वसई किल्ल्यातील एक रपेट !

Submitted by Yo.Rocks on 4 April, 2011 - 13:42

मागे होळीच्या दिवशी आम्ही काही मायबोलीकर वसई किल्ल्यात सकाळीच रपेट मारून आलो होतो त्याचा रिपोर्ट जिप्सीने इथे सचित्र दिला आहे... तेव्हा इथे नुसते प्रचि डकवत आहे.. Happy

वसई किल्ला गाठण्यासाठी विरारला जाणारी ट्रेन पकडून वसई रोड स्थानकावर उतरावे.. पश्चिमेस आल्यावर बाजूलाच असणार्‍या एसटी स्टँडवर किल्ल्याला जाणारी एसटी पकडावी..(प्रवासी भाडे रु.९) रिक्क्षासुद्धा जातात पण प्रत्येकी अंदाजे रु.२०-२५ घेतात..

जलदुर्ग व भुदुर्ग अशा दोन्ही प्रकारात हा किल्ला येतो.. हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला नि पुर्नबांधणीचे काम सुरु केले.. त्याला तब्बल १० वर्षे लागली असे म्हणतात.. नि खरच ह्या किल्ल्याची लांबच्या लांब असलेली तटबंदी नि प्रतेक कोपर्‍यावर बांधलेले बुरुज बघता त्याचा विस्तार लक्षात येतो.. हाच किल्ला पुढे चिमाजीअप्पांनी तुंबळ लढाई करुन हिसकावून घेतला होता.. आज बहुतांशी भाग इतर किल्ल्याप्रमाणे उद्धव्स्त आहे.. पण पुर्वीच्या काळातील वाडे- चर्चची बांधणी, तेव्हाचे कोरीव काम, नि शिवाय भुरळ पाडणारा तिकडचा निसर्ग हे सगळे अनुभवण्यासाठी एकदातरी भेट द्यावी असा हा किल्ला आहे.. काही भिंती अजूनही मान उंच करून उभ्या आहेत.. वापरण्यात आलेला दगड अजूनही तसाच आहे.. या किल्ल्याकडे वेळीच लक्ष घातले गेले असते तर बरेच काही वाचवता आले असते.. असो.. पण एकदा तरी भेट देउन या..

(इथे जाताना मात्र एक काळजी घ्यावी.. शक्यतो शनिवार-रविवार बघून जावे.. मधल्या दिवसांमध्ये जाणे शक्यतो टाळावे.. विशेषकरुन नवख्याने.. नि गेलात तर एकट्या- दुकट्याने जाउच नये.. लुटमारीचे वा इतर प्रकार घडलेले आहेत असे म्हणतात.. नि अंधार पडायच्या आत किल्ल्याचा निरोप घ्यावा.. आम्ही गेलो तेव्हा अगदी एका टोकाला स्टेनगन घेउन दोन पोलीस होते खरे.. पण किल्ल्याचा विस्तार बघता ही सुरक्षा फारच कमी आहे..)

प्रचि १ : हर हर महादेव !

प्रचि २ : रोझी स्टार्लिंग (पळस मैना)

प्रचि ३ : Great Eggfly

प्रचि ४ :

प्रचि ५: ताडी काढण्यासाठी वापरण्यात येणारी मडकी

प्रचि ६ :सश्याचे डोळे

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४: कॉपरस्मिथ बार्बेट (तांबट)

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१ :

प्रचि २२ :ORIENTAL MAGPIE ROBIN (दयाळ)

प्रचि २३ : Garden Lizard (सरड्याची धाव....;) )

गुलमोहर: 

छानच रे. तूझ्या फोटोमधून तो किल्ला उध्वस्त आहे असे वाटत नाही.
पुर्वी इथे अनेक सिनेमांची शुटींग्ज व्हायची, शेवटची ढिशूम ढिशूम मारामारी इथेच व्हायची.काही गाणी पण इथे चित्रीत झालीत (दोनोने किया था प्यार मगर...)

मी भटकलोय एकटा इथे. पण दुपारच्या वेळी तू म्हणतोस तसे जुगार्‍यांचे अड्डे असतात इथे. भट्ट्या पण लागलेल्या दिसतात.

७, ११, १५ व १६ खूप आवडले. १५ पण मस्त आहे, फुलं जराशी एका कोपर्‍यात असती तर अधिक मस्त वाटली असती, असं माझं मत. Happy

सही!
गुंजा(सश्याचे डोळे) बर्‍याच दीवसांनी पाहील्या. आधी ह्या गुंजांच्या परिमाणाने सोने मोजत असे ऐकले आहे.

सही! बर्‍याच नवीन सिनेमातही बघितल्यासारखा वाटतोय?!
वास्तुरचना आपल्याकडील नाही हे कळतय.. विशेषतः ७, १६, २० मधले खांब, कमानी इ.

प्रचि ७ , १०, १२, १३, २१ , १८ जास्त आवडले. विन्टेज लुक पर्फेक्ट टिपलं आहेस एकदम.
रच्याकने हे फोटो काढताना 'जुनं ते सोनं' कसं दाखवता येईल याचा विचार केलास ना?

मस्त रे यो Happy
थोडी माहिती टाकलीस ... ते छान केलस Happy
बाकी फोटो छानच... झब्बु देऊ का?

हा किल्ला आता उध्वस्त आहे.
पण हे उध्वस्त बांधकामा पाहिले तरी कळते. वापरात असेल तेव्हां काय शान असेल या किल्याची.

प्रचि २० मधे दिसणारे छत, नक्कीच कधीकाळी सुंदर चित्रांनी सजलेले असेल. स्टेन्ड ग्लास विंडोज पण असणार.

यो... फोटो एकदम जबराट.... Happy
बाकि तो सरडा पण मस्तच मूड मधे होता... लय भारि पोझ देऊन होता तो... Wink