काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये गप्पा मारता मारता कोल्हापूरचा विषय निघाला आणि मला माझी ३ वर्षापूर्वी केलेली कोल्हापूरची भटकंती आठवली. त्याच भटकंतीचे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करण्याचा मोह आवरला नाही. :). चार दिवसात भरपूर भटकलो तरीही सिद्धगिरी म्युझियम राहिले (आम्ही संध्याकाळी ६:३० वाजता गेलो आणि ते ७:३० ला बंद होणार होते :(). जेंव्हा गेलो तेंव्हा रामनवमी असल्याने तांबडा/पांढरा रस्सा न खाताच यावे लागले. :(.
आता खास कणेरी मठाला भेट देण्यासाठी आणि तांबडा/पांढरा रस्सा खाण्यासाठी तरी परत एकदा कोल्हापूरची भटकंती करायला पाहिजेच.
एक ऐतिहासिक आणि राजेशाही शहर म्हणुन कोल्हापूर मनात ठसले. त्याच कोल्हापूरची हि भटकंती.
==================================================
कुलस्वामिनी अंबाबाई - महालक्ष्मी मंदिर
==================================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
==================================================
भवानी मंडप
==================================================
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
==================================================
न्यु पॅलेस
==================================================
प्रचि ८
==================================================
छ. शाहू महाराज कुस्त्यांचे मैदान
==================================================
प्रचि ९
==================================================
शालिनी पॅलेस
==================================================
प्रचि १०
==================================================
रंकाळा तलाव
==================================================
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
==================================================
दख्खनचा राजा - जोतिबा मंदिर
==================================================
प्रचि १६
प्रचि १७
==================================================
पन्हाळा
==================================================
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
==================================================
कुंभोजगिरी (भगवान पार्श्वनाथ मंदिर)
==================================================
प्रचि २२
==================================================
बाहुबली
==================================================
प्रचि २४
==================================================
श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)
==================================================
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
==================================================
दुध कट्टा (गंगावेश)
==================================================
प्रचि २९
==================================================
पंचगंगा घाट परिसर
==================================================
प्रचि ३०
==================================================
एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापूरी साज ......
==================================================ठुशी
==================================================
==================================================
==================================================
==================================================
सदर फोटो तीन वर्षापूर्वी
सदर फोटो तीन वर्षापूर्वी माझ्या सोनी डिजीकॅमने काढले असल्याने (आणि त्यावेळेस फोटोग्राफीची जास्त आवडही नसल्याने :फिदी:) त्याला DSLR क्वालिटी नाही :). तरी इतर फोटोप्रमाणे हे ही गोड मानुन घ्या.
सही रे.. कोल्हापुरला अजुन
सही रे..
कोल्हापुरला अजुन गेलो नाही पण तुझ्या फोटोतुन बघितल....
कधितरी जायला आवडेल..
अंबाबाई , दिपमाळ, कोल्हापुरी
अंबाबाई , दिपमाळ, कोल्हापुरी साज लय भारी.. पार्श्वनाथ मंदीर रचना सुंदरच... ठूशी एकदम ठुसठूशीत.. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, रंकाळ्याची तहान लई मोठी... कुस्तीचा आखाडा जबरदस्त.. झेंडा आठवला.. शाहू महाराजांचा रुबाब... राजवाड्याचं वैभव.. जबरदस्त..
फक्त काही राहीलं असेल तर..तलवारीची धार, कोल्हापुरची वहाण, तांबडा रस्सा , मोतीबाग तालीम अन शिवाजी चौक राहीलाच की रे.. ...
वा वा छान फोटो !!! मंदिराच्या
वा वा छान फोटो !!!
मंदिराच्या कळसाला पांढरा रंग मारलाय ....काय म्हणावं ह्यांन्ना .....आजही ते पाहिलं की कसंसं च होतं ....
खुप छान, सुंदर आहेत सगळेच
खुप छान, सुंदर आहेत सगळेच प्रचि.
तिथून जवळच रहायला होतो.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ... रंकाळा माझा नेहमीचा स्पॉट होता त्यावेळी
DSLR क्वालिटी नाही<< कहीतरी गैरसमज होतोय २४ तुझा.
ती क्वालिटी DSLR ची क्वालिटी नाही आहे. ती आहे योगेश२४ ची क्वालिटी. त्यामुळे ती इथेही दिसतेच आहे..
छान आहेत प्रचि, पण बरीच
छान आहेत प्रचि, पण बरीच ठिकाणं राहिली ! संध्यामठ, रंकाळ्याजवळचा घाट !!!
तिथून जवळच रहायला होतो. >>
तिथून जवळच रहायला होतो. >> सुन्या तालमीतला वाटत नैस लेका... !
बाकी योगेश फोटोच्या क्लिअॅरीटीबद्दल काहीच वाद नाही. जूने आहेत म्हणून आम्ही समजू शकतो.. आता कोल्हापुरासनं कवा जायचं ते ठरीव .. सुतकाळीच्या ! फक्त जोडीनं जा लवकरच.. आईच्या दर्शनाला..
योगेश.. रकांळ्यावरून पाणी जातं तेव्हा तर तो बघण्यासारखा असतो रे.. रंकाळा पहायचा झाल्यास संध्याकाळी निवांत.. किंवा रात्री.. तसाच सावंत वाडीचा एक तलाव आहे.. वर घाटातून फक्त खळीत अमृत ठेवल्यासारखं अन बाजूनं दिवे राखण करतायेत असं वाटतं.. होय ना रे सुन्या !
यो२४, या नाताळाच्या सुट्टीत
यो२४, या नाताळाच्या सुट्टीत मला कोल्हापुर अन आजुबाजुचा परीसर करायचा आहे, कोणाकडे या परीसराचा नकाशा असल्यास मला naresh_parab@yahoo.com ला मेल कराल काय....
तसेच कोणी पुर्वी गेले असल्यास चार-पाच दिवसाचा प्लान सांगु शकाल काय....
जुना राजवाडा आणि नवा राजवाडा
जुना राजवाडा आणि नवा राजवाडा दिसायला सारखेच आहेत का ? कारण मी फार पुर्वी new palace पाहीलाय तो जुन्या राजवाड्याच्या प्रची सारखाच आहे असे वाटते.
योग्या.. पण युनिवर्सीटीचे
योग्या.. पण युनिवर्सीटीचे फोटो नाही टाकलास..
लेका, जुन्या आठवणींना उजाळा दिलास. खरं त्या आठवनी नाहीतच, कारण त्या साठी विसरावं लागतं.
वा वा जुने दिवस आठवले
वा वा जुने दिवस आठवले
" केजीबी डिटेक्टिव्ह "
" केजीबी डिटेक्टिव्ह " योगेश२४ :-p
फोटो छान आहेत. राजवाड्याचे जास्त आवडले.
सू़की, सावंतवाडीचा तो मोती
सू़की, सावंतवाडीचा तो मोती तलाव. मी खूपवेळा तो रात्री उशीरा आणि पहाटे बघितलाय. नरेंद्र डोंगरावरुन पण तो छान दिसतो.
मायबोलीकर, जूना आणि नवा राजवाडा फार वेगळे आहेत. जून्यामधे राजवाड्यातील अंबाबाईचे देऊळ आहे तर नव्यात वस्तूसंग्रहालय आहे. नव्याचा परिसर बराच मोठा आहे.
गिरीविहार, नकाश्याची गरज नाही. वरच्या फोटोत यादी आणि अंतरे आहेतच. शिवाय कोल्हापूरात कुणीही अगदी व्यवस्थित रस्ता दाखवतात.
सुकी हा आहे रे तो
सुकी
हा आहे रे तो सावंतवाडीचा मोती तलाव...

रात्रीचा फोटो नाही काढला कधी पण तु म्हणतोस तसच काहीतरी वाटतं बघ .
धन्यवाद जुना राजवाडा आणि नवा
धन्यवाद
जुना राजवाडा आणि नवा राजवाडा दिसायला सारखेच आहेत का>>>धन्यवाद मायबोलीकर, न्यु पॅलेसच आहे (ज्यात वस्तुसंग्रहालय आहे) तो चुकुन जुना राजवाडा लिहिले :(. अपडेट केले.
" केजीबी डिटेक्टिव्ह " योगेश२४>>>>बित्तु
दिनेशदा धन्यवाद... चार्-पाच
दिनेशदा धन्यवाद...
चार्-पाच दिवसात कोल्हापुरला मुक्काम करुन काय काय करता येईल...
तसेच एखादे चांगले होटेल सुचवा....
दिनेशदा अन सुन्या धन्स.. !
दिनेशदा अन सुन्या धन्स.. ! "मोतीतलाव" खरोखर सुंदर दिसतो तो तलाव घाट माथ्यावरून रात्रीच्या वेळी.. अन पहाटे इथले फोटो काढण्याचा मोह मला तरी आवरता येणार नाही.. !
शिवाय कोल्हापूरात कुणीही अगदी
शिवाय कोल्हापूरात कुणीही अगदी व्यवस्थित रस्ता दाखवतात.
हो.. आणी तरीही अडचण आलीच तर तुम्हाला पत्त्यावर सोडुन देखील येतील. स्वानुभवावरुन !
योगेश धन्स रे
योगेश धन्स रे
मस्त कोल्हापुरी फेरफटका त्या
मस्त कोल्हापुरी फेरफटका
त्या गंगावेशीत जाऊन लहानपणी पेलाभर धारोष्ण दूध प्यायलं आहे. अर्धा पेलाच संपतो आणि उरलेला संपवावा लागतो. नंतर त्या शुद्ध भारी दुधाची गुंगीच येते.
योगेश, मस्तच रे! आमची
योगेश, मस्तच रे! आमची लेटेस्ट पन्हाळा-ज्योतिबा ट्रीप आठवली.
कोल्हापूरातील राजाभाउची भेळ खाल्लास काय?
राजाभाउअची भेळ .. भवानी
राजाभाउअची भेळ .. भवानी मंडपाजवळ मिळते..
मस्त .. जबरदस्त...
मस्त .. जबरदस्त...
कोल्हापूर माझा वीक पॉईंट ,
कोल्हापूर माझा वीक पॉईंट , त्यामुळे फोटो आवडलेच पण आठवणी सुद्धा जाग्या झाल्या .
-- तुला माझ्याकडून पुन्हा एकदा धपाटे कशाबद्दल मिळतील हे कळले असेलच . 
जाता जाता महत्वाचे
गिरीविहार, विपुत लिहिले
गिरीविहार, विपुत लिहिले आहे.
हा मोती तलाव अगदी रात्री आणि पहाटे, तिथल्या दिव्यांच्या उजेडात मस्त दिसतो. बाजाराच्या दिशेने तिथला सूर्योदय पण मस्त दिसतो. पण सावंतवाडी गावाच्या पश्चिमेला नरेंद्र डोंगर असल्याने, त्या गावातून सूर्यास्त दिसत नाही !!
कोल्हापूरला जावे आणि सोळंकीचे आईस्क्रीम खाऊ नये, हे महापाप !
कोल्हापूरच्या संध्यामठाजवळून संध्याकाळचे दृष्य अप्रतिम दिसते. तिथलेच एक पेंटर, श्री वारंगे, यांनी काढलेले एक सुंदर पेंटींग आमच्याकडे होते.
योगेश मस्तच आहेत सगळे फोटो.
योगेश मस्तच आहेत सगळे फोटो. महालक्ष्मीचा पण असता तर मस्तच.
योगेशभाय, फोटो मस्तच रंकाळा
योगेशभाय,
फोटो मस्तच
रंकाळा इतका स्वच्छ कसा झाला?
योगेश, भवानी मंडपात तासंतास
योगेश,
भवानी मंडपात तासंतास बसून मित्रांशी मारलेल्या गप्पा आठवल्या राव. सहा महिने झाले जाऊन. आता जावसं वाटू लागलयं....
मस्त काढलेस फोटो. ती डिकमल कट्ट्यासह आली असती तर मजा आली असती.
योगेश खरतर तुझि लेखणिहि छान
योगेश खरतर तुझि लेखणिहि छान आहे. प्र.चि. बरोबरच तु त्या त्या फोटोबद्द्ल थोडक्यात माहिति दिलिस तर दुधात साखरचकि. बाकि हे फोटो म्हणजे झ्याकच.
हबा डिकमल म्हणजे काय ? रंकाळा
हबा डिकमल म्हणजे काय ?
रंकाळा आता स्वच्छ केलाय. मधे सगळा जलपर्णीने भरला होता. टनावारी काढली ती.
Pages