गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिनेशदांना भेटलो ते राणीच्या बागेत. हि माझ्या आयुष्यातील पहिली राणीच्या बागेला भेट होती :-). त्यावेळी त्यांनी काहि दुर्मिळ झाडांची ओळख करून देताना म्हंटले, कि माझा वारसा हा तुझ्याकडे सोपवत आहे, फेब्रुवारी-एप्रिल दरम्यान त्यांना बहर येतो तो अवश्य पहा. त्यांच्यामुळेच बरीचशी अनोळखी झाडे आता आपलीशी वाटायला लागली, म्हणुनच कि काय माझी सहा महिन्यात ४ वेळा राणीच्या बागेत माझी वारी झाली. पहिल्यांदा भेटलेली हि सगळी झाडे प्रत्येक भेटीत नवीन नवीन दिसू लागली. शनिवारी महानगरपालिकेने भरवलेल्या फळ, फुले प्रदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राणीबागेत गेलो. प्रदर्शन एक बहाणा होता खरं सौंदर्य तर आत बहरलेल्या झाडांचे बघायचे होते. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे गर्दी जास्त होती, पण ती सगळी बागेत असलेल्या प्राण्यांना पाहण्यासाठी. बागेत फुललेला निसर्ग एक-दोनजण सोडले तर कुणाच्याहि गावी नव्हता.
अर्थात हे पाहून बरंही वाटले
नाहीतर बहरलेली झाडे, फुले ओरबाडायला यांनी कमी केले नसते. खरंतर हा सारा परिसर या दुर्मिळ वृक्षांसाठी "संरक्षित क्षेत्र" म्हणुन घोषित व्हावा असे वाटते. बागेत वाढलेली झाडे दुसरीकडे नेता येणार नाही, पण प्राणीसंग्रहालय हलवले तर्??? कदाचित त्यामुळे बागेत येणारी गर्दी कमी होऊन या झाडांना अधिक संरक्षण मिळेल. अर्थात या जर तरच्या गोष्टी.
ब्राऊनिया, उर्वशी, नागचंपा, समुद्रफुल, सीता अशोक, बॉटलब्रश, पावडरपफ आणि मायबोलीकर विजय पोकळ शोधत असलेली सोनसावर यांनी संपूर्ण राणी बाग बहरून आली होती. प्रत्येक वेळी नविन भासणारी हि बाग आता बहरल्याने खुपच सुंदर दिसत होती. हा सारा बहार पाहता पाहता नकळत खय्यामच्या संगीतातले शब्द ओठांवर आले..........
"बहारों मेरा जीवनभी संवारो........."
=================================================
=================================================
प्रचि १
ब्राउनिया फुल
प्रचि २
ब्राउनिया फुल
प्रचि ३
ब्राउनिया कळी
प्रचि ४
गायत्री
प्रचि ५
शिवण (गंभारी)
प्रचि ६
समुद्रफुल किंवा समुद्रशोक
प्रचि ७
उंडीची फळे
प्रचि ८
प्रचि ९
कैलाशपती
प्रचि १०
उर्वशीचा फुलोरा
प्रचि ११
सीता अशोकचा फुलोरा
प्रचि १२
फुलांनी बहरलेला सीता अशोक
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
ट्रंपेट फ्लॉवर
प्रचि १६
ट्रंपेट फ्लॉवर
प्रचि १७
नागचंपा
प्रचि १८
नागचंपा
प्रचि १९
नागचंपा
प्रचि २०
पीतमोहोर (पेल्टोफेरम )
प्रचि २१
प्रचि २२
सोनसावर
प्रचि २३
सोनसावर
प्रचि २४
गायत्री
प्रचि २५
चाफा
प्रचि २६
उंदीरमारी
प्रचि २७
प्रचि २८
तामणीची पालवी
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
शिवण (गंभारी)
प्रचि ३३
जंगली बदाम
प्रचि ३४
पुष्करणीत पडलेली बॉटलब्रशची फुले
प्रचि ३५
??? (हि प्रदर्शनात ठेवली होती)
दिनेशदा, काहि फुलांची/झाडांची
दिनेशदा, काहि फुलांची/झाडांची नावे विसरलोय.
आणि ज्या ठिकाणी ??? टाकले आहे त्यांची नावे नक्की माहित नाही.
वाह ! योगी.. फोटो बघून जावेसे
वाह ! योगी.. फोटो बघून जावेसे वाटतेय...
व्वा!!! मस्त!!
व्वा!!! मस्त!!
व्वा.. वारसा छानच चालवतोयेस
व्वा.. वारसा छानच चालवतोयेस रे!!
अरे वा, माझ्यासाठी तरी हे
अरे वा, माझ्यासाठी तरी हे (जवळजवळ) प्रत्यक्षात उतरलेले स्वप्न आहे.
४ आणि २४ गायत्री,
५ आणि ३२ शिवण (गंभारी)
७ उंडिची फळे
३३ जंगली बदाम बरोबर याचा आणखी क्लोजप मिळाला तर त्यातली लाल हिरव्या रंगाची नजाकत बघता येईल
३१ ऐन वाटतोय (जागू नक्की सांगेल )
१५/१६ बहुतेक ट्रंपेट फ्लॉवर
२८ तामणीची पालवी
२० पीतमोहोर (पेल्टोफेरम )
२६. उंदिरमारी बरोबर
३५ बाभूळ नाही, प्रदर्शनात तसे लिहिले होते का ?
अजून तूला तिथे, कनकचंपा, वेगवेगळे कॅशिया, पाचुंदा (वरुण), कळम, गोरखचिंच यांचे बहर टिपायचेत.
दा, नावे अपडेट केली बाभूळ
दा, नावे अपडेट केली
बाभूळ नाही, प्रदर्शनात तसे लिहिले होते का ?>>>>नाही, तिथे नाव नव्हते लिहिले. मी अंदाजाने म्हटले
अजून तूला तिथे, कनकचंपा, वेगवेगळे कॅशिया, पाचुंदा (वरुण), कळम, गोरखचिंच यांचे बहर टिपायचेत.>>>>हो, यांचा बहर अजुन तरी दिसला नाही. अजुन करमळ पण टिपायचा आहे.
हे बघा कलाबाशच्या झाडाला कसेबसे जगविण्याचा प्रयत्न चालू आहे.

अ प्र ति म!!!!मस्तच रे मफो
अ प्र ति म!!!!मस्तच रे मफो
काही झाडांची नुसती नावं ऐकली होती, दिनेशदा आनि तुझ्यामुळे ती झाडं कशी दिसतात हे बघायला मिळाअलं. धन्स 
फारच सुंदर!!
फारच सुंदर!!
सर्व फोटो अप्रतिम! डोळे
सर्व फोटो अप्रतिम! डोळे निवले!
परत साधारण एप्रिलमधे एक फेरी
परत साधारण एप्रिलमधे एक फेरी मार. करमळ पावसाळ्यातच दिसते.
माझ्याकडचे फोटो मग निसर्गाच्या गप्पावर टाकतो.
मस्त रे योगेश ... जबरी
मस्त रे योगेश ... जबरी
सहि आहे रे....मस्तच!!!
सहि आहे रे....मस्तच!!! पुढच्या वेळी पण मला नक्कि बोलव... निसर्गाच्या सानिध्यात खुप बर वाटत रे...
खूपच छन. सोन्सावरीचा पूर्ण
खूपच छन.
सोन्सावरीचा पूर्ण बहराचा फोटो असेल तर टाक ना.
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद!!! फोटो बघून जावेसे
धन्यवाद!!!
फोटो बघून जावेसे वाटतेय...
परत साधारण एप्रिलमधे एक फेरी मार. करमळ पावसाळ्यातच दिसते.>>>>>यो, एप्रिलचा एखादा विकांत राखीव ठेव रे.
सोन्सावरीचा पूर्ण बहराचा फोटो असेल तर टाक ना.>>>>विजयजी पूर्ण फोटो नाही काढता आला भिंतीच्या पलिकडे असल्याने.

रच्याकने, सागर उपवनमध्येसुद्धा सोनसावर बहरली आहे.
हो दिनेशदा ऐनाची कोवळी पाने
हो दिनेशदा ऐनाची कोवळी पाने अशीच असतात.
योगेश मलाही आता राणीच्या बागेत जावस वाटतय.
आवडले फोटो.
आवडले फोटो.
वाह.... कितीतरी दुर्मिळ
वाह.... कितीतरी दुर्मिळ वृक्ष!!! मागे ठाण्यात कुठे तरी 'रुद्राक्ष'चा वृक्ष आढळला असल्याचं 'लोकप्रभे'त वाचल्याचं आठवतं.
कैलाशपतीचे फुल खुप आवडले!
छान...
छान...
जिप्सी, खूप खूप धन्यवाद.
जिप्सी, खूप खूप धन्यवाद. सीताअशोक बघून तर पूर्वीच्या आठवणींनी अंगावर काटा आला, ही फुल काढण्यासाठी मी जीवाच रान करत असे. नदीकाठी उंचावर झाड होते. तिथे दगडावर चढून, काट्याकुट्यात जाऊन ही फुले काढायचे. झाडावर ओंबील(लाल मोठ्या मुंग्या) असायच्या त्या चावायाच्या, तरी ही फुले मी नेहमीच काढत असे.
आणखी एकदा धन्यवाद. मला जो चाफा पाहिजे होता तो हाच नाग चाफा. हे फुललेले झाड पाहून मला बरोबर आठवले, तुला खोटे वाटेल पण मला खरच त्याचा सुवास पण आला. आणि खात्रीच झाली हाच तो चाफा.
धन्स लोक्स योगेश मलाही आता
धन्स लोक्स
योगेश मलाही आता राणीच्या बागेत जावस वाटतय.>>>>>जागू, चला तर मग एप्रिल महिन्यात परत एक निसर्ग गटग ठरवूया.
मला जो चाफा पाहिजे होता तो हाच नाग चाफा. हे फुललेले झाड पाहून मला बरोबर आठवले, >>>>>शोभा, राणीच्या बागेत याची खुप सारी झाडे आहेत आणि सध्या सगळीच मस्तपैकी बहरलीत.
मी ही शनिवारी तिकडेच
मी ही शनिवारी तिकडेच होतो...
खुपच गर्दी होती प्रदर्शन असल्यामुळे .....मी ही बागेत फिरलो....पण तुम्हाला जे दिसले ते मला नाही दिसले.....कदाचित माझी नजर कमजोर असेल.
पण फोटो खुपच अ...प्र.....ति......म........