=================================================
=================================================
रत्नागिरीच्या भटकंतीत आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी शहरापासुन जवळच असलेल्या ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्याला. रत्नागिरी शहरापासुन अवघ्या २ किमी अंतरावर रत्नदुर्ग किल्ला उभा आहे. सदर किल्ला हा तीनहि बाजुंनी समुद्राने वेढला असुन पायथ्याशी भगवती बंदर आहे. गडाची तटबंदी भक्कम असुन त्यावरून चालत समुद्राचे विहंगम दृष्या बघता/टिपता येते. किल्ल्यावरच भगवती देवीचे अतिशय सुंदर मंदिर असुन या गडाला भगवतीचा किल्ला असेही म्हणतात.. किल्ल्याच्या माथ्यापर्यंत चांगला डांबरी रस्ता असल्याने वाहन थेट माथ्यापर्यंत जातात. संध्याकाळी ६ वाजता किल्ल्याचे दरवाजे बंद होत असल्याने सूर्यास्त पाहून लवकर गडाच्या खाली येणे बरे. रत्नागिरी शहरातील आवर्जुन बघण्यासारखे एक ठिकाण.
=================================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६श्री भगवती देवीचे मंदिर
प्रचि ७श्री भगवती देवी
प्रचि ८गडावरून दिसणारे भगवती बंदर
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११गडावरून दिसणारे सूर्यास्ताचे मनोहर दृष्य
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१)
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045
रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073
रत्ननगरी "रत्नागिरी" – (३) प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
http://www.maayboli.com/node/22107
रत्ननगरी "रत्नागिरी" – (४) डेरवणची शिवसृष्टी
http://www.maayboli.com/node/22137
अप्रतिम प्र.चि.! मुख्य म्हणजे
अप्रतिम प्र.चि.! मुख्य म्हणजे ह्या किल्ल्याचीं/ देवळाची वैशिष्ठ्य नेमकी टिपणारी. हे ठिकाण म्हणावं तितकं पर्यटकांचं आकर्षण कां ठरूं नये ,हा मला पडलेला जुनाच प्रश्न. [कदाचित पूर्वी रस्ता चांगला नव्हता म्हणूनही असेल]. वरून दिसणारी "ब्रेक-वाटर वॉल" व नर्मदा सिमेंटची जेट्टी छानच टिपली आहे.
अभिनंदन.
मस्त.. फोटो बघून जुन्या आठवणी
मस्त.. फोटो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
गडाचा दरवाजा अजूनही संध्याकाळी ६ ला बंद होतो??
अप्रतिम.. प्रचि ७,११,१४ फार
अप्रतिम.. प्रचि ७,११,१४ फार म्हणजे फार आवडले.
नेहमी प्रमाणे मस्त .......
नेहमी प्रमाणे मस्त ....... ४,१२ , १४ *****
१ ला मस्तच. त्यातल्या
१ ला मस्तच. त्यातल्या दिपगृहाचा काढला का जवळून एखादा?
अप्रतिम.. प्रचि..! प्रचि१३
अप्रतिम.. प्रचि..!
प्रचि१३ मधे सुर्यावर काळा चौकोन काय आहे?? डोंगर..?
प्रतिसादाबद्दल धन्स गडाचा
प्रतिसादाबद्दल धन्स
गडाचा दरवाजा अजूनही संध्याकाळी ६ ला बंद होतो??>>>>>होय रोहन, गडाचा दरवाजा अजुनही ६ वाजताच बंद होतो.
त्यातल्या दिपगृहाचा काढला का जवळून एखादा?>>>दीपगृहाचा काढला रे फोटो पण हवा तसा आला नाही
प्रचि१३ मधे सुर्यावर काळा चौकोन काय आहे?? डोंगर..?>>>>चातक, ते गडाचे बुरुज आहे.
मला उसगावात बसल्याबसल्या
मला उसगावात बसल्याबसल्या माझ्या गावाची सफर घडली....
जिप्सी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद!!
रच्याकने, भगवतीच्या देवळाजवळ एक भुयार आहे, त्या भुयाराचं दुसरं टोक सरळ कोल्हापुरात आहे म्हणे!! पुर्वीच्या काळी गुप्तहेरांसाठी किंवा अपघाताच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जायचा मार्ग म्हणून केलेली सोय होती ती असं मोठी घरातली मोठी माणसं सांगत.
आणि किल्ल्याच्या खाली नर्मदा सिमेंटची जेट्टी आहे. तिथे जे दगड लावले आहेत ते ठरविक प्रकारच्या रचनेत बसवले आहेत असंही काहीतरी आहे. म्हणजे एकमेकांत अडकवून वगैरे बसवले आहेत, जेणेकरून लाटांच्या जोरामुळे जेट्टीचं नुकसान/झीज होऊ नये.
मस्तच रे जिप्सी !
मस्तच रे जिप्सी !
रच्याकने, भगवतीच्या देवळाजवळ
रच्याकने, भगवतीच्या देवळाजवळ एक भुयार आहे, त्या भुयाराचं दुसरं टोक सरळ कोल्हापुरात आहे म्हणे!! पुर्वीच्या काळी गुप्तहेरांसाठी किंवा अपघाताच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जायचा मार्ग म्हणून केलेली सोय होती ती असं मोठी घरातली मोठी माणसं सांगत.
>>> असे काही नसायचे.. छोट्या अंतरासाठी भुयार ठीक आहे.. हे इथून कोल्हापूर काय... कैच्याकै... आवरा एकदम...
नाथमाधव वगैरे लोकांनी नको ते लिहून ठेवलंय..
मस्त फोटोज रे !!
मस्त फोटोज रे !!
धन्यवाद!!! रच्याकने,
धन्यवाद!!!
रच्याकने, भगवतीच्या देवळाजवळ एक भुयार आहे>>>>>>मी सुद्धा असे वाचले आहे कि या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे, पण तो खाली समुद्रापर्यंतच जातो.
या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग
या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे, पण तो खाली समुद्रापर्यंतच जातो.
असेल बुवा!

लहान असताना कधी एवढा विचार नाही केला. निरागस होतो ना तेव्हा! आणि मोठेपणी तो गैरसमज (आख्यायिका?) छान वाटायला लागला. परत कधी असा निरागसपणा शोधुनपण सापडणार नाही...
बाकी चालुद्या!
मजा वाटतेय.
सुंदर.
सुंदर.
येथुनच एका बाजुला पांढरी व
येथुनच एका बाजुला पांढरी व एकिकडे काळी वाळु दिसते ना...
येथुनच एका बाजुला पांढरी व
येथुनच एका बाजुला पांढरी व एकिकडे काळी वाळु दिसते ना...>>>>>येस्स्स, एका बाजुला आरेवारेचा समुद्र (पांढरी वाळू) आणि दुसर्या बाजुला मांडवी बीच (काळी वाळू).
बरोबर.
बरोबर.
छान प्रचि. रत्नागिरीत दोन
छान प्रचि.
रत्नागिरीत दोन समुद्र किनारे आहेत ना ? एक काळा आणि दुसरा पांढरा.
लोकमान्यांचे घर बघितले कि नाही ? माझी मावशी तिथून जवळच राहते.
कोकणात इतकि वर्षे राहून ह्या
कोकणात इतकि वर्षे राहून ह्या गोष्टी बघणे जमले नाही. आणि आता वेळ नाही. खुप खंत वाटते.
मस्त रे.. ४ आणि १४ विशेष
मस्त रे..
४ आणि १४ विशेष आवडले.
मस्त फोटो... माझ्याकडे झब्बू
मस्त फोटो... माझ्याकडे झब्बू द्यायला बरेच फोटो आहेत पण सगळे फिल्म कॅमेराने काढलेले.
तिथल्या दिपगृहाला आम्ही भेट दिली होती. तिथल्या माणसाने सगळं मस्त सांगितलं. पुर्वी वाटायचं दीपगृह म्हणजे रात्री खलाशांना जमीन कुठाय ते कळावी यासाठी असते. पण त्यातही बरेच बारकावे आहेत. उदा.
- दिपगृहाला दिलेला रंग (पट्टे) हा देखिल एक संकेताचा भाग आहे.
- रात्री फिरणार्या दिव्याचे (इथे) दोन झोत केलेत आणि त्यातील वेळेचे अंतर आणि फिरण्याचा वेग हा प्रत्येक दिपगृहासाठी वेगळा असतो.
- दृश्य प्रकाशाबरोबर रेडिओ लहरी देखिल प्रक्षेपित केल्या जातात.
वॉव !! मस्त... ती जेट्टी तर
वॉव !! मस्त... ती जेट्टी तर खासच !
हे इथून कोल्हापूर काय... कैच्याकै... आवरा एकदम... >>
भारी...
भारी...
छान
छान
गुरुजी, हे मंदिर बघुन जुन्या
गुरुजी, हे मंदिर बघुन जुन्या आठवणिंना उजाळा मिळला. या किल्ल्यावर गेलो असताना खुप फोटु काढले होते पणा जुन्या मोबाईलमधले कार्ड हरविल्यामुळे सगळे गेले. त्या खिडकितुन खाली बघितल्यावर मस्त फेसाळ समुद्राच्या लाटा दिसतात. त्याचा एक खुप छान फोटो होता.