फ्लोरीडा

फ्लोरीडातले मायबोलीकर


फ्लोरिडा वाल्या मायबोलीकरांचे स्वत:च्या बी बी वर स्वागत असो.



* हा बी. बी. कशाला आणखी एन. जे. चा बी बी होता ना?. * ;)
- अनिलभाई



धन्यवाद शोनु! पण ते रेड कारपेट, किमान गुलाबाच्या पाकळ्या वगैरे काही दिसलं नाही! स्मित
भाई, कित्ती म्हणजे कित्ती टोचून बोलायचं म्हणते मी! फिदीफिदी (तिकडे स्वतंत्र विदर्भ सुध्दा मिळाला! स्मित ) अन फ्लोरिडासाठी हे असं!
ऍडमिन, अमेरिकतल्या मायबोलीकरांचं GTG किंवा 'अधिवेशन' (जास्त भारी वाटतं) फ्लोरिडाला करता येतंय का बघा. मी आहेच! स्मित



*तेवढी ती टिकीटाची, रहाण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था झाली की आम्ही आलोच. :)
- अनिलभाई



खाण्या आणि 'पिण्या'ची सोय आमच्या घरी होईल. (जेवण न आवडल्यास घरामागे अंगणात चूल आहे. अंगणातल्या डबक्यात मासे आहेत. मीठ मसाले मी पुरवीन! स्मित
येताना आपापली 'निद्रा पिशवी' घेऊन यावी. घरात झोपायला जागा न पुरल्यास घराभोवती अंगण आहे. बाजुलाच मल्टिपरपज जंगल देखिल आहे, नदीसगट! फिदीफिदी
तिकिटाचं? ते फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स काढा बघु वापरायला! स्मित



>आमच्या घरी होईल
म्हणजे कुठल्या गावाला? पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात कामानिमित्त फ्लोरीडाला चक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकिटाची आणि झोपण्याची चिंता नाही.



अजय, मी 'ओव्हीडो' (Oviedo) ला असते. डिस्ने (ओरलँडोपासून) पासून ३५ मैलांवर. नक्की घरी या. सहकुटुंब येणार असाल तर सगळ्यांना आमंत्रण देतेय. फोन नंबर, पत्ता पाठवते.



धन्यवाद. मी आलो तर तुमच्यापासून थोडा लांब येणार आहे. पाम बीच च्या पश्चिमेला आणि एकटाच येईन. बघुया काही तरी भेटायला जमवायचं. जरा नक्की झालं की कळवतो.



नमस्कार,

मी इथे नविन आहे, इथे मराठी लोकान्चा कुठला ग्रुप आहे का?
माला नक्कि सान्गा.

तुमचा,
अम्बरीष ....



अंबरीष, तुम्ही कुठे असता? सेंट्रल फ्लोरिडा (ओरलँडो, ऑविडो, लेक मेरी, विन्टर स्प्रिन्ग्ज, विन्टर पार्क वगैरे) चं बरंच मोठं म. मं. आहे. इथवर यायची तयारी असेल तर बघा. स्मित



मी सध्या टाम्पा मधे आहे. इथे मला जास्त मराठी लोक दिसले नाही. ओर्लन्डो दूर पडेल ना. म्हणजे तस मला अजुन सगळच नविन आहे. क्रुपया तुम्हिच सुचवा...

तुमचा,
अम्बरीष ....



मृण्मयी ...
बाराच्या एवेएठिला (७ जून) येणं जमत असेल तर पहा ... आता आमच्यकडेही ऊन दिसायला लागलंय म्हटलं स्मित
---------
आमच्या घरी मिकी, मिनी आणि इतर सवंगडी ... दिवस-रात्र दूरदर्शन देतात !! आदित्य (आमचे चिरंजीव!!) तीन वर्षांचा होईल ह्या महिन्यात. त्यामुळे येत्या वर्षभरात फ्लोरिडा दर्शन घडवावे लागेलसं दिसतय.
येण्याआधी जरूर कळवू स्मित
----------------
संदीप
www.atakmatak.blogspot.com



संदीप, आमंत्रण पोचलं! धन्यवाद! नेहमी मी फक्त प्लॅन्स करत असते येण्याचे. जमेल तेव्हा खरं! स्मित
१० जुलैच्या वीक एंडला डी सी त आहे. येता का एनजे आणि शिट्टीकरांनो? तेव्हा लालुला भेटीन म्हणते. (रुनी आहेस का गं?)
आदित्यला वाढदिवसाचे शुभाशिर्वाद! खरा स्मित मिकी आणि मिनी बघायला नक्की आणा त्याला. आत्ता मे महिन्यात आलात तर जास्त बरं. मग मात्र उन्हाळा तापतो. नाहीतर एकदम नव्हेंबर -डिसेंबर! पिल्लु ऍनिमल किंगडम, मॅजिक किंगडम एन्जॉय करेल. वॉटर पार्क्स (आता तर नवाकोरा ऍक्वाटिका) पण छान आहेत. घरी येण्याचं नक्की ठरवा.
झक्की, झाली का तयारी डिस्नेवारीची?



मंडळी,
मायबोलीच्या टी-शर्ट तसेच टोपीची विक्री चालू झाली आहे.
अधिक माहितीसाठी इथे पहा व लवकर आपापली ऑर्डर बुक करा...
धन्यवाद,
टी-शर्ट समिती