एका ओळखिच्या व्यक्तिकडून सुरंगिच्या झाडाचा पत्ता लागला. आणि त्याच व्यक्तीची ओळख काढून होळीच्या सकाळीच सुरंगीचे झाड पहाण्याचा मुहुर्त ठरविला. सकाळी ७ वाजताच या नाहीतर सगळ्या कळ्या काढून नेतील ही सुचना मिळाल्याने सुट्टीच्या दिवशीही सकाळी उठुन व नवरोबांची सकाळ लवकर उजाडून आम्ही सुरंगीचे झाड पाहण्यास गेलो आणि जवळ जवळ १ तास त्या झाडाखाली रमलो. झाडावर कळ्या काढण्या साठी दोन माणसे चढलेलीच होती. मिस्टरांच्या ओळखीची असल्याने त्यांनी आमचे झाडावरुनच स्वागत केले. आणि सुरंगीची त्यांना माहीत माहीती दिली.
साधारण चिकु, आंब्या सारखे मोठे असते. हे झाड चिवट असते.
होळी जवळ आली की सुरंगीच्या गजर्यांची आठवण येते. आजकाल खुप दुर्मीळ झालेली सुरंगी ही मार्च महिन्यापासुन दोन बहरांत फुलते. सुरंगीच्या कळ्या झाडाच्या खोडालाच लागतात.
सुरंगीच्या कळ्या काढण म्हणजे जोखिमीच काम असत. कळ्या काढण्यासाठी झाडावर चढाव लागत व एक एक झालेली कळी काढावी लागते. ह्या कळ्याच काढाव्या लागतात. जर फुल उमलले तर गजरा करताना त्रास होतो. साधारण १० वाजता म्हणजे सुर्यप्रकाश पुर्ण आल्यावर ह्या कळ्यांचे फुलात रुपांतर होऊन झाड पिवळे दिसु लागते. होळी असल्याने मला १० वाजेपर्यंत थांबणे शक्य नव्हते म्हणून थोडी खंत वाटली.
ह्या झाडावरुन जर पाय सटकुन माणूस पडला तर त्याची खुपच वाईट स्थिती होते असे म्हणतात. फुलांच्या सुगंधामुळे ह्या झाडावर साप येतात असेही म्हणतात. एवढी जोखिम आणि मेहनत घेउन ह्या गजर्यांना जास्त भाव नसतो. १० ते १५ रुपयांत ह्याचा गजरा मिळतो. शिवाय तो संध्याकाळी कोमेजतो. एकीकडे सायलीचा, टिकाऊ गजरा मात्र बाजारात २५ ते ३० रुपयांवर भाव खाउन बसतो.
झाडाखाली सुकलेल्या फुलांचा सडा पडला होता.
सुरंगीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक कमीवासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हीची झाडे सारखीच असतात फक्त कमी वासाची सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात तर वासाच्या सुरंगिला कमी असतात.
सुरंगीच्या फुलांचा मंत्रमुग्ध करणारा वास स्त्रियांना आकर्षीत करतो. केसांमध्ये माळलेला गजरा सुकुन काढला तरी पुर्ण दिवस ह्या फुलांचा वास केसांमध्ये राहतो. पुर्वी होळीला ह्या गजर्यांना खुप डिमांड असे. पुर्वी हे गजरे भेट म्हणूनच वाटायचे.
अहा! सुरंगीचा गजरा!
अहा! सुरंगीचा गजरा!
जागू, मस्तच आलेत फोटो. खूप
जागू, मस्तच आलेत फोटो.
खूप खूप खूप धन्यवाद. माझी खूप दिवसांची ईच्छा पूर्ण केलीस.
सुरेख...
सुरेख...
वा वा खूप छान फोटो व छान
वा वा खूप छान फोटो व छान माहितीही........
छान माहिती आणि फोटो
छान माहिती आणि फोटो
सुरेखच दिसतय हे प्रकरण.
सुरेखच दिसतय हे प्रकरण.
छान...
छान...
मस्त. तू बनवलेयस हे गजरे?
मस्त. तू बनवलेयस हे गजरे?
अहाहा सुरंगी.. माझादेखिल
अहाहा सुरंगी.. माझादेखिल आवडता गजरा. मुंबईतहि मिळतात हे गजरे.
जागू, फोटो बघूनच त्या वेड
जागू, फोटो बघूनच त्या वेड लावणार्या सुगंधाची आठवण आली. अगदी बाजारात असणार्या गजर्यावर पण मधमाश्या घोंघावत असतात.
गजरे मस्त आहेत. माहितीही
गजरे मस्त आहेत. माहितीही नवीनच मिळाली.
जागुताई, माझा अतिशय आवडीचा
जागुताई, माझा अतिशय आवडीचा आहे हा गजरा. लहानपणि काकू आठवणिने द्यायचि हा गजरा (कोकणात). मस्त.
मस्तच गं.. खरेच याच्यावर
मस्तच गं.. खरेच याच्यावर मधमाशा असतातच. सुरंगी रुपाने डावी आहे पण देवाने सुगंध अगदी वेडावणारा दिलाय...
जागुजी किती छान माहिती दिलीत.
जागुजी किती छान माहिती दिलीत.
मस्त माहिती. थॅंक्स जागू.
मस्त माहिती. थॅंक्स जागू.
साधने खरच अगदी, माझ्या अतिशय
साधने खरच अगदी, माझ्या अतिशय आवडीची फुल !
वा.. मस्त माहिती मला पण हवा
वा.. मस्त माहिती

मला पण हवा एक गजरा
सगळ्यांचे धन्स धन्स
सगळ्यांचे धन्स धन्स धन्स.
वर्षे ये मग माझ्याकडे.
अश्विनी नाही ग हे मला भेट आले होते गजरे.
माहीती आणि तो गज-याचा फोटो
माहीती आणि तो गज-याचा फोटो अप्रतिम.......
छान फोटो आणि माहिती.
छान फोटो आणि माहिती.
मस्त फोटो आणि माहिती धन्स
मस्त फोटो आणि माहिती

धन्स जागू.
पानं, फुलं बघुन क्षणभर मला उंडीचे झाड/फुल आठवली.
जागु मस्तच फोटो बघुनच त्याचा
जागु मस्तच
फोटो बघुनच त्याचा सुगंध जाणावला.
जागु, छान माहिती आणि
जागु, छान माहिती आणि फोटो.
गोव्याला सुरंगीचे गजरे पाहिलेत तसे बाकी कुठेच दिसले नाहीत.
वाह ! मस्तच माहिती नि
वाह ! मस्तच माहिती नि फोटू..
झाडाचा पत्ता नाही सांगितलास तो..
जागू, गजर्यांचा फोटो
जागू, गजर्यांचा फोटो मस्तच!!! माहीतीही छान सुरस! सुरंगीचा वास अहाहाहा!!! त्रिवार धन्स गं!!
मला पण हवा एक
मला पण हवा एक गजरा...............
सूंदर माहिती व फोटू.
यो रॉक्स जायच असेल तेंव्हा
यो रॉक्स जायच असेल तेंव्हा सांग पत्ता देईन.
मानस, मंदार, योगेश, सचिन, आशुतोष, ड्रिमगर्ल, उजु धन्स.
फारफारच सुरेख. गजरे तर लै
फारफारच सुरेख. गजरे तर लै झ्याक, जागू.
धन्स मामी. योगेश ह्या झाडाला
धन्स मामी.
योगेश ह्या झाडाला पण छोती फळे येतात आणि त्या.न्चे बी पडून खाली रोपे उगवतात.
मी आणले एक रोप आणि पिशवीत लावुन ठेवले आहे.
गजरे न्हुंय गो आयटे, वळेसार;
गजरे न्हुंय गो आयटे, वळेसार; सुरंगीचो वळेसार.
Pages