Submitted by भुंगा on 8 July, 2011 - 08:32
गप्पागोष्टीवर सहज गप्पा मारताना एक कल्पना सुचली आणि त्यावर "बागेश्री"च्या शैलीमध्ये कविता कशी होईल त्याचा एक केलेला छोटासा प्रयत्न.
*******************************************
फडताळातल्या जुन्या लोणच्याच्या बरणीने
सहज परवा लक्ष्य वेधून घेतलं....
कोण कुठल्या आंब्याच्या त्या फोडी,
पण कश्या अगदी एकमेकांत मुरून गेल्यात ना.....
मला पण नेहमी असं वाटतं की,
तू आणि मी .....
अगदी असंच मुरलेलं आयुष्य जगावं...
एकमेकांपासून वेगळं करणं, जमूच नये कोणाला
पण हे असं फक्त मलाच वाटतेय....
की तुलाही ??
मी अपेक्षा करतेय तुझ्याकडून
आंबटगोड मुरलेल्या आंब्याच्या फोडीची
आणि तू......
तू मात्र, तेलाच्या तवंगासारखा...... !!!!!
गुलमोहर:
शेअर करा
हे एक बरीक झालं... भुंग्याने
हे एक बरीक झालं... भुंग्याने बागेच्या शैलीचं "लोणचं" नाय घातलं.
प्रचंड जमलीय रे..!
आह्हा...सरस्.....जिओ... सावरी
आह्हा...सरस्.....जिओ...
सावरी
खुप मस्त!!!!
खुप मस्त!!!!
चांगला विचार आहे राव!
चांगला विचार आहे राव!
अमितला अनुमोदन... चांगला
अमितला अनुमोदन...
चांगला प्रयत्न, मिलिंद
मस्त.............. बागेश्री
मस्त.............. बागेश्री शैली
शैलीदार "लोणचं"
शैलीदार "लोणचं"
भुंग्या, लेका जमलंय की लोणचं
भुंग्या, लेका जमलंय की लोणचं
चांगली कल्पना
मस्त झालंय लोणचं.
मस्त झालंय लोणचं.
तू मात्र तेलाच्या
तू मात्र तेलाच्या तवंगासारखा!
हे भारीय. भन्नाट मुरलंय लोणचं.
स्वादिष्ठ लोणच यालाच
स्वादिष्ठ लोणच यालाच म्हणतात.....

भुंग्या, फारच सुरेख कविता.
भुंग्या, फारच सुरेख कविता. एकदम आवडेश. स्त्रीच्या भुमिकेतून लिहिलियेस ते योग्यच.
छान हां
छान हां
तू आणि मी ..... अगदी असंच
तू आणि मी .....
अगदी असंच मुरलेलं आयुष्य जगावं...
एकमेकांपासून वेगळं करणं, जमूच नये कोणाला
मुरब्बीपणा एकदम पक्का हं !
अजून येउद्यात मुरांबा, पापड,
अजून येउद्यात
मुरांबा, पापड, चटणी, कोशिंबीर...
डावी बाजू कशी भरल्यासारखी वाटतीय नाही...
हायला हायकूच झाली एकदम
बाबु सर्वांचे आभार...!!
बाबु
सर्वांचे आभार...!!
छान!
चांगलंच मुरलयं लोणचं.
चांगलंच मुरलयं लोणचं.
चांगली जमलिये.
चांगली जमलिये.
भुंगा घरी नुकतच लोणचं घातलंय
भुंगा घरी नुकतच लोणचं घातलंय काय? कि कापलेल्या कैर्या काप स्वच्छ करताना सुचलीये कविता?
आवडली.
डावी बाजू कशी भरल्यासारखी
डावी बाजू कशी भरल्यासारखी वाटतीय नाही...
>>>
बाब्या
बागुलबु .. वा! .. वा!! ..
बागुलबु .. वा! .. वा!! .. वा!!!
डावी बाजू भरायची जबाबदारी आता
डावी बाजू भरायची जबाबदारी आता मामी आणि वर्षाची आहेत...... पापड, कोशिंबीर, मीठ, चटणी आता त्याच आणतील कवितेत
भुंग्या तुझी ही रचना अप्रतिमच
भुंग्या तुझी ही रचना अप्रतिमच

हे घे
http://www.maayboli.com/node/27262
(No subject)
व्वा छानच जमलीय कविता!
व्वा छानच जमलीय कविता!
माझी शैली वापरून जेवणाचं ताट
माझी शैली वापरून जेवणाचं ताट वाढायला घेतलेल्या तुम्हा सार्या कलाकारांना (आर्या, वर्षा, भुंगा) ह्यांना माझा __/\__
जबर आहे हे लोणचं..
जबर आहे हे लोणचं..
तू मात्र, तेलाच्या तवंगासारखा
तू मात्र, तेलाच्या तवंगासारखा <<< भारी. पण उतरतते, उतरते, तेलातही चव उतरतेच शेवटी

झणझणीत लोणचं
(No subject)
Pages