(भाग १३)
ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते-
.....परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते. त्या बेटावर त्यांचा खुप छळ केला गेला होता. विरुद्ध राष्टाकडच्या अधिकार्यांकडून, जवानाकडून!
त्यामध्ये अनेक महिला होत्या. त्यापैकी जेनिफर नावाची एक अमेरीकन गुप्तहेर होती. ती पूर्वी एक अट्टल गुन्हेगार होती. पण अमेरीकेने तीला काही वर्षे तुरुंगात ती सुधारल्यानंतर रशियाच्या हेरगीरी साठी पाठवले होते. पण, ती युद्धा दरम्यान पकड्ली गेली. तीला रशियाने इतर कैद्यांसमवेत बंदी बनवून या डेव्हील्स स्क्वेअरवरच्या बेटावर ठेवले होते असे ऐकीवात आहे.
कॅप्टनने सांगितले की पूर्वी एकदा जहाज साऊथ जॉर्जिया कडे येत असतांना प्रवासात काही अतर्क्य घटना घडल्या होत्या. तेव्हा योगायोगाने जहाजावर एका संशोधनासाठी रॉबर्ट गॉडमन आलेले होते.
जहाज ऐन समुद्राच्या मध्यावर असतांना जहाजावरच्या लोकांसह कॅप्टनने आणि रॉबर्ट गॉडमन यांनी एक घटना पाहिली.
कॅप्टन मला म्हणाले- "त्या घटनेनंतर रॉबर्ट गॉडमन यांनी मला ही युद्ध कैद्यांची थोडक्यात माहिती त्यावेळेस थोडक्यात दिली होती. एवढेच! तुम्हाला लागल्यास त्यांना भेटू शकता."
कॅप्टन पुढे सांगत होता-
"त्या घटनेबद्दल सांगायचे झाल्यास साऊथ जॉर्जिया च्या आम्ही जेव्हा जवळ आलो होतो तेव्हा रात्री दूरवर डेव्हील्स स्क्वेअरच्या हद्दीतून एक प्रवासी विमान उडत होते. डेकवर सहज आम्ही ते विमान बघत बसलो होतो.
त्या विमानाभोवती अचानक काळ्या पांढर्या ढगांनी गराडा घातला. ते विमान हवेतच हेलकावे खावू लागले. मग त्या विमानाची बॉडी गरम ज्वालामुखीने विरघळावी तशी विरघळू लागली. ते विमान आतल्या प्रवाशांसह वितळले आणि काही वेळाने तेथे काहीही नव्हते."
रॉबर्ट गॉडमन चा ठावठीकाणा मला देवून कॅप्टन आपल्या कामावर निघून गेला. त्या बेटावरून वाचलेली केट तिघा मित्रांच्या मृत्यू मुळे आणि तीला आलेल्या विचित्र अनुभवाने विमनस्क अवस्थेत होती आणि उपचार घेत होती. ती तीच्या मूळ देशात- कॅनडाला उपचारासाठी निघून गेली होती.
नंतर लंडनला आल्यावर मी रॉबर्ट ला शोधले. सर्वप्रथम रॉबर्ट ने मला ती माहीती सांगण्यास नकार दिला. पण मी आग्रह केला कारण जलजीवा पुन्हा जागृत झाले होते हे मी त्यांना पटवून सांगितले. या विषयी पूर्ण नाही पण थोडीफार कल्पना मी रोझीला दिली होती.
रॉबर्ट ने मला स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लेखक अनिस्टन अॅन्टेनबरो याबद्दल सांगितले आणि ते पुस्तक मला वाचायला दिले.
पहील्या महायुद्धाच्या काळात अनिस्टन ला एकदा मध्य प्रदेशातल्या शर्वरी जंगलात हिरव्या मातीच्या संशोधनासाठी भारतात आले होते.समुद्रातल्या अनेक निर्जन बेटांवर सुद्धा अशी हिरवी माती असते आणि भारतात फक्त मध्य प्रदेशातच ही माती होती असे संशोधना अंती स्पष्ट झालेलेल होते.
तेथे असतांना त्यांची भेट योगायोगाने एका व्यक्तीशी झाली...ते एक साधे शेतकरी होते.
जार्वार पर्वतावर चढण्यासाठी संध्याकाळी अनिस्टन निघाले असता त्या शेतकर्याने त्यांना रोखले.
सहजच माहीती विचारण्यासाठी तोडक्या हिंदी भाषेतून त्या शेतकर्याला विचारले असता एक माहीती समोर आली.
ती व्यक्ती (शेतकरी) पुढे अनिस्टनला सांगू लागली-
"एकदा त्या जंगलातून परतताना उशीर झाला. सहज म्हणून त्या जार्वार पर्वताकडे माझे लक्ष गेले. मला त्या पर्वतावर एक झाड दिसले. पण ते झाड साधे झाड नव्हते.
त्या झाडांच्या प्रत्येक पानाऐवजी तेथे रात्री प्रखर ज्वाळा निघत असतात.
रात्रीच्या अंधारात ते जळणारे झाड विचित्र दिसते होते.
मला प्रथम वाटले की कुणी या झाडाला आग लावून दिली असेल. पण आग लावली असती तर त्या झाडांच्या ज्वाळा वरच्या बाजूने गेल्या असत्या.
पण येथे प्रकार वेगळाच होता. झाडाच्या पानां ऐवजी ज्वाळा होत्या. "
दुसर्या दिवशी अनिस्टन त्या झाडाजवळ दिवसा गेले. सोबत त्यांनी त्या व्यक्तीला ही आणले होते...
त्या झाडाची पाने दिवसा हिरवीच पण आगीच्या ज्वाळा निघतांना जसा आकार होता तसा त्या पानांचा आकार होता. ती पाने
तोडून संशोधनासाठी त्यांनी घेतली. त्या पानांचा वाळवून भुगा करून घेतला.
त्यापैकी काही भुगा जवळ साचलेल्या पाण्यात उडाला असता त्या पाण्याचा तात्काळ बर्फ झाला.
पण, तो बर्फ हाताला गरम लागत होता. म्हणजे पाण्याची ही चौथी वेगळीच स्टेट (रूप) होती. एक अद्भुत शोध लागला होता......"
अॅनाच्या वडीलांच्या फाईलमध्ये त्या व्यक्तीच्या पुढे लिहिलेल्या नावावरून आणि वर्णनावरून अरविंद आचरेकरांना अचानक काहीतरी आठवले. ते व्यक्ती म्हणजे अमेयचेच पूर्वज होते हे नक्की झाले होते. म्हणूनच अमेयला जलजीवांकडून टार्गेट करण्यात आलेले होते, बदला म्हणून.
सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या होत्या. उलगडत होत्या.
त्या फाईलमध्ये पुढे लिहिले होते-
"पहिल्या महायुद्धातल्या छळ करण्यात आलेल्या कैद्यांना नंतर पाण्यात बुडवून मारणयात आले.
त्यांच्या छळ होत असतांनाच्या त्या आर्त किंकळ्या त्या पाण्यातच राहिल्या.....
त्या किंकाळ्यांची शक्ती जलजीवांच्या रुपात उफालून बदला घ्यायला निघाली.....
पाण्यातले सैतान जन्मले....
पहिला जलजीवा स्त्री होती, म्हणजे जेनिफर.
अनिस्टनच्या त्या प्रयोगाद्वारे त्यांनी त्या झाडाच्या पानांचा उपयोग करून पाण्याच्या चौथ्या रुपात म्हणजे "गोठलेल्या पाण्याच्या पण गरम असणार्या बर्फाच्या" रुपात त्या जलजीवांना गोठवून अनेक हेलीकॉप्टरद्वारे अंटार्टीका खंडावर त्यांना मोठ्या टाक्यांमध्ये आणून अतिशय खोल खोदून त्यांना गाडून बंद करून टाकले होते.
हे फक्त ठरावीक लोकांनाच माहिती होते.
पण त्याच झाडांना पोसणारी हिरवी माती त्या गरम बर्फावर टाकली की ते पुन्हा वितळून जलजीवा बनतात,असे आढळून आले होते. आफ्रीकेच्या जंगलात सुद्धा तशी हिरवी माती सापडते. पण तश्या प्रकारचे झाड आणि त्याच्या बीया मात्र सर्वप्रथम भारतात सापडल्या.
या जलजीवांबाबत माहीती अमेरिकेने सर्वसामान्य लोकांसमोर जास्त येवू दिली नाही.
दुसर्या महायुद्धात पुन्हा कुणीतरी त्या जलजीवांना जिवंत केले.
पुन्हा त्यांना जमीनी खाली गाडण्यात आले. पण त्यावेळेस जलजीवांना नवीन सैतानी खेळ सापडला होता.
जिवंत माणसांना जलजीवा बनवायचे. जिवंत माणसां भोवती वेढा घालून हे त्यांनाही जलजीवा बनवत असत.
ही जलजीवा बनलेली जीवंत माणसं मात्र त्या पानांमुळे रुपांतरीत होत नव्हती. त्यांना लाल माती टाकून पुन्हा मूळ मानव रूपात आणता येत होते....जोपर्यंत ते मूळ रुपात येत नाही तोपर्यंत ते जलजीवांच्याच सैतानी शक्तींच्या संमोहनाखाली असतात आणि ते आणखी जास्त खतरनाक बनतात..."
त्या नंतर त्या हिरव्या, लाल मातीची ठीकाणे आणि त्या बीया आणि झाडॅ याबद्दल माहिती त्या फाईल्स मध्ये होती.
त्यातल्या एका लिहिले होते की जार्वार पर्वताच्या पायथ्याशी खणले असता एका गुहेवजा जागेत खुप खोल एका अंधार्या जागेत त्या बीया, रोपटे आहेत. तसेच इतर अनेक देशांतली बीया, रोपटे, झाडाच्या पानांचा भुगा (चुरा) असलेली ठीकाणे तेथे सांगितली होती. गरज पडली तर घेण्यासाठी!!
त्यानंतर एकदा ऑर्थर हॉफमनचा चा जहाजावरच्या चाच्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पण ते सर्व चाचे हे मानव-जलजीवाच होते. पेपरमध्ये ही मृत्यूची छापलेली बातमी स्कॅन करून त्या फाईल मध्ये होती.
अॅनाच्या डॉळ्यात पाणी आले.....
त्या सर्वांना कळून चुकले की अमेय जंगलातून असाच जलजीवांमुळे गायब झाला असावा. आणि त्या दिवशी घरी आलेला हा अमेयच होता आणि अॅनाला भास झाला नव्हता. टी.व्ही. वर सिडी घेवून पळणार्या त्या माणसाचा पाणीमय चेहेरा अमेयसारखाच दिसत होता.
मग ही सगळी माहिती अॅनाने लेस्टर बेनेट्ला सांगितली.
बीया लपवलेल्या ठीकाणांचा शोध जगभरच्या शास्त्रज्ञांनी घेण्यास सुरुवात केली. आता तिसर्यांदा उद्भवलेल्या जलजीवांना कायमचे नष्ट करायचे काम पार पाडायचे होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेयला पुन्हा मानवरूपात आणायचे होते.
अमोलच्या विनंतीवरून जितीन मुंबईला आलेला होता.
त्यांनी लाल माती मागवली आणि ती घेवून आता अमोल, अरविंद, अमेयची आई, आसावरी, अॅना हे सर्वजण मध्य प्रदेशात जायला निघाले. पण त्यांच्या पुढे प्रश्न होता, की अमेयला कसे शोधायचे आणि ओळखायचे? किंवा त्याला पुन्हा परत त्या जंगलात कसे बोलवायचे?
लॅपटॉप मध्ये बर्याच फाईल अजून वाचायच्या बाकी होत्या. कदाचीत त्यात सापडू शकेल काहीतरी..!!
गुगलवर सर्च करून अॅनाने वॉटर डीमन्स बद्दल लोकांना डेव्हील्स स्क्वेअर मध्ये आलेले अनुभव वाचण्यास सुरूवात केली. कदाचीत त्यावरून काही दुवा मिळेल का?
किंवा जलजीवांच्या तावडीतून वाचलेली माणसे काही मदत करू शकतील का? केट काही मदत करू शकेल का? चौघेजण बेटावर असतांना केट मात्र वाचली होती. कशामुळे?
अॅनाने जेफची मदत घ्यायचे ठरवले. तीने जेफला विनंती केली की रॉबर्ट गॉडमन किंवा त्याचे सहकारी यांना भेटून काही माहिती मिळते का ते बघायला सांगितले.
तसेच कॅनडातून केट चा काही ठावठीकाणा मिळाला तर बरे होईल असे अॅनाला वाटले.
...सिडी न आणता अमेय जेनिफरजवळ पोहोचला. आता सर्व जलजीवा आकाशात ढगांच्या रुपात जमले होते. त्या ढगात अमेय ढगरुपात आला. त्याने सिडी आणली नव्हती हे तीला तो वाफरुपात परत आल्यावर कळले होते....
त्यांचे पुढचे टार्गेट होते - "स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लखक अनिस्टन अॅन्टेनबरो! हे पुस्तक वैज्ञानिक क्षेत्रात क्रांतीकारी ठरले होते. अमेयच्या पूर्वजाला जलजीवांनी मारले होतेच. त्यानंतर अनिस्टनला सुद्धा त्याच वेळेस त्यांना मारायचे होते. पण, तेव्हा त्यांना गरम बर्फात बंद करून अंटार्टीका खंडातल्या थंड बर्फा खाली खोदून गाडून टाकले गेले होते.
आता कित्येक वर्षांनंतर जागृत झालयावर हे जलजीवा खुपच खतरनाक झाले होते. अनिस्टन ज्या विमानातून प्रवास करणर होते त्यावर हल्ला करण्याचे सर्व जलजीवांनी ठरवले होते.
ते पूर्ण विमानच वितळवून संपवण्याचा मानस त्यांचा होता. वेडेवाकडे आकार करून ढग आकाशात हल्ल्याची योजना बनवत होते. अमेय सुद्धा त्यांच्या अधिपत्याखाली होता.
इतर मानवांना आणि अमेयला जलजीवांच्या अधिपत्या खालून कसे वाचवायचे हा एक मोठा यक्षप्रश्न होता!!!
ते सर्वजण आसंद येथे पोहोचले. अशोकरावांना तसेच तेथल्या पोलिसांना या सगळ्याची पूर्ण कल्पना देण्यात आली.
त्यांनी सहकार्य करायची तयारी दर्शवली.
जंगलात त्या बीया शोधण्यासाठी जायचे होते. त्याच बरोबर अमेयलाही शोधून काढायचे होते. अजूनपर्यंत जलजीवांनी आपले अस्तित्त्व गरजेपुरते जगासमोर आणले होते. त्यामुळे प्रसार मध्यमांना सांगून या बद्दलच्या बातम्या देण्यास बंदी केली गेली.
त्यामुळे तो सिडी घेवून जाणारा माणूस आणि ती बातमी येणे बंद झाले.
सगळेजण जंगलात जाण्यासाठी निघले. सोबत पोलीसही होते.
गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता.
सकाळचे अकरा वाजले होते.
नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव होता.
त्यावर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आणि मग ते शर्वरी जंगल होते.
जंगलाच्या सुरुवातीला काही स्थानिक लोकवस्ती होती. अन मग पुढे सुना रस्ता.
काही जण दोन जीप्स मध्ये आणि तिसरी जीप पोलीसांची.
जीपस च्या मागे अनेक नामातुआ पक्षी ओरडत चालले होते. त्यांचा आवाज अतिशय भेसूर होता. पुढे येणार्या एखाद्या संकटाची ही चाहूल होती की आणखी काही? जेफचा कॉल लवकरात लवकर आला पाहीजे....
जेफला गॉडमन भेटेल का?
जंगल आले. जितीन त्यांना त्या जार्वार पर्वताच्या पायथ्याशी तळ्याजवळ घेवून गेला.... (क्रमश:)
एवढे छोटे भाग नका टाकु. थोडे
एवढे छोटे भाग नका टाकु. थोडे मोठे टाका.
बरं.
बरं.
वाचतेय. निमिष हे सगळे
निमिष हे सगळे काल्पनिक आहे की काही सत्य घटनेचा आधार आहे? मी काल खरच गुगलून पाहिले तर वॉटर डिमॉन विषयी बरीच माहिती होती.
खुप उत्कंठावर्धक, वाचतेय
खुप उत्कंठावर्धक, वाचतेय लिहित रहा.
मनी उगीच हुरहुर लावुन
मनी उगीच हुरहुर लावुन जाते
तुमची ती जलजीवा कथा॥
लवकर लिवा की राव
राहवत नाही आता॥
हा भाग थोडा विस्कळीत वाटला...
हा भाग थोडा विस्कळीत वाटला... (हेमाप्राम.) आधीचे भाग वास्तववादी व अभ्यासपूर्ण वाटत होते त्यामानाने हा रिलेट नाही झाला.
पण असो तुम्ही छान लिहीताय लिहीत राहा.
काही ठिकाणी तर थेट 'निरंजन घाटे स्टाईल' इतकं उत्कंठावर्धक वाटलं...!
ही काल्पनीक सत्यकथा आहे.
ही काल्पनीक सत्यकथा आहे.

इंटरनेट वरचे वॉटर डिमन्स आणि
इंटरनेट वरचे वॉटर डिमन्स आणि माझ्या कथेतले डिमन्स यांच्यात फक्त नाव साधर्म्य आहे. बाकी काही नाही.
निमिष, वाचतोय रे, येउ
निमिष,
वाचतोय रे, येउ दे...मला पण आता गुगलायची इछ्छा होत्येय्...पण तुझी कथा पुर्ण होइपर्यंत थांबेन :)... लवकर लिहि रे बाबा, छान वेग आलाय आता...
अमित अरुण पेठे
काल्पनीक सत्यकथा
काल्पनीक सत्यकथा