=================================================
=================================================
रत्नागिरीच्या आजच्या भटकंतीत आपण भेट देणार आहोत थिबा पॅलेस (थिबा राजाचा राजवाडा), पावस आणि भाट्येच्या समुद्रकिनार्याला.
=================================================
थिबा पॅलेस (थिबा राजाचा राजवाडा)
प्रचि १
प्रचि २पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचे समाधी मंदिर
प्रचि ३आवळीच्या झाडातुन प्रकटलेला "आवळी गणेश" (पावस)
प्रचि ४भाट्ये खाडी
प्रचि ५भाट्ये खाडीवरचा पूल
प्रचि ६भाट्ये खाडीपुलावरून दिसणारा समुद्र
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०भाट्ये खाडीपुलावरून दिसणारा रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारा
प्रचि ११भाट्येचा समुद्रकिनारा
प्रचि १२
प्रचि १३भाट्ये समुद्रकिनारी बांधत असलेले पर्यटक निवास
प्रचि १४हॉटेल कोहिनूर समुद्र
प्रचि १५
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१)
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045
रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073
रत्ननगरी "रत्नागिरी" – (३) प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
http://www.maayboli.com/node/22107
रत्ननगरी "रत्नागिरी" – (४) डेरवणची शिवसृष्टी
http://www.maayboli.com/node/22137
रत्ननगरी "रत्नागिरी" – (५) रत्नदुर्ग किल्ला
http://www.maayboli.com/node/22164
पाहिला आणि पाचवा खास..
पाहिला आणि पाचवा खास..
मस्त..
थिबा वाड्याची आत्ता काहीतरी १०० वर्षे पूर्ण झाली..
मासेमारि साठि जाळे फेकणारा एक
मासेमारि साठि जाळे फेकणारा एक नम्बर ...........
जुन्या आठवणी जाग्या
जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
डिप्लोमाला असताना पॅलेसच्या कट्ट्यावर बसून जर्नल्स लिहायची, व्हायवाची तयारी, सेमिनार ची तयारी, लेक्चर्स बन्क केली तर तिथे टाईमपास...३ वर्षं धमाल आणि अभ्यास...
त्या वेळी पॅलेसचं प्रवेशद्वार वेगळं केलं नव्हतं.
पुढच्या वेळसाठी एक सुचवू का? पुन्हा जेव्हा रत्नागिरीला जाल, तेव्हा पॅलेसच्या थोडं पुढे गगनगिरी महराजांचा मठ आहे, त्या बाजूने खूप मस्त व्यू मिळतो तोही घ्या कॅमेर्यात.
आणि थिबा पॅलेसवरून बाहेर पडताना आकाशवाणी केंद्राजवळ (थोडं अलिकडे) डावीकडे वळून थिबा पॉइंटवर जाऊन तिथला व्ह्यु पण घ्या. भाट्याची खाडी, मांडवीचा किनारा आणि भाट्याचा पूल...अप्रतिम दिसतो.
मला वाटतं ह व्ह्यु आता रत्नागिरीची ओळख बनलाय.
सगळेच प्रचि जबरदस्त. सध्या
सगळेच प्रचि जबरदस्त. सध्या कोकणवारी जोरात चालू आहे मायबोलीकरांची.
पहीलाच फोटो सुरेख.
पहीलाच फोटो सुरेख.
पुन्हा जेव्हा रत्नागिरीला
पुन्हा जेव्हा रत्नागिरीला जाल, तेव्हा पॅलेसच्या थोडं पुढे गगनगिरी महराजांचा मठ आहे, त्या बाजूने खूप मस्त व्यू मिळतो तोही घ्या कॅमेर्यात.>>>>>प्रज्ञा, मठात जाऊन आलो, पण फोटो काढायचे लक्षातच आले नाही. थिबा पॉईंटला संध्याकाळी जाणार होतो, पण रत्नदुर्गवरून परतताना उशिर झाला आणि दुसर्या दिवशी परतीच्या प्रवासास निघालो.
रच्याकने, पॅलेस आता वस्तुसंग्रहालय आहे पण अजुन एकदाही (४ वेळा जाणे झाले तरीही) मी ते चालु असलेले पाहिले नाही (अगदी दिलेल्या वेळेत जाऊनसुद्धा :()
मला वाटतं हा व्ह्यु आता रत्नागिरीची ओळख बनलाय.>>>>>अगदी अगदी
मस्त रे.. आम्ही मागच्या वर्षी
मस्त रे.. आम्ही मागच्या वर्षी २६ जानेवारीला तिथे होतो.
सगळे प्रचि सुंदर....
सगळे प्रचि सुंदर....
मस्तच
मस्तच
सुंदर. आता एक खास ट्रीप काढुन
सुंदर. आता एक खास ट्रीप काढुन हे सर्व पाहिलंच पाहिजे.
प्रचि ३ फारच खास !
प्रचि ३ फारच खास !
जिप्सी, अजून एक राहिलं! (माफ
जिप्सी, अजून एक राहिलं!
(माफ करा हं, पण अगदी राहावत नाही सांगितल्याशिवाय...)
पावसच्या वाटेवर, भाट्याचा पूल ओलांडला की सुरूबन आणि त्याच्या शेवटी झरीविनायकाचं छोटंसं देऊळ आहे...वेळेकडून ते कव्हर झालं नसेल तर नेक्ष्ट टायमाला बघाच!
झरीविनायक स्वयंभू गणेश आहे आणि समुद्रकिनारी असून त्या झर्याचं पाणी अतिशय गोड आहे!
झालंच तर मग कशेळी गाव, पूर्णगडातल्या खाडीचा व्ह्यु (भाट्याचा पूल ज्यांनी बांधलाय त्यांनीच हेही काम केलंय. म्या यकदा प्रवासात झोपले तवा भाट्याचा पूल वलांडला व्हता, नि जाग आली तवा म्या त्योच पूल पघत व्हते की!! मांगुन्शान म्हाजी व्हयनी बोल्ली, की "बाय माजी....गो हा पूर्नगडाचा हाय...झोपंत व्हतीस न्हवं..."
तर सांगायचा मुद्दा हा, की दोन्ही सारखेच दिसतात...तरी बघावेसे वाटतात.
शिवाय प्रवास करताना करवंदीच्या जाळीशी झोंबून करवंदं खाणं...खाडीच्या टावरणात कांदाभजी.. (आता मिळतात का देवास ठाऊक)..
पुढच्या वेळसाठी ७-८ दिवस तरी ठेवा हाताशी!
हा मा. फु. स.
झकास!!
झकास!!
थिबा पॅलेस जवळ राजाज पॉईंट
थिबा पॅलेस जवळ राजाज पॉईंट वरुन सुर्यास्ताचे फोटो मस्त येतात.. ते ठिकाण पण मस्त आहे.
थिबा पॅलेस जवळ राजाज पॉईंट
थिबा पॅलेस जवळ राजाज पॉईंट वरुन सुर्यास्ताचे फोटो मस्त येतात.. >>>>हो त्याच पॉईंटला थिबा पॉईंट म्हणतात ना? तेथे एक छानशी बागही केली आहे. प्रवेश फि ५ रूपये माणशी आहे.
हो.
हो.
मस्त प्रचि. रत्नागिरीला
मस्त प्रचि.
रत्नागिरीला जाऊनही मी कधीच या ठिकाणी जाऊ शकत नाही. रत्नागिरीत असेन तितका वेळ, मावशीच्या समोर बसून तिच्याशी गप्पा मारत तिचा पाहुणचार घ्यावा लागतो.
खूपच छान सचित्र
खूपच छान सचित्र वर्णन.
ब्रिटीशांच्या काळात रत्नागिरीला बदली झालेल्या कर्मचार्याना "बॅड क्लायमेट अलावन्स" मिळायचा असं ऐकलंय. कारण वस्ती किनार्यालगत डोंगराच्या आडोश्यालाच होती व उन्हाळ्य्यात आटणार्या विहीरींशिवाय पाण्याची सोयही नव्हती. आता वस्ती चढावावर व वरच्या मो़कळ्या माळावर झाली आहे, एमआयडीसी व नवीन धरणातून पाण्याची सोय झालीय, मुख्य रस्ता चांगलाच रूंद आहे व झाडीही टिकून आहे. त्यामुळे रत्नागिरी खरंच छान, सुबक वाटते.
थिबा पॅलेसमध्ये आता प्रदर्शनं व सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे होतात, हाही प्लस पॉईंट !
सुरेख फोटो.
सुरेख फोटो.
मस्तच....
मस्तच....
जिप्सी, छानच फोटो. स्वामी
जिप्सी, छानच फोटो. स्वामी स्वरूपानंदांचा फोटो घेऊन देत नाहीत का? पावसला जाऊन खूप वर्ष झाली. तुमच्या प्रचिमुळे आठवणी जाग्या झाल्या.
प्रज्ञा१२३ सगळे फोटो आजपर्यंत
प्रज्ञा१२३ सगळे फोटो आजपर्यंत पाहिलेले व नंतर पाहाशिल ते यांची यादी करून ठेव. कुठे कुठे जायचे ठरव. आपण जाऊया.
योग्या जाळीत कोणते मासे
योग्या जाळीत कोणते मासे मिळाले ?
मस्त.. पावस बघायचाय.. प्रचि ५
मस्त.. पावस बघायचाय.. प्रचि ५ खूपच छान
मस्त रे !
मस्त रे !

वा वा.. मस्तच प्रचि
वा वा.. मस्तच प्रचि
अतिशय सुरेख फोटो. यातील थिबा
अतिशय सुरेख फोटो. यातील थिबा राजवाड्याचा फोटो पूर्वी मायबोलीवरच पाहिल्याचे आठवते.
शोभा१२३ तु मला घेऊन जाणार
शोभा१२३ तु मला घेऊन जाणार असशील तर मी एका पायावर तयार. ;);)
प्रतिसादाबद्दल धन्स योग्या
प्रतिसादाबद्दल धन्स
योग्या जाळीत कोणते मासे मिळाले ?>>>>>>जागू, जाल्यात मांदेली आणि सुरमई घावली
शेवटच्या भागात बघायला मिळेल 
Pages