मूडस ऑफ काळाघोडा फेस्टीवल !

Submitted by Yo.Rocks on 13 February, 2011 - 22:46

काळाघोडा फेस्टीवल संपायला शेवटचे दोन दिवसच उरले होते.. शुक्रवारी इंद्रा व रोहीत यांच्याबरोबर जाणे जमले नाही तेव्हा शनिवारीच ऑफीसमधून सुटल्यावर दुपारी काळाघोडा चौक गाठले.. मायबोलीकरांचा जिटीजी इथे सकाळच्या वेळेस होणार होता जे मला शक्य नव्हते (नंतर कळले जिटीजी रद्द झाला).. पोहोचलो तेव्हा गर्दी होतीच पण धक्काबुक्की होईल इतकीही नव्हती.. सो संधी मिळेल तसे फोटो टिपत गेलो.. काही मोजकेच जे मला आवडले ते फोटो देत आहे.. खालील फोटोंपैंकी दोन पोर्ट्रेट आहेत.. त्या कलाकारांची नावे लक्षात नसल्याने तिथे मुद्दामहून वॉटरमार्क "काळा घोडा फेस्टीवल"चा दिला आहे.. बर्‍याच स्टॉल्सवर फोटो काढण्यास मनाई असते.. त्यामुळे जिथे परवानगी मिळाली तिथेच काढले.. फक्त तो लँपचा फोटो (प्रचि ९) अगदी न राहवल्यामुळे दुरून घेतलाच..

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

(ह्या चौघांमध्ये एक नकली आहे.. ओळखा पाहू कोण असेल तो ? Happy )

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

(राजस्थानी नृत्य करताना बघ्यांच्या गर्दीतून एक बाई त्यांच्यात सहभागी झाली तो क्षण.. मलापण त्यांना कंपनी द्यावीशी वाटली होती पण कॅम हातात होता.. मायबोलीकर सोबतीला असते बेफाम नाचलो असतो.. Proud )

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

(काळा घोडा म्हटला की विदेशी मंडळींची उपस्थिती असतेच.. त्यातलाच हा एक फोटो.. जो त्याच्या नकळत गुपचूप काढून घेतलाय Proud )

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

असेच फोटो रात्रीच्या वेळचे बघायचे असतील तर इथे रोहीतने छान माहितीसकट फोटो डकवले आहेत.. Happy

गुलमोहर: 

व्वा.... फेस्टिवलला न गेल्याचि उणीव भरुन निघाली.

धन्स यो रॉक्स. Happy

वाहवा, काय मस्त मूड्स पकडलेत. रंगिबेरंगी राजस्थानी छानच. ती धातूची लिझार्ड, कंदिलवाला हात, ते मोजडीचे इंस्टॉलेशन मस्तच. त्यातली ती अनवाणी पायावरची मुंडकी आहेत हे आज कळले, काल रोहितच्या फोटोत ते आडवे झाले होते त्यामुळे मला आईस्क्रीम कोन वाटत होते. आणि संगतीच लागत नव्हती. Happy

ती 'द पर्ल इअरिंग' या फेमस फोटोची हाताने पेंट केलेली कॉपी आहे का? खुपच मस्त आहे. या पेंटिंगवर आधारीत एक मूव्हीसुध्दा बधितला होता. 'Girl with a Pearl Earring' नावाचा.

सगळीकडचे काळा घोडा जत्रेचे फोटो बघता प्रत्यक्ष्याहून प्रतिमा उत्कट चा प्रत्यय येतोय.
मामी, व्हर्मीरच्या पर्ल इअरींग चं प्रिंट आहे ते. हाती केलेली कॉपी नव्हे.

अस्ल काय काय बनवणारी माणसे "कलन्दरच" असली पाहिजेत! नॉर्मल सामान्य माणसान्चे ते काम नाही

>>>(ह्या चौघांमध्ये एक नकली आहे.. ओळखा पाहू कोण असेल तो ? ) <<< अर्थात एकदम उजवीकडचा झान्जवाला!

तू नाचला अस्तात तर त्या राजस्थान्यान्ना गाशा गुण्डाळावा लागला अस्ता, नै? Proud

सगळेच फोटोज खुप छान!!
तुम्हा सगळयांमुळे आमच्यासारख्या मुंबईत नसणा-यांना सुध्दा अश्या अप्रतिम फेस्ट चे दर्शन घडले. खुप खुप धन्यवाद!

धन्यवाद Happy

त्या राजस्थान्यान्ना गाशा गुण्डाळावा लागला अस्ता, नै? >> अर्थात Lol
बाकी त्या फोटोत एकाच्या पायात चक्क बुट आहेत !!