बीजिंग ची खाऊ गल्ली

Submitted by वर्षू. on 1 April, 2011 - 06:21

साधारण खाऊ गल्ली म्हटलं कि डोळ्यासमोर चाट,भेळपुरी,दोसे,मिसळ,भाजीपाव,आईसक्रीम,दहीभल्ले,बटाटेवड्यांचे दाटीवाटीने एकमेकांना खेटून असलेले स्टॉल्स येतात नं.. तसलेच स्टॉल्स बीजिंग च्या खाऊ गल्लीत आहे फकस्त पदार्थ वेग्गळे अगदी!!!

हे स्टीम होत असलेले क्रॅब्स

साते च्या काड्यांना लावलेली विविध फळे

काही ठिकाणी या फळांना साखरेच्या कडक पाकात बुडवून विकत होते

अ‍ॅनीबडी ?? फॉर भाजलेले विंचू आणी स्टार फिश??

मोठे विंचू नसतील आवडत..तर छोटेही आहेत मेन्यु वर Happy

स्क्विड्स, अँट ग्रब्स.. ऊप्स!!!

क्रॅब्स रेडी झालेत.. छान स्टीम निघतीय आता

अजून पण काही..बाही

आह्हा.. फायनली.. समथिंग फॉर वेजीज.. अ‍ॅपिटाईट उरलं असल्यास Wink

छोटे मोठे स्क्विड्स्,साप्(सोलून)

ही अतिशय टेस्टी गजक.. खमंग दाणे,तीळ ,गूळ घालून केलेली..

खाऊन झालं असेल तर या गिचिमिची ,अरूंद गल्ल्यांमधल्या या गच्च भरलेल्या सोविनिअर्स च्या दुकानांतून
काहीबाही विकत घ्या

हीच ती गल्ली.. लोकल लोकांनी, टूरिस्ट्स नी सदैव भरलेली

गुलमोहर: 

वर्षुताई, ते अँट ग्रब्ज, छोटे-मोठे विंचू, साप असे हे पदार्थ बघून मी मी म्हणणार्‍या सामिषवाल्यांचीपण ततपप होईल ना! मस्त मेजवानी दिलीत पण कोण खाणार?

रच्याकने: गजकच्या भांड्याचा आकार लै नामी!

वर्षु, ती फळं सोडून काऽऽहीही बघवत नाहीये बाई.

हा घे कोरियातल्या खाऊगल्लीचा झब्बू. सॉरी ग, राहवत नाहीये पण.
DSC03078 copy.jpgDSC03079 copy.jpgDSC03081 copy.jpgDSC03082 copy.jpg

वर्षू,

मस्त फोटो. पण बघायलाच हं! (आता तंत्र जमलं म्हणायचं, इथे फोटो डकवायचं )
स्क्वीडस आपल्याकडे पण खातात. (जागूला माहीत नाही वाटतं) पण त्याचे पाय नाही, मधलाच भाग खातात.

(पण मला एक जाणून घ्यायचय, तूम्ही लोकांनी काय काय खाल्लत ? )

मस्त Happy

आऊटडोअर्स ला अनुमोदन..
फळांचा स्टॉल सोडल्यास बाकी काही बघवत नाहिये.. Sad
कसं खातात असं काहीबाही लोक?
मी शाकाहारी असल्याने हा बीबी नाही आवडला.. Sad

दिनेश्.. Lol मी साखरेच्या कडक पाकातले पाईनापल.. बाकी काही नाही...

@आडो.. धन्स गं.. कोरियातली खाऊगल्ली पण तितकीच टेंम्प्टिंग दिस्तिया.. Proud

तायवान मधे लाइव स्नेक मार्केट बघितलं होतं.. ग्राहकाच्या पसंतीने तिथे लटकावलेल्या जिवंत सापाला, उभी चीर द्यायचे..आणी निघालेले रक्त पेल्यात जमा करून ,खरेदी करणारा ,नारळ पाण्यासारखा पिऊन टाकायचा ..मग उरलेल्या सापाचे सोलून तुकडे करून,झटपट फ्राईड राईस बनवून द्यायचा विक्रेता..
आई ग!! ही गोष्ट 'अमानवीय' सदरात डकवायला हवी होती का.. Wink

अगागागा... कलरफुल्ल मार्केट... पण पदार्थांकडे बघवत नाहीए अजिबात Lol

वर्षु नील - वाट बघत होतो . आज फळ मिळाले बरे वाटले.निव्वळ अप्रतिम फोटो
विंचू ..? छोटा ..?मोठा ..? चीन म्हणजे मजाच आहे .. काहीपण खाऊ शकतात .नि चवीने.
फोटो बघून तोंडाला पाणी सुटले. माझ्या पद्धतीने सर्वांची चव घेतोय.
बाकी काय म्हणताय ..? पुढील लेखनास शुभेच्छा !!

यात सी हॉर्सेस नाहियेत का? ते बरे लागतात. तसेच कोंबड्याचे पायांची(Claws वाला भाग जो आप्ण फेकुन देतो ) त्याचीही येक चांगली डिश बहुतेक ठिकाणी मिळते. काहि दिवस झोन्सेंग (ZONGSHENG) ला रहायला लागले होते तेव्हा फार काही चॉईस नसल्याने यातले काही प्रकार पोटात ठकलले होते.

सी हॉर्सेस ?? होते तर.. फोटो टाकायला विसरले.. अरे व्वा.. तुम्ही सी हॉर्सेस ट्राय केले??
इकडे कोंबड्यांचे पाय्,नख्यांसकट ,उकडलेले,काहीतरी मीठमसाले लावलेले सुपर मधे सर्रास मिळतात्..म्हणून त्याचे फोटू टाकायचं सुचलं न्हाई Happy

आमच्याकडे इतके छोटे प्राणी नाही बॉ खात.
माझ्या घरापासून जवळ, कार्नीव्होर म्हणून एक खास हॉटेल आहे.

तिथे झेब्रा, मगर (बाकी नावे घेत नाही ) वगैरे प्राण्यांचे मांस, कोळश्यावर खरपूस भाजून सर्व करतात. (फोटो टाकू का ?)
मी तिथे (पण) फक्त फूलेच बघायला गेलो होतो.

वर्षू,
चीनी खाऊगल्लीचे वर्णन आवडले. अशीच जमिनीवरली वर्णने करावित!

गजक पहून तोंडाला पाणी सुटले!
मात्र वडीच्या स्वरूपात न दिसता ते चुर्‍याच्या स्वरूपात का दिसते आहे?

वर्षु, ती फळं सोडून काऽऽहीही बघवत नाहीये बाई.>>>
आडो,
मग तू जे काय दिले आहेस ते बघवताय होय? असो.
पण किमान त्यांची नावे वर्णने काहीतरी द्यायची वर्षूसारखी!

मामी,
मी मी म्हणणार्‍या सामिषवाल्यांचीपण ततपप होईल>>>> एकूण तसे दिसतय खरेच!

वर्षू,
कविता सुचली कि नाही विंचवांना पाहून >>>>>
हो ना. सुचली तर!

विंचू चावला! विंचू चावला!! विंचू चावला!!!
अग गग गग विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, कुणाला सांगू विंचू चावला
विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हा!

या विंचवी रसाला, प्राशूनी आनंद झाला,
मेंदुपर्यंत गेला, विंचवी रस !!

फळफळावळ टेम्प्टींग आहे... बाकीचं अम्म्म... Happy

वर्षू पण फोटोज झक्कास!!! मस्त आणि धन्स फ्री खाऊ गल्ली सफरी बद्दल !!!

ऑक्टोपस बरे लागतात चवीला. त्यांचे वळवळणारे पाय बघून आपल्याला कसंतरी वाटतं ती गोष्ट आहे खरी! पण विंचू वगैरे खायचे ह्या कल्पनेने सुद्धा पोटात ढवळून आलं.
आडोतैच्या फोटोतले शेल्स आवडले.
रच्याकने, किवी फारच पाणचट लागते चवीला, नाही? का इथे मिळणारेच पाणचट असतात?

ऑक्टोपस बरे लागतात चवीला. त्यांचे वळवळणारे पाय बघून आपल्याला कसंतरी वाटतं ती गोष्ट आहे खरी! पण विंचू वगैरे खायचे ह्या कल्पनेने सुद्धा पोटात ढवळून आलं.
आडोतैच्या फोटोतले शेल्स भन्नाट.
रच्याकने, किवी फारच पाणचट लागते चवीला, नाही? का इथे मिळणारेच पाणचट असतात?

Pages