सदस्य प्रवेश |
साबुदाणा, रविवारची दूपार आणि मीआई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. (अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणाना.) त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा इगोचा प्रश्न असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते. शेजारच्या बांधकामावरचे मजूरही रविवार असल्याने शांतपणे विडीचे झुरके मारत मातीच्या ढिगार्यावर बसले होते. समोरच्या पटेलांची क्रिमा... हे गुज्जु नावं कुठुन शोघतात हा एक प्रश्नच आहे. माझा एक मित्र त्याच्या मुलीचं नाम स्म्लेषा ठेवणार होता. त्याचा अर्थ नाकातील प्रवाही पदार्थ आहे हे सांगितलं आणि मोठ्या कष्टाने त्याने हा बेत बदलला. पण ही क्रीमा आहे बरीक खास हं आता म्हणाला हा काहि प्रश्न आहे का? मस्त ताणून द्यावी, नाहीतर वाचन करत पडावं, नाहितर गाणी ऐकावीत किंवा जालावर येऊन काहितर खरडावं.. पण का कोण जाणे त्या दुपारी मला यापैकी काहि काहि करावसं वाटेना.. अगदी भावाशी भाडावसं देखील!.. मग एकदम माझ्या डोक्यात किडा वळवळला. चला काहितरी खायला करू या! आता माझ्यापुढे प्रश्न होता करायचं काय? म्हणजे मला बरेच पदार्थ येतात आणि त्यातला कोणता बरं करावा अशातला भाग आहे असं समजु नका हं! (आता तुमच्यापैकी कोणाचाही असा समज नाहि आहे हे खरं असलं तरी लोक आपल्याला आहोत त्यापेक्षाही ग्रेट समजताहेत असं माणसाला उगाचच वाटत असतां नाहि!?) माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यातून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो. मी काय करू शकतो याची यादी तशी अगदिच काहि लहान नाहि. चहा नामक भारतीयाची प्राथमिक गरज मी अगदी लीलया पूर्ण करू शकतो. त्याच बरोबर कॉफी, हॉट चॉकलेट, आईस टी आदी पेयेदेखील मी बनवूनही लोक पिऊ शकतात. खाद्यपदार्थांत सँडविच, ऑमलेट अश्या सोप्य सोप्या पदार्थांपसून ते पोहे, उपमा असे कॉप्लेक्स आणि पावभाजी नामक अतिकॉप्लेक्स पदार्थ बनवता येण्याचा दावा मी करतो. पण दुपारचे चहाबरोबरचे खाणे यासाठी यापैकी काहिच फिट बसेना. भावाला विचारल्यावर उपकार केल्याच्या थाटात "तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा! तुला हा पदार्थ नक्की जमेल!" अशी अगदी सदाशिवपेठी कमेंट मारून हा हा हा करून हसून घेण्याशिवाय त्याने काहि केलं नाहि. काहिच सुचेना तेव्हा मी नाईलाजाने घरात काहि रेडीमेड आहे का ते शोधायला लागलो. एका डब्यात तळाला थोडासा साबुदाण्याचा चिवडा होता. दोन घासांत संपला देखील. तोंड मात्र चाळवलं! जालावर रेसिपि वाचली. त्याप्रमाणे एकेक स्टेप करू लागलो. "आता साबुदाणा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळवा आणि टिपकागदावर पसरावा" असं एका ब्लॉगवर वाचलं. तेल तापवलं आणि साबुदाण्याचा मस्तपैकी एक बचका तेलात टाकला. मी पुन्हा सरसावलो. यावेळी साबुदाणा तेलात घालताच एक झाकण त्यावर ठेवलं! काहि क्षणातच आवाज बंद झाला. झाकण उघडून पाहतो तर काय काळेठिक्कर पसलेले साबुदाणे दुप्पट जोराने माझ्याकडे बघून खिदळत होते. आता मात्र हद्द होती. झाकण ठेवावं तर जळणार आणि झाकण काढावं तर उडणार अशी पंचाईत झाली होती. त्यात भावाची भोचक नजर टोचत होती. त्याचं ते मनातल्या मनात खिदळणं समजून अजून चेव येत होता. आता साबुदाण्याचा चिवडा करून खाणं हा प्रेस्टीज इशु बनला होता. आता मात्र हार मानायची नाहि हे नक्की झालं. डोकं वार्याच्या वेगात कल्पना लढवू लागलं. क्षणात डोक्यात वीज चमकली. कपाट उघडलं आणि त्यातून एक जूना गॉगल बाहेर काढला. आता मी साबुदाणा तळात होतो. सगळं स्वयंपाकघर आणि माझी रविवारची दूपार साबुदाणामय झाली होती. तरीही मी साबुदाणा तळला.. डोळ्यावर गॉगल लाऊन!!! .. असा कीचनमधे मनसोक्त बागडत केलेला चिवडा मस्त झाला हे वेगळे सांगणे नलगे! -ऋषिकेश दाभोळकर |
<<माझा एक मित्र त्याच्या मुलीचं नाम स्म्लेषा ठेवणार होता. त्याचा अर्थ नाकातील प्रवाही पदार्थ आहे हे सांगितलं आणि मोठ्या कष्टाने त्याने हा बेत बदलल<<
मस्तच! मजा आली वाचून!
तू केलेला चिवडा ऍटॅच करून पाठवून दे!
छान रे ऋषिकेश

स्वयंपाकाचे पुरूषी अनूभव अगदी
:हहापूवा:
खायला कसा लागला चिवडा. बंधुराजांना दिला की नाही? मस्तच वर्णन.
छान पदार्थ. निदान बघायला तरी मिळावा.
सर्व प्रतिसादकर्त्यां प्रोत्साहकांचे अनेक आभार.
किशोरराव,
हा चिवडा बंधुराजांना चमचाभर दिला. त्याला आवडल्यावर त्याच्यासमोर बसून सगळा संपवला
दिनेशराव,
.. आणि त्यावेळी किचनची अवस्था बघता फोटो न काढणं इष्ट होतं :प
पदार्थ दाखवता येणं कठीण आहे.. केव्हाच संपला
पुन्हा एकदा सार्यांचे आभार
-ऋषिकेश
अ किति छान हसवलस!!