बीजिंग आणी आसपास

Submitted by वर्षू. on 7 April, 2011 - 08:24

जवळ जवळ ३००० वर्ष वय असलेलं हे बीजिंग शहर,ऑलिंपिक्स मुळे नव्या तरुणाईने नटले असले तरी ,शहराचे अनेक भाग,गल्ल्या आपला ऐतिहासिक चेहरा अजूनपर्यंत टिकवून आहेत. बीजिंगला कितीदा भेट दिली तरी नेहमी काहीतरी नवीन (जे वर्षोनुवर्षं जुनं आहे) दिसतं.

तर इथे सामावेश करत आहे बीजिंग च्या हेरिटेज साईट्स चा

१५व्या शतकात मिंग डायनेस्टी च्या सम्राटाने बांधलेला हा राजवाडा. जिथे पाचशे वर्षं आम जनतेला आत जाण्याची मनाई असल्याने हा राजवाडा,'फॉर्बिडन सिटी'म्हनूनच आजतागायत ओळखला जातो.
बीजिंगच्या हृदयस्थानी असलेल्या या राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'माओ'चं हे जगप्रसिद्ध तैलचित्र पाहिलं कि वेगळाच थरार वाटतो.

आत शिरायला लागलेल्या रांगा

आतमधे शिरल्यावर दोन्ही बाजूला असणार्‍या एकसारख्या इमारती,मधे विस्तीर्ण पटांगण.

दि फेमस तिएनानमन गेट पासून दिसणारी फॉरबिडन सिटी

या विजिट मधे पांडा दर्शन ही घडले

आमच्याकडे मुळीच लक्ष न देता उदरभरणात गुंग झालेला पांडा

या पठ्ट्याने मात्र शेवटपर्यन्त आम्हाला तोंड दाखवले नाही..

ईसवी सनापूर्वी दोनशे वर्ष, चिन शी व्हांग ती या सम्राटाने ही भिंत बांधायला सुरुवात केली. त्यानंतरच्या सम्राटांनी भिंत बांधणे सुरुच ठेवले. शेवटी १८०० वर्षांनंतर ही ग्रेट वॉल पूर्ण झाली. पूर्वेला यलो सी पासून ते पश्चिमेला गोबीच्या वाळवंटापर्यंत पसरलेली ही ८००० + किलोमीटर्स येव्हढ्या लांबीची भिंत ,लांबून एखाद्या आळसावून पडलेल्या अजगरासारखी दिसते.

या भिंतीवर चढण्यासाठी तीन ठिकाणी सोय केलेली आहे. पायी, केबल कार आणी ट्रॉली वे. त्यापैकी हे केबल कार ने जायचं स्थान.

तिकडून तीन किलोमीटर उंचावर जाऊन सोडतात . इथून भिंतीचा सर्वोच्च बिंदू साधारण ८८० मीटर्सवर होता.तिथपर्यन्त पायी चढावे लागते.

केबल कार मधून दिसणारे उंच पर्वत..बर्फ आणी कडा़क्याच्या थंडीनंतर बोडके,रुक्ष,काळवंडलेले दिसत होते

From Forbidden city

From Forbidden city

From Forbidden city

परतीचा प्रवास

गुलमोहर: 

निलतै, सुंदर प्रचि.!

यांच्या प्रत्येक 'नक्षि' मेध्ये "ड्रॅगॉन" असतोच.

डोंगर उघडे बोड्के आहेत. तापमान १०से. च्या आसपास दिसतेय.

आत्ता कसं सगळं नीट दिसायला लागलं. या दोन्ही जागा ओळखीच्या वाटतात, पण मला खात्री आहे, प्रत्यक्ष बघण्यात वेगळाच थरार असणार.
इतकी गर्दी असूनही, या दोन्ही जागा खूपच स्वच्छ ठेवलेल्या दिसताहेत !

स्वच्छतेबद्दल दिनेशदांना अनुमोदन. डोंगररांगा अगदी बिच्चार्‍या दिसताहेत. पांडूमामा येकदम गोड! Happy

'पांडूमामा' अकु Lol
'या दोन्ही जागा ओळखीच्या वाटतात''.. अगदी खरंय दिनेश दा.. मलाही तसच वाटे...पण प्रत्यक्ष गेलं कि या जागांच्या भव्यतेमुळे अक्षरशः दिपायला होतं.

झक्कासच!!!

स्वच्छता, सोय आणि मेंटेनन्स चांगला ठेवलाय भिंतीचा. Happy मध्ये सकाळमध्ये का कुठेतरी चीनच्या भिंतीबद्दल लिहुन आलेल कि कोणीतरी तिथेपण खडुने नावं लिहुन आलेत Sad

कुठे कुठे भिंतीवर आहेत कोरलेली नावं.. पण आपल्याकडे फतेहपूर सिकरी च्या भिंतीवर हार्ट ,बाण.. नावं असलं पाहून फार वाईट वाटलं होतं..

हो वर्षू, चायना वॉलवर आहेत नाव-बिवं लिहिलेली. आम्ही बघून म्हटलं सुद्धा की या बाबतीत अगदी आपल्यासारखेच दिसतायत.

मी आत्ताच नवीन वर्षाच्या सुट्टीत चायनाला जाऊन आले. जायच्या आधी खूप उत्सुकता होती. पण का कोण जाणे, मला नाही आवडलं चायना. Sad शांघायला पर्ल टॉवरच्या ऑब्झर्वेटरीमध्ये तर लोकांनी इतका कचरा केला होता, बघून वाईट वाटलं. पण आम्हांला शाकाहारी जेवण जे काही मिळालं ते चांगलं मिळालं हे मात्र नक्की.

आडो.. न आवडायची कारणं सांगशील का?? कारण मला इकडे ९ वर्षात हा देशच न आवडण्यासारखं काही कारण दिसलं नाही गं..म्हणून कौतुहलापायी तुला विचारतेय Happy

वर्षू, मला काहीच कळलं नाही की मला तो देश का आवडला नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे जायच्या आधी नवर्‍यापेक्षा जास्त एक्साईटमेंट मलाच होती खरंतर. कोरियामधून गेल्यामुळे असं झालं कां? की माझ्याच अपेक्षा जास्त होत्या माहीत नाही.

त्यातल्या त्यात शांघाय आवडलं मला. बीजिंग खूपच ट्रॅडिशनल वाटलं. फॉरबिडन पॅलेसचा इतिहास कळल्यामुळे की काय तो बघायची उत्सुकता राहिली नव्हती. पण टेम्पल ऑफ हेवन व त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप आवडला. शहराच्या मध्यभागी एवढी जागा अजूनही राहिलीये याचं खूप कौतुक वाटलं. चायना वॉलला आमच्या गाईडने अगदी टळटळीत उन्हात नेलं, तिला जास्त इंटरेस्ट आम्हांला जेड, पर्लची फॅक्टरी दाखवण्यात होता.

आडो होता है होता है!! Happy
आयफेल टॉवर बघताना मलासुद्धा याच फीलिंग्स आलेल्या .. जास्त अपेक्षा.. पॉइंट!!
बीजिंग चं ट्रेडिशनल लुक मुद्दाम जपून ठेवलय..त्यातच या शहराचा चार्म आहे. राजधानी असल्यामुळे नोकरी करणारा मध्यम वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. मोठं शहर असल्याने इकडे, आजूबाजूच्या खेडीवजा शहरातून मोठ्या संख्येने माणसं रोजीरोटी शोधायला इकडे आलीत. पण त्यांचं ग्रामीण इनोसंस अजून टिकून राहिलेला दिसतो. लोकल लोकांमधे मिसळलं कि हे गुणविशेष तात्काळ दिसून येतात.

इकडले गाईड्स खरच कधी कधी सर्व भराभर दाखवून जेड, पर्ल, सिल्क फॅक्टरीत घेऊन जायला उत्सुक असतात. एकाला मी याचे कारण विचारले तर त्याने सांगितले कि आमच्या कंपनीच्या मालकाला टूरिस्ट्स ना या सरकारी कारखान्यात आणण्याची एकप्रकारची सक्तीच असते. हा नियम पाळला नाही तर गाईड च्या नोकरीवर गदा येऊ शकते.

पर्सनली मला शांघाय पेक्षा बीजिंगच जास्त आवडतं.. त्याच्या रहस्यमयी इतिहासामुळे बहुतेक..
खैर..
टेंपल ऑफ हेवन चे फोटू टाकते लौकरच ..तुझ्याकडचेही शेअर कर इकडे Happy

वर्षू, माझे फोटोही काही चांगले नाहीत त्यापेक्षा तुझे नक्कीच छान आहेत. असो, टाकेन निवडक पण तू तुझे आधी टाक.

इकडले गाईड्स खरच कधी कधी सर्व भराभर दाखवून जेड, पर्ल, सिल्क फॅक्टरीत घेऊन जायला उत्सुक असतात. एकाला मी याचे कारण विचारले तर त्याने सांगितले कि आमच्या कंपनीच्या मालकाला टूरिस्ट्स ना या सरकारी कारखान्यात आणण्याची एकप्रकारची सक्तीच असते. हा नियम पाळला नाही तर गाईड च्या नोकरीवर गदा येऊ शकते.>>>>बापरे, खरं की काय?

बरं मला सांग ह्या जेड, पर्ल फॅक्टरीमध्ये मिळणार्‍या कितपत जेन्युईन असतात?

वर्षू, मस्त आहेत फोटो आणि माहिती. फोटोबरोबर जरा जास्त चांगले पण तुमचे शब्द फारच कमी ( कोकणस्थांना लाजवतील इतके ) अजुन जरा लिहा. वाचायला नक्कीच आवडेल.

Pages