळी
ज्यावेळी आपण जे लिहितो ते नक्की कुणासाठी ? याचा विचार उमजणं हे अतिशय महत्वाचं. आपण फक्त स्वतःसाठी लिहावं. आपल्याला ज्यामुळे आनंद मिळेल तेच तितकंच आणि तेंव्हाच लिहावे. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. त्यांच्यावर आपला कांहीच ताबा नसतो. तो असावा असं जेंव्हा कुणाला वाटायला लागतं तेंव्हा ती त्याच्या पराभवाची चाहूल आहे असं समजावं. अरे आपण लिखाण केलंच आहे तर ते सर्वांनी वाचावं एवढीच अपेक्षा ठेवावी आणि प्रसिद्ध करावं. ज्याला जे जेवढं हवं तेवढं तो ते घेईल. असं दुसर्याच्या आवडी निवडीनुसार जगायचं ठरवलंस तर सगळं जग तुला शत्रू वाटायला लागेल आणि त्याची परिणीती म्हणून तुला तूच अखेर परका होशील. घाबरू नकोस. तू अत्ता जे लिहिलं आहेस ते देखिल छान लिहिलं आहेस. फक्त त्याचा शेवट चुकीचा केलास. Be brave. Be sport. You only can help yourself. यानंतरचा याच विषयावरचा नवीन पॉझिटिव्ह लेख लिही. मग सांग कसं वाटतंय ते. वाट पहतोय.
...............................अज्ञात
अश्विनी,
अश्विनी, फालतू सल्ले मनावर घेणार्यातला चाफ्फा नाही. ये तो चलताही रहता है मायबोलीपे.... ही कथा आहे, सत्यकथा नाही.
मंजू, असं
मंजू, असं असेल तर उत्तमच. त्या सल्ल्यांपाठोपाठ त्याचे हे लिखाण आले म्हणून काळजी वाटली.
ही कथाच
ही कथाच आहे मला खात्रि आहे, चाफ्फ्या तुझी १ वाचक जिवंत आहे. टाळ्यांचा गजर करणारि बाहुलि.
ए
ए चाफ्फ्या, काय चाललय काय? नॉर्मली कायतरी टरकीफाय करणारं लिहितोस, ते मस्तच असतय. ही कथाच आहे की खत्मकथा (आत्मकथा जी खत्मं होण्याबद्दल लिहिते ती- माझी ताजी व्याख्या)? ते आधी सांगून मोकळा हो.
हो, आणि मला आवडतं तुझं लिखाण. फक्तं तुझं नाव बघितलं की, रात्री-अपरात्री वाचत नाही... दिवसाढवळ्या वाचते... पण वाचते.
उगीच लोकांचा गैरसमज नको म्हणून पटकन हे विनोदी मध्ये हलव तरी... उग्गीच जीवाला घोर नं काय!
सॉलिड
सॉलिड कथा.......... अजुन येउ दे नवीन कथा.......
आरे, घाबरु
आरे, घाबरु नका रे.............. हे कदाचित चाफ्याचे शेवटचे लेखन असेल....... कायमचे नव्हे. तेव्हा तयार रहा नविन कथे साठी.
काय चाललंय
काय चाललंय रे? स्पष्ट सांगतो, मला तुझं हे लिखाण बिलकूल आवडलेलं नाही. त्याला काही साहित्यिक मुल्य असेल तर गेलं उडत. निगेटिव्ह- मग ते खरं असो की काल्पनिक- ते कोणत्याच पद्धतीने कोणालाच मदत करत नाही. अन वाचणार्यांनी पाठ फिरविली म्हणून लिहिणारा सोडून देत नाही.
तु दुसर्यांसाठी लिहितोस वाटतं?
कथा खुपच
कथा खुपच छान आहे.
हे कदाचीत
हे कदाचीत माझे शेवटचे लिखाण असेल>>>>>>>>
ओ दादा, कुणाला सांगताय?

गप गुमान लिवत र्हायचं
नायतर.......
chaffa, छान कथा
chaffa,
छान कथा आहे. अर्थात कथाच असावी अशी अपेक्षा!!
चाफ्या,
चाफ्या, कसली रे पिल्लं सोडत असतोस नेहमी???? नि इथे आमच्या डोचक्याला ताप........
पण कथा मस्त आहे!!!
नवा पी सी
नवा पी सी घे. नवीन साईट बघ. नवा गडी नवा राज. ईये मराठीचिये नगरी वाचकांचा सुकाळु आहे.
घाबरू नको. अरे स्वप्नच ते. नवीन काही अर्थ निघतो का बघ त्यातून.
माफ करा
माफ करा दोस्तलोक, पण इतके दिवसात वेळच नाही मिळाला !
आता बरेच दिवस जरा कामात असणार म्हणुन आपली सहज लिहून टाकलेली कथा आहे ही. माझ्यापासुन या जन्मी तरी सुटका नाही वाचक मंडळींची 
ते काही शेवटचे लिखाण वगैरे नाही
असो, कळकळ दाखवल्या बद्दल धन्यवाद दोस्तलोक !
साजिरा , लेका किती गंभिर गंभिर लिहीतो रे !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
आला ! बदडा
आला ! बदडा याला काही बाही लिहिल्याबद्दल
अश्विनीला
अश्विनीला उकडीचे मोठ्ठे मोठ्ठे मोदक.
होस्टेलमध्ये करतात तशी गोधडी अंगावर टाकून बदाबदा हाणा. मग उलटा टांगा, अन मिरच्यांची धुरी द्या.
आता हे सगळं गंभीरपणे बोल्लो बरं का रे.
***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!
तिव्र आणि
तिव्र आणि दाहक प्रतिक्रीया म्हणतात त्या याच का ? बरं झालं मी नव्हतो व.वि. ला साजिरा भाव ने गोधडी प्रयोग केला असता बहुतेक
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
चाफा, कांही
चाफा,
कांही म्हण लेका, तू, तुझे लेखन आणि तुला मिळालेल्या बोलक्या, हळव्या, तीव्र, आपुलकीच्या, हक्कच्या, लटक्या, मनस्वी प्रतिक्रियांनी मायबोलीवर एक सुंदर कॅन्व्हास रंगवला. या चित्राला तोड नाही. खूपच धमाल. याला म्हणतात निस्सीम निखळ मैत्री !!!
...........................अज्ञात
अज्ञात, या
अज्ञात, या मुळेच तर माझी लेखणी चालु शकते कदाचीत, यालाच आपलेपणाची शक्ती म्हणतात दोस्त !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
चाफ्फ्या,
चाफ्फ्या, मी हे खुपच उशीरा वाचते आहे, पण खरच सांगते, सगळ्यांचीच टरकवली होतीस.
तुझ्या लिखीणाचे चाहते, मरेपर्यंत तू लिहीलेलं वाचतच राहतील. आणि अर्थातच तु आम्हाला वाचायला दिल्याशिवाय सोडणार आहेस व्हयं?
तुझ्यावरच सगळ्यांच प्रेम बघुन, तळमळ बघुन वाटतय, की निखळ प्रेम दाखवायला फक्त संधी हवी, ते ओथंबुन वाहत येतच.
पुढच्या कथेची वाट बघत आहे.
अनघा
हाय चाफ्या खूप दमदार प्रयत्न
हाय चाफ्या
खूप दमदार प्रयत्न आहे. अपेक्षा वाढवल्यास रे...
छान प्रसंग फुलवता येतील
छान
प्रसंग फुलवता येतील अजून. पुलेशु
मस्त कथा आहे . खुपच सुंदर
मस्त कथा आहे
.
खुपच सुंदर आहे
.
.
.
.
निगेटिव्ह मघ्ये
.
पॉजेटिव शोधावे लागते !
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
पुढच्या कथेची वाट बघत आहे!
साल्या, अंदाज घेतोस काय आमचा?
साल्या, अंदाज घेतोस काय आमचा?
पुन्हा वाचली ही कथा. चाफ्याला
पुन्हा वाचली ही कथा.
चाफ्याला दिवसभर शवपेटीत पडून अशा कथा सुचतात आणि रात्री लिहून काढतो. तू असाच शवपेटीत पडून रहा. शेवटचं बिवटचं काय लावलंय, आँ ? परत भंकस केलीस कि पेटी उघडून आत क्रॉस नाहीतर ॐ ठेवू !!