मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा++.....

"माझा प्रवास" एकदम झकास!!!!!

सध्या विजय देवधर अनुवादित "म्रुत्यु पेटीत पाच दिवस " वाचत आहे. खर्‍या घटना असल्याने खुपच रंजक आहे. वाचुन झाले की माहिती लिहीन.

शर्मिला, डोंगरी टू दुबईतला काही भाग वर्तमानपत्रांत वाचला होता. आवडला होता. आता नक्की लक्षात ठेवून पुस्तक वाचेन

काकासाहेब गाडगीळ यांचा एक वेचा कुठल्या तरी पाठ्यपुस्तकात वाचला होती. त्याचे नाव बहुधा 'त्याचा येळकोट राहीना' असे असावे. काकासाहेब गाडगीळ पंजाबचे राज्यपाल (हेही बहुधाच) असताना सरकारी मोटारींच्या व लवाजम्याच्या ताफ्यात जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला भज्यांची गाडी दिसते व (महाराष्ट्र धर्माप्रमाणे ) त्याना भजी खाण्याची अनिवार इच्छा होते. मग भजी खायला जावे की जाऊ नये, लोक काय म्हणतील वगैरे मनात द्वन्द्व उभे राहते व दोन मने एकमेकांचा प्रतिवाद करतात अशी थीम होती. ते कशात आहे? काकासाहेबांचे लेखन कुठे उपलब्ध होईल? की थेट आता अनन्त गाडगीळांनाच विचारायला हवे Proud

साहित्यतीर्थ चिनूक्स यावर प्रकाश टाकू शकतील काय? Uhoh Proud

where can i get book "maza prawas" in pune? m searching a lot bt nt getting.

The God of Small Things वाचलं.
मला पुस्तक आवडलं !! (इतकी वर्षं का वाचलं नव्हतं? - याला काहीही उत्तर नाही.)
केरळमधलं एक लहान गाव, सिरियन-ख्रिश्चन समाजातली पात्रं, त्यांचं (काहीसं आपल्यातलं न वाटणारं) राहणीमान, जरासं गूढ आणि वेळप्रसंगी विचित्रही वाटू शकेल असं कथानक, भूतकाळातील घटना आणि वर्तमानकाळात त्याचे उमटणारे पडसाद यांची अतिशय घट्ट गुंफण हे सर्व घटक लक्षात राहतात.
वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्यात निवेदनाने ज्या आगे-मागे उड्या मारल्या आहेत, त्या कुठेही गोंधळवून टाकत नाहीत. उडी मारली गेलीय हे पहिल्या एक-दोन वाक्यांतच लक्षात येतं. (हे फार महत्त्वाचं आहे.)

केरळचं हवामान, तिथला पाऊस, झाडी, घनदाट रानं, रोरावणार्‍या नद्या, त्या नद्यांचं सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात असलेलं स्थान या गोष्टींचा कथानकात अतिशय सुंदर उपयोग करून घेतलेला आहे. नदी, नदीकाठ, तिथले दगड-माती-चिखल, माजलेलं गवत, गवताची पाती, झाडं, वृक्ष, त्यांच्या पानांवरून टपकणारे पावसाचे थेंब, पावसाळ्यात दाट रानात आढळणारे विविध कीटक, अगदी घरांच्या भिंतींवर साचणार्‍या शेवाळ्यालाही यात स्थान मिळालंय. या सगळ्यामुळे वाचक थेट केरळच्या अंतर्भागात पोहोचून कथानकाची अनुभूती घेऊ शकतो. त्यात पुन्हा, संपूर्ण कथानकाला केरळमधल्या मार्क्सवादाचा एक पदरही आहे.
(शिवाय, पुस्तक इंग्रजी असलं, केरळी वातावरण अपरिचित वाटलं, तरीही शेवटी त्याच्या भारतीय असण्याने थोडाफार फरक नक्की पडतो असं मला वाटून गेलं.)

अजून एक उल्लेखनीय गोष्ट, म्हणजे काटेकोरपणे टिपलेले सूक्ष्मातले सूक्ष्म बारकावे. प्रसंगी ते अंगावर येतात, अपवादात्मक प्रसंगी जरासे किळसवाणे किंवा अतिरंजितही वाटतात. पण जरा विचार केल्यावर लक्षात येतं, की तथ्य तेच मांडलेलं आहे. सर्वसामान्य माणूस हा असाच असतो, असेच विचार करतो, अशाच प्रतिक्रिया देतो.

वरती जे विचित्र वाटू शकणारं कथानक म्हटलंय, ते विशेषतः दोन प्रमुख पात्रांच्या आपांपसांतील नात्याला शेवटी जे वळण लागतं, त्यापायी. आपल्यासारख्या शहरी, पांढरपेशी, एकरेषीय आयुष्य जगणार्‍यांच्या मनापर्यंत त्यातली अपरिहार्यता पोहोचत नाही. ते वळण स्वीकारण्यामागची त्या पात्रांची गरज आपल्याला तत्क्षणी उमगत नाही.

गेल्या वर्षी 'क्रॉसवर्ड'मधे या पुस्तकाचा अपर्णा वेलणकर यांनी केलेला अनुवाद चाळला होता. भावानुवाद, अनुवाद आणि भाषांतर यांचा सुरेख मिलाफ असं त्याचं वर्णन करावं लागेल. तेव्हाच मनात आलं होतं, की अनुवाद इतका गुंगवून ठेवणारा आहे, तर मूळ पुस्तकही तसंच असणार.
आता मूळ पुस्तक वाचून झाल्यानंतर तो अनुवाद वाचून काढण्याची इच्छा होते आहे. (जे मी करणारच.)

बापरे! हे मी काय वाचतो आहे!!! मला तर अरुंधती रॉय ह्यांचे पुस्तक पेलवले नाही इतकी त्यांची शैली आणि शब्दसंपदा किचकट वाटली. म्हणून मी अपर्णा वेलणकरांचे अनुवादीत पुस्तक आणले. तो अनुवाद तितकाच किचकट आणि न समजणारा वाटला. मेघना पेंठेचे नातिचरामी जसे बोजड कळेनासे वाटले तसेच हे पुस्तक मला वाटले.

ललिता तू ईंग्रजी प्रत वाचण्याचा प्रयत्न केला होता का?

लले.....हम्म्म्म्म्म............!!!!!!
एकदम, पूर्ण, कम्प्लिट विरोधी मत आहे माझे!
भाषाशैली वगैरे वेगळे, एक्झॉटीक इ.इ. आहे पण त्याचाही अतिरेक झालाय असे वाटले, मुळात त्यातल्या 'कथे'शी काही जीवच जुळला नाही.
असो!!!!

अगाऊ+१. माझे पण अगदी विरोधी मत. गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज लै भंपक वाटले होते.
ललिता तू मस्त लिहीले आहेस पण.

बरं वाचनयादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे असताना 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' वाचावे का?

काल अचानक एक रत्न सापडले. साधेसेच आहे. ८०% सूट होती त्या कचरा पुस्तकात दडले होते. २० हाँ डॉलरमध्ये इथे कॉफी सुद्धा मिळत नाही स्टारबक्सची. असो. A roomful of waiting - A.M. Azda. मस्त साध्या कवितांचे पुस्तक आहे. फ्रेश वाटले.
Clouds are clothes to me;
Laundry hanging from a line,
clouds are clothes not mine.

आगाऊ +१
पण लले, मस्त लिहिलंयंस. तुला पुस्तक किती भावलंय ते अगदी पोचतंय तुझ्या लिखाणातून Happy

अच्छा वाचल्यात. तू खरचं एक काम कराव अस मला वाटत आहे. इथे अनेक जण आहेत ज्यांना हे पुस्तक वाचन जमल नि झेपल नाही. तुला हे पुस्तक इतक छान वाटल हे वाचून खरे तर I felt envy असे माझे झाले. इतकी छान कलाकृती हातातून ह्या जन्मी निसटून जाऊ नये म्हणून तू पुस्तक आणि वाचकांच्याखातर ह्या पुस्तकाचे एक दीर्घ रसग्रहन लिहू शकशील का? तेही ह्या आठवड्यात. आणि ह्यात तू कथांमधील ओळींचा समावेश अवश्य कर म्हण्जे लेखिका काय म्हणते आहे हे तुझ्या बुद्धीतून आम्हाला कळेल. बघ Sad

वाचकांच्याखातर ह्या पुस्तकाचे एक दीर्घ रसग्रहन लिहू शकशील का? तेही ह्या आठवड्यात. आणि ह्यात तू कथांमधील ओळींचा समावेश अवश्य कर म्हण्जे लेखिका काय म्हणते आहे हे तुझ्या बुद्धीतून आम्हाला कळेल.>>>>> +१ मलाही फारसे आवडले नव्हते हे पुस्तक.

धन्यवाद विनार्च!

ललिता-प्रिती, तू हे वाचते आहेस ना? तुमचा अभिप्राय अपेक्षित आहे. धन्यवाद.

काल परवाच वि स खांडेकरांचे अम्रुतवेल संपवले "
बापरे होति गोष्ट पण किती ते तत्वज्ञान खुप सारे बाउन्सर गेले पण पोट भरले
वाचनाचा आनंद झाला

गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज लै भंपक वाटले होते.
>> हे वाचून फार आनंद झाला Wink सेम हिअर! तसंच ते इन्हेरिटन्स ऑफ लॉस अन व्हाइट टायगर.. बुकरची अन माझी चॉइस काय जमत नाही. तरी सटॅनिक व्हर्सेस वाचायचंच आहे. कुणी वाचलं असेल तर काही लिहा ना..

सध्या मी माझा रोल मॉडेल हर्षा भोगले अन अनिता भोगले यांचं "द विनिंग एज" वाचतेय. मॅनेजमेंट लेसन्स थ्रु स्पोर्टस असं स्वरुप आहे. आवडतंय.

याशिवाय ओ हेन्री चे " द गिफ्ट ओफ मागी" हे शॉर्टस्टोरीजचे पुस्तक, रस्किन बाँडचे "द रोड्स टू द बझार" (पुन्हा एकदा), श्री श्री रविशंकर यांचे "सेलिब्रेटिंग सायलेन्स" आहेतच. ऑनलाइन लायब्ररी लावल्याने मज्जा आहे. Happy

नताशा Happy
भंपकच आहे ते. इंडियन इंग्लिशमधे लिहिणार्‍या बर्‍याचशा लेखकांचं साहित्य मला तरी भंपकच वाटतं

नताशा इन्हेरिटन्स ऑफ लॉस थोडेतरी (म्हणजे बरेच बरे आहे) असे मला वाटले. तू ऑनलाईन लायब्ररी कोणती लावलीस.

The God of Small Things जेव्हढे पकाऊ वाटले होते तेव्हढीच त्याची भाषा आवडली होती. ललिताने लिहिलेले मात्र मनापासून लिहिलेले वाटले.

मी म्हणूनच तिला म्हणत आहे की तू पुस्तक परिक्षन लिहि. पण ती आता गायब झाली Sad

मागे टुलिप सुद्धा एकदा म्हणाली होती की तिला गॉड ऑफ .. फार फार आवडले. खास करुन त्यातील पासवाचे वर्णन. मला इतका हेवा वाटला होता ना तेंव्हा तिच्या बुद्धीचा की अजून मला तो वाटतच आहे Sad

केदार, tenderleaves.com. कलेक्शन फार नाहीये. पण ओके आहे. त्यामुळे सध्या ६ महिन्यासाठीच लावलीय.

बी, ते काही तत्वज्ञानाचं पुस्तक नाहीये कुणाला न कळायला. अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेली कादंबरी आहे. तुला इंग्लिश वाचायला कुणी आडकाठी केलीये का? कळत नसेल तर डिक्शनरी आणि थेजॉरस घेऊन बस की! जे मनापासून वाचायचं असतं ते वाचक वाचतोच. दुसर्‍याने रसग्रहण करून स्पूनफीडिंग करेपर्यंत थांबत नाही. आणि प्रत्येक वाचकाला समोरचं लिखाण स्वतंत्रपणे भावत असतं तेव्हा आपणच जाऊन वाचावं ना. काफ्का समजावून सांगा, अरुंधती रॉय समजत नाही ती सांगा असं प्रत्येकवेळा म्हणून काहीही उपयोग नाही. शिवाय इंटरनेटवर कुठल्याही पुस्तकावर मान्यवर/ अमान्यवर लोकांनी लिहिलेली विश्लेषणं, एक्स्प्लनेशन्स, इ. एका टिचकीवर मिळतात. असो.

इंडियन इंग्लिशमधे लिहिणार्‍या बर्‍याचशा लेखकांचं साहित्य मला तरी भंपकच वाटतं>> याजोटाझापा Proud
वरच्या यादीत अजून एक - फाइन बॅलन्स (रोहिंटन मिस्त्री). कुणाला पकाऊ पण प्रेस्टिजिअस पुस्तकांची यादी हवी असेल तर मी देते. lol

मी रोहिंतनचा एक कथासंग्रह वाचला होता तो आवडला होता. पण कादंबरी (आत्ता नाव आठवत नाहीये) घेतली एक वाचायला ती कैच्याकैच पकाऊ होती.

Pages