करली/काटी जर छोटी असतील तर त्यांची डोके, शेपुट काढुन, पोटातील घाण काढून तिन पाण्यांतुन धुवुन घ्यावीत. जर काटी मोठी असेल तर एक पुष्कळ होते. हया लांब काटीचे तुकडे तिरके करायचे म्हणजे काटे व्यवस्थित काढता येतात. कारण ह्याचे काटे तिरके पसरलेले असतात.
७-८लसुण पाकळ्या
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे.
मिठ
तेल.
तुकड्यांना पहिला हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या. मग गरम गरम तव्यावर तेल सोडून तुकड्या तव्यात टाका. गॅस मिडीयम ठेवा. ५ मिनीटांची पलटा ५ मिनीटांत गॅस बंद करा आणि तयार व्हा काटे काढून चविष्ट मांस खायला. हाय काय नी नाय काय ? १० मिनीटांचा खेळ.
काटी/करली नावावरुनच ह्याचा बोध होतो की ही काटेरी मच्छी आहे. छोटी करली दिसायला सुंदर असते. शेपुट व पर सोनेरी असतात. भरपुर काटे असतात ह्यात. त्यामुळे लहान मुलांच्या हातात देउच नका. त्यांना मांस काढून द्या. काटे भरपुर असल्याने अगदी हळू चविचविने खाण्याचा आनंद मिळतो. ही करली खुपच चविष्ट असते म्हणूनतर काटे काढण्याचा त्रास सहन करुनही आवडीने लोक खातात. करलीचे कालवणही छान लागते. इतर कालवणांप्रमाणेच हिचे कालवण करतात.
जागु, फोटो
जागु, फोटो कुठाय..............
जागू, फोटो टाक ना प्लीज.
जागू, फोटो टाक ना प्लीज. म्हणजे मला निदान दर्शन तरी घडेल.
नंतर इनो घेइनच. 
ही आहे काटी/करली डोके आणि
ही आहे काटी/करली

डोके आणि शपुट काढुन असा मसाला चोळा.

आता स्वाद घ्या.

ही आहे मोठी करली/काटी

आता कस......एकदम झ्याक वाटल.
आता कस......एकदम झ्याक वाटल. मगाशी मजा जरा कमी येत होती.
जागु तुझ्या रेसिपीनेच आमच्याकडेपण मासे केले जातात. वाटण वैगरे आम्हीपण नाहि लावत. आता करली खाल्ली पाहिजे.
मालवण, गोव्यात तर हि
मालवण, गोव्यात तर हि अतिप्रिय. पण हि कापणे कौशल्याचे काम आहे.
आमच्या कडे कोळीण च देते
आमच्या कडे कोळीण च देते कापुन, अतिशय चविष्ट मासा, पण त्याचे काटे हि भरपुर असतात!
हे छान आहेत. मागच्या एका
हे छान आहेत. मागच्या एका कृतीत मासे कळतच नव्हते. ह्या इमेजेस मुख्य कृतीत टाक की.
हा माझा सगळ्यात आवडता मासा.
हा माझा सगळ्यात आवडता मासा. अप्रतिम चवीचा मासा. अर्थात याचे काटे काढुन याला कसे खायचे ते माहित असलेल्या माणसानेच याच्या वाटेला जावे.
भ्रमर कुठे गेला? कर्ली कापु व खाऊ तज्ज्ञ. कर्ली न कापता अख्खी आणणारा तो एकटाच
जागुतै, खर्पुस सुगंध इथ
जागुतै, खर्पुस सुगंध इथ पर्यंत दरवळतोय>>
पण हि कापणे कौशल्याचे काम आहे.>> हो, दिनेशदा हा मासा कापताना "तिरकस" कापे देउन कापावा लागतो. चविष्ट मासा आहेच पण घरी बनवल्यास मी फक्त मासाच खात बसतो
हा खाताना जेवण राहते बाजुला आणि याचे काटेच काढत बसण्यात वेळ जातो." प्रचंड कामाचे ओझे" असल्या सारखं होतं. 
माझ्या आवडीचा मासा नं २. मासा
माझ्या आवडीचा मासा नं २.
मासा नं१ - पातुरडी.
गेल्याच आठवड्यात मनसोक्त माहेरी रहाणं आणि कर्ली,पातुरडी खाणं झालंय म्हणून हे फोटो बघून वाईट वाटत नाहीये.
मालवणजवळ तारकर्ली नावाचं गाव आहे तिथे कर्ली म्हणुन नदी आहे. तिच्या खाडीत कर्ली मासा अगदी चविष्ट मिळतो असे म्हणतात.
मला मात्र रत्नागिरीतलाच कर्ली पसंत आहे.
जागू या कर्लीच्या कालवणात , याला आमच्या गावात कर्लीचं सांबारं (सांबार नव्हे बरं
) म्हणतात त्यात कच्ची कैरी लांबट तुकडे करून टाक खूप्पच मस्त लागते. कैरी टाकल्यावर अर्थात आमसूल किंवा चिंच टाकू नये.
मला किंवा पट्टीचे मासे खाणार्या कुणालाही पापलेट, सुरमई,मोडावसा असे कमी काट्याचे मासे आवडत नाहीत.
मासे खावे ते असे काट्यांचेच.
ता.क. तुमच्याकडे खाडीतल्या कांटा मिळतात का?
is this sardine?
is this sardine?
सुयोग, सार्डिन म्हणजे तारळी.
सुयोग, सार्डिन म्हणजे तारळी. हि ती न्ह्ववे.
>>हा खाताना जेवण राहते बाजुला आणि याचे काटेच काढत बसण्यात वेळ जातो." प्रचंड कामाचे ओझे" असल्या सारखं होत>><<
हाह्हा. बरोबर. भात एकदम गारेगार, कालवण थंड आणि डोकं एकदम फक्त ह्या माशाचे काटे काढण्यात खाली... थकायला होते पण तो एक माशाचा घास इतका सुंदर लागतो..
आमच्याकडे असे मासे खायला दिले मुलांना की एक तास मोकळीक होते(आईची) कारण कारटं एकदम दंगलेले असते मासा खाण्यात व असा मासा खाणारे कारटे हुशार असे समजतात.
खरंतर याचे तुकडे खायची एक
खरंतर याचे तुकडे खायची एक ट्रिक आहे . काटे कुठल्या बाजूने आहेत हे कळलं तर पापलेट किंवा बांगड्याच्या तुकड्यांइतक्या सहजपणे हे खाता येतात. इतके चविष्ट असतात की माशाचे कटलेट करायला पण आम्ही याच्याझ वाफवलेल्या तुकड्या वापरत असू.
मी लहान कर्ली कधी पाहिली नव्हती. याची गाबोळी पण एकदम चविष्ट अस्ते
धन्स जागू
धन्स जागू
देवा, हा मासा खाताना मी इतकी
देवा, हा मासा खाताना मी इतकी दमलेय!!
पण सही होता!
खरंतर याचे तुकडे खायची एक
खरंतर याचे तुकडे खायची एक ट्रिक आहे . काटे कुठल्या बाजूने आहेत हे कळलं तर पापलेट किंवा बांगड्याच्या तुकड्यांइतक्या सहजपणे हे खाता येतात.
अग्दी बरोब्बर. मी अजुन कधी दमले नाहीय हा मासा खाताना. अगदी व्यवस्थित भराभर खाऊन होतो. फक्त सोबतच्या इतरांना मात्र काटे काढुन द्यावे लागतात त्यात माझा वेळ जातो.
जागु, मीही लहान कर्ली पाहिली नव्हती. तुझ्यामुळे पाहिली.
माझे एक नातलग कोकणातले आहेत. बहुतेक आरवली गावातले. त्यांची कुलदैवत की गावची देवी कोणातरी एका देवीचे वाहन कर्ली मासा आहे. त्यामुळे त्यांच्या घरात कर्ली खाल्ली जात नाही. एकदा ते आमच्या घरी जेवायला आलेले आणि जेवणात नेमकी कर्ली होती. त्यांनी ताटाला नमस्कार केला आणि ते उठले. काहीच जेवले नाहीत.
डोकं एकदम फक्त ह्या माशाचे
डोकं एकदम फक्त ह्या माशाचे काटे काढण्यात खाली... थकायला होते>>> हे बघा मासा जातो जिवानिशी आणि खाणारी म्हणते काटे काढु कशी
जागु देवाशपथ सांगतो तु नोकरी बिकरी करत असशील तर सरळ नोकरी सोडुन फक्त मासा स्पेशल रेस्टॉरंट काढ तुफ्फान चालेल.
वा हे छान दिसतय. खाल्लं नाही
वा हे छान दिसतय. खाल्लं नाही अजून कधी.
मागच्या रेसिपीतले ते मासेच वाटत नव्हते.. कसला तरी लगदा दिसत होता.. !
आलोच!! लहान मासे आहेत ती
आलोच!!
लहान मासे आहेत ती कर्ली नाही. त्याला आम्ही "पातशाळी" म्हणतो. मोठी मात्र कर्लीच.
कर्ली कापायची पद्धत वेगळीच आहे. त्यानुसार कापली तर काटे सहजपणे काढता येतात. माझी आई तशी कापते. मधला काटा (कणा) अख्खा ठेवुन बाजुला तिरकस काप द्यायचे. त्यामुळे लहान काटे सहजपणे निघतात. आमच्याकडे जवळचे नातेवाईक (विशेषत: गावाकडले) आले की कर्ली हमखास. कारण एकतर चविष्ट मासा, आणि काटे सोडवत जेवताना भरपूर गप्पा रंगतात.
आहा जागु मस्तच , हा माझापण
आहा जागु मस्तच , हा माझापण आवडीचा मासा आहे . खुप छान चव लागते
थंड मोठी काटी आमच्याकडे पण
थंड मोठी काटी आमच्याकडे पण कापुनच मिळते.
सिंडरेला टाकते इमेजमध्ये.
साधना ही पाकृ टाकताना मला पण भ्रमरची आई मासा कापताना डोळ्यासमोर आली.
चातक, नुतन धन्स.
साती मी पण कैर्यांच्या सिझनमध्ये कालवणात कैर्याच घालते. आणि मला तु कांटांचा विषय काढलास ते फार आवडल. कारण त्या जास्त कोणाला माहीत नाहीत. आणि सहसा विकायला पण येत नाहीत. कांटा मिळतात आमच्याकडे आणि खुपच चविष्ट लागतात त्या. माझे नातेवाईक आणुन देतात मला त्या कांटा त्या सिझनमध्ये आता दोन तिन महिन्यांत येतील.
सुयोग तारली साधारण बोईट सारखी असतात पण चकचकीत.
ध्वनी अगदी बरोबर. घोळीचा काटा खाणार्याला पण चांगला मासेखाऊ म्हणतात.
मेधा एकदा गाबोळीची वेगळी रेसिपी टाकेन.
बस्के त्यातच तर मजा असते.
श्री
मी नोकरी करते रे बाबा. जर कॉर्पोरेशन वगैरे होऊन नोकरी गेली तर नक्की तुझी आयडीया आमलात आणेन. पण मला मदतीला तुम्हाला याव लागेल.
पराग तो कोलमाचा लगदाच असतो.
भ्रमरा त्या लहान कर्ल्याच आहेत.
कर्ली खात नाही तो माणुस मासे
कर्ली खात नाही तो माणुस मासे खाणार्यात गणला जात नाही..
ह्या आठवडयाच्या लोकप्रभामध्ये एक ले़ख आला आहे.
http://www.loksatta.com/lokprabha/20110318/khali-pet.htm
स्लर्प!!!
निकिता लिंक दे ना.. असले
निकिता लिंक दे ना.. असले काही वाचायलाही चवदार वाटते. आपल्या जातीचे लोक भेटले की कसे बरे वाटते... आपण सगळे भाऊ भाऊ, मिळूनी जागुहातचे मासे खाऊ...
निकिता खरच लिंक दे. वर्षू
निकिता खरच लिंक दे.
वर्षू आवाज आला.
अग साधना कधी नुसते खाउ खाउ म्हणतोय किती दिवस. कधी करायचा गटग ?
साधुतै + जागुतै = खाउतै अग
साधुतै + जागुतै = खाउतै
अग साधना कधी नुसते खाउ खाउ म्हणतोय किती दिवस. कधी करायचा गटग ?>>> मी पण
अरेरे
कर्ली, कांटा, पातशाळी.. अरे
कर्ली, कांटा, पातशाळी.. अरे काय चाल्लय काय?

सांबारं..
चातका रडतोस काय ? गटग झाला
चातका रडतोस काय ? गटग झाला नाही व्हायचा आहे.
शैलजा
गटग ठरवाच लोक्स...
गटग ठरवाच लोक्स...
हो ठरवाच. पुढच्या
हो ठरवाच. पुढच्या आठवड्यापासुन माझा उत्साह दुप्पट होईल हे सगळे करण्याचा...
Pages