कर्नाळ्यात भेटलेले दोस्त ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 February, 2011 - 02:24

कर्नाळ्याच्या भटकंतीत टिपलेली काही फुले....

एकाच ठिकाणी सुकलेली आणि नुकतीच फुललेली अशी ही अज्ञात फुले...

झाडाच्या अगदी वरच्या टोकावर असलेले हे तुरे. कॅमेरा अवघा ७ मेगापिक्सेलचा असल्याने फार झुम अथवा फोकस नाही करता आले Sad

तिथेच भेटलेला हा नेहमीचा एक मित्र....

प्रोफेशनल पोजर (फोटोसाठी पोज द्यायला यांच्याकडुन शिकावे Wink )
साहेब अगदी टेक-ऑफच्या पवित्र्यातच होते Happy

या साहेबांची मात्र ब्रह्मानंदी टाळी लागलेली होती. पोज द्यायला अजिबात तयार नव्हते. मग तसेच टिपले त्यांना.

विशाल

गुलमोहर: 

छान आहेत फोटो.
पहिली निळी करडी ती चित्रकाची आणि लाल पिवळे तूरे वाकेरीचे. वाकेरीला उलटे काटे असतात आणि भयंकर रुततात. वाकेरीचे भाते (मूळ) औषधी असते. चित्रकाचा पण खरजेवर वापर होतो.

छान

विशाल - सर्व फोटो अप्रतिम - तो पोपट रानटी असून एवढा स्तब्ध बरा राहिला फोटो काढताना ! हे पक्षी, प्राणी फोटो काढायला फार पेशन्स लागतो आणि लक् ही - त्यामुळे सलाम.

दिनेशदा - ती दोन नं ची वाळलेली फुले कोणती ?

शशांक मग सांगतो. कर्नाळ्यातील माकडांना आणि आता उरलेल्या पक्ष्यांना माणसाची इतकी सवय झालीय, कि ते अजिबात बिचकत नाहीत.

दिनेशदा - पहिला फोटो (निळी फुले) दशमुळी (Eranthemum roseum) ही आहेत. संदर्भ-फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री इंगळहळीकर. चित्रकाचा फोटो आहे माझ्याकडे - तो टाकतो स्वतंत्र.

फोटो छान...

>>दिनेशदा, प्रचि २ बद्दल माहिती वाचायला आवडेल.
कारण माझं गाव ठाणे जिल्ह्यातलं. मुरबाड - शहापूर तालुक्यांच्या सीमेवरचं. अचानक या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून (गेल्या वर्षी अजिबात नव्हती किंवा जास्त प्रमाणात नव्हती) ही फुलं दिसायला लागली... सगळीकडेच.. अगदी जिथे पहाल तिथे.

आणि मी, माझी बहिण आणि माझ्या आई बाबांच्या निरीक्षणानुसार ही वनस्पती झुडुप आणि वेल अशा दोन्ही प्रकारे वाढते. जर एकटीच असेल तर झुडुप आणि स्पर्धा करायला दुसरी झाडे असतील तर त्या झाडांना पूर्णपणे आच्छादून टाकते. त्याचा परिणाम म्हणून दुस-या झाडांची वाढ खुंटते.

त्यामुळे काही गावांना कडधान्ये जास्त प्रमाणात पिकली नाहीत(कारण कडधान्यांची रोपंच वाढू दिली नाहीत या वनस्पतीने.)
मी २ महिन्यांपूर्वी आंतरजालावर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. आम्हाला आगोदर वाटलं Congress Grass असेल(पांढरी फुले आणि Dominating Nature मुळे).. पण हे ते नाहिये. Please जमलं तर माहिती द्या.

विशाल मस्तच फोटो रे.....

सर्वात शेवटच्या फोटोखाली "विशाल" लिहिलेय...... Proud
याला "नामसाधर्म्य" म्हणावे काय विशालदा..... Proud Biggrin Light 1

माहीतीबद्दल धन्यवाद दिनेशदा आणि शशांकजी Happy
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
मिलिंदा, कुणीतरी आपल्या सगळ्यांच्या पुर्वजांबद्दल कृतज्ञता बाळगायलाच हवी ना Wink

झूझी ती रानमारी आहे. हि झूडूप वर्गीय वन्स्पती आहे. ही जिथे वाढ्ते तीथे दुसरी झाडे वाढू देत नाही.
ती विश सून्दरी आहे.

विशल्या, फोटो जबरी. Happy

>>मिलिंदा, कुणीतरी आपल्या सगळ्यांच्या पुर्वजांबद्दल कृतज्ञता बाळगायलाच हवी ना
रच्याकने, तुझे पुर्वज म्हण Proud Rofl

जागु, त्याला नुकतेच कुणीतरी सफ़रचंद दिले होते. रच्याकने माकड म्हणु नकोस Angry भुंग्याला राग येइल नाहीतर Wink

मन:पूर्वक आभार सर्वांचे !

जायंट स्पायडर नाही का भेटले?>>>>

भेटले रे, पण खुप उंचावर होते. माझा कॅमेरा अवघा ७.१ मेगापिक्सलचा असल्याने तेवढे नीट नाही टिपता आले. तरी त्यातल्या त्यात बरा 'गावलेला' एक इथे खाली टाकतोय....

त्याचं काहीतरी बिनसलं होतं बहुदा. कदाचीत सुस्तावला होता. अगदी अर्ध्या फुटावर गेलो तरी थोडासा बाजुला सरकायचा पण उडाला नाही. Wink

Pages