सांग गो चेडवा दिसता कसो आंबोलीचो घाट...

Submitted by गिरिश सावंत on 4 August, 2010 - 11:52

01.jpg

आंबोलॉ घाटातुन दिसणार हिरव्या कोकण...

04.JPG

घाटात जय्-थय धबधबेच आसत..

05.JPG07.jpg

मस्त धुक्यात फिरायचा..

06 copy.jpg08.jpg
सांग गो चेडवा दिसता कसो आंबोलीचो घाट !!!

गुलमोहर: 

माका तो आंबोलीच्या घाटातला मुख्य धबधबा बघुचा होता.. त्याचो फोटो कित्या नाय डकवलस हडे ?

बाकी फोटु छान आसत.. Happy

मस्त Happy

झक्कास!

शेवटच्या फोटोतले कुटुंबप्रमुख आपल्या family ला घेऊन असे काही पोझ देऊन बसलेत ना! बहुदा त्यांनी त्यांच्या सौ., एक टीनएजर मुलगी आणि बंड्या यांना सांगितलं असणार की "आता पाऊस पडायला लागलाय तर ते दोन पायांचे प्राणी वेड्यासारखे तो बघायला येतिल. आपण हि वाहत्या पावसात हात धुवून घेऊया.... जरा कट्ट्यावर भांग-बिंग पाडून, तयार होऊन जाउन बसलो तर आपले पण फोटो काढतील ते. तेवढिच फुकटची पब्लिसिटी!" बाकी सौ.ची लाली अंमळ जास्तच लागलेय.

मामी, काय माइंड रिडींग करता हो !

अंबोलीच्या वार्‍या केल्यात. असे फोटो बघून, परत परत जायची इच्छा होते.
गोवा कोल्हापूर मार्गावरचे सातही (पर्यायी ) घाट वैशिष्ठपूर्ण आहेत (अंबोली, फोंडा, करुळ, भूईबावडा, चोर्ला, तिलारी आणि अनमोड )

माका तो आंबोलीच्या घाटातला मुख्य धबधबा बघुचा होता.. त्याचो फोटो कित्या नाय डकवलस हडे ?
----------------
अवो..
ह्या रविवारी कोकणातसुन आंबोलीक जाणारो घाट रस्तोच बंद होतो...
त्या बंद रस्त्याचे फोटो मारुक गेलेलय...

15.JPG16.jpg

म्हाराज्यांनो मान्सान डोंगर फोडले..रस्ते केले...
पन निसगाच्या मनात अशी आगळीक लय दिस रव्हत नाय ...
सुदैवान दरड कोसाळली तेवा थय कोन नव्हातो..
आठ दिस घाट बंद होतो जनतेसाठी...

सावतानु , फोटू मस्तच काढलास हा ! Happy

घाटातलो रस्तो लवकर सुरू होवची चिन्हा नाय हत....

योगी , ह्यो घे रे तो धबधबो...
Image143-1.jpg

मस्त Happy डोळ्याचे पारणे फिटले हिरवाई बघुन
बर, मला जरा कुणी घाटान्ची नावे कन्फर्म करुन सान्गता का? जसे की
१. लोणावळ्यापासचा पुणे मुम्बई रस्त्यावरील घाट तो बोरघाट (उर्फ खण्डाळा- हल्लीचे नाव) (मिळालेले उत्तर)
२. पौडहून पुढे जाऊन माणगावाकडे उतरणारा तो ताम्हीणी घाट
३. वेल्ह्यापासुन पुढे कोकणात उतरणारा (नविन डाम्बरी रस्ता) तो मढे घाट
४. भोर पासून पुढे कोकणात महाडजवळ उतरणारा तो वरन्ध घाट
५. वाई ते महाबळेश्वर - पसरणीचा घाट
६. महाबळेश्वरपासून पुढे कोकणात पोलादपुरजवळ उतरणारा तो आम्बेनळी घाट
७. सातार्‍यातुन, (वाईला वगळून जाण्यासाठी) मेढा मार्गे एक रस्ता (शॉर्टकट) आहे, त्यावर देखिल घाट आहे, कोणता?
८. कोयने पासून पुढे चिपळूणास उतरणारा तो कुम्भार्ली घाट
९. मलकापुर पासुन पुढे कोकणात देवरुख-सन्गमेश्वरात उतरणारा तो .............. कोणता? आम्बा घाट (मिळालेले उत्तर)

या नन्तरचे घाट माहित नाहीत - बघितले नाहीत, गोव्याच्या वाटेवरची फोण्डा घाट वगैरे नावे नुस्ती ऐकुन आहे.
अम्बाघाटानन्तर पण फोण्डाघाटा अलिकडे, दरम्यान आम्बोली घाट आहे का? लोकेशन सान्गा राव! Happy

नाशिक मुम्बई रस्त्यावर कोणता घाट लागतो? = कसारा (मिळालेले उत्तर)

तसेच, महाड्-चिपळूण दरम्यान एक मोठ्ठा घाट लागतो, नाव विसरलोय. = कशेळी (कशेडी) (मिळालेले उत्तर)
बाकी पुणे सातारा दरम्यान कात्रज, अन खम्बाटकी चे घाट माहितीयेत
पुणे नाशिक दरम्यान सहा घाट लागतात, एक चन्दनापुरी घाट, बाकी नावे विसरलो

जरा कुणी अपडेट्स देईल काय?
यातिल बहुतेक घाटातून मी गेलोय, एसटीने अथवा कार्-टूव्हीलरने

खास...

Pages