पालकं
५ ते ६ लसुण पाकळ्या ठेचुन
१ ते २ कांदे चिरुन
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण १ ते २ लहान चमचे
सुके खोबरे + कांदा भाजुन केलेले वाटण ४ ते ५ चमचे
तेल, मिठ
गरम मसाला १ चमचा.
पालकं साफ करणे हे खुप किचकट काम आहे. पालक ही खडबडीत असतात त्यात रेती चिकटलेली असते. ही पालकं खडबडीत दगडावर मधुन मधुन पाणी टाकुन हाताने घासुन गुळगुळीत करावी लागतात. मग ही पालके चिरुन त्यातील घाण काढून टाकुन चिरुन घ्यावीत.
आता तेलावर लसुण टाकुन कांदा गुलाबी रंगावर तळावा मग त्यात हिंग, आल लसुण पेस्ट, मसाला घालावा. आता पालक घालुन थोड पाणी घालुन शिजवावीत. जर सुकी करायची असतील तर पाणी नाही घातल तरी चालेल. नुसत्या वाफेवर शिजवावीत. मग साधारण १५ ते विस मिनीटांनी शिजली का पाहून त्यात कांदा खोबर वाटण, मिठ, गरम मसाला घालुन थोडे शिजु द्यावे जर रस हवा असेल तर थोडे पाणी टाका. उकळल्यावर गॅस बंद करा.
पालकांच्या दिसण्यावर जाऊ नका. ही पालकं दिसायला ओबड धोबड असली तरी चविला तर छान असतातच शिवाय कॅल्शियम युक्तही असतात. खुबड्यांप्रमाणे समुद्रात दगडांवर चिकटलेली किंवा वळवळताना सापडतात. ही भरपुर घासुन आणि बर्याच पाण्यात धुवुन घ्यावीत म्हणजे ह्यात अडकलेली रेती निघुन जाते.
पालकांचा रस्सा मटणाच्या रस्श्याप्रमाणे करतात. पालकांच्या बेसन घालुन वड्याही छान होतात.
फोटो ??
फोटो ??
ही आहेत पालके रेतीने
ही आहेत पालके रेतीने भरलेली

नशिबाने त्या दिवशी माझी कामवाली उशिरापर्यंत थांबली होती. तिने मस्त दगडावर घासली.

ही गुळगुळीत साफ झालेली पालकं

हे पालकांचे सुके.

..
..
जागू, हा प्रकार माहित नव्हता!
जागू, हा प्रकार माहित नव्हता! तुझ्याकडे 'हटके' प्रकारांचा खजिनाच आहे.
कालवं अशीच दिसतात ना
कालवं अशीच दिसतात ना
जागुतै, नविन प्रकार आहे
जागुतै, नविन प्रकार आहे माझ्यासाठी.
इथे "फिलिपिन्स" आणि "चायनिज" लोकं 'दुबई क्रिक' च्या किनार्यावर दगडी उचलुन उचलुन कहीतरी शोधत फिरत राहतात. पण, काय आहे ते, कधी जवळुन पाहीलं नव्हतं. आज कळलं, ते या "पालकांचा" शिकार करत फिरत असतात बहुतेक.
तु कुठून हुड्कलेस
ए.भा प्र., नक्की हा प्राणि आहे की मासा ?
जागू, हा प्रकार खातात हेच
जागू, हा प्रकार खातात हेच माहित नव्हतं.
चातका, आता त्यांच्यासमोर कॉलर ताठ ना ?
जागु, हे नविनच दिसतय प्रकर्ण.
जागु, हे नविनच दिसतय प्रकर्ण. कधी पाहिली नाहीत.
बाबो डेंजर दिसतय ते. हे मासेच
बाबो डेंजर दिसतय ते. हे मासेच आहेत का ?
इथे पण बघितलय लोकांना पिशव्या घेऊन शोधाशोधी करताना.
जागू गेल्या जन्मी चीन कींवा
जागू गेल्या जन्मी चीन कींवा कोरीयाला जनमली असेल असे खात्रीने वाटू लागल आहे.
विजय अमी नाही ग. कालव पांढरी
विजय
अमी नाही ग. कालव पांढरी असतात आणि हे काळे.
चातक आमच्याइथे हे लोकप्रिय आहेत. म्हणजे ज्यांना माहीत आहेत ते लोक खुप आवडीने खातात. हे मार्केटमधुनच आणले मी.
दिनेशदा, भ्रमर
सिंडरेला हल्ली इथे पण प्लास्टीकच्या पिशवीत वाटे ठेउन विकतात.
जागू तूमच्याकडे चडू ( चडव)
जागू तूमच्याकडे चडू ( चडव) मिळतात का? वरण भाताच साध जेवण असेल तर ही भाजून छान लागतात.
विजय चडू कसे असतात ?
विजय चडू कसे असतात ? आमच्याकडे वेगळे नाव असेल किंवा मला माहीत नसेल.
या अल्ला! प्रकार तरी किती
या अल्ला! प्रकार तरी किती माहित आहे तुला जागू? हे प्रकरण सर्वस्वी नविन आहे माझ्याकरता.
आई ग्गं! हा प्रकार माहीत
आई ग्गं! हा प्रकार माहीत नव्हता.
मामी अजुन बरेच आहेत मला माहीत
मामी अजुन बरेच आहेत मला माहीत असणारे मासे. पण मला अजुन त्यांचे फोटो घेता नाही आलेत त्यामुळे वेटिंगलिस्टवर आहेत. शिवाय काही मासे सिझनल असतात तेही यायचे आहेत.
लले
जागु मलाही माहित नव्हता हा
जागु मलाही माहित नव्हता हा प्रकार .
नुतन मला वाटल तुला तरी माहीत
नुतन मला वाटल तुला तरी माहीत असेल. पण डॉ. कैलासना माहीत असेल नक्की.
जागूले, लगे रहो. जिकडे मिळत
जागूले, लगे रहो.
जिकडे मिळत असतील तिकडे नक्की खात जाल्ले असतील हे सगळे प्रकार. नाव वेगवेगळी असतील एव्हढच.
जागू तू अजून एक कलेक्शन बनवून ठेव. माशांचे (खायच्या) फोटो आणि त्यांची (वेगवेगळी) नावं. मत्स्यप्रेमी माबोकरं कमी नाहीयेत. एकाच प्रकाराला वेगवेगळी नावं असतील तरीही समजून येतील आपल्याला.
हो आयडीया चांगली आहे.
हो आयडीया चांगली आहे.
जागु, हे मासे दगडावर घासून
जागु,
त्यांचे मूळ टेक्श्चर कसे असते? कठिण असतात का हे मासे? आणि शिजायला किती वेळ लागतो?
हे मासे दगडावर घासून गुळगुळित करायचे?
बाकी तुझ्याकडे किती खजिना आहे ना? समुद्रभाज्या काय, मासे काय..
धन्य आहे तुझी __/\__
ए पण वाचायला जाम मजा येते मला..
दक्षे किती ते प्रश्न. या
दक्षे किती ते प्रश्न. या विकांताला आम्हाला खाउ घालणारेस का तु

दक्षे अग खरखरीत आणि बुळबूळीत
दक्षे अग खरखरीत आणि बुळबूळीत असतात. आधी बुळबुळीत असतात मग घासल्यावर जरा खरखरीत होतात.
शिजायला थोडा वेळच लागतो. साधारण २० मिनीटे तरी.
खजीना कधी आकड्यात सांगता येतो का ग ?
वर्षा मला पण असच वाटत आहे. की आता दक्षीणा आपल्याला करुन खायला घालणार आहे.
जागू.. पालकं.. हा पहिल्यांदाच
जागू.. पालकं.. हा पहिल्यांदाच पाह्यला प्रकार.. आज माझ्याकडे पालक आणलाय म्म मला वाटलं तू काहीतरी पालक घालून फिश ची रेसिपी लिवलीयेस..
दक्षी.. तेरे लिये बीजिन्ग खाऊगल्लीच फिट्ट है
बघ हां जास्त प्रश्न विचारलेस तर नेक्स्ट मासे गटग तुझ्याच कडे..
दक्षी.. तेरे लिये बीजिन्ग
दक्षी.. तेरे लिये बीजिन्ग खाऊगल्लीच फिट्ट है
जागू, खडक पालव म्हणतात तो हाच
जागू, खडक पालव म्हणतात तो हाच मासा का? मी खडक पालवच सुक खाल्लं होत पण कर्ली पेक्षाही चविष्ट मासा, पण खरच करली पेक्षा चविष्ट होता. पण तो मास्या सारखा होता हे काहीतरी वेगळ दिसतय.
जागु फोटॉ कुठे मिळणार एक छोटा तुकडा चवी पुरती मिळाला होता, गावी गेलो असताना चुलभावाने स्पेशल म्हणुन खाउ घातला होता. तेंव्हा पासून शोध घेतो आहे.
माबोच्या मत्स्य प्रेमीन्नो मदत करा.. डोक्याला ताण द्या..
सत्यजीत ही पालके माशासारखी
सत्यजीत ही पालके माशासारखी नसतात. वरती फोटोत आहेत.
तुम्ही खडक पालव म्हणता त्याला कोळणी खडप्पालू म्हणतात.
जियो जागु... कुठे मिळतो हा
जियो जागु... कुठे मिळतो हा मासा? तुम्ही खाऊन बघितला का?
सत्यजित मी अजुन खाऊन नाही
सत्यजित मी अजुन खाऊन नाही पाहीला. हे मासे मी मुरुडच्या मासळी बाजारात पाहीले. तिथल्या कोळणीने मला हे नाव सांगितले. तुम्ही म्हणताय चविष्ट लागतो तर आता ह्याचा शोध आमच्या लोकल मार्केट मध्ये घेते.
जागु, कालवं,तिसर्या ह्या
जागु, कालवं,तिसर्या ह्या प्रकारात मोडणाराच हा प्रकार दिसतोय. पालकं नाव वाचून मला मोदकं(माश्याचा प्रकार उकडीचे नव्हेत
) प्रमाणे असेल आसे वाटले पण हे नवीन दिसतेय.आमच्या बाजारात मिळते का ते बघेन.