Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
एकफुटीच्या कुंडीतही होईल. अग
एकफुटीच्या कुंडीतही होईल. अग हे झाड सुद्धा १ ते २ फुटच वाढत.
तु चवळिचा वेलही लाऊ शकतेस कुंडीत.
तु चवळिचा वेलही लाऊ शकतेस
तु चवळिचा वेलही लाऊ शकतेस कुंडीत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>>>> काय सांगतेस? पण त्याला शेंगा आल्यावर त्या सुकवायच्या आणि त्यानंतर मुठभरच चवळी मिळेल ला?
गवारीच्या बिया कुठे मिळतील? भाज्यांचं बियाणं ठाण्यात किंवा जवळपास कुठे मिळेल ते कुणाला माहित आहे का?
आशु अग ओल्या चवळीच्या शेंगा
आशु अग ओल्या चवळीच्या शेंगा नाही का खात तुम्ही ?
नाही आवडत कुणाला. गवार आवडते.
नाही आवडत कुणाला. गवार आवडते. निदान दिडशे दोनशे ग्रॅम निघेल का गं एका कुंडीतून?
एका कुंडीत ३-४ रोपे लाव.
एका कुंडीत ३-४ रोपे लाव.
एका कुंडीत ३-४ रोपे लाव. >>>
एका कुंडीत ३-४ रोपे लाव.
>>> गर्दी नाही का होणार? गर्दी झाली तर वाढ खुंटेल की !
हो गं अश्वीनी, एका कुंडीत
हो गं अश्वीनी, एका कुंडीत एवढी रोपे झालीतर काहीच हाती येणार नाही..
माझे वांगे एकफुटी कुंडीत आहे. प्लॅस्टिकची एक फुट रुंद व्यास आणि एक फुट उंच.. पण वांगे मस्त झालेय. मी टोमॅटो पण लावले होते, लागले पण होते, पण चांगले लागत नव्हते म्हणुन रोप परवाच उपटले आणि मिरची पेरली... रो उपटताना जीवावर आले, पण मिरचीला पण जागा पाहिजे ना??? माझ्याकडे मिरच्या खुप छान होतात.
गवार पण चांगली होते, मी लावलेली. पण चारपाच रोपे पाहिजेत एका वेळी, नाहीतर थोडी कोवळी थोडी जुन अशी मिळते ..... मी ८-९ वर्षांपुर्वी घेवडा लावलेला कुंडीत. मस्त वाढलेला, लागलेला.... हिवाळ्यात ती पांढरी पुड बसायला लागली आणि सगळीच वाट लागली.
वेल फुला-फळांवर आला असताना किटकनाशक फवारायचे जिवावर येते. घरच्या भाजीत आणि विकतच्या भाजीत काय फरक राहिला मग? फुले नसताना मी फवारते किटकनाशके, पण नंतर नाही.. गोनीम म्हणुन एक किटकनाशक मिळते, कडुनिंब आणि गोमुत्रापासुन बनलेले असे त्यावर लिहिलेले आहे. ते वापरते मी अशा वेळी.. आताही आणुन ठेवलेय, पावसाळ्यात तसा जास्त त्रास नसतो किडींचा.
गवारीचे रोप २ ते ३ फूट वाढते.
गवारीचे रोप २ ते ३ फूट वाढते. त्याला गुच्छाने गवारीच्या शेंगा लागतात. पण सारख्या आकाराच्याच खुडाव्यात (गुच्छात लहानमोठ्या असतात.)
जून गवारी दह्यात भिजवून सुकवून तळता येतात.
मूळा आणल्यास, त्याच्या वरचा भाग खोचला तर तोहि जीव धरतो. त्याला शेंगा लागतात (डिंगर्या) त्याची भाजी करता येते. (त्यापण अश्या सुकवता येतात.)
गाजराचे पण असेच. त्याला बडीशेपेसारख्या बिया धरतात. आधी छान पांढरा फुलोरा येतो. पण त्या बिया खाऊ नयेत.
गाजराचे तो तुरा खुप सुंदर
गाजराचे तो तुरा खुप सुंदर दिसतो. माझ्याकडे असेच टाकलेले गाजर रुजुन मग त्याला आलेला.. विश्वासच बसेना एवढा सुंदर...
प्लॅस्टिकच्या कुंडीत चांगली
प्लॅस्टिकच्या कुंडीत चांगली येतात का रोपं? मातीच्या कुंडीसारखीच?
गवारीचं बी मिळतं की शेंगाच तुकडे करून पेरायच्या?
सेम प्रश्न मिरचीसाठी. काय पेरायचं? मिरचीचं बी? की मिरचीचे तुकडे?
साधना, मी तर नेहमीच गाजराचे
साधना, मी तर नेहमीच गाजराचे बुडखे स्टीलच्या खोलगट ताटलीत पाणी घालून ठेवते. मस्त हिरवेगार तुरे येतात. शोभेला छान दिसतं. नंतर टाकून द्याय्चे.
पूनम, मिरची खळखळीत सुकव आणि त्यातलं बी पेर मातीत. प्लॅस्टीकच्या कुंडीतही येतात रोपं.
गवारीबद्दल आणि इतर भाज्यांबद्दल मीही वर प्रश्न विचारलाय, अजून कुणी उत्तर दिलं नाहिये.
गवारीच्या बीयांचे पाकिट ५-१०
गवारीच्या बीयांचे पाकिट ५-१० रुपयाला मिळते. शेंगातल्या बिया कोवळ्या, काहीच कामाच्या नाहीत. जुन गवार मिळाली तर शेंग वाळवुन बी बनवता येईल. पण तरीही वेळ लागेल.
नवी मुंबईत बॉम्बे सीड्समध्ये, भायखळ्याला स्टेशनसमोर.. पुण्यात जिथे कुंड्या, खते वगैरे मिळतात तिथे मिळायला पाहिजे. त्या लोकांकडे ५-१० रुपयात वेगवेगळी पाले व फळभाजीबीयांची पाकिटे मिळतात.
मिरच्या - सुकलेल्या मिरच्या आपण आणतो त्याच्या बिया पेराव्यात. पिकलेला टोमॅटोच्या बीया अशाच टाकल्या तरीही येतात.
जरा जास्त प्रमाणात (घराशेजारी जागा वगैरे असेल तर) ही पाचदहा रुपयाची पाकिटे बरी पडतात कारण त्या बियांवर रुजुन याव्यात म्हणुन थोडी प्रक्रिया केलेली असते. हौस म्हणुन करायचे तर मग टोमॅटो-मिरच्या बिया पेरुन वाट पाहायची. मिरचीचे रिझल्ट्स चांगलेच येतात, पण टोमॅटोचे एवढे नाही येत चांगले.
प्लॅस्टिकच्या कुंडीत झाडे जरा लवकर सुकतात. उन्हाळ्यात लक्ष ठेवावे लागते. मातीपेक्षा चांगल्या आहेत तरीही.
अश्विनी मी फोटो टाकलाय तो बघ
अश्विनी मी फोटो टाकलाय तो बघ गवारीचा. अग आमच्याकडे शेतात अशाच एका ठिकाणि ४-४ बिया टाकतात. तुझी कुंडी जर मोठी असेल तर टाकायला काहीच हरकत नाही.
लालसर झालेल्या कारल्याच्याही बिया रुजतात.
आमच्या गच्चीत लावलेल्या
आमच्या गच्चीत लावलेल्या कलिंगडाच्या रोपाला (आपोआप आलेला वेल, ओला कचर्यातुन कलिंगडाच्या बिया गेल्या) ५-६ फळे आली आहेत. पण ती साधारण मोठा पेरु च्या आकाराची होतात आणि वाढ्तच नाहीत. तेव्हढीच रहात आहेत. काय कारण असेल? उन्हाळ्यात (मे मध्ये) वेल आलाय. फोटो टाकते उद्या.
आमच्याकडे मेथी, पालक,
आमच्याकडे मेथी, पालक, कोथिंबीर रूजून आले. भेंडी, टोमॅटोने अजूनतरी दगा दिलाय. मिरचीची रोपे पण नुकतीच आली आहेत.
योगेशच्या एका मित्राला कलमे करायला आंब्याची रोपे हवी होती म्हणून मे महिन्यात खालेल्या सर्व कोयी रूजवल्या होत्या. पन्नास साठ रोपे आली होती. काल त्याचा मित्र येऊन ती रोपे काढून घेऊन गेला. इतकं वाईट वाटलं तेव्हा.
पण नंतर आठवलं अरे इतकी जमीन मोकळी झालिये. अजून काहीतरी लावता येइल. आता पुढच्या आठवड्यात गडी आला की जमीन मोकळी करून घेईन आणि तिथे अजून थोड्या भाज्याच लावेन. आणि उरलेल्या जागेत झेंडू अबोलीचे रान उठवता येइल.
मला ओली हळद लावायची आहे. हळदीचा गड्डा आणून लावल्यास लागेल का?
लागते. आंबे हळद पण लागते.
लागते.
आंबे हळद पण लागते. माझ्याकडे कुंडीत आहे
लीना, कलिंगडाला मानवेल असे
लीना, कलिंगडाला मानवेल असे हवामान लागते. आणि तो वेल जमीनीवर सोडून कलिंगडाखाली काहीतरी मउ म्हणजे पेंडा वगैरे ठेवावा लागतो. मग ते मोठे होत जातात नाहीतर डागाळतात एका बाजुने. आम्ही एक वर्ष कलिंगडाच शेत लावल होत. पण आमच्याकडे जास्त प्रमाणात नव्हती आली.
नंदीनी बाजारात ओली हळद विकायला येते तीचा गट्ठा लाव.
पूनम, सुक्या मिरच्या फोडणीत
पूनम, सुक्या मिरच्या फोडणीत घालण्यासाठी मोडशील तेव्हा त्यांच्या बिया एका डब्यात जमव. साधारण मूठभर झाल्या की पेरून टाक.
पुनम पुण्यामधे फुले मंडई जवळ
पुनम
पुण्यामधे फुले मंडई जवळ दगडुशेठ हलवाई दत्त मंदिर ते नेहरू चौक दरम्यान दोन तिन बि-बियाणांची दुकाने आहेत.
किंवा त्याच रस्त्याने सरळ पुढे गेल्यास टिळक रोड चौकात नाईक बी-बियाण्यांचे दुकान आहे.
सगळ्यांना धन्यवाद. मिरचीचं
सगळ्यांना धन्यवाद. मिरचीचं रोप लावेन आता. उद्या नवीन कुंड्याही आणणार आहे, यावेळी प्लॅस्टिकच्या.
मी पण खिडकीतील बागेसाठी तीन
मी पण खिडकीतील बागेसाठी तीन रोपे आणणार आहे. मेन दारापाशी लावायला एक मस्त स्टँड शोधलाय केन चा त्यावर कुंड्या ठेवाव्यात असा प्लॅन आहे.
दिनेशदा माझी आई करत असे सुकवलेल्या गवार व डिंगर्या. तिच्यानंतर इथेच हा शब्द भेट्ला. लै ग्रेट वाट्ले.
मी तुम्हा सगळ्यापुढे, एकदमच
मी तुम्हा सगळ्यापुढे, एकदमच नवशिकी आहे झाडांबाबतीत. माझी सर्व झाडे अजुन कोंब येण्याच्याच स्टेजला आहेत. कडीपत्त्याला आत्ता सुन्दर पालवी आली आहे. बघुनच बरे वाटते. खरे म्हणजे कढीपत्ता मी जेवणात अजिबात वापरत नाही. पण आई कडून नेहमी ऐकले होते की जगवावा लागतो प्रयत्न करुन म्हणुन मी लावला.
गाजर कुंडीत लावता येते का?
इथेच वाचुन मी काल लसुण पाकळ्या (सालासकट) पेरल्या आहेत, कुंडीतच. बघुया कसा वाढतो ते.... अजुन कुंड्या आणल्या की मग मोहरी सुद्धा लावायची आहे. मोहरीचे झाड आल्यावर पुढे काय होते? म्हणजे त्याला फुले वगैरे येतात का?
मानक कढीपत्त्याला टाकाउ
मानक कढीपत्त्याला टाकाउ असलेले ताक घाल. त्याने पाने अगदी तजेलदार होतात.
जरुर जागु. माझ्या आईने सुद्धा
जरुर जागु. माझ्या आईने सुद्धा मला सांगितले आहे..
माझ्याकडे कून्डीत लावलेला
माझ्याकडे कून्डीत लावलेला पूदिना आहे..खूप छान वाढलाय्...पण आता खूडायची वेळ आलिये तर कसा काढायचा?पाने काढायची की फान्द्या ? आणि एकदा काढल्यावर परत फान्द्या येतात ना?
सखी, एखादी फांदी ठेवून सगळ्या
सखी, एखादी फांदी ठेवून सगळ्या फांद्या खुडून टाक. नवी पालवी येइल.
अळू कुंडीत लावायचा झाल्यास
अळू कुंडीत लावायचा झाल्यास अळकुंडे (अरवी) लावावीत का? त्यातही भाजीचा अळू आहे की वडीचा हे कसे कळेल?
अमि, अळकुडीच लावायची. एका
अमि, अळकुडीच लावायची. एका अळकुडीला ४-५ पानं येतात. पण भाजीचा की वडीचा ते भाजीवाल्यालाच विचारावं लागेल गं. त्यातून कुठलाही उगवला तरी आपल्याला पाहिजे तेच करायचं बिन्धास्त![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अमी माझ्या रानभाजीतील टेरी -
अमी माझ्या रानभाजीतील टेरी - अळू बघ. त्यात मी सगळे फोटो दिले आहेत. आणि कुंडीत अळकुडी लावायची.
वडीचा काळ्पट असतो.
सखि, पुदीन्याच्या वरच्या फांद्या काढायच्या. त्याला राहीलेल्या फांद्यातुन कोंब येतात. व बाजुलाहे फुटावे धरतात.
जागू, अळकुडी पण काळपट असते का
जागू, अळकुडी पण काळपट असते का वडीच्या अळूची? ती कशी ओळखायची?
Pages