अगम्य तू....!

Submitted by बागेश्री on 8 July, 2011 - 04:05

इतकी वादळं
झेलूनही उभीच राहतेस....
कित्येकदा थरारतेस,
लटपटतेस,
कोलमडतेस,
पण; पुन्हा उभीच....!!

चेहर्‍यावर तेच स्मित लेवून!
देवघरातल्या समईच्या ज्योतीसारखं
शांत, स्थिर,
संथ तेवणारं....!!

कसं जमतं तुला?
सगळ्यांना सावरत जगणं?
त्रासात हसणं?
अवसान राखत उभं ठाकणं?

अरे,
मी काहीही विशेष करत नाही,
निसर्गाने दिलेलं "स्त्रीत्त्वं",
समर्थपणे पेलण्याशिवाय!!

सही Happy

अरे,
मी काहीही विशेष करत नाही,
निसर्गाने दिलेलं "स्त्रीत्त्वं",
समर्थपणे पेलण्याशिवाय!!

काय लिहिलंस बागेश्री! खासच.

अरे व्वा, क्रांतिताई,
तुमचं Appreciation! छानच वाटलं!:)

स्मितू, जॉनी, अमित,नचिकेत, मंदार, उमेशजी, वर्षा, दीपक, सुशोलभा, राधा, भुंगा मनापासून आभार!
निवडुंगा तुझे विशेष आभार रे Wink

मस्तच गं ! इतकं छान तुच लिहु जाणेस.

हे तर

<<<अरे,
मी काहीही विशेष करत नाही,
निसर्गाने दिलेलं "स्त्रीत्त्वं",
समर्थपणे पेलण्याशिवाय!! >>>

ultimate !

निसर्गाने दिलेलं "स्त्रीत्त्वं",
समर्थपणे पेलण्याशिवाय!! >>>>

पूर्ण सहमत .....
अगदी सहज आणि प्रभावी मांडणी.