मायबोलीच्या गणेशोत्सवाची जशी मोठे मायबोलीकर वाट बघत असतात तशीच आपली छोटी दोस्तमंडळी म्हणजेच भावी मायबोलीकरही वाट बघत असतात. अहो का म्हणून काय विचारताय? हीच तर वेळ असते ना त्यांना आपले कलागुण जगाच्या कानाकोपर्यापर्यंत दाखवायची. अर्थात मायबोली ही ह्या बच्चेकंपनीला कधी निराश करत नाही. आबालवृद्धांपासूनच सगळेच उत्साहाने सर्व स्पर्धा, कार्यक्रमात सहभागी होतात.
यावर्षी आम्ही या छोट्या मायबोलीकरांकरता स्पर्धा न ठेवता निरनिराळे कार्यक्रम ठेवले आहेत. यात या चिमुकल्यांनी म्हटलेलं गणपतीचं स्तोत्र/गाणं/आरती तसंच बाप्पाचं चित्रं किंवा निबंध असं काहीतरी आमच्याकडे नक्की पाठवा.
कार्यक्रमासंबंधी काही नियम:
१. ह्या कार्यक्रमात फक्त मायबोलीकरांची वय वर्षे १५ पर्यंतची मुलेच भाग घेऊ शकतात. इतर नातेवाईक नाहीत. (पुतण्या, भाचा इ.)
२. कार्यक्रमात भाग घेताना सगळ्या विभागात भाग घेऊ शकतात परंतु एका विभागात फक्त एकदाच भाग घेता येईल. उदाहरणार्थ - एकच निबंध किंवा एकच चित्र.
३. कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे.
४. चित्राबरोबर मुलाचे/मुलीचे संपूर्ण नाव आणि वय लिहावे. ज्यांना आपल्या पाल्याचे संपूर्ण नाव जाहीर करायचे नसेल त्यांनी फक्त पहिले नाव लिहिले तरी चालेल. गाणी/स्तोत्र पाठवताना ऑडिओ फाईल (mp3 फॉरमॅटमध्ये हवी) sanyojak@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी. त्यावर पाल्याचे नाव, वय लिहावे तसेच पालकांचा मायबोली आयडी लिहावा.
५. चित्राचे माध्यम देणे अपेक्षित आहे. (स्केचपेन, वॉटरकलर, पेंटब्रश इ.)
६. चित्र रंगवलेले नसेल तरी चालेल.
७. चित्र काढताना पालकांनी मदत केली असेल तर तसे स्पष्ट लिहावे.
८. गाणी/स्तोत्र/आरती पाठवताना फक्त ऑडिओ स्वरूपातच पाठवावे (फक्त mp3फॉरमॅट मध्येच पाठवा). व्हिडिओ अपेक्षित नाहीत.
९. हे प्रोत्साहनपर कार्यक्रम आहेत, स्पर्धा नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
*****************************************************
कार्यक्रमात भाग घेण्यासाठी काय कराल?
१. आपल्या पाल्याने काढलेले चित्र/निबंध स्कॅन करावे लागेल.
२. "मायबोली गणेशोत्सव २०१०" ह्या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल आणि नविन लेखनाचा धागा उघडावा लागेल. तसेच शब्दखुणा मायबोली, मायबोली गणेशोत्सव २०१०, किलबिल सांस्कृतिक कार्यक्रम ह्या टाका. नंतर धाग्याला सार्वजनिक करा. या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच चित्र/निबंध टाकायचे आहे.
३.स्पर्धेमध्ये चित्र/निबंध पाठवण्यासाठी आपल्याला माझे सदस्यत्व मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' चित्राची/निबंधाची इमेज फाईल अपलोड करावी लागेल. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रुंदी ५०० x ५०० पिक्सेल्स अशी हवी.
४. आता प्रतिसाद देतो त्या चौकटीत चित्राची इमेज अपलोड करा. खाली पाल्याचे नाव आणि वयोगट लिहा.
५. प्रतिसाद तपासून सेव्ह करा.
प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.
या विषयासंदर्भात कोणाला काही
या विषयासंदर्भात कोणाला काही शंका असतील तर संयोजकांना इथेच नक्की विचारा.
चित्रकला किंवा निबंध हेच हवे
चित्रकला किंवा निबंध हेच हवे आहे का? इतर हस्तकला चालणार नाहीत का? उदा. शाळेतून माती देऊन मुलांकडूनच गणपतीची मूर्ती केली जाते. तो आकार गणपतीसारखा दिसत असेल (:)) आणि त्याचे छायाचित्र टाकले तर?
'मुलं' म्हणजे कोण? वयोगट टाकावा. उदा. १२/ १५/ १८ वर्षांपर्यंतची मुलं. इथे मायबोलीकर आई-वडिलही आहेत आणि त्यांची मुलं २५ वर्षांची किंवा त्यापुढचीही आहेत
गाणी कशी अपेक्षित आहेत?
गाणी कशी अपेक्षित आहेत? म्हणजे भक्तिगीते किंव्हा कशी?
आणि गाणे हिन्दीतून पण चालतील का?
वयोमर्यादा काय असणार आहे? ह्यात वयानुसार गट करण्यात येणार आहेत का?
ही स्पर्धा नसल्याने वय वर्षे
ही स्पर्धा नसल्याने वय वर्षे १५ पर्यंतच्या मुलांच्या प्रवेशिका स्विकारल्या जातील, वयोगट असणार नाहीत.
- इतर हस्तकला चालणार आहेत शेवटी हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे. तुमच्या प्रवेशिकेसाठी लागणारी चित्रे/फोटो वगैरे तुम्हाला टाकावी लागणार आहेत.
- कार्यक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने असल्याने गाणी भक्तीगीते/श्लोक अशाप्रकारची असावीत.
हिन्दी गाणी चालतील का?
हिन्दी गाणी चालतील का?
संयोजक, किमान वयोमर्यादा काय
संयोजक, किमान वयोमर्यादा काय आहे यामध्ये भाग घेण्यासाठी?
हिंदी गाणी चालू शकतील पण हा
हिंदी गाणी चालू शकतील पण हा कार्यक्रम गणेशोत्सवांतर्गत असल्याने भक्तिगीतेच असावीत. आणि किमान वयोमर्यादेचं म्हणाल तर तुमचा पाल्य वरीलपैकी कोणत्याही कार्यक्रमात (निबंध/चित्रकला/हस्तकला/श्लोक/आरत्या/भक्तिगीत) सहभागी होण्यासारखा/सारखी असेल तर प्रवेशिका पाठवू शकता.
'मुलं' म्हणजे कोण? वयोगट
'मुलं' म्हणजे कोण? वयोगट टाकावा. उदा. १२/ १५/ १८ वर्षांपर्यंतची मुलं. इथे मायबोलीकर आई-वडिलही आहेत आणि त्यांची मुलं २५ वर्षांची किंवा त्यापुढचीही आहेत>>>>>>>>>
संयोजक, नक्की पाठवणार प्रवेशिका
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
यात या चिमुकल्यांनी म्हटलेलं
यात या चिमुकल्यांनी म्हटलेलं गणपतीचं स्तोत्र/गाणं/आरती तसंच बाप्पाचं चित्रं किंवा निबंध असं काहीतरी आमच्याकडे नक्की पाठवा.
>> हाच आरखडा आहे का? की अजुन डिटेल यायचेत.
प्राजक्ता, हाच अंतिम आराखडा
प्राजक्ता, हाच अंतिम आराखडा आहे. गणपतीचं स्तोत्र/गाणं/आरती, बाप्पाचं चित्रं किंवा निबंध, इतर हस्तकला अशा स्वरुपात प्रवेशिका स्वीकारल्या जातील.
प्रवेशिका कधीपर्यंत
प्रवेशिका कधीपर्यंत पाठवायच्या आहेत?
वत्सला, प्रवेशिका
वत्सला,
प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.
धन्यवाद.
ओके!
ओके!
धन्यवाद संयोजक!
धन्यवाद संयोजक!
ही स्पर्धा नसल्याने वय वर्षे
ही स्पर्धा नसल्याने वय वर्षे १५ पर्यंतच्या मुलांच्या प्रवेशिका स्विकारल्या जातील, वयोगट असणार नाहीत.
>>>>
हा इतर वयोगटातील मुलांवर अन्याय आहे.. त्यांनी निषेध कुठे नोंदवावा?
व्हिडिओ लिंक दिली (यू ट्यूब
व्हिडिओ लिंक दिली (यू ट्यूब ची) तर चालेल का?
आशूडी, संयोजक मंडळातील इतर
आशूडी,
संयोजक मंडळातील इतर सभासदांशी बोलून लवकरच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ.
धन्यवाद
माझी मुलगी ८ वर्षे वयाची
माझी मुलगी ८ वर्षे वयाची आहे.. तिला मी सहज सोप्पी रांगोळी काढायला शिकवली आहे..
तिचा रांगोळी काढतानाचा व्हीडीयो या कार्यक्रमात चालतील का?
suja02: तुमच्या मुलीने
suja02:
तुमच्या मुलीने काढलेल्या रांगोळीचा फोटो चालेल. विडिओ असलेली प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
धन्यवाद!
ऑडिओ घेताय तर व्हिडिओ का नाही
ऑडिओ घेताय तर व्हिडिओ का नाही म्हणे?
नावः- वेधा वय :- २ पुर्ण
नावः- वेधा
वय :- २ पुर्ण (साधारण अडिच)
विषय :- तिने सहज काढुन " मम्मा हा बघ पमकिन " असे डिक्लेअर केले.मला तरी थोडाफार वाटला म्हणुन ईथे टाकत आहे.
खास ईथे देण्यासाठि काढलेला नाही अगदी सहज आम्ही टी व्ही पहात असताना तिने काढुन दिला आणि उद्या पर्यंत तो तिच्या रुम मधे गायब होणार म्हणुन लगेच सेल फोन वर घेतला पिक्चर. त्यामुळे कदाचित जास्त क्लिअर नाही.
रिमझिम, तुमची प्रवेशिका छान
रिमझिम,
तुमची प्रवेशिका छान आहे पण ती नियम क्रमांक २ नुसार वेगळा धागा काढून देणे अपेक्षीत आहे. तेव्हा वर नियमात लिहिल्याप्रमाणे नविन धागा काढा म्हणजे जास्त लोकाना पहाण्यास मिळेल.
धन्यवाद.
वेगळा धागा काढला, पण दिसत
वेगळा धागा काढला, पण दिसत नाही?
रिमझिम, तुमचा धागा सार्वजनिक
रिमझिम,
तुमचा धागा सार्वजनिक झाला आहे.कृपया इथे असलेली तुमची पोस्ट डिलिट करा.
धन्यवाद.
डिलिटायला ऑप्शन दिसत नाहिए
डिलिटायला ऑप्शन दिसत नाहिए
रिमझिम प्रतिसाद संपादित करता
रिमझिम
प्रतिसाद संपादित करता येतो, डीलीट करता येत नाही. संपादन करून सगळा मजकुर काढून तिथे रिकामे पोस्ट ठेवता येते.
मी माझ्या लेकीने क्ले पासून
मी माझ्या लेकीने क्ले पासून बनलेल्या बाप्पाचा फोटो काढून तो किलबिल मध्ये टाकला आहे.
तिने गणपतीचे एक चित्र पण काढल आहे, मी ते पण इथे टाकू शकते का?
.wav फाईल नाही का चालणार?
.wav फाईल नाही का चालणार?
parijat30, मुद्दा क्रं. ४
parijat30, मुद्दा क्रं. ४ मध्ये लिहिल्याप्रमाणे फक्त MP3 फॉरमॅटमध्येच प्रवेशिका स्विकारण्यात येतील.
Pages