विनोद - आचार्य अत्रे

आचार्य अत्र्यांचे संग्रहीत विनोदः

Submitted by Indradhanushya on शुक्र., 07/04/2008 - 15:17.

चला आचार्य अत्र्यांकडे वळूया..... एक विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व...
/
स्व . राष्ट्रपती व्ही . व्ही . गिरी यांना आठ मुले होती .

त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची .

अत्र्यांनी गिरी , सौ . गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला आणि त्याखाली हेडिंग दिले...

'' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी ''

**************************

'कार...'
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती . त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते .

तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, त्याने खवचटपणें विचारले 'काय बाबूराव आज पायीच, कार विकली की काय ?'

अत्रे म्हणाले... 'अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर?

कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय?

***********************************************

'' एकटा पुरतो ना ?''

आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते .

मात्र ते विरोधी पक्षात होते . सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते .

अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत .

अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले... 'अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?''

बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले, ''बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''

''तर... चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की!''

''आणि कोंबडे किती?''

''फक्त एक हाये''

''एकटा पुरतो ना?''

उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला आणि पत्रकारही त्या हंशात सामील झाले.

**************************

Submitted by aashu_D on शुक्र., 07/04/2008 - 15:49.

अजून एक..
जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरदार चालू होती तेव्हा आचार्य अत्रे एका सभेत ठणकावून म्हणाले,"संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!"
तेव्हा यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणाले," होईल की ! पण एवढा आग्रह का? म्हणजे अगदी झाला च पाहिजे! हा च कशाला हवा?"
त्यावर आचार्य म्हणतात्,"मग तुमच्या आडनावातला च पण काढून टाका! कशाला हवाय ??"

********************
Submitted by Resham_dor on शुक्र., 07/04/2008 - 16:49.

आता अत्र्यांचा विषय णिघल आहे तर हे एक माझे योगदान
अत्रे सायकल ने चालले होते . समोरुन अंतयात्रा येत होती . तोल जाउन अत्रे पदले आणी त्यांचा धक्का लगुन शव देखिल पडले. सगळे संतपले. ते बघुन अत्रे म्हनाले " अरे ज्याला लागले तो कही म्हणत नही तर तुम्ही क ओरडता?"
सगळे थोडा वेळ बुचकाळ्यात पडले. ही संधी सधुन त्यांनी पोबारा केला.

***************************
Submitted by krishnag on शनि., 07/05/2008 - 11:56.

आचार्य अत्रे अगदी लहानपणा पासून हजर जवाबी आणि प्रसंगावधानी
एकदा शाळेतून घरी जात असताना रस्त्यात ख्रिस्ती मिशनरी रस्त्यावर उभे राहून धर्म प्रचार करीत होते!
अत्रे काय चाललय आहे म्हणून तिथे पहायला गेले.
तिथे धर्मप्रचारक एक हातात लाकडी क्रूस आणि एका हातात दगडाची मुर्ती घेऊन लोकांना दाखवत होता..
एका मोठ्या पाण्याच्या ड्रम मध्ये पाणी भरले होते त्यात क्रूस आणि मुर्ती दोन्ही टाकून तो जमलेल्या लोकांना म्हणतो.
"बघा हा तुमचा दगडाचा देव पाण्यात बुडाला! आणि आमचा क्रूस कसा तरंगतोय!!
जो देव स्वत:ला बुडण्या पासून वाचवू शकत नाही तो तुम्हाला काय वाचविणार?"
अत्रे ते अगदी निट पहात आणि ऐकत होते...
धर्मप्रचारकाचे भाषण संपताच अत्रे त्याला म्हणाले "आता हे दोन्ही आपण पाण्यातून काढून आगीत टा़कून पाहूया!"

************************
Submitted by zankaar on शनि., 07/05/2008 - 16:18.

आचार्य अत्रे एकदा एका सभेत भाषण करण्यास गेले , सुरवात करताना " सभ्य स्री पुरुषहो" असे म्ह्ट्ले , तेव्हा एक वात्रट प्रेषक 'ओ' अशी हाक देतो, तेव्हा अत्रे त्याला म्हणतात, ' माफ करा, आपणाला सोडुन "

**************************
Submitted by kedar123 on सोम., 07/07/2008 - 16:25.

अत्र्यांचे सगळेच किस्से धमाल
.
अत्र्यांची भाषणही तितकीच जबरदस्त असत
.
एकदा नव-कवींची खिल्ली उडवताना त्यांनी एक स्वयंरचित कविता म्हणून दाखवली . ते म्हणाले, नव कवींच्या कविता अश्या असतात...
.
"फुलपाखरू बसले माझ्या कुल्यावर"
.
ही कविता त्यांनी 'उडणारे फुलपाखरु' हातांची बोटे हलवून दाखवले आणि 'ते' नक्की 'कुठे' बसले तेही दाखवून दिले.
.
अखंड जनसमूदायाची हसून हसून वाट लागली.
.
(इथे लिहीलेला किस्सा थोडासा अश्लील आहे खरा. त्याबद्दल क्षमस्व. पण तरीही सांगीतल्याशिवाय रहावला नाही.)

********************
Submitted by vinaydesai on सोम., 07/07/2008 - 18:38.

गायवाडीतल्या भाषणाला अत्रे थोडे उशीराच पोहोचले, आणि उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले, 'गायवाडीत धावत यायला मी काय बैल आहे...?'.
.
ऐकीवः उशीरा पोहोचलेल्या अत्र्यांना उद्देशून व्यासपीठावर बसलेले पु. ल. म्हणाले 'अरे यम आला'.. अत्र्यानी लगेच, 'मघापासून माझा रेडा शोधतोय, पण हा तर इथेच बसलाय' प्रतिसाद दिला..
********************
Submitted by ravishekhar on मंगळ., 07/08/2008 - 12:17.

आचार्य अत्रे आणि ना. सी. फडके यांच्यात बरेच वाद होते. त्यातुन बर्‍याचदा शाब्दिक चकमकी घडत.
एकदा फडके चिडून अत्र्यांना म्हणाले, "अत्रे, तुम्ही मुत्रे"
अत्रे हजरजबाबीपणे लगेच उत्तरले, " फकक्याने पुसले"

***********************
Submitted by Nikhilrao on मंगळ., 07/08/2008 - 12:31.

सर्व अत्र्यांवर लिहितायत हे देखील वाचा

अत्रे एकदा त्यांच्या मित्रांच्या घरी गेले
मित्र घरात नव्हते
मित्राच्या मुलीने अत्र्यांना चहाचा आग्रह केला आणि ती किचनमध्ये चहा बनविण्यासाठी गेली
बराच वेळ झाला तरी चहा आला तेव्हा अत्रे किचनमध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिले की मुलगी एका हाताने साखरेचा डब्बा काढत होती तेव्हा ते तिला म्हणाले एका हाताने निघत नसेल तर परकर वरकर. (पर (दुसरा) कर (हात) वर कर)

************************
Submitted by yedakakhula on मंगळ., 07/08/2008 - 14:41.

एकदा अत्र्यांच्या एका मित्राला त्यांची चेष्टा करायची लहर आली. तो म्हणाला "मराठी भाषेत हे पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम ह्यांचे खूप स्तोम माजले आहे. ह्यांची काहिही गरज नाही. ही सगळी फुकटची नाटके बंद केली पाहिजेत" ह्यावर अत्रे काहिही बोलले नाहीत. दुसर्‍या दिवशी तो मित्र घरी नाही हे पाहून त्याच्या घरी जाऊन ते त्याच्या बायकोच्या हातात एक चिठ्ठी ठेवून चालते झाले. त्यात लिहिले होते "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ". मित्र घरी आल्यावर त्याच्या बायकोने ती चिठ्ठी त्याच्या तोंडावर मारली आणि सांगितले की अत्र्यांनी पायरी ओलांडली आहे तेंव्हा तुम्ही काहितरी करा. तो मित्र चिडून तरातरा अत्र्यांकडे गेला व जाब विचारू लागला. अत्रे त्याला म्हणाले "अरे मी तुझ्या कालच्या सूचनेचे पालन केले आणि त्या चिठ्ठीमध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम वगैरे निरर्थक थोतांड अजीबात वापरले नाही. आण ती चिठ्ठी इकडे". मग त्यानी त्या चिठ्ठीमध्ये काही स्वल्पविराम आणि पूर्णविराम टाकले. तेंव्हा ती चिठ्ठी अशी दिसू लागली. 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ.'

*************************


हे मस्त काम केलत हो लिंबूदा स्मित



चांगले केलेत हे टाकुन्.पण तो रेड्याचा जोक मी नेमका उलटा ऐकला होता.पुल उशिरा गेले आणि म्हणाले मी रेडा आधीच पाठवुन दिलाय असे मी ऐकले होते



लिंब्या आहे भारी. पण एक सुचना. राग मानु नको पण गुलमोहोरात फक्त स्वःताचे साहीत्य अपेक्षीत आहे ना?



हो की रे कान्द्या! म्हणजे हा बीबी गुलमोहरात नको! स्मित
मॉडरेटर, या बीबीला योग्य जागा द्याल का? तसेच वर सुरवातीला "अत्र्यान्चे विनोद इथे लिहा" अशा अर्थाची सुचना टाकाल का? धन्यवाद!



गुड, लिंब्या तु थोडा बदलला आहेस. स्मित



@ लिंबुटेंबु
वा!! आता इथं समग्र अत्रे यावयास हरकत नाही. स्मित

दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"



एकदा पंगतीत बसले असताना, जेवण वाढायला आलेल्या बाईना अत्रे म्हणाले 'पातळ सोडून सर्व वाढा...'
.
.
एकदा एक लेखिका अत्र्यांकडे काही चर्चा करायला आल्या होत्या. बोलता बोलता उशीर झाला तेव्हा त्या म्हणाल्या..
'अय्या, एवढे तास कसे गेले कळलंच नाही...'
तेव्हा अत्रे म्हणाले,
'अजून थोडा वेळ थांबलात तर दिवस कसे गेले तेही कळणार नाही....'..
.
(अत्र्यांचे विनोद यावर बरंच काही खपवलं जातं. त्यातलेच काही)....



हा एक वाचलेला: एकदा कोणत्यातरी समितीतून काही सदस्य बाहेर पडले व म्हणू लागले की आम्हीच खरी समिती आहोत व ती (मूळ समिती) शेषसमिती आहे, तेव्हा अत्रे - "अहो एकदा एका घोड्याने लीद टाकली. बाहेर पडल्यावर लीद म्हणाली की मीच खरा घोडा आहे, हा उरलेला शेष घोडा आहे" स्मित



अप्रतिम्...........खूप मजा आलि वाचून्.....अजुन काहि असेल तर वाचायला नक्कि आवडेल...



खुप मझा आली.



फाळणीच्या बाबतीत समाजवादी पक्षाने तटस्थ रहायचे ठरविले. या बाबतीत समाजवादी पक्षाचे पुढारी अच्युतराव पटवर्धन यांनी खुलासा करताना सांगितले, "आम्ही फाळणीच्या ठरावाला पाठिंबा दिला असता, तर आम्ही जातीयवादी ठरलो असतो आणि फाळणीला विरोध केला असता तर साम्राज्यवादी. म्हणून आम्ही तटस्थ रहायचे ठरवले." तेव्हा अत्रे थट्टेने म्हणाले, " लग्न केले तर आपण संसाराच्या जाळ्यात अडकतो, आणि ब्रह्मचारी राहिलो तर आपण निसर्गाच्या विरूद्ध वर्तन केल्यासारखे होते. म्हणून माणसाने लग्न न करता एखादी बाई ठेवावी, तसला तुमचा युक्तीवाद आहे."



हौशी नाटकांच्या प्रयोगाबिषयी बोलताना आचार्य अत्रे भाषणात म्हणाले, "नाटकाच्या तालमी करायच्या नाहीत अन आयत्या वेळी कशीतरी वेळ मारून नेली म्हणजे स्वतःला कृतकृत्य मानायचे हे हौशी नाटकवाल्यांचे एक ठराविक तंत्र होऊन बसले आहे. नाटक बसवायचे म्हणजे वाच्यार्थ्याने अक्षरशः ते खाली बसवूनच दाखवतात." पुढे ते म्हणाले, "अशाच एका हौशी नाटकाच्या प्रयोगाला गेलो असता सर्वात कोणाचे काम चांगले झाले असे सांगण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा प्रॉम्पटरचे काम सर्वान चांगले झाले, असे सांगणे मला भाग पडले..." फिदीफिदी



आचार्य अत्रे पुण्यामध्ये राहत असताना एकदा काकासाहेब गाडगीळ त्यांना म्हणाले "तुमच्या साहीत्य संमेलनाला मी कधी येत नाही."

अत्रे: "हो मी तुम्हाला कधी साहीत्य संमेलनात पाहीले नाही.

काका : "मी साहीत्य संमेलनाला का येत नाही विचारा"

अत्रे : "का बुवा येत नाही?"

काका: तुमच्या त्या साहीत्य संमेलनात सगले डँबिस लोक असतात.

अत्रे : मग तेवढ्यासाठी तुम्हाला न येण्याचे कारण काय? इतक्या डँबिस लोकां अजून एक आला तर बिघडलं कुठं?