Submitted by विदेश on 12 March, 2011 - 04:24
हत्तीदादा हत्तीदादा
कसला आहार घेतो रे ?
अगडबंब शरीर बघून
शत्रू गार होतो रे !
ससेभाऊ ससेभाऊ
कुठला साबण वापरतो ?
शुभ्र रेशमी अंगाला
डाग एकही ना पडतो !
अस्वलकाका अस्वलकाका
कोणते तेल लावतो रे
केस नेहमी दाट काळे
गुपित काय सांग बरे ?
हरणा हरणा - थोडं थांब
कसले बूट घालतो सांग ?
उड्या मारत चपळाईने
लांब लांब टाकतो ढांग !
माकड माकड - हूप हूप
कुठली फळे खातो खूप ?
फांदीवरच्या कसरतीने
आम्हाला तू करतो चूप !
सिंहराज सिंहराज -
कोणत्या चघळता गोळ्या ?
त त प प करतो आम्ही
ऐकून तुमच्या डरकाळ्या !
गुलमोहर:
शेअर करा
छान कविता माझ्या मुलाला आवडली
छान कविता माझ्या मुलाला आवडली
माझ्या लेकीला पण आवडली! खरच
माझ्या लेकीला पण आवडली! खरच मस्त आहे गाणं.
छान बालकविता.
छान बालकविता.
छानच
छानच
मस्त
मस्त
मस्तच !!!
झक्कास.............
झक्कास............. फोडतय.............
मस्त कविता .. आवड्ली
मस्त कविता .. आवड्ली
व्वाह ! मस्तच आहे !
व्वाह ! मस्तच आहे !
छान कविता.
छान कविता.
मस्त! खूपच छान आहे.
मस्त! खूपच छान आहे.
छान...
छान...
जबरीच, मस्त आहे ही पण
जबरीच, मस्त आहे ही पण
मस्तच
मस्तच