मी बघितलेले मालवण जरासे शहरी...बरेचसे ग्रामिण....अन ऐतिहासिक वास्तुचि देणगि लाभलेले एक सुंदर गाव.
माझ्या द्रुष्टितुन पाहिलेले हे गाव माझ्या फोटोग्राफिच्या पहिल्या प्रयत्नातुन येथे सादर करत आहे.
श्री जयंत साळगावकर यांनि बांधलेले हे श्री गणेशाचे मंदिर पुरातन नसले तरी या गावतिल एक महत्वाचे प्रेक्षणिय स्थळ आहे. या मंदिरातिल श्री गणेशाचि हि मुर्ति स्वर्ण मुर्ति आहे.
हे श्री रामाचे मंदिर जेथे श्री रामाचि एकटी मुर्ति आहे... बंधु लक्ष्मण आणि सीतामाई त्यांच्यासोबत नाहित.
हे श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर शिवकालिन असल्याचे तेथिल लोक सांगतात. कौलारु घरासारखे दिसणारे हे मंदिर जरासे दुर्लक्षित असले तरि उत्तम व्यवस्थापनेमुळे ब-याअवस्थेत आहे.
हा सागरी किनारा
ओला सुगंधि वारा...
असेच वर्णन मालवण येथिल या सागर किना-याचे करायला हवे. हा सागर किनारा आणि याच्या लाटांशि झुंज देणारा हा कुरपे बेटावरील सिंधुदुर्ग किल्ला.
शिवरायांच्या वास्तुकलेचा एक उत्तम उदाहरण म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला. शिशाच्या रसात बसविलेले हे दगड आजहि वास्तु स्थापत्याला आवाहन देणारे आहेत. कोणाच्याहि नजरेला प्रथम दर्शनि न पडणारे प्रवेशद्बार हेच आहे.
(बोटितुन फोटो घेतल्यामुळे प्रवेशद्वार नीट दिसत नाहि.
श्री गणेशाचि हि मुर्ति संपुर्णपणे वाळुचि बनलेलि आहे.
किल्ल्यावरील हा सुर्यास्त ... मला आवड्लेला.
Submitted by dineshvs on रवि., 05/11/2008 - 19:59.
मालवण माझे गाव. हे गणेश मंदिर आहे त्या मेढ्यातच आमचे घर आहे, पण गेल्या बर्याच वर्षात तिथे जाता आलेले नाही. देऊळ तर मी अजून बघितलेले नाही. इथे सगळे बघून खुप छान वाटले.
सुरेखच मनमोहक किनारे!
खरच फारच सुन्दर आहे हि जागा,धन्यवाद
मालवणची सहलच घडवुन आणलीत. आभार.
प्रीतीबेन,

सही!
मालवण माझे गाव. हे गणेश मंदिर आहे त्या मेढ्यातच आमचे घर आहे, पण गेल्या बर्याच वर्षात तिथे जाता आलेले नाही. देऊळ तर मी अजून बघितलेले नाही. इथे सगळे बघून खुप छान वाटले.