Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 May, 2011 - 05:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
भांड्यात तेल गरम करा मग ठेचलेल्या लसुणपाकळ्यांची मस्त फोडणी द्या. आता त्यावर चिरलेला कांदा घालुन बदामी रंग येईपर्यंत तळा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला आणि घालुन ठवळून त्यावर करंदी घाला व वाफेवर ती शिजवा. शिजताना ती थोडी अळते. म्हणुन शिजल्यावर मिठ घाला म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही. मिठाबरोबर कोकम किंवा कैरी आणि कोथिंबीरही घाला. परत एक वाफ आणुन गॅस बंद करा.
ही बघा तयार झालेली सुकी करंदी.
वाढणी/प्रमाण:
आवडीवर आहे.
अधिक टिपा:
उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम
करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात.
आळुवडीतही करंदी घालतात.
करंदी पुलावही चांगला होतो.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागू, तू क्रमवार पाकृमध्ये
जागू, तू क्रमवार पाकृमध्ये करंदी घाला असं लिहिलंच नाहियेस.
केश्विनी, तू खाणार नाहीस ना
केश्विनी, तू खाणार नाहीस ना करंदी घातल्यावर म्हणून यावेळी तिने मुद्दाम तशीच लिहिलेय पाककृती. स्पेशली तुझ्यासाठी.

जागु, मी स्वतः सीफुड मुळीच खात नाही. पण नवर्याला मात्र तुझ्या माश्यांचे फोटो दाखवत असते.
माझ्या आईचा अत्यंत आवडीचा
माझ्या आईचा अत्यंत आवडीचा मासा. पण साफ करणे फार किचकट असते.
अल्पना अगं पण या रेसिपीत ती
अल्पना
अगं पण या रेसिपीत ती करंदीच घातली नाही तर कांद्याची भाजी होईल ती. विसरलीय ती, आल्यावर बदलेल
अश्विनी तु मासे खात नसलीस तरी
अश्विनी तु मासे खात नसलीस तरी वाचताना मात्र हाणुन पाडतेस. धन्स. बदल केला आहे.
अल्पना धन्स.
दिनेशदा
जागु तुझी क्रमवार पाकृ
जागु तुझी क्रमवार पाकृ वाचताना माझ्या तोंडात क्रमवार पाणी साठत गेले..... मस्ट डू पाकृ. आंब्याची कढी पण टाक ना इथे. म्हणजे तुझे कॉम्बो आम्ही पण ट्राय करतो.
ह्म्म्म. आवडता प्रकार. पण
ह्म्म्म. आवडता प्रकार. पण दादा म्हणाले तसे, साफ करायला किचकट. आणि कोळणींकडील साफ केलेले वाटे घ्यावेसे वाटत नाही कारण बरेचदा त्या फ्रोजन आणुन मग त्याचे वाटे लावतात. या रविवारी आणतोच आणि मांडी ठोकुन मीच साफ करतो.
धन्यवाद जागु!
साफ केलेल्या करंदीचा ३रा फोटो
साफ केलेल्या करंदीचा ३रा फोटो मस्त आलाय जागू.
माडी ठोकुन मीच साफ
माडी ठोकुन मीच साफ करतो.
आयला, अनुस्वार राहिला वाटते.. अनुस्वार द्याहो राव नाहीतर माडी ठोकुन करंदी साफ करताना डोकी आणि शेपटे ताटलीत टाकाल आणि मधली करंदी कच-यात...
मला १ला फोटो जास्त आवडला. करंदी अगदी मस्त गुलाबी नी ताजी फडफडीत दिसयेत.
जागुले मस्त दिसतय.. खायला
जागुले मस्त दिसतय.. खायला कधी घालतेस

साधना मी पण असाच विचार केला
साधना, धन्यवाद! तोंडाला
साधना, धन्यवाद! तोंडाला सुटलेलं पाणी पुसत टायपताना....
एकदम यम्मी ! जागु कधी चुकुन
एकदम यम्मी !
जागु कधी चुकुन माकुन तुम्हारे रामगढ मे आयाच तो ,एक तो सी फुड डिश उकळेंगाच.
दक्षी अजुन कशी टपकली नाही इथं.
जागुतै आज काही खरे नाही...
जागुतै आज काही खरे नाही... पहिला वडा, नन्तर करंदी.....
आज कसेही करुन मासे खायचे आमंत्रण मिळवावे लागणार असे दिसतेय.....
अरे बोलवा कुणीतरी.....
दक्षिणा, फिश मार्केट मधे
दक्षिणा, फिश मार्केट मधे गेलीय. फारच मनावर घेतलेय तिने.
कालवण टेस्टी असेल एकदम. मस्त
कालवण टेस्टी असेल एकदम. मस्त दिसतय..
तुम्ही घरी "सी फूड फेस्ट" कधी ठेवणार आहात ?
कालवण टेस्टी असेल एकदम. मस्त
कालवण टेस्टी असेल एकदम. मस्त दिसतय..
तुम्ही घरी "सी फूड फेस्ट" कधी ठेवणार आहात ?
अरेच्चा! माझा नं उशिरा की
अरेच्चा! माझा नं उशिरा की काय? असो पण अश्वी आहे की शाकाहार्यांची रिप्रेझेंटेटिव्ह...
जागु, फायनल छायाचित्रं इंटरेस्टींग दिसतंय.... फक्त तो न सोललेला आणि सोललेला वाटा सोडून.
गबर्या... तुमने पुकारा और हम
गबर्या... तुमने पुकारा और हम चले आये..
मस्त तोंपासु
मस्त तोंपासु
आता जावच करंदी आणायला
आता जावच करंदी आणायला
फोडणित टाकू काय ?
>>>आळुवडीतही करंदी घालतात.<<< वा ! काय आयडिया आहे !
दुसर फोटो लईच झ्याक
आंब्याची कढी दोन दिवसांत
आंब्याची कढी दोन दिवसांत टाकते साधना.
भ्रमर आमच्याकडील कोळणी वाटे करुन साफच करत बसलेल्या असतात त्यामुळे फ्रोझन करंदीच टेंन्शन नसत.
शैलजा, रोहित धन्स.
वर्षा, गब्बर, गिरिविहार, पराग तुम्ही आलात की ताटात वाढतेच.
अवल अग लसुण टाक.
दक्षे आलिस का ग मार्केटमधुन ?
म्हणजेच श्रिम्प ना?
म्हणजेच श्रिम्प ना?
करंदी मस्त लागते कोळंबी
करंदी मस्त लागते कोळंबी पेक्षा.
सुक्या करंदीचे किसमूर मस्त लागते.
करंदी कोलंबीसारखीच लागते ना ?
करंदी कोलंबीसारखीच लागते ना ? मी खाल्ली आहे एका मैत्रिणीकडे करंदी घातलेली बिर्याणी. मस्तच होती !
रच्याकने, करंदी, कोलंबीचे सोललेले वाटे मिळतात म्हणून घरी आणून करायला सोपे वाटते. बाकीचे मासे खूप आवडले तरी नीट साफ करायला जमत नाही
जागू करंदी घातलेल्या आळूवडीची
जागू करंदी घातलेल्या आळूवडीची आठवण कशाला केलीस? करंदी काही नशिबात नाही तेव्हा कोलंबीचे कालवण केले.
अगो, बाकी मासे पण साफ करुन घ्यायचे कोळणीकडून.
जागू, तू न खणार्यांना पण
जागू, तू न खणार्यांना पण बाटवतेयस. मग आम्हा पामरांची काय कथा!
अगो, बाकी मासे पण साफ करुन
अगो, बाकी मासे पण साफ करुन घ्यायचे कोळणीकडून. >>> नवख्या गिर्हाईकांना कोळिणी फार फसवतात हो
शिळा / ताजा, किंमत, साफ करुन देणे अशा सगळ्याच बाबतीत. माहीतगाराबरोबर जाणे चांगले. पण ते नेहेमी जमतेच असे नाही.
जागु शेवटची डिश जरा इकडे पास
जागु शेवटची डिश जरा इकडे पास करशील का ?
मला इतक्या प्रकारचे मासे
मला इतक्या प्रकारचे मासे असतात हेच माहीती नव्हत.
म्हणजे प्रॉन्स बिर्याणी असं
म्हणजे प्रॉन्स बिर्याणी असं जे म्हणतात त्यात करंदी असते? कोलंबी नसतेच का??
Pages