जुन्नरच्या गप्पा

जुन्नरबद्दलच्या गप्पा


छे गं वर्षा, काहीतरी गैरसमज झालेत.
झंक्या, प्रतिभा, वर्षा आणी जुन्नरकर मंडळी,
आपण इथे फक्त लेखी संवाद साधत असतो. अशा वेळी समोरच्याच्या मनातल्या भावना वा उद्देश अगदी तसेच आपल्यापर्यंत पोहचतातच असे नाही. बर्‍याचदा लिहिताना मनात मिश्कील भावना असतात मात्र त्या निट शब्दात कागदावर येतातच असे नाही. किंवा शब्द जरी व्यवस्थित सापडले तरी त्यामागचा मतितार्थ समजावून घेताना समोरच गडबडू शकतो. ब्लॉगवर या मर्यादा नेहमी असणारच!
झंकार, तुझ्या वक्तव्यामागचा नेमका उद्देश इथे स्पष्ट कर बरे! उगाच गैरसमज वाढायला नकोत.
आणी मित्रहो, आपले थोडेशे मतभेद हे आपल्या घरात, आजुबाजूच्या मित्रांबरोबरपण असतातच. पण ते मतभेद दूर ठेऊन आपण एकत्र राहत असतोच. इथे तर आपली प्रत्यक्ष भेटही नाहीये अद्याप! केवळ मातीच्या ॠणानुबंधातून आपण या धाग्यात एकत्र बांधलो गेलो आहोत व एकमेकांशी मुक्त संवाद साधत आहोत. त्यामुळे आपण एक नक्की करुयात की जेव्हा पर्यंत प्रत्यक्ष भेट होत नाही तेव्हा पर्यंत काही वक्त्यव्यावरुन जर वाद होणार असतील तर ते थोडेसे दुर्लक्षून आपण चालायला हवे.

बाकी सासुरवाशीनींना श्रावण तर अगदी खाशा आनंदाचा, आठवणींचा मेवा असेल ना? जरा आम्हाला पण सांगा की नागपंचमी इतर श्रावणातली व्रतवैकल्ये वगैरे घरी कशी व्हायची ते. हो आणी ते आठवणींच्या पानावर आले तर फार बरे होईल. प्रतिभा, वर्षा, शोनो, जया आहात न तयार?



श्रावण अनुमोदन. स्मित
गजानन, खर आहे हो तुमच दिड तपानंतरच कोणी पाह्यलय.
झंकार, सतिश खांडगेला ओळखतोस का? तोही निमगाव साव्याचाच जावई. भायखळा मतदार संघातुन नगरसेवक पदासाठि उभा होता.
बाळासाहेब दांगट एक व्यक्ति म्हणुन अतिशय चांगले आहेत. अतिशय साधा आणि सौजन्यपुर्ण स्वभाव. राहणीमानहि अतिशय साधे पण म्हणुनच राजकारणात मागे पडले. आता तर शिवसेनाहि सोडली. आता त्यांची राजकिय कारकिर्द संपल्यातच जमा आहे. चांगली माणस टिकण कठिणच आहे.
शरद सोनावणे उंब्रजचे जावई. स्मित



श्रावण,तु जे लिहिले आहेस ते एकदम बरोबर आहे .माझा सुर काही रागाचा किंवा भांडणाचा नव्हता . फक्त झंकारला नक्कि काय म्हणायचे ते मला कळले नाहि म्हणुन इतके प्रश्नचिन्ह टाकले.
प्रतिभा, चांगल्या माणसांच राजकरणात काहि खर नसत. पण तरीहि प्रश्न पडतो कि राजकरणात थोडी तरी चांगली माणसे असतीलच ना. यशवंतराव चव्हाण,सुशिलकुमार शिंदे हि आठवणारी चांगल्या लोकांची नावे. फक्त दोनच नावे .अरेरे



नमस्कार मंडळी! हा आजचा नमस्कार. गजानन, किशोर बकी मंडळि कुठे आहात?
सोनी वर गंगाजल बघतोय. दर सहा महीन्यानी बघीतला तरी हा चित्रपट पाहताना मला कंटाळा येत नाही. स्मित
प्रतिभा, दांगटांबद्दल मला खरोखर वाईट वाटते. मगच्या निवडणूकीत घरभेद्यांमुळे पडला हा सज्जन माणूस. चालायचेच. राजकारण. आपण का।इ न बोललेचं बरे!



श्रावण, ग्लोबल वॉर्मिंगच्या युगात कसल्या सासुरवाशिणी आणि कसले श्रावणी सण घेवुन बसलास? इंटरनेटवरुन नागाची पुजा करायचे दिवस आजकाल. फुगड्या, झिम्मा, बसफुगडि, पिंगा सगळच कालबाह्य झालय. अरेरे
आता फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे बघ कित्ती सोप्पे साजरे करायला. आणि कस मॉर्डन वाटत नाहि?



श्रावण, ग्लोबल वॉर्मिंगच्या युगात कसल्या सासुरवाशिणी आणि कसले श्रावणी सण घेवुन बसलास? इंटरनेटवरुन नागाची पुजा करायचे दिवस आजकाल. फुगड्या, झिम्मा, बसफुगडि, पिंगा सगळच कालबाह्य झालय. अरेरे
आता फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे बघ कित्ती सोप्पे साजरे करायला. आणि कस मॉर्डन वाटत नाहि?



श्रावणपाटी हा प्रकार माहित आहे का ? लग्नानंतर दोनचार दिवसांनी पहिल्यांदा जेव्हा मुलगी माहेरी येते व परत सासरी निघते तेव्हा तिच्याबरोबर पाटीभर पुरणपोळ्या व भजी किंवा पाटवड्या व टोपलीभर चपात्या माहेरच्या कडुन दिल्या जातात. मग सासरी ती मुलगी व सासरची एखादी बाई भाऊबंद व शेजारी श्रावणपाटी घेऊन पोळ्या वाटुन येते. हेतु हा की नव्या नवरीची सासर्च्या मांणसांची रितसर ओळख व्हावी. आम्ही तर वाट पहात असायचो केव्हा नवी नवरी पहायला मिळतेय याची. हातावर मेंहदी ,अंगावर हळदिचा पिवळसर रंग व हिरव्या साडितली,दागिने घातलेली ती छान छान नवरी.



वर्षा, अगदी अगदी!!!
नागपंचमी कशी झाली? पोळ्या कुणी कुणी खाल्या?
प्रतिभा, खरे बोललीस. आजकाल सणांचे महत्व कमी होत चालले आहे. काय की पुर्वी इतर मनोरंजनाची साधने कमी होती. करमणूक म्हणजे जे काही सण असतील ते साजरे करणे. आजकाल सदासर्वकाळ आनंद साजरा होत असतो. स्मित केवळ सणांनाच नवे कपडे, चांगले जेवण असा प्रकार राहीला नाही. तसेच करमणूकीच्या कल्पना ही टि.व्ही., सी.डी.प्लेयर, विविध चॅनल्स यांच्या सहज उपलब्धतेमुळे बदलल्यात. त्याचा ही परिणाम होतोय. पण त्यामुळे लोकांचे एकत्र येणे होत नाही. सौदार्ह कमी होतंय. चालायचेच.. कालाय तस्मे नमः!



वर्षा, छान आठवण सांगितलीस. पण थोडिशी दुरुस्ती. लग्नानंतर पहिल्यांदा मुलगी सासरहुन माहेरी जाते तेव्हा सासरचेहि मुलीला भजे, पाटवड्या इ. बांधुन नविन सुनेबरोबर देतात, तेहि तिच्या माहेरी भाऊबंदांना वाटले जातात, तसेच माहेराहुनही तिला अशाच प्रकारचे खाद्यपदार्थ बांधुन दिले जातात सासरच्या भाऊबंदांना वाटण्यासाठि. ह्या खाद्यपदार्थांना "बुत" म्हणतात. ती बहुतेकदा पांढर्‍या धोतरात किंवा एखाद्या स्वच्छ कापडात बांधुन देत. हा बुत उघडण्याचा मान घरातिल कर्त्या / वयस्कर बाईचा असे.

आता श्रावणपाटिबद्दल. नविन नवरीला लग्नानंतर येणार्‍या पहिल्या आषाढ महिन्यात रीतिप्रमाणे तिच्या माहेराहुन तिला न्यायला येत. (का तर म्हणे त्या आषाढ महिन्यात नवर्‍याचे तोंड बघायचे नसते. स्मित) महिनाभर माहेरी मजा केल्यावर श्रावणात तिच्या सासरवरुन तिला न्यायला येत. बहुतेकदा सासरे, दिर असे कोणीतरी असे. (नवरा नाहि) माहेराहुन नव्या कोर्‍या पाटित पोळ्या, भजे, पाटवड्या इ. भरुन ती पाटि आणी मुलगी सासरच्या मंडळिंच्या सुपुर्त केली जात असे. पण त्याबदल्यात सासरकडुन मुलीला श्रावणपाटिची साडि द्यावी लागे. बर्‍याचदा तिच्या माहेरच्याहि एक दोन मानाच्या बायकांना साडी दिलि जाई.
मुलीने सासरी जाताना नवी सासरहुन आलेली साडी नेसुन जायचा रीवाज आहे.

तर मंडळिंनो, हे सगळ मला इंत्यंभुत माहिती असण्याच कारण अस की काहि वर्षांपुर्वी मीही ह्यातुन गेले आहे. आता लिहिताना आठवुनहि खुप मजा येतेय. मला न्यायला सासरे आले होते. स्मित



प्रतिभा, हे आठवणींच्या पानावर टाक ना....



नमस्कार जुन्नरकर,
काल ०८.०८.०८ वा. आणी ०८.०८..०८ रोजी बिजींग आलंपिकचे ( चंद्र्कोर) बिगुल वाजले एकदाचे...
आपण तर मानले बुवा चीनला, उदघाटन सोहळा पाहील्यावर वाट्ले "द ग्रेट शो आन ( पुन्हा चंद्र्कोर) द अर्थ) . आलंपिकच्या इतीहासातील सर्वात भव्य, देखणा, नियोजनबद्ध व महागडा असा उदघाटन सोहळा होता. "द बर्ड नेस्ट" ही अती सुंदर, फक्त चार वर्षात हे तयार केले म्हणे. आपल्याकडे एक रस्ता चार वर्षात तयार होत नाही.२०१० रोजी कामनवेल्थ गेम्स आहेत दिल्लीला. याच्या २०% जरी तयारी झाली तरी नशीब !
हु जिंताव यांनी भाषणात "चीन संपुर्ण जगाचे स्वागत करण्याचे स्वप्न अनेक वर्ष बाळ्गुन होता ते आज पुर्ण झाले ' असे उदगार काढ्ले ते त्यांची तयारी पाहील्यावर किती खरे आहेत याची खात्री पट्ते.२४ तारखेपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये व उद्योगधंदे बंद असणार आहेत.
मला सोनीया गांधींची भारताची प्रतिनीधी म्हनुन ऊपस्थिती मात्र खटकली.त्यांच्याकडे कोणतेही वैधानीक पद नसताना त्यांची निवड व्हावी हे नवलच.
असो...
यावेळेस या स्पर्धेचे पहिले सुवर्ण पद्क भारतीय नेमबाज मिळ्वतील ही आशा .( कि वेडी आशा ? )
चला आता पुरे करतो. गावी निघायचे आहे. गावी जायचे असल्यावर कुठे मनच लागत नाही.( हे जीवन माझे मस्त कलंदर इथे जीव गुंतला माझा)



झंकार. सहीच लिहीलेस एकदम.... खेळांनाही जागतीक राजकारणात, घडामोडीत किती अनन्यसाधारण महत्व असते हे यावरुन दिसते. चिनने सोहळा मात्र एकदम नेत्रदिपक, भव्यदिव्य, डोळ्याचे पारणे फेडणारा वगैरे म्हणतात तसा केला अगदी. यानिमीत्तने पाश्चात्य देशांच्या तोडीस तोड आम्ही आहोत हेच चिनने दाखवून दिले. (कितीही नाही म्हणले तरी अमेरिकेच्या पोटात ढवळले असेलच.). गावावरुन आल्यवर गावभेटीचा वृत्तंत सांग. गावाकडे मस्त पाऊस पडतोय. सगळे सुखावलेत...
विकएंड कसा गेला लोकहो? गजानन आणी किशोर मिळून इंटरनेटसेवा नसलेल्या दुर्गम वगैरे भागात फिरायला गेलेत की काय? स्मित



श्रावण निरोप द्यायला बराच उशीर होतोय परंतु तुमचे मायबोली टी-शर्ट झकासकडे सुखरुप आहेत. ववि२००८ गेलो होतो, फारच मजा आली. वृतांत व छायाचित्र टाकणे प्रयत्न करुनही जमले नाही. असो, प्रतिभाताई श्रावणपाटी मस्तच. अलिकडे श्रावणपाटीत असतात हलवायाच्या दुकानातले गोलाकार लाडू व मिष्टान.
(उदास स्मायली). बरे तर मंडळी गप्पा भरपूर आहेत....
झकास, अवली, अमोल, वर्षाताई, जया_जोशी, शोनु रामराम.
गजानन दुर्गम भागातून लवकर बाहेर या. क्षमा असावी जुन्नरकरांनो. मंडळी अद्यापही माझी संगणक पानपट्टी रुसलेलीच आहे.



शांतता, कोर्ट चालू आहे. स्मित
अरे काय, कुणीच नाही इथे? ऑलिंपीक उद्घाटन सोहळा संपून आपल्याला चक्क सुवर्ण मिळाले तरी इथे कुणीच नाही?
श्रावणातले उपवास जोरात चालले आहेत का?



किशोर खरय तुझ. आजकाल रेडिमेड हलवायाच्या दुकानातुनच मिठाई पाठवली जाते. वैशालीच्या लग्नात तिच्या सासुने लग्नदिवशीच भर मांडवात सांगितले कि पहिल्या पाठवणी नंतर माहेराहुन परत येताना लग्नातील लाडु आणु नकोस परत नाहितर बुत म्हणुन तेच आणशील्.स्मित
श्रावण, सुवर्णपदक मिळाल्याचा अभिमान आहेच रे पण आपल्याला तेवढ्यावरच समाधान मानावे लागेल अस दिसतय्.अरेरे
झंकार, चीनचा उदघाटन समारंभ पाहुन थक्कच झालोय. आपण फक्त लोकसंख्येत बरोबरी करतोय. आपल्याकडे करायची वेळ आली तर काय होईल त्याचाच विचार करतेय.



(कितीही नाही म्हणले तरी अमेरिकेच्या पोटात ढवळले असेलच.). >>
हे खरंच आहे. मुळात अटलांटाच्या सोहळ्यानंतर समरांच ने one of the best अशी बोळवण केली होती 'the best' नव्हे. त्यामुळेच अमेरिकन लोक वैतागलेले होते. बारा वर्षांपुर्वीचा अटलांटाचा सोहळा अन अथेन्स किंवा सिडनी मधिल सोहळे साधारण एकाच कॅटगरी तले होते. पण इथल्या भाषेत सांगायचं तर china has raised the bar . लंडन सोहळ्याच्य अपेक्षा फारच उंचावल्या आता. या खेळांच्या शेवटी, लंडन वाले पण एक ' आमंत्रणाचा' छोटासा कार्यक्रम सादर करतील - तो कसा काय होतो ते पहायची उत्सुकता वाढली आहे.

श्रावण ( महिना ) आवडीचा, इथे राहुन हुरहुर लावणारा खराच. पण श्रावणातल्या वेगवेगळ्या प्रथा, व्रतं,रीतिरिवाज यांचा विचार करता मन गोंधळून जातं. एकविसाव्या शतकात सुध्दा 'सवाष्ण' ला इतकं महत्त्व का? त्या संकल्पनेचा मूळ हेतू काय असेल, तू काळाप्रमाणे बदलायला हवा की तो खरंच कालातीत आहे ? माहेरी जाणे-सासरी जाणे यात सुद्धा गेल्या पन्नास शंभर वर्षात किती बदल झालाय. जुने रीत रिवाज 'संस्कॄती जपण्याच्या' नावाखाली किती चालवायचे, किती कालाप्रमाणे बदलायचे किंवा काल बाह्य म्हणून सोडून द्यायचे कळत नाही.



माझ्या लग्नाच्या वेळची सासर-माहेर दोन्हीकडील बुत लाडवांची होती, हलवायाकडील स्मित
माझा ऑलंपीक सोहळा चुकला. अरेरे



ऑलिंपिक चा सोहळा खूप प्रेक्षणीय होता पण काही काही गोष्टी आता बाहेर येउ लागल्या आहेत. ते २९ ठिकाणी आतषबाजी करत हेलिकॉप्टर ने त्याचे चित्रिकरण केले होते त्याची तेव्हाच शंका आली होती पण असेही वाटले की चीन चा भरवसा नाही काहीही करतील, तेथील लोकांना दोन वर्षे दुसरीकडे राहायला पाठवतील. पण ते बरेचसे computer animation होते. तसेच त्या लहान मुलीने म्हंटलेले गाणे प्लेबॅक होते. ते ही चुकीचे काही नाही. तरीही सोहळा खूप बघण्यासारखा होता.



शोनु, ज्यावेळि रितिरीवाज बनवले गेले ते त्या काळाप्रमाणे योग्यहि असतिल कदाचित. आताच्या काळात म्हणायचे तर जो पर्यंत आपल्याला आणि समाजाला त्या रिती पाळण्याने कोणत्याहि प्रकारे उपद्रव होत नसेल तर त्या पाळण्यात काहिच हरकत नसावी. स्मित
श्रावण, मी चालले श्रावण सरींमधे भिजायला. उद्या सकाळि चार दिवसांसाठि उंब्रजला जायचे आहे. बहुतेक माळशेजनेच जाऊ.
गावकर्‍यांनो गावाला पाऊस आहे का? कारण कालचीच बातमी आहे की संगमनेर भागात चांगलेच ऊन पडले आहे म्हणुन.



नमस्कार जुन्नरकर,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!



स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!!!
करुणा, आनंद वाटला तुझ्या शुभेच्छा बघून! बर्‍याच दिवसांनी आलीस.
प्रतिभा, गावी झाला चांगला पाऊस. शेतकरी सुखावलाय. तालुक्यातील सगळी धरणे १००%, डिंभा ८०% भरलेत. त्यामुळे काळजी नाही राहीली. पण या दिवसामधील माळशेजमार्गे गावी जाणार म्हणजे धमाल असेल.
फारेंड, खरे आहे बाबा. चीनचा भरवसा नाही. काहीही करु शकतील ते. तुही बर्‍याच दिवसांनी आलास की इथे. स्मित
शोनो... स्मित
प्रतिभाशी सहमत आहे. ज्या चालीरितींनी नुकसान होत नाही अशा जपायला काही हरकत नाही.
किशोर, निरोपाबद्दल धन्यवाद!
झकोबा, अभ्यासाला बसलाय वाटतं.



प्रतिभा, श्रावण तिथेच तर मेख आहे !
उद्या श्रावणी शुक्रवार, माझ्या सासरकडच्या विवाहित बायकांसाठी अत्यंत मह्त्त्वाचा दिवस. मी स्वत: काही करत नाही अन माझ्या सासू सासर्‍यांना हे माहीत आहे. आवडत नसेल तरी त्यांनी कधी त्याबद्दल मला काही सांगितलं नाही. पण इथले इतर नातेवाईक - त्यांना माझ्या उद्धाराची काळजी. ऑफिस मधे काम करून्,घरी जाऊन मग head bath घेउन मग त्यांच्या कडे प्रसादाला जायला हवं. दिवसभर ऑफिस मधे'शिवाशिवी' होते ना- म्हणुन हेड बाथ.
आठवड्याभराच्या धांदली नंतर शुक्रवार संध्याकाळ म्हणजे थोडासा विसावा असतो. त्यात ही दगदग. मी नाही म्हटलं तर माझ्या सासू सासर्‍यांना ऐकुन घ्यावं लागेल अरेरे
माझ्याबरोबरीने काम करणार्‍यांबद्दल ( बहुतेक तरी) मला आदर आहे, आपुलकी आहे. त्यांची शिवाशिव मी कधीही मानत नाही. असले विचार माझ्या मनात कधी आलेही नसते. आज मुद्दाम फोन करून निरोप दिलाय चुलत-मावस सासूबाईंनी. ( माझ्या मुम्बै कर असण्याच्या उद्धार झाला तो वेगळाच )
हे सगळं करण्याचा शारीरिक त्रास मिनिमल आहे. पण मनाची तडफड होते त्याचं काय?



नमस्कार मन्ड्ळी,आलो आलो अगदी धावत पळत, गैरहजेरीची चिठ्ठी विचारु नका
म्हणजे झाले.
सर्वांना स्वातंत्रदिनाच्या सुभेच्छा.
जरा एका प्रकल्पात अडकलो होतो शिवाय सकाळी/रात्री स्वयंपाक घरात प्रयोग
चालु आहेत्,गिनिपीग पण मीच, आता वाटते ते "माहेर "नावाचे गांव नसावे या जगात.



नमस्कार जुन्नरकर. गजानन स्वागत. शोनु कसा पार पडला श्रावणी शुक्रवार? मुबैकर असल्याचा उद्धार नाही कळला. असो.
श्रावण सुट्टीच्या दिवसात माळशेज मार्गे गावी जायला-यायला दुप्पट वेळ खर्च होतोय. कालच ओतुर ते कल्याण प्रवासाला तब्बल ६ तास लागले. पर्यटकांनी माळशेज अगदी फुलुन गेलाय. स्वातंत्र्यदिनी भरपुर मद्यपान केलेली मंडळी धबधब्याखाली भिजत होती. वेडीवाकडी थांबविलेली वाहने, दमदाटी करणारे तरुण रक्त जाणार्‍या येणार्‍या वाहनांना अडथळा करत होते. दोन गटांच्या मारामारीचे परिणाम एका राज्य परिवहन गाडीचे हेडलाईट फोडण्यापर्यंत गेले. सगळाच गोंधळ. वडापाव, मक्याची कणसे विकणारे दुकानदारही हाणामारीत भरडले गेले.



किशोर
माझ्या सासरची मंडळी भारताच्य पूर्व किनारपट्टीवर रहाणारी आहेत. आंतर जातीय, आंतर भाषीय मामला आहे. मोठ्या शहरातली सून, तिला आपले रीतरिवाज माहित नाहीत म्हणजे कुठलेच रीत रीवाज माहित नसणार असा दृढ (गैर ) समज. त्यामुळे मला असली मुक्ताफळे वारंवार ऐकून घ्यावी लागतात . ' तुला हे सगळं माहीत नसणार, तुमच्यात काही रीती भाती पाळत नसणार , इ.इ.' स्मित

सहसा मी मनावर घेत नाही. वाद ही घालत नाही. पण कधी एखादा शब्द जास्त दुखावतो. असो.
सार्वजनिक ठिकाणी नशापाणी करण्याचा हा नवाच रोग, फार बळावलाय सगळी कडे ! अतिशय खेदाची बाब.



अरे, आजही कोणीच नाही का ईथे? महाराष्ट्रात चांगला पाऊस पडलाय मग ह्या जुन्नर बिबिवर का एव्हढा दुष्काळ?



नमस्कार जुन्नरकर.
किशोर, मी देखिल १५ तारखेलाच गावी गेले होते. माळशेजनेच. अरेरे
सकाळि आठ वाजता निघुन दुपारी पाच वाजता पोहचलो. आधि शहाडमधेच दिड तास गेला. नंतर घाटात तर विचारुच नकोस. जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना दारु पिऊन लोक अडवत होते. बंद गाड्यांच्या काचांवर धक्के मारत होते. आमच्याहि गाडिवर मारले. चांगल्या घरातिल स्त्रियांना तर अगदि नकोसे केले होते. त्यांच्या बरोबर असणारे पुरुषहि ह्या प्रकाराने घाबरले होते. आतापर्यंत असले भयावह प्रकार फक्त पिक्चर मधे पाहिले होते. तिनशे चारशे जमावाला दहा पंधरा पोलिस कसे कंट्रोल करणार ? एखादा पोलिस अडवताना दिसला कि त्याच्याहि अंगावर धाऊन जात होते. अरेरे

श्रावण, ह्या प्रकाराला आळा घातलाच पाहिजे. ड्राय डे असुनहि स्वातंत्र्य दिना दिवशी असा धिंगाणा घालताना त्यांना जराही शरम वाटत नव्हती. भारताचे दुर्देव दुसरे काय? पण ह्या सगळ्या प्रकाराची स्वतःलाच शरम वाटतेय नुसत लिहुन सुध्दा.



अरेच्चा,माळशेजचा हा उपद्रव फारच वाढलेला दिसतो आहे.प्रशासन अन स्थानिक लोक एखादा भयंकर अपघात झाल्यावर झोपेतुन उठ्तील वाटते.



प्रतिभा, किशोर.. अगदी बरोबर. दर पावसाळ्यात माळशेजमध्ये हा अनुभव ठरलेला आहेच. आणी यांच्या स्वातंत्र्य दिन साजर्‍या करण्याच्या कल्पना काय तर दारु पिऊन पाकीस्तानला अर्वाच्य शिव्या देणे, कपडे काढून गाड्यांसमोर नाचणे... अत्यंत हिडीस प्रकार चालतात याची कल्पना आहे. आणी हे सगळे भयावह आहे. मी दोनदा माळशेजला सहली साठी गेलोय. शेवटचा अशाच एका १५ ऑगस्टला.. आणी जे काही बघीतले त्यानंतर नको आला अगदी.. आता कितीही निसर्ग भुरळ घालत असला तरी तिकडे जाण्याची कल्पना सुध्दा करवत नाही. निदान त्या दिवशी तरी भरपुर पोलीस बंदोबस्त ठेवायला वा पण नेमका त्याच दिवशी इतरही ठिकाणी बंदोबस्त जास्त ठेवावा लागतो त्यामुळे मर्यादा येत असाव्यात. पण या घाणेरड्या प्रकाराला काही तरी आळा बसवायलाच हवा.
गजानन, अहो आपल्याकडे हेच चालते की. वरातीमागूनच घोडे असतात हो. एखादी अप्रिय घटना घडून काही जीव जात नाहीत वा कोणी उध्वस्त होत नाही तेव्हापर्यंत प्रशासन नाही जागे होत. आपल्याकडे माणसाची, जीवाची किंमत करते कोण हो? काळुबाई घटना, आत्ता घडलेली मानसी देवी घटना अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
प्रतिभा, बाकी गावच्या ट्रीपबद्दल काहीच बोलली नाहीस ती?
मी चाललोय उद्या.. आता तुमची इच्छा असो वा नसो, मंगळवारी तुम्हाला गावाकडच्या गोष्टी ऐकायच्या आहेतच... स्मित
झकोबाची परिक्षा कधी संपतेय देव जाणे.
शोनो, खरे आहे. आपल्याकडे ही सांस्कृतीक जबरदस्ती असतेच. तुमचे म्हणने पटतेय. नोकरी करुन घरी आल्यावर एवढा उपद्व्याप करुन थकवा वाढेलच. जे करताहेत त्यांना विरोध नाही पण त्यांनीही तसा आग्रह धरायला नको ही अपेक्षा चुकीची नाही. मात्र एकंदरीत भारतीय जीवनशैली खुपच सामाजीक असल्याने हे प्रकार होतात. ज्यांना जुन्या परंपरांचा अभिमान आहे व त्या जपायच्यात त्यांनी त्या आनंदाने जपाव्यात. त्यातुनही त्यांना समाधानच मिळेल पण दुसर्‍यांना शक्य नसल्यास तसा आग्रह मात्र धरायला नकोय.