- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
उपग्रह वाहिनी
सदस्य प्रवेश |
सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)मराठी सा रे ग म प लीटल चॅम्प्स.. झी मराठी वर सोम मंगळ रात्री ९.३० ते ११ असते. कालच पहिला भाग सुरू झालाय. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ |
|
हे सगळे प्रोग्स कुठे/कधी असतात ? माझ्याइथे फक्त ई-टीव्ही मराठी दिसते आणि त्यावर बंडल कार्यक्रम असतात. टाटा स्काय घ्यावे लागेल असे दिसते.
ह्म्म.. मी झी मराठी मिस करते आहे गेली ३ वर्ष, पण त्यासाठी टाटा स्काय घ्यावे इतके त्यावरचे कार्यक्रम चांगले आहेत का हे कळत नाहीये, कारण आम्ही दिवसभर बाहेर असतो. हे मराठी सारेगम इतर कुठे पहायला मिळेल का ?
प्रत्यक्ष स्टुडियो मधे! हे हे


जोक्स अपार्ट, झी २४ तास पर रिपीट टे. होत असेल तर काही कल्पना नाही. पण पुन्हा झी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
अगं अश्विनी, यूट्यूबवर एपिसोड्स कदाचित टाकले जातात किंवा कुठल्यातरी वेबसाईटवर पण अपलोड करतात. तू जर अर्काईव्हज वाचलेस जुन्या मायबोलीवरचे तर तुला ती साईट कळेल. मला ना कळलं तर मी इथे टाकेन.
हो.. आठवलं. पण त्याबद्दल जास्त माहिती नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
धन्स मंजू, बघते मी. अगं इथली चर्चा वाचून वाटतं पहावं म्हणुन.

आशू झी २४ तास पण नाही दिसत, इथे सूर्या, उदया असलं काय काय भरून ठेवलं आहे पहीले १०० चॅनल्स ! माझी मुलगी मग रात्री जेवताना त्यावर कुचीपुडी, भरतनाट्यम् वगैरे आनंदाने बघत बसते.
काय गं असं! स्वतःने इथे मराठीची हौस पुरेपुर भागवायची आणि मुलीच्या वाट्याला सूर्या , उदया द्यायचे का? शो. ना. हो

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
काल सा रे ग म प लिटिल चॅम्प्स मध्ये करमरकर आणि कामत यांत टाय झाली. त्यात गोंयची चेडी जिंकली.
५० स्पर्धकांत केवळ १२ मुलगे आहेत. मुलुंडचा मि. फास्ट नक्कीच पुढे जाइल.
ह्या लिटिल चॅम्प मध्ये बहुतेक मुलं इंग्रजी माध्यमात शिकणारी आहेत. त्यांच्या उच्चारांना मला दाद द्यावीशी वाटते. कालच्या भागात त्या अवनी पटेलने 'एक तत्व नाम' म्हटलं..... किती दिवसांनी ऐकलं हे गाणं.....
अवधूतने जिला म्हटलं ना ' ...... कानांना मुंग्या येतील' त्यावरची तिचीच रीऍक्शन - 'आईगं.... ' इतकी गोड होती.... so innocent..... त्यातच तिने जिंकलं..
सा रे ग म प लिटिल चँप्स् ०८/०७/०८
कालचा भाग पण चांगला झाला..
१२ ते १४ वयोगट.
टाय झाल्यावर खरतर दोघींनाही ठेवायला हरकत नव्हती, पण ...
अवधूतने जिला म्हटलं ना ' ...... कानांना मुंग्या येतील' त्यावरची तिचीच रीऍक्शन - 'आईगं.... ' इतकी गोड होती.... so innocent..... त्यातच तिने जिंकलं..>>> ती आर्या आंबेकर.. पुण्याची आहे.. यंदा प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या स्पर्धेत पहिला नंबर आला तिचा...
ह्या पोरांना गाणी निवडायला शिकवलं पाहिजे.. उगाच कायच्या काही अवघड गाणी म्हणतात.. आणि मग मार्कस् कमी मिळतात..
'मि. फास्ट' खरच शेवट पर्यंत जाईल असे वाटते आहे.. काल त्यानी जे गाणे म्हटले ना ते लय अवघड गाणे आहे.. सुरेश वाडकरच अशी गाणी म्हणणे जाणो.. पण ह्या पोरानी जो प्रयत्न केला तो खरच जबरी होत..
'गोयेंच्या मुलीनी' दुसरे गाणे खूपच मस्त म्हटले..
आणि अवनी पटेल.. पटेल असूनही इतके व्यवस्थित उच्चार.. सही है...
तो जो कुलकर्णी होता ना तो बाकीच्यांपुढे फारच फिका वाटला.. बा़की त्याच्या नकल सही होत्या..
काल प्रथमच दोन परिक्षकांच्या मार्कात बर्यापैकी तफावत बघायला मिळाली.. एकानी 'नी' आणि दुसर्यानी 'प' ये बात कुच हजम नही हुई... त्यामुळेच कदाचित ती कामत बाहेर गेली...
आणि वाडकर काकांनी काल परत हिंदी गाणी घेण्याचा आग्रह केलाच..
==================
डिंग डाँग डिंग
कामत कोण? ती ऑल राऊंडर? ती गेली???? अरेरे
काय गोड आवाज होता तिचा... तो कुलकर्णी 'चिक्कीवाला' पण छान आहे आणि मि. फास्ट पण 

----------------------
The cheapest face-lift is a SMILE
काल खरंच सगळ्यांचे आवाज मधासारखे गोड होते!! मजा येणार आता. ती गोव्याची आणि आर्या कसल्या गोजिरवाण्या वाटत होत्या ना...आर्याचा बोलतानाचा आवाज्..आईगं...इतकी गोड रिऍक्शन कुणीच दिली नसेल आता पर्यंत टीव्ही वर.!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
त्या अनुजा कामतला पहिल्याच गाण्यानंतर सुरेश वाडकरने disappoint केलं होतं. चार दगडांवर उभं राहून डगमगण्यापेक्षा गाण्यावर लक्ष केंद्रीत कर असं तो म्हणाल्यावरच खरंतर निकाल कळला होता. तिचा आवाज चांगला आणि तयारीचा वाटला होता पण अवधूतने खरोखर चांगलं परीक्षण केलं तिचं..
.
नावं अजून लक्षात राहत नाहीयेत... त्या गोव्याच्या करमरकरने टायब्रेकरमध्ये 'का धरीला परदेस' म्हटलं... ती गाणी पूर्ण ऐकवली नाहीत..... पण एवढ्या लहान वयात इतकी अवघड गाणी कशी म्हणू शकतात ही मुलं?
हजारोतून हजार्..त्यातून नऊशे त्यातून पाचशे, त्यातून १२५ त्यातून १०० त्यातून ५०!!! अशी आहेत ती. मग किती खास असणार याचा अंदाज करा!! आणि सिलेक्शन ला सलील कुलकर्णी, आणि सा रे....चे दिग्गज कलावंत होते!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
काल ऐश्वर्या सहस्रबुद्धे होती का? आमच्या अकोल्याची आहे ती. प्रशांत दामले तिला अनेक कार्यक्रमांत गायला बोलवत असतो..
नाही. असे नाव नाही ऐकले. नंतर असेल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
कामत आत्ता गे ली असे ल ही पण ती येईलच परत कॉलबोक मध्ये
कालचा एपिसोड अगदी दणक्यात झाला!! परवाची ती कार्तिकी गायकवाड.. आहाहा!! काय खणखणीत आवाजत लावणी ...वाह क्या बात है!!

आणि काल म्हणजे तर अक्षरशः कहर झाला!! नी नी ची हॅटट्रिक तर झालीच्..पण दोन्ही मुलांनी कमालच केली. तो प्रथमेश किती गोंडुला आहे ना!!
ऋषिकेश चे बोलणे मला नाटकी वाटत होते. असो. हा ताक धिना धिन मधे होता ना?? पेटी का तबल्याची साथ द्यायला?
आणि केतकी माटेगावकर लहानपणापासून झी मराठी वर गात आलीय. तो कार्यक्रम.. नाव नाही आठवत्...स्वररंग का काहितरी.. संध्याकाळी ५-६ ला लागायचा. तिची आई सुवर्णा माटेगावकर नक्षत्रांचे देणे मधे नेहमी असायची गाताना.
कालच्या भागाचे आज सोडून रिपीट टेलिकास्ट कधी असते? काल मधेच लाईट गेले होते.. पहिला फेरी नाही मिळाली पाहयला...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
आशु रविवारी असते बहुतेक रिपिट टेलिकास्ट... वेळ नाही माहित.. पण कालचा भाग नक्कीच परत बघायला आवडेल...
==================
डिंग डाँग डिंग
सोमवार दि. १४/०७/०८ आणि मंगळवार दि. १५/०७/०८
अजून एक ड्रामा
.
प्राथमिक फेरीतच 'नी' देणं, तेही दोन्ही गाण्यांना योग्य होतं का?
.
सुवर्णा माटेगावकरची मुलगी केतकी, पहिलं गाणं इतकं फिकं होऊनही दुसर्या गाण्यात तिने बाजी मारली. पुढच्या राऊंडला ती जायलाच हवी होती म्हणून तिला पुढे नेण्यासाठी दोन दोन 'नी' देणं आवश्यक होतं.... ती जाहीर कार्यक्रम करतेच त्यामुळे स्टेजवरचा तिचा वावर सहज होता.
.
कॉल बॅक एपिसोडऐवजी consolation round........
.
बोरगावकरांची खरंच फॅक्टरी असावी असं वाटतं......
मंड्ळी,
जागे व्हा.. ववि रजिस्ट्रेशनचे दोनच दिवस उरलेत... तेव्हा लगेच रजिस्ट्रेशनची मेल करा वविच्या दिलेल्या मेल आयडीवर सर्व माहितीसकट.. एकदा अंतीम तारीख निघुन गेली की मग वविला यायची संधीही निघुन जाईल. तेव्हा त्वरा करा..
वविसंयोजक
कालचा मराठी सा रे ग म प चा भाग खुपच छान झाला. सगळे जण एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
त्या समस्त बोरगावकरांचे जरा जास्तच लाड होतात या कार्यक्रमामध्ये. मला नेहमीच हा प्रश्न विचारावासा वाटतो, की जर का हे बोरगावकर कुटुंबिय जर का इतके हुश्शार आहेत, मग अजून पर्यंत त्यांच्यापैकी कोणी महागायक / महागायिका कसे झाले नाहीत?
बाकी कालच्या त्या दोघा पोरांनी मस्तच म्हटली गाणी .........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
बोरगांवकरचा काय ड्रामा झाला नक्की? मी पहिली फेरी पाहिली फक्त, पण दोन्ही मुलं निर्विवाद 'सॉलिड' होती. ती उंच संचिता पण चांगली होती की. ती नाही गेली होय पुढे!

ऋशिकेष कामेरकरला 'जज' म्हणून पाहिल्यावरच मी चाट पडले होते! दूरदर्शनच्या ताकधिनाधिन मधे आदेश'भाऊजीं'बरोबर असायचा तो गायक म्हणून. आता फार तर प्लेबॅक करत असेल. त्याला काय जज म्हणून बोलवायचं?
----------------------
Invention requires an excited mind;
Execution, a calm one.
प्राथमिक फेरीतच 'नी' देणं, तेही दोन्ही गाण्यांना योग्य होतं का?>>>>
एखादा गायक/गायिका खरच जर त्या योग्यतेनी गायल्यास काय हरकत आहे....
त्यातही अशी गाणी की जी गाताना भल्या भल्यांची भंबेरी उडते...
.
कामेरकर भाऊ आता संगीतकार झालेत..
.
ह्या भागात वाडकर पाहिजे होते गेस्ट म्हणून. मग मजा आली असती..
.
वैनी, ती उंच मुलगी आहे बरका पुढच्या राऊंडला...
==================
डिंग डाँग डिंग
तो प्रथमेश लघाटे माझा भाच्चा लागतो नात्यात
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||
मी कालचा एपिसोड मिसला. रविवारी किती वाजता असतो? परवाची कार्तिकी मस्तच गायली. काय लावणी गायली तिने मस्तच. काल ट्रेनमध्ये सगळ्याजणी तिचेच कौतुक करत होत्या.
तो प्रथमेश लघाटे माझा भाच्चा लागतो नात्यात...>>> अरे वा वा.. त्याला अभिनंदन सांग. कमाल गातो तो.
वहिनी, साडे माडे तीनचा कामेरकरच संगीतकार आहे.
मला तर तो कामेरकर त्या ताकधीनाधिन पासूनच डोक्यात जातो, कसला आगावु वाटतो तो
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||
youtube पाहिले ते episdoes...
awesomeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee !!!! दुसरा कहि शब्दच नाही...
ती केतकी माटेगाव्कर डोकयात गेली जरा.. आणि ती आळंदी वाली काही ठिकाणी अशुदध उच्चार करत होती का?? की मलाच तसं ऐकू येत होतं?? कारण कोणी fb दिला नाही तिला..
ती दोन्ही मुलं मस्त गातं होती बाकी...
ज्यांनी मिसलं त्यांनी पहा..
http://youtube.com/watch?v=YAWowBDQwC0